सुचिन्हे निर्माण़ झाली आहेत का?

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
14 Mar 2009 - 8:57 pm

मिपावर काही लेख/चर्चा मंदी, आयटी, महागाईबद्द्ल लिहिलेले वाचल्यावर हे लिहावेसे वाटले.

From new

वरील चार्टमधे ०% ही स्थिती म्हणजे जेथून तो इंडेक्स खाली यायला लागला तो क्षण.
१. करडी ट्रेंड रेषा: १९२९: ही अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सगळ्यात मोठा क्रॅश दाखवते. मार्केट ९०% पर्यंत खाली गेल्यावर परिस्थितीत सुधारणा व्हायला लागली व त्याला ३४ महिने लागले.
२. लाल ट्रेंड रेषा: १९७३ चा ऑईल क्रॅश हा २२ आठवड्यांनी सुधारणा दाखवे पर्यंत ४८% नी खाली गेला होता.
३. हिरवी ट्रेंड रेषा: २००० साली बबल बर्स्ट झाल्यानंतर ३० महिन्यांतर सुधारणा झाली.
४. निळी ट्रेंड रेषा: २००८ साली सुरु झालेला हा क्रॅश अजुन सुधारण्याची चिन्हे दाखवत नाही.
[अमेरिकेच्या मार्केट्चा चार्ट इथे चर्चा करण्यासाठी का वापरला? भारतातील परिस्थितीशी ह्याची तुलना होऊ शकते का?- ह्याची उत्तरे माझ्याकडे आहेत आणि तुमच्याकडेही असतीलच]
प्रत्येक क्रॅशनंतर मार्केटमधे सुधारणा व्हायला काहीतरी सुचिन्हे निर्माण झाली व त्याचा परिणाम हळुहळू सर्व जगावर पडून सगळीकडची परिस्थिती सुधारली. तशी सुचिन्हे निर्माण झाली की, निळी ट्रेंड रेषा अजुन खाली जाणे बंद होईल. त्यामुळे अजुन ही ट्रेंड रेषा किती खाली जाईल- ती आधीच २००० च्या ट्रेंड रेषेपेक्षा खाली आली आहे व १९२९ च्या ट्रेंड रेषेच्या पातळीपर्यंत जायच्या आधी ती अजुन किती खाली जाईल ते जाणकारांना विचारावे लागेल.

असा एक सुप्रवाह ७०० बिलियन डॉलरचे मदतनिधीनंतर मार्केटमधे निर्माण लवकर होऊदेत व ही निळी ट्रेंड रेषा वर जायला सुरुवात झाली की, मंदीचा प्रभाव ओसरायला लागेल. त्याच्या सुपरिणाम जगभर होण्यास थोडा कालावधी लागेल.

न्युयॉर्क टाईम्सम्धे आलेल्या एका लेखाचा संदर्भ मी काही दिवसांपुर्वी मिपावर दिला होता. तो दुवा पुन्हा इथे देत आहे. (The Inflection Is Near?)
त्यात असलेली काही परिक्षणे आपल्याला लागू होत असतील तर त्यातून काही क्लृप्त्या महागाईवर मात करण्यासाठी मिळतील.

विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत काय केले पाहिजे- जे आता शेवटच्या वर्षात आहेत व अजुन प्लेसमेंट झालेले नाही, कॅम्पसमधे सिलेक्षन झाले नाही अशांना मार्गदर्शन हवे असल्यास जरुर कळवावे.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विद्याधर३१'s picture

14 Mar 2009 - 9:15 pm | विद्याधर३१

पुर्वीच्या क्रॅशनंतर कोणती सुचिन्हे दिसू लागली होती?
थोडा सविस्तर प्रकाश टाकलात तर बरे होइल.

विद्याधर

नितिन थत्ते's picture

14 Mar 2009 - 9:17 pm | नितिन थत्ते

खराटा
(रंग माझा वेगळा)

अजय भागवत's picture

14 Mar 2009 - 11:06 pm | अजय भागवत

१९२९-३२: प्रे. रुझवेल्ट यांनी अमेरिकेत खूप खर्चिक असा इन्फ्रास्ट्र्क्चर प्रोजेक्ट हाती घेतला हे सगळ्यांना माहित असेलच
२०००-०२ साली मंदी ही प्रमुख्याने आय टी क्षेत्रातच होत्ती. इतर क्षेत्रे बरी होती- किम्बहुना ९०दीतच त्यात मंदी होती व ती सुधारली होती. त्यामुळे आय टी क्षेत्रात त्यांनी आउटसोर्सिंग करुन कॉस्ट कमी केली व त्यांची परिस्थिती सुधारली.

हरकाम्या's picture

15 Mar 2009 - 2:00 am | हरकाम्या

आम्हा ऑटोमोबाईलवाल्यांना यातले काही समजत नाही . गाड्यांचा खप कमी झाला की उत्पादन कमी होते.
सगळीकडे कुजबुज चालु होते मंदी आली. गाड्यांचा खप कमी होण्याची वेगवेगळी कारणे दिली जातात.
पण राबण्याचे तास कमी होत नाहीत. ते मंदीच्या काळातही जास्तच असतात्.त्यामुळे सुचिन्हे काय ती कशी
दिसतात ते आम्हाला माहिती नाहीत.