बहर

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 6:58 pm

[या बाईला काही उद्योग आहे की नाही? रोजची एक कविता पाडून बोर करतेय! ] अस कुणाला वाटू नये, म्हणून सांगते, हा सगळा जुनाच स्टॉक आहे!

अर्पिलास जरी तुझा अकल्पित बहर मला तू,
रिती तरीही ओंजळ माझी राहिली कशी?
फुलताना सुकण्याचे नव्हते भान कळ्यांना,
आता हे निर्माल्य राहू दे तुझ्याचपाशी!

गंधभारले, मंतरलेले दिवस आगळे
कसे , कधी अन कुठे हरपले, कुणास ठावे?
फांदीफांदीवरी स्मृतींच्या कळ्या ठेवुनी,
उडून गेले ते स्वप्नांचे हिरवे रावे

उधळलीस तू दौलत माझ्या भग्न मनावर
तरल मुलायम मोरपिसाच्या सुखद क्षणांची
काय करू मी? तरी पुन्हा जाळते मनाला
चिरंजीव वेदना रित्या एकलेपणाची

प्राजक्ताच्या पायघड्यांच्या प्रसन्न वाटा,
बकुळीचा तो मंद गंध, तो धुंद मोगरा
क्षण निसटावे तसे भास ते निसटून गेले,
उरे एक अंधार दाटला कुंद कोपरा

या वेलीचे प्राण प्राण कोमेजून गेले
आधाराने तुझ्या दिलासा कसा मिळावा?
मनीमानसी ग्रीष्मदाह आजन्म सोसता,
तूच सांग, निष्पर्ण जीव हा कसा फुलावा?

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 7:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता छान आहे, पण थोडी दु:खी आहे.

(दुसर्‍या एका धाग्यावर तुम्ही मिपावर येऊन आनंद होतो असं काहीसं लिहिलं आहेत त्यामुळे 'दु:ख विसरा' टाईप लिहित नाही.)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मराठमोळा's picture

15 Mar 2009 - 12:55 am | मराठमोळा

च्यामारी, च्या खारी, च्या बिस्किट

विडंबनासाठी वेगळा सेक्शन उघडावा कृपया,,

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

जयवी's picture

15 Mar 2009 - 2:55 pm | जयवी

खूप छान :)