(होळीचे औचित्य साधून,मिपावरील एक नव कवी तुषार शिंतोडे ह्यांची एक ज्वलंत कविता (म्हणजे ज्वलंत प्रतिसाद मिळवणारी कविता ) फॉलो करण्याचा एक प्रयत्न. ह्या प्रयत्नांमागे कुणालाही दुखावण्याचा किंवा सुखावण्याचा कुठलाही अंत्यस्थ (का अस्वस्थ) हेतू नाही. कृपया हलक्याने घ्यावे. )
------------------------------------------------------------------------------------
आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई
.
राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन 'कमोड' निघाला
.
ते पोर गुळांबी , जणू रानतल अळंबी
मन मह्ये बोन्साय हे खुळांबी झाले
.
छळ छळ छळीता काव्य धारा गळीता
जणू तमाखू मळीता होय भुई थोडी पळीता
.
थांब ना वासू जरा थांब ना वासू
अरे अश्या कविता पाडणे गून्हा आहे
आज जरी तुला टाळल तरी
भोग हा माझ्या नशीबी पून्हा आहे.
.
श्री तुषार शिंतोडे
(नवकविंच्या भय कवितांमधून एक झलक. मूळ संग्रह गेल्या होळीत भस्मसात )
------------------------------------------------------------------------------------
प्रतीक्रीया :
.
प्रेषक दूतोंडी ११ मार्च २००९ - ०७-२६
वा वा सुरेख कविता. दिवसाची आल्हाददायी सुरूवात (|:
.
प्रेषक सुकांता ११ मार्च २००९ - ०७-३२
खासच. विशेषत: २ आणि ४ फारच आवडल @)
.
प्रेषक गणपुले ११ मार्च २००९ - ०७-४२
एक प्रामाणिक प्रयत्न
.
प्रेषक तिरसट ११ मार्च २००९ - ०७-४९
एक तर सकाळी सकाळी बस चुकली आणि त्याय आयला हे असल दळभद्री काव्य वाचायला लागतय X(
.
प्रेषक बाष्कळ ११ मार्च २००९ - ०७-५७
प्रयत्न चांगलाय. पण तरीही मला कवितेच अधिक विवेचन करुन घ्यायला आवडेल
उदा: राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन कमोड निघाला >>>>
ह्यात कवी स्वत: सिंहसनावर बसतो इतरांना तुच्छ लेखतो असा अर्थ अभिप्रेत आहे. पण केवळ ओळी मीटर मध्ये बसण्या साठी कवीने स्वत : कमोड वर बसावे हे पटत नाही
यात श्लेष 'कमोड' वर न असता 'सिंहासना' वर असायला हवा होता
तसेच ...
आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई>>>
'समीकक्षकांचा' हा शब्द विशेष आवडला. :)
.
प्रेषक डांबरट ११ मार्च २००९ - ०८-३३
ह्यात कवी स्वत: सिंहसनावर बसतो इतरांना तुच्छ लेखतो असा अर्थ अभिप्रेत आहे. पण केवळ ओळी मीटर मध्ये बसण्या साठी कवीने स्वत : कमोड वर बसावे हे पटत नाही >>>>>> =))
.
प्रेषक पळसुले ११ मार्च २००९ - ०८-४८
एक प्रामाणिक प्रयत्न :)
.
प्रेषक डांबरट ११ मार्च २००९ - ०८-५७
अहो गणपुले/ पळसुले : नाव बदलत किमान पक्षी प्रतिसाद तरी बदला =))
.
प्रेषक हिरवा ११ मार्च २००९ - ०९-३७
मला कविता बिलकूल पचली नाही. प्रयत्न तोकडा पडलाय :S
.
प्रेषक मानसकन्या ११ मार्च २००९ - ०९-५१
अय्या. ती चिन्ह कशी द्यायची कळेल का ?
.
प्रेषक मी मराठी, तू मराठी ? ११ मार्च २००९ - १०-१२
अहो मानसकन्या चिन्हे देण्यासाठी ह्या पानाच्या सुरूवातीला स्मायली असा तक्ता आहे तो वापरा
मला २ कडव हे बिलकूल आवडल नाहीये. विशेषतः 'कमोड' हा शब्द खटकला. त्या ऐवजी 'परस' हा शब्द वापरला असता तर कविता अधिक मराठी झाली असती. अर्थात हे माझ स्वतःच खाजगी अस वैयक्तीक मत झाल.
.
प्रेषक डांबरट ११ मार्च २००९ - ११-०७
हे माझ स्वतःच खाजगी अस वैयक्तीक मत झाल >>>> =))
.
प्रेषक मी मराठी, तू मराठी ? ११ मार्च २००९ - ११-३७
डांबरट : दूसर्याचे प्रतिसाद डकवून त्यावर हास्य करण्यापेक्षा स्वतःची बुद्द्धी वापरून काहीतरी लिहा X(
.
प्रेषक डांबरट ११ मार्च २००९ - ११-४४
अहो 'परस' काय किंवा 'कमोड' काय भावना समजून घ्या ना =))
.
प्रेषक मानसकन्या ११ मार्च २००९ - ११-५७
:O
=D>
>:)
अय्या. कधी पासून प्रयत्न करतेय चिन्ह द्यायचा आत्ता कुठेशी जमतय . :D
.
