पूर्वी या विषयावर मिसळपाव वर चर्चा झाली आहे. त्यावेळी लिखाणात काहीच आक्षेपार्ह नाही असे सर्वांचे म्हणणे पडले होते.
आता यादव यांनी मागे घेतलेले पुस्तकही प्रसिद्ध करावे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
चालायचेच भटोबा ,
शहाण्याने ह्यांच्या नादी लागु नये ...
"... तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥ "
( हे आपले उगीचच, चालायचेच .. )
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
मला एकदम 18 Mar 2009 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला एकदम आशा भोसलेंनी गायलेलं गाणं आठवलं, (कवी कोण आठवत नाही)
पंढरीनाथा झडकरी आता
पंढरी सोडून चला विनवते रखुमाई विठ्ठला ...
... विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
ह्या सर्व प्रकरणात वारकरी आपली सहानुभूती आणि दर्जा घालवून बसलेत.....
यांचा बोलविता धनी कोण आहे ते समोर आले पाहीजे. कदाचीत अ.भा.म्.सा.स. ला खो घालण्यासाठी विद्रोहीवाले सुध्धा असु शकतील याच्या मागे.
"ज्या" वाक्यान्मुळे वारकरी सम्प्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या, ती वाक्ये (पुरावा) येथे टाकल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद! :)
आनन्द यादवांच्या आधीच्या कादंबर्यांचा, लघुकथांचा संदर्भ लक्षात घेता.... त्यातील अनेक "बहकाऊ"(जशीच्या तशी किन्वा त्या टाईपची) वाक्ये "संतसूर्य तुकाराम" मध्ये टंकित झालेली आहेत.
उद्दाम तारुण्याच्या भरात खूप वाहावत गेलो, दारूड्यान्ची संगत, जुगाराचा अड्डा, बदफैलीपणा, बाईच्या भानगडी इ. इ. सगळ्या कपोलकल्पित गोष्टी संत तुकारामांच्या स्वच्छ चरित्रामध्ये घुसडून आनन्द यादवांनी खरंच तुकारामांच्या चारित्र्यावर शिन्तोडे उडवलेले आहेत. जे की, प्रत्यक्षात "तुकाराम" हे वरील सर्व गोष्टींपासून दूर होते.
'यादवां'सारखे लेखक हे प्रणयकथा, ग्रामीण कथा, सामान्य स्त्री जीवनाचे पैलू, इ... विषय उत्तमरीत्या फुलवू शकतात.. पण त्या काल्पनिक कथांमधले दाखले "देहू गाव आणि तुकारामांचे चरित्र" यान्च्याशी जोडून "यादव" यांनी घोडचूक केलेली आहे.
त्यामुळे नाईलाजाने का होईना, पण त्यांनी साहित्यसम्मेलनाच्या "अध्यक्षपदाचा" राजीनामा दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनन्दन करते. :)
|| ज्ञानदेवे रचला पाया| तुका झालासे कळस||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
>>उद्दाम तारुण्याच्या भरात खूप वाहावत गेलो, दारूड्यान्ची संगत, जुगाराचा अड्डा, बदफैलीपणा, बाईच्या भानगडी इ. इ. सगळ्या >>कपोलकल्पित गोष्टी संत तुकारामांच्या स्वच्छ चरित्रामध्ये घुसडून आनन्द यादवांनी खरंच तुकारामांच्या चारित्र्यावर शिन्तोडे >>उडवलेले आहेत. जे की, प्रत्यक्षात "तुकाराम" हे वरील सर्व गोष्टींपासून दूर होते.
सहमत आहे. अगदी बरोबर आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
वाल्मिकी हा पूर्वी दरोडेखोर होता व नंतर नारदांच्या उपदेशाने सुधारला अशी कथा आपण नेहमी ऐकतो.
तुकाराम हे अगोदरच्या काळात तितकेसे ईश्वररत नव्हते व नंतर त्यांना उपरती झाली असे यादवांनी लिहिले आहे असेच दिसते. मग वाल्मिकी बद्दल असे लिहिलेले चालते तर तुकारामाबद्दल का नाही?
'तुकाराम कसले संतसूर्य ? ते तर अमुक, तमुक असल्याच गोष्टी करीत असत.' अशा अर्थाचे यादवांनी काही लिहिलेले नाही.
हा नसलेला इश्यू उगाच विपर्यास करून वाढवला गेला असे मला वाटते.
अवांतरः तुकाराम आधीच्या काळात खरेच तसे वागत होते की नव्हते ते मला माहीत नाही. ते तसे वागत होते हा यादवांचा शोध खरा आहे असे समजून प्रतिसाद दिला आहे.
हा एक महत्त्वाचा भाग....
त्यावर बर्याच संशोधक लेखक मंडळींनी हे असत्य असल्याचे लिहिले आहे...
ते असो .. म्हणजे इथेही यादवांच्या बाजूने बोलायला मला फारसे सापडत नाही.
लेखनाचा दर्जा
ही जी काही तीन चार पाने वाचली, ती मला तरी सुमार वाटली... आणि ते उल्लेख अगदीच अनावश्यक वाटले.
