महाश्वेता

जृंभणश्वान's picture
जृंभणश्वान in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 11:05 am

वर्ष झाले असेल मी पाल बघून. परवा पालीवर माझी नावडती मैत्रिण हा लेख वाचला आणि पालीची खूप आठवण आली -
कसा मी रोज सकाळी उठून अर्ध्या झोपेत धडपडत धडपडत बेसिनपाशी जायचो आणी पालीला बघुन दचकायचो. नंतर आपली रोजची पालच आहे ते बघुन कसा सुखावायचो वगैर वगैरे सगळे आठवून दाटून कंठ आला
एवढी आठवण आली की मग कविता करण्याशिवाय पर्याय नव्हता.

*किळसवाण्या सहित्यप्रकाराची ज्यांना किळस आहे त्यांनी कृपया वाचू नका

महाश्वेता

ओसरला हा संधिप्रकाश,
दिनकरास करकच्च रजनीपाश
झाल्या शुभंकरोत्या,
अन्‌ आटोपली स्तोत्रे

लावल्या खिडक्या
आपटली दारे,
घाबरल्या ताई, माई, अक्का
अन्‌ हादरले बाळूचे पप्पा,

फटीतून घुसले
भिंतीवर बसले,
चिलट म्हणावे का डास?
बघून त्या गट्ट्या बाळूस
पिपासूने बेत बनवला खास

अहा, ते गोबरे गाल
होतील कसे लाल
चावण्यास कडकडून
सर्वसज्ज हा डास

पण...

कडाडल्या वीजा
थरारली धरणी

चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज भिंतीवरून
चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज ट्यूबमागून

शक्ती ही दैवी कोणी
घोर ही रणरागिणी
रोखुन शीत हरितनेत्र
फुलवुनी लिबलिबीत गात्र
अवतरली ही महाश्वेता

पांढरीफट्ट, पांढरीफट्ट
रोवूनि पाय घट्ट
आली एक सुपाल

लांबवून जिव्हा चपळाईने
क्षणार्धातच हा घेतला घास,
पालोदरी विसावला पापी डास
पालोदरी विसावला पापी डास
*
यडपट कसा हा बाळू
मंद म्हणावे का द्वाड
पसरून भोकाड
म्हणतो आईगं, आईगं
आली पाल,
आली पाल
***

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 11:21 am | परिकथेतील राजकुमार

खी खी खी मला 'महाश्वेता' मालिकेत त्या 'ऐश्वर्या नारकरला' बघताना खरच पालीचीच आठवण यायची, पाल बघा आपण कुठल्याही बाजुने बघितले तरी आपल्याकडेच बघत आहे असे वाटते, अगदी तसेच हि ऐश्वर्या नारकर कुठुनही बघा कॅमेर्‍याकडेच बघत असते. कवितेचे शिर्षक आवडले ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अश्विनि३३७९'s picture

14 Mar 2009 - 11:24 am | अश्विनि३३७९

वा वा मस्त !! कालच घरात पाल आली होती .. पण असा कल्पना विलास नाही सुचला

क्रान्ति's picture

14 Mar 2009 - 2:45 pm | क्रान्ति

त्या बिच्चा-या पालीला कळत तरी असेल का आपण इतक्या साहित्यिकांच्या प्रतिभेचा विषय आहोत? काही म्हणा कविता छान जमलीय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2009 - 2:48 pm | बिपिन कार्यकर्ते

भयानक!!!!!!!!!!!!!!!!!! भयानक आवडली!!!!!!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

14 Mar 2009 - 2:54 pm | अवलिया

जबरा !!

--अवलिया

लिखाळ's picture

14 Mar 2009 - 2:56 pm | लिखाळ

कडाडल्या वीजा
थरारली धरणी

चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज भिंतीवरून
चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज ट्यूबमागून

वाहवा .. एकदम मस्त ! :)
सुपाल पण मस्त :)
-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

14 Mar 2009 - 2:57 pm | भडकमकर मास्तर

खूप थरकापदायिनी कविता...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लवंगी's picture

14 Mar 2009 - 3:02 pm | लवंगी

पालीमध्ये आता मला महिशासूरमर्दिनी दिसणार !!

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 4:32 pm | विसोबा खेचर

वा! महाश्वेता फारच आवडली! :)

तात्या.

किट्टु's picture

15 Mar 2009 - 4:32 am | किट्टु

छान लिहीली आहे... =D>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 5:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वावावा .... भीषण सुंदर कविता.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मुक्तसुनीत's picture

15 Mar 2009 - 4:27 am | मुक्तसुनीत

यॉनिंग डॉग !
लगे रहो !! :-) "सुपाली" च्या या सुस्तोत्रात कुसुमाग्रजांच्या "अहिनकुल" आणि ग्रीष्मावरच्या कवितेची खिल्ली सुद्धा जाताजाता उडवलेली आहे !

अवांतर : याच्या डोक्याचे झाकण उघडले तर केवळ किडे वळवळत असतील असे पूर्वी वाटायचे. आता पालीसुद्धा ! राम राम ! ;-)

भाग्यश्री's picture

15 Mar 2009 - 4:43 am | भाग्यश्री

लोल...तू महान आहेस!!!

http://bhagyashreee.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

15 Mar 2009 - 9:31 am | चन्द्रशेखर गोखले

एक पालंकृत कविता..!!!

समिधा's picture

15 Mar 2009 - 10:06 am | समिधा

मस्तच जमलय महाश्वेतेचे वर्णन. :)

नाना बेरके's picture

15 Mar 2009 - 11:43 am | नाना बेरके

म्हणून आवडली.

आमच्या लहानपणी अशाप्रकारच्या म्हणजे - प्राणी, पक्षी, निसर्ग, माणसा-माणसातली नाती इ. विषयांवरच्या कविता खूप असंत. त्यामुळे पाठ्यपुस्तकवाल्यांना कविता मिळायला फारशी अडचण भासंत नसे. त्याकाळात "स्व " विषयाच्या म्हणजे - मी, ती, प्रेम, भावना ( फक्त तिच्या / त्याच्या ) इ. कविता फारश्या नव्हत्या, कारण माणसं खरंखुरं प्रेम करीत असंत आणि भावनाही जपंत असंत.

सहज's picture

16 Mar 2009 - 7:23 am | सहज

मस्त!

जृंभणश्वान अजुन येउ देत. आपले लिखाण नेहमीच आवडते.

अनिल हटेला's picture

16 Mar 2009 - 7:27 am | अनिल हटेला

उत्तम महाश्वेता !! :-)
आवडली !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जृंभणश्वान's picture

16 Mar 2009 - 8:32 am | जृंभणश्वान

सर्वांचे मनापासून आभार :)