"हजेरी" हे नाम आहे क्रियापद नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Mar 2009 - 10:07 am

हजेरी म्हणजेच "असणं" काही "करणं" नाही.

"असण्यावर" माझी श्रद्धा आहे.अलीकडेच मला ह्याची आठवण आली.त्याचं असं झालं की कोकणात त्यावर्षी खूप मोठं वादळ आलं होतं.नारळाची उंच उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती.काही घरांची छप्परं उडून गेली होती.नळे, कौलं तुटून घरं उजाड झाली होती. त्यादिवसात कोकणात नाही तिकडची गरिबी असायची.असा निसर्गाचा कोप झाल्यावर जास्तीत जास्त हाल होतात ते गरिबांचे.स्थाईक कार्यकरत्यानी अपंगाना, वृद्धाना, स्त्रीयांना आणि लहान मुलांना एका मोठ्या माल ठेवण्याच्या वखारीत आणून संरक्षण दिलं होतं.नुकसानीच्या आठवणीने लोक भयभयीत झाले होते.त्यांना कुणाची तरी आस्थापूर्वक चौकशीची जरूरी होती.गावातल्या इतर लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली होती.
मानसिक धक्क्यातून त्याना सावरण्याची जरूरी होती.बेळगावहून माझे दोन मित्र मुद्दाम मदतीला आले होते.त्यातला एक मनोविज्ञानिक होता.

त्यानंतर बर्‍याच दिवसानी त्याची आणि माझी गाठ पडली होती.मी त्याला त्या वादळातल्यादिवसाची आठवण करून दिली होती.ते लक्षात आणून तो म्हणाला होता,
"त्या वखारीत जमलेल्या लोकाना आम्ही "मानसिक प्रथोमोपचार " देण्यासाठी आलो होतो.अशावेळी थोडक्यात समजावून सांगून पेशंटना मानसिक तणावाच्या प्रक्रियेबद्दल शिक्षीत करण्याचं आणि ज्याना ज्या उपचाराची जरूरी आहे त्यांचं परिक्षण करून त्यांच्यावर उपचार करण्याचं जे काय असेल ते शिक्षण आम्ही घेऊन सुद्धा अचानक माझ्या मनात केवळ आपल्या "असण्या"च्या ताकदीने महत्वाचा उपचार होऊ शकतो असं लक्षात आलं.

ज्यावेळी आम्ही वखारीच्या दरवाज्यातून आत शिरत होतो,त्यावेळेला ज्या पहिल्या व्यक्तीशी आमची गाठ पडली ती व्यक्ती कृतज्ञतेच्या उत्साहाने भरभरून आमच्या स्वागताला आली.मला धन्य वाटलं पण काहिसा मी मला अपराधी समजून गेलो.
कारण अजून लोकांवर आम्ही खराच काही उपचार केला नव्हता.
हजेरी हे नाम आहे क्रियापद नाही.हजेरी म्हणजेच "असणं" ते काही "करणं" नाही.काही ठिकाणी "असण्याला" इतकं महत्व नसतं जितकं "करण्याला" प्राथमिकता दिली जाते. तरी पण खरं हजर असणं किंवा कुणालाही आपलं अस्तित्व भासणं ही एक मूक ताकद बरोबर घेऊन उचित साक्षीची स्विकृती झाल्यासारखी वाटतं.कुणाचं तरी भावनीक ओझं घेऊन गेल्यासारखं,किंवा उपचाराची प्रक्रिया केल्यासारखं वाटतं.पण कुणाशी तरी घनिष्ट नातं जुळविण्याच्या प्रयत्नात जे लोक शिघ्रतापूर्वक नातं जुळविण्याच्या प्रयासात असतात त्या लोकांना हे "असण्य़ाचं" नातं क्वचितच समजलं जातं."

त्या भेटीतलं हे माझ्या मित्राचं "असण्या" बद्दलचं चिंतन माझ्या मनावर चांगलंच बिंबलं होतं.
अलिकडे मी नकळत हजर राहण्याच्या प्रक्रियेत ओढला गेलो होतो.माझ्या एका मित्राची आई अचानक निर्वतली. मला माझ्या मित्राच्या नातेवाईकाचा फोन आला होता.माझं एक मन ताबडतोब तिकडे जाण्याचं सांगत होतं,पण एक मन सांगत होतं,की त्या मित्राच्या अत्याधिक आणि अगदी वयक्तीक दुःखात जाऊ नये म्हणून.माझं मन द्विधा झालं. माझ्या एका मित्राने त्यावेळी सल्ला दिला की "तू जा,तू तिथे हजर रहा".मी तसंच केलं.आणि मला त्याचा कधीच पश्चाताप होणार नाही.
त्या विधायक क्षणानंतर मी कुणाच्याही प्रसंगाला हजर राहायला जरी माझ्याकडून काही"करणं" झालं नाही तरी जाण्याची काचकूच केली नाही.