____________________
पण त्यांच्या राजीनाम्यानंतरही अध्यक्ष कोण असावा आणि कसा असावा हे वारकरी ठरवणार हे पाहून भरपूर मौज वाटली...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
हे म्हणजे अगदी कहरच झाला म्हणायचा!!... :)
पण त्यांच्या राजीनाम्यानंतरही अध्यक्ष कोण असावा आणि कसा असावा हे वारकरी ठरवणार >>>>>
हे हे हे हे.... कठीण आहे सगळेच:)..पांडुरंगा वाचव आता तुच!!
प्रतिक्रिया
17 Mar 2009 - 9:38 pm | मराठी_माणूस
दुर्दैवी घटना
17 Mar 2009 - 10:35 pm | स्वामि
प्रवरानगरच्या साहित्य संमेलनात ब्राम्हण अध्यक्ष नको म्हणुन गोंधळ घालणारा हाच तो यादव.आपल्या पुस्तकांतुन ठाइठाइ जातिवाचक विधानं करणारा हाच तो यादव.
18 Mar 2009 - 4:41 pm | मृगनयनी
यावेळी, बहुधा ब्राह्मणांचे शाप लागलेले दिसतायेत!
;) ;) ;) ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
17 Mar 2009 - 10:39 pm | नितिन थत्ते
पूर्वी या विषयावर मिसळपाव वर चर्चा झाली आहे. त्यावेळी लिखाणात काहीच आक्षेपार्ह नाही असे सर्वांचे म्हणणे पडले होते.
आता यादव यांनी मागे घेतलेले पुस्तकही प्रसिद्ध करावे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
17 Mar 2009 - 10:50 pm | स्वामि
ज्यांना आपल्या 'बहुमुल्य'चर्चेचा लाभ घेता आला नाही त्या बहुतांश अशिक्षित वारकरी बांधवांशी आपले काहीच सोयरे-सुतक दिसत नाही.
18 Mar 2009 - 9:08 am | अमोल केळकर
संमेलन अध्यक्षपदाचा राजिनामा देण्यापर्यंत हे प्रकरण जाईल असे वाटले नव्हते.
असो. लोकशाही आहे ( आणि आता निवडणूक ही आहे )
यादव साहेब पुढील संमेलनात व्हा अध्यक्ष !!
आणि हो तोपर्यंत कुठल्याही संतांवर पुस्तक / कादंबरी न लिहिण्याची काळजी घ्या
बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल !!!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
18 Mar 2009 - 9:17 am | घाटावरचे भट
>>बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल !!!
खरंय. तो विठ्ठलसुद्धा हरलाय या लोकांपुढे....
18 Mar 2009 - 9:24 am | छोटा डॉन
चालायचेच भटोबा ,
शहाण्याने ह्यांच्या नादी लागु नये ...
"... तुका म्हणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥ "
( हे आपले उगीचच, चालायचेच .. )
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
18 Mar 2009 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला एकदम आशा भोसलेंनी गायलेलं गाणं आठवलं, (कवी कोण आठवत नाही)
पंढरीनाथा झडकरी आता
पंढरी सोडून चला विनवते रखुमाई विठ्ठला ...
... विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
18 Mar 2009 - 12:52 pm | कवटी
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला?
ह्या सर्व प्रकरणात वारकरी आपली सहानुभूती आणि दर्जा घालवून बसलेत.....
यांचा बोलविता धनी कोण आहे ते समोर आले पाहीजे. कदाचीत अ.भा.म्.सा.स. ला खो घालण्यासाठी विद्रोहीवाले सुध्धा असु शकतील याच्या मागे.
पण पत गेली ती वारकर्यांची हे नक्की.
कवटी
18 Mar 2009 - 4:09 pm | दिपक
त्यात यादवांच्या पुस्तकाचे स्कॅन केलेले उतारे होते..
18 Mar 2009 - 5:50 pm | मृगनयनी
दीपक' जी,
"ज्या" वाक्यान्मुळे वारकरी सम्प्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या, ती वाक्ये (पुरावा) येथे टाकल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद! :)
आनन्द यादवांच्या आधीच्या कादंबर्यांचा, लघुकथांचा संदर्भ लक्षात घेता.... त्यातील अनेक "बहकाऊ"(जशीच्या तशी किन्वा त्या टाईपची) वाक्ये "संतसूर्य तुकाराम" मध्ये टंकित झालेली आहेत.
उद्दाम तारुण्याच्या भरात खूप वाहावत गेलो, दारूड्यान्ची संगत, जुगाराचा अड्डा, बदफैलीपणा, बाईच्या भानगडी इ. इ. सगळ्या कपोलकल्पित गोष्टी संत तुकारामांच्या स्वच्छ चरित्रामध्ये घुसडून आनन्द यादवांनी खरंच तुकारामांच्या चारित्र्यावर शिन्तोडे उडवलेले आहेत. जे की, प्रत्यक्षात "तुकाराम" हे वरील सर्व गोष्टींपासून दूर होते.