प्रेषक तुषार शिंतोडे ११ मार्च २००९ - १२-००
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
माझ्या पुढच्या काव्य झुरळात मी अधिक काटेकोर प्रयत्न करेन :)
.
प्रेषक दूतोंडी ११ मार्च २००९ - १२-०२
प्रयत्न फसलाय :(
.
प्रेषक डांबरट ११ मार्च २००९ - १२-२६
माझ्या पुढच्या काव्य झुरळात मी अधिक काटेकोर प्रयत्न करेन >>>>
अरे बापरे
(वर वापरलेल्या व्यक्तीरेखेचे नाव चुकून मिपावरील एखाद्या व्यक्तीरेखेच्या नावाशी जुळत असेल तर तो एक निव्व़ळ योगयोग समजावा)
------------------------------------------------------------------------------------
चु भू द्या घ्या
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा ... तुमची कविता तर भारी आहेच पण त्यावरचे "प्रतिसाद" तर त्याहून इरसाल आहेत. तुषार शिंतोडे काय, गेल्या होळीत भस्मसात काय .... =)) =))
आता या कविता आणि/किंवा प्रतिसादांची एक लिखाळ-समीक्षा वाचायलाही आवडेल.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
15 Mar 2009 - 12:19 pm | अवलिया
जबरदस्त... मालक, तुम्ही फक्त नावानेच मुखदुर्बळ आहात,
पण जे काय लिहिले आहे ते ज ब रा!!!
=))
येव द्या अजुन... शिमगा अजुन चालुच आहे.... वह्या अजुन जळतच असतीलऽ.. :)
--अवलिया
15 Mar 2009 - 12:21 pm | नाना बेरके
(नवकविंच्या भय कवितांमधून एक झलक. मूळ संग्रह गेल्या होळीत भस्मसात )
मस्त रे !
अहो, ह्या झुरळांच्यामागेसुध्दा कुठलेतरी विडंबनाच्या काव्यपाली सोडतील, त्याला प्रतिपाली मिळतील.
व्यक्तिगत उल्लेख असल्यामुळे प्रतिसाद संपादित. -- अदिती
15 Mar 2009 - 12:26 pm | किट्टु
=)) वाचुन मजा आली. छान जमलय.
15 Mar 2009 - 12:44 pm | प्रमोद देव
प्रकार नाविन्यपूर्ण आहे आणि तो आवडलाही.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
15 Mar 2009 - 12:54 pm | अनंता
छानच फिरकी घेतलीय कम्पुबाजांची.
बाझवला साला.
अवांतर : पुढिल लेखनापूर्वी सावध करतो.
तुम्ही प्रतिसादातून बरेच 'मित्र' गोळा केलेत.
'तेव्हा' भोगा आपल्या कर्माची फळं ;-)
15 Mar 2009 - 2:55 pm | मनीषा
व्याख्या :
(न)/(अ) काव्य झुरळ = झुरळाने , झुरळांसाठी प्रसवलेले (उडवलेले हा शब्द जास्त बरा वाटतोय का?), झुरळ्सदृष्य ... नाही नाही (न)काव्य सदृष्य शिंतोडे .
15 Mar 2009 - 3:29 pm | सुनील
मजा आली. प्रेषकांची नावे देताना किंचित नामसाधर्म्य दाखवले असतेत तर अधिक मजा आली असती!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Mar 2009 - 6:21 pm | विजुभाऊ
झुरळाने मिशा फेन्दारल्या म्हणून ते काही स्टॅलीन होत नाही.
स्टॅलीन ने मिशा फेन्दारल्या तर लोक स्टॅलीनचा अंश म्हणून झुरळाचा जै जै कार करतील
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
15 Mar 2009 - 11:16 pm | शिवापा
प्रतिक्रिंयामधे आमच्यासारखा माणुस कुठे आहे का हे शोधत होतो. (सापडला. म्हणजे. दोन सापडले) B-)
16 Mar 2009 - 12:03 am | पिवळा डांबिस
मस्त आहे!
आवडलं!!
:)
प्रेषकांची नावे देताना किंचित नामसाधर्म्य दाखवले असतेत तर अधिक मजा आली असती!!
=))
16 Mar 2009 - 12:45 am | भडकमकर मास्तर
प्रतिसाद भन्नाट आहेत..
त्यातलं " ते चिन्हांचं आत्ता जमलं " लै भारी आहे... =)) :)) =D>
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Mar 2009 - 10:12 pm | लिखाळ
हा हा हा .. खरंच मस्त आहे :)
तुषार शिंतोडे, गेल्या होळीत भस्मसात .. हा हा हा .. मजेदार :)
-- लिखाळ.
19 Mar 2009 - 11:08 pm | चतुरंग
एकदम मस्त कल्पना!! :)
तुषार शिंतोडे हे नाव फार आवडलं! =D>
चतुरंग
16 Mar 2009 - 6:26 am | विंजिनेर
एकदम फ्रेश प्रकार. धमाल आहे!!
आवडला!
16 Mar 2009 - 10:50 am | मूखदूर्बळ
धन्यवाद मंडळी :)