एकदा माझ्या काही मित्रांबरोबर एका व्यक्तिच्या अगदी बिछान्याजवळ बसून होतो.त्याला त्याच्या दुखण्यात प्रचंड वेदना येत असल्याने त्या येऊ नयेत म्हणून मॉरफीन दिलं होतं.त्याला जाग आल्यावर आम्ही त्याच्याशी त्याच्या जीवनात होऊ घातलेल्या अनिर्वाय परिस्थितीची माहिती समजूत घालून सांगत होतो. त्याने, नंतर तो जरा बरा झाल्यावर आपल्या आईवडीलाना सांगितलं की आमच्या निव्वळ हजेरीचा त्याला आधार वाटला.

मी माझ्याकडून संकटात असलेल्या लोकांबरोबर किंवा आजार्‍याबरोबर हजर राहण्या पलिकडे कार्यान्वीत असतो.पण जवळ "असण्या" च्या क्रियेच्या क्षमतेबद्दल आणि त्यांना वाटणार्‍या आपल्या अस्तित्वाच्या जागृतते बद्दल प्रभावित असतो.खरं म्हणजे अशा स्थितीत कुणीही एकटं नसतं.
हजर रहाण्यातली क्षमता म्हणजे एकच मार्गी रस्ता नव्हे.नुसतंच आपण दुसर्‍याला काही देत नसतो. तर ह्या असण्याने माझ्यात नेहमीच बदलाव होतो आणि तो पण आणखी चांगलं होण्यात, हा एक दुसरा मार्ग आहे."

आज का कुणास ठाऊक,माझा तो मनोविज्ञानिक मित्र,त्याचं ते "असण्या" बद्दलचं चिंतन, आणि ते जीवघेणं वादळ यांची अचानक आठवण आली.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

14 Mar 2009 - 10:32 am | विंजिनेर

स्फुट चांगले आहे.
सामंत साहेब, मला वाटतं की हजर "असणं" किंवा हजेरी "लावणं" हे व्यक्तिसापेक्ष (किंबहुना नाती-सापेक्ष) असतं. आणि ह्याचं भान असणं आवश्यक आहे.

तुम्ही तुमच्या मित्राचं वर्णन दिले आहे. त्यात माझ्या मते त्या नात्याला जास्ती महत्व आहे.
कुठल्याही नात्यात आणि मैत्रीत जवळिकीचे अनेक पदर असतात ह्या बद्दल कोणाचं दुमत असू नये. सगळेच मित्र अगदी जिवाभावाचे नसतात.
तेव्हा प्रसंगानुरूप आणि नात्यातल्या जवळिकीनुरूप आपली उपस्थिती तिथे आवश्यक आहे का त्या उपस्थितीची अडगळ वाटेल ह्याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. ही बाजु हजेरी "लावणार्‍याची" बाजू झाली.
असाच जर विचार हजेरी "घेणार्‍याने" केला तर ते अधिक समंजस पणाचे ठरणार नाही काय? अवास्तव अपेक्षांचे ओझे कोणावर लादून मग त्या पूर्ण झाल्या नाहित तर स्वतःला मनःस्ताप करून घेणारे कितीतरी असतात(ह्याला मी सुद्धा अपवाद नाही :) ).
शेवटी काय तर. "सर्वेऽपि सुखिनः सन्तु" हे फक्त श्लोकामधे(च) ठीक असतं.
असो. प्रतिसाद मुळ विषया पासून भरकटला असेल तर एक डाव माफी द्यावी :)

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Mar 2009 - 8:39 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो विंजिनेर,
मुळ विषयापासून आपला प्रतिसाद मुळीच भरकटलेला नाही असं मला वाटतं.किंबहूना आपण केलेल्या चर्चेमुळे "असणं" हे किती व्यक्तिसापेक्ष आहे हे फार कौशल्याने आपण दाखवून दिलं आहे.
"अवास्तव अपेक्षांचे ओझे कोणावर लादून मग त्या पूर्ण झाल्या नाहित तर स्वतःला मनःस्ताप करून घेणारे कितीतरी असतात"
हे आपलं म्हणणं फारच दूरदर्शी आहे.
आपल्या प्रतिसादा बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2009 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंत साहेब,
'उपस्थिती' ही व्यक्तीसापेक्ष असली तरी विचार करायला लावणारे एक सुंदर स्फुट !

किती अनुभव संपन्नता असते आपल्या लेखनात आणि दर्जाही तितकाच उच्च..खूप वाचायचे आहे आपले लेखन, अजून येऊ द्या !

-दिलीप बिरुटे

श्रीकृष्ण सामंत's picture

15 Mar 2009 - 8:44 pm | श्रीकृष्ण सामंत

डॉ.दिलीप,
आपल्या कडून असा प्रतिसाद वाचल्यावर माझ्या सारख्याला लेखन करायला हुरूप येतो.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com