'यादवां'सारखे लेखक हे प्रणयकथा, ग्रामीण कथा, सामान्य स्त्री जीवनाचे पैलू, इ... विषय उत्तमरीत्या फुलवू शकतात.. पण त्या काल्पनिक कथांमधले दाखले "देहू गाव आणि तुकारामांचे चरित्र" यान्च्याशी जोडून "यादव" यांनी घोडचूक केलेली आहे.
त्यामुळे नाईलाजाने का होईना, पण त्यांनी साहित्यसम्मेलनाच्या "अध्यक्षपदाचा" राजीनामा दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनन्दन करते. :)
|| ज्ञानदेवे रचला पाया| तुका झालासे कळस||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
18 Mar 2009 - 6:08 pm | llपुण्याचे पेशवेll
>>उद्दाम तारुण्याच्या भरात खूप वाहावत गेलो, दारूड्यान्ची संगत, जुगाराचा अड्डा, बदफैलीपणा, बाईच्या भानगडी इ. इ. सगळ्या >>कपोलकल्पित गोष्टी संत तुकारामांच्या स्वच्छ चरित्रामध्ये घुसडून आनन्द यादवांनी खरंच तुकारामांच्या चारित्र्यावर शिन्तोडे >>उडवलेले आहेत. जे की, प्रत्यक्षात "तुकाराम" हे वरील सर्व गोष्टींपासून दूर होते.
सहमत आहे. अगदी बरोबर आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
18 Mar 2009 - 4:44 pm | विसोबा खेचर
तुकोबांबदल उलटसुलट लिहिणार्या यादवांची कीव करावी तेवढी थोडीच!
तात्या.
18 Mar 2009 - 4:48 pm | सुनील
संत तुकारामांची तथाकथित बदनामी करणारे हे उतारे यापूर्वीही मिपावर आले होते आणि त्यावर चर्चाही झाली होते. हा बघा दुवा.
सदर उतार्यांमधून तुकारामांची कोणत्याही प्रकारे बदनामी होते असे मिपाकरांस त्यावेळी वाटले नव्हते, कारण ते खरेच आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Mar 2009 - 5:03 pm | विसोबा खेचर
सदर उतार्यांमधून तुकारामांची कोणत्याही प्रकारे बदनामी होते असे मिपाकरांस त्यावेळी वाटले नव्हते,
त्या मिपाकरात मी नव्हतो. तेव्हा 'मिपाकरांस वाटले नव्हते' असे म्हणण्याऐवजी 'काही मिपाकरांस वाटले नव्हते' असे म्हणणे योग्य ठरेल..
असो,
तुकोबांसारख्या सूर्यावर थुंकणार्या यादवांचा जाहीर निषेध...!
आपला,
(वारकरी) तात्या.
18 Mar 2009 - 6:10 pm | नितिन थत्ते
वाल्मिकी हा पूर्वी दरोडेखोर होता व नंतर नारदांच्या उपदेशाने सुधारला अशी कथा आपण नेहमी ऐकतो.
तुकाराम हे अगोदरच्या काळात तितकेसे ईश्वररत नव्हते व नंतर त्यांना उपरती झाली असे यादवांनी लिहिले आहे असेच दिसते. मग वाल्मिकी बद्दल असे लिहिलेले चालते तर तुकारामाबद्दल का नाही?
'तुकाराम कसले संतसूर्य ? ते तर अमुक, तमुक असल्याच गोष्टी करीत असत.' अशा अर्थाचे यादवांनी काही लिहिलेले नाही.
हा नसलेला इश्यू उगाच विपर्यास करून वाढवला गेला असे मला वाटते.
अवांतरः तुकाराम आधीच्या काळात खरेच तसे वागत होते की नव्हते ते मला माहीत नाही. ते तसे वागत होते हा यादवांचा शोध खरा आहे असे समजून प्रतिसाद दिला आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
19 Mar 2009 - 12:17 am | भडकमकर मास्तर
सत्य की असत्य?
हा एक महत्त्वाचा भाग....
त्यावर बर्याच संशोधक लेखक मंडळींनी हे असत्य असल्याचे लिहिले आहे...
ते असो .. म्हणजे इथेही यादवांच्या बाजूने बोलायला मला फारसे सापडत नाही.
लेखनाचा दर्जा
ही जी काही तीन चार पाने वाचली, ती मला तरी सुमार वाटली... आणि ते उल्लेख अगदीच अनावश्यक वाटले.
____________________
पण त्यांच्या राजीनाम्यानंतरही अध्यक्ष कोण असावा आणि कसा असावा हे वारकरी ठरवणार हे पाहून भरपूर मौज वाटली...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Mar 2009 - 10:38 am | केदार_जपान
हे म्हणजे अगदी कहरच झाला म्हणायचा!!... :)
पण त्यांच्या राजीनाम्यानंतरही अध्यक्ष कोण असावा आणि कसा असावा हे वारकरी ठरवणार >>>>>
हे हे हे हे.... कठीण आहे सगळेच:)..पांडुरंगा वाचव आता तुच!!
-----------------------
केदार जोशी