<काय काय वाटतयं>

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 6:38 pm

सगळं डोकं गरगरतय विचित्र वाटतयं
मळमळतय असलं विचित्र फिलिंग वाटतयं
काल पिलेली बाहेर येऊ असं विचारतेय वाटतयं
आताशा अवस्थेमध्ये खुप अस्वस्थ वाटतयं
सगळे जवळ असूनसुध्दा उतारा देणारा एकपण नाही असं वाटतयं
काल रात्री राहिला अर्धा पॅग तो अर्ध्यावर सोडून दिला वाटतयं
'वॅट ६९' कालचा ब्रान्ड आपला नव्हंताच असं वाटतयं
आताशा सकाळ सकाळी खूप मळमळतयं
कसं सगळे विचित्र विचित्र वाटतय
समोर पडलेला तो अर्धा पॅगचा उतारा दिसतोयं
जरा घटकाभर डोकं दाबणारी कोणी लाभणारच नाही वाटतयं
आताशा अवस्थेमध्ये लिंबू पाणी देणारं कोणीच नाही असं वाटतयं
लोक म्हणतात कशाला येवढा पितो कशाला डोकं हँग होव्हर मध्ये झुलेतयं
पण सप्तर॑गी ही दुनिया आपल्यासाठी नाहीच अस॑ वाटतय॑
सोडा असताना पण 'निट' च पिली असं वाटतय
आज पुन्हा सोडायची शपथ घ्यावी असे वाटतय

प्रेरणा - हीच आहे असं वाटतयं ;)

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

14 Mar 2009 - 6:41 pm | विनायक प्रभू

आहे.

दशानन's picture

14 Mar 2009 - 6:42 pm | दशानन

=))

मला तरी सध्या असंच वाटतयं !!!!

अवलिया's picture

14 Mar 2009 - 6:41 pm | अवलिया

आजपासुन सोडली ......उद्या सकाळपर्यत :)

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार

बाटलीवर किरंगळी कापुन शपथ घ्या राजे.... पुन्हा सोडायचा विचारसुद्धा करणार नाही अशी !

तळीराम
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन's picture

14 Mar 2009 - 6:52 pm | दशानन

नाय बॉ !

रक्ताची भिती वाटते... लोकांना दाखवायची... !
मागे एकदा दाखवलं होतं... लोकं म्हणाली रक्त आहे का दारु =))

प्राची's picture

14 Mar 2009 - 7:30 pm | प्राची

=)) =)) =)) =)) (हसून हसून लोळवलत राजे)
नसानसांत भिनली आहे मदिरा.
राजे,खरच कठीण आहे बुवा तुमचं.... :<

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2009 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे, सोड्यात नका घेत जावू...एक तर चेहरा दुसर्‍या दिवशी चेहरा सुजल्यासारखा वाटतो आणि त्याचे जरा साइड इफेक्टही होतात जसे कविता करावी वाटते इत्यादी इत्यादी...ही सर्व हँगओव्हरची लक्षणं बाकी काय ? :)

>>आज पुन्हा सोडायची शपथ घ्यावी असे वाटतय
हा हा हा ! अशा फार शपथा घेणारे पाहिलेत आम्ही. :)

दशानन's picture

14 Mar 2009 - 6:52 pm | दशानन

सहमतं

विनायक प्रभू's picture

14 Mar 2009 - 6:53 pm | विनायक प्रभू

अती पीण्याने वेगवेगळे विकार चालु होतात. विषेशतः गुढग्याचे. उठाबसायला त्रास होतो राजे

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 7:00 pm | परिकथेतील राजकुमार

जोर बैठका काढताना पण त्रास होतो ना हो गुर्जी ?

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य