ग्लोबल वॉर्मिंग (देवद्वार छंद)

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जे न देखे रवी...
16 Mar 2009 - 7:02 pm

पाहता पाहता
काळ दारी आला
सारी वसुंधरा
संकटात….१

ऊतले मातले
गर्वात नाचले
बेफाम वागले
सान थोर….२

वाहनांची रीघ
जणू पाठशिव
हवेचाच जीव
घुसमटे….३

यंत्रांचा निघाला
धूर काळा काळा
प्लॅस्टिकचा मळा
त्यात फुले….४

विज्ञानाने केली
आपली प्रगती
आणि अधोगती
आपणच….५

पाहू एक स्वप्न
करूया प्रयत्न
जपूया हे रत्न
पृथ्वी नामे….६

कापडी पिशवी
प्लॅस्टिक ऐवजी
जमे ही सहजी
सुरूवात….७

मोटार गाडीला
ठेवुनी बाजूला
पायी पायी चला
शक्य तेव्हा….८

लावू झाडे, वृक्ष
माळरानी रूक्ष
मुलांचे भविष्य
तगवाया…. ९

कविताविचार

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

16 Mar 2009 - 7:05 pm | लिखाळ

मस्त :)

हवेचाच जीव
घुसमटे….३
वा वा ...
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Mar 2009 - 9:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हवेचा जीव घुसमटण्याची कल्पना आवडली.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बेसनलाडू's picture

16 Mar 2009 - 11:05 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

मराठमोळा's picture

16 Mar 2009 - 7:23 pm | मराठमोळा

आवडली कविता.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Mar 2009 - 7:24 pm | llपुण्याचे पेशवेll

सुंदर कविता. खरोखर अप्रतिमच.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

चतुरंग's picture

16 Mar 2009 - 7:25 pm | चतुरंग

हवेचा जीव कल्पना आवडली! :)

काही ठिकाणच्या यमकात थोडे प्रदूषण आहे ;) उदा.

कापडी पिशवी
प्लॅस्टिक ऐवजी
जमे ही सहजी
सुरूवात

ऐवजी असे केले तर -

कापडी पिशवी
प्लॅस्टीक का हवी?
सदा वापरावी
हातोहात!

चतुरंग

लिखाळ's picture

16 Mar 2009 - 7:34 pm | लिखाळ

प्रकाटाआ :)

-- लिखाळ.

विकास's picture

16 Mar 2009 - 7:36 pm | विकास

फारच छान कविता.

मला वाटते हे काव्य अधिक लोकांपुढे जायला हवे. शक्यतोवर सकाळला पाठवा.

संदीप चित्रे's picture

16 Mar 2009 - 7:39 pm | संदीप चित्रे

सकाळच्या 'पैलतीर'साठी आधीच पाठवले आहे.

धनंजय's picture

16 Mar 2009 - 7:39 pm | धनंजय

छान.

(पण कवितेतून सामाजिक बदल सुचवताना प्रचारकी ढंग टाळणे फार कठिण असते ते जाणवले. "शेवटाची कडवी मी वेगळी कशी लिहिली असती" असा विचार करता, माझ्यापाशी सुचवणी नाही. तरी सरकारी कवितांमध्ये आणि तुमच्यासारख्यांच्या समर्थ कडव्यांमध्ये आणखी गुणात्मक फरक असावा, असेही वाटते.)

श्रावण मोडक's picture

16 Mar 2009 - 11:03 pm | श्रावण मोडक

मूळ मत आणि कंसातील मजकुराशी सहमत.
अवांतर - विज्ञानाने केली, आपली प्रगती, आणि अधोगती, आपणच….५ - हे मला न उलगडलेले कोडे आहे. कायमचेच. विज्ञान आणि प्रगती-अधोगती यात आपण नेहमी विज्ञान माणसापासून वेगळे कल्पितो. प्रत्यक्ष ते तसे आहे का? तसे असेल तर प्रगतीचा दाता विज्ञान आणि अधोगतीचे निर्माता माणूस हे मान्य करावे लागेल. पण तसे नसेल तर... तर या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतात. बाजू दोन आहेत म्हणून नाणी दोन ठरत नाहीत. लिन व्हाईट यांच्या 'द हिस्टॉरिकल रूट्स ऑफ अवर इकॉलॉजिकल क्रायसीस'ची नेहमी आठवण होते. त्यातील ख्रिश्चनिटीवरची टीका बाजूला ठेवून वाचल्यावर तर माणसाचा प्रभुत्त्वाचा सोस अधोरेखीत होत जातो. असो. हे अवांतरच आहे.

मुक्तसुनीत's picture

17 Mar 2009 - 8:31 am | मुक्तसुनीत

कविता आवडलीच.
मात्र श्री. मोडक यांचे विवेचन विशेष आवडले.

चकली's picture

16 Mar 2009 - 7:42 pm | चकली

कविता आवडली. वेगळा विषय..
चकली
http://chakali.blogspot.com

मदनबाण's picture

16 Mar 2009 - 7:47 pm | मदनबाण

कविता आवडली...

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

क्रान्ति's picture

16 Mar 2009 - 9:52 pm | क्रान्ति

हवेचा जीव घुसमटतोय, खरच एकदम सही कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

16 Mar 2009 - 9:56 pm | प्राजु

कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 10:30 pm | भडकमकर मास्तर

वेगळी मस्त कविता...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

16 Mar 2009 - 10:44 pm | शितल

संदिप,
कवितेचा विषय छान निवडला आहेस.
कविता छानच :)

चन्द्रशेखर गोखले's picture

16 Mar 2009 - 10:44 pm | चन्द्रशेखर गोखले

मस्त कविता अन चांगला प्रयत्न !!

शब्द बापुडे's picture

17 Mar 2009 - 8:18 am | शब्द बापुडे

आज याची तीव्र गरज आहे. अत्यंत उत्तम कविता तीही छदोबद्ध. छान.
*चिरविजयी*

सहज's picture

17 Mar 2009 - 8:29 am | सहज

कवीता अतिशय आवडली.

मिपाकरांनी संदेश म्हणुन तुमच्या नावसकट पाठवली तर हरकत नसावी ना?

संदीप चित्रे's picture

18 Mar 2009 - 5:15 pm | संदीप चित्रे

>> मिपाकरांनी संदेश म्हणुन तुमच्या नावसकट पाठवली तर हरकत नसावी ना?
उलट आनंदच होईल :)

बाकरवडी's picture

17 Mar 2009 - 7:46 pm | बाकरवडी

देवद्वार छंद मस्तच

कविता आवडली.

जयवी's picture

17 Mar 2009 - 1:33 pm | जयवी

संदीप......एकदम जबरी झालीये रे....... फार फार आवडली :)
येऊ द्या अजून.

बाकरवडी's picture

17 Mar 2009 - 7:47 pm | बाकरवडी

.