जोगवा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
13 Mar 2009 - 10:14 pm

नक्षत्रांच्या गावातून कुणी सांगावा धाडला?
जीव पाखरू होऊन माझा आभाळा भिडला
वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला?
मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला
आला मैफलीला रंग, ताल सुराला भेटला
अन्तरात आनंदाचा असा उमाळा दाटला
मोतिपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला
हळूवार गूज काही वारा कानात बोलला
झाकोळल्या दृष्टीला या दिसे प्रकाश आतला
माझ्या फाटक्या झोळीत असा जोगवा घातला

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

13 Mar 2009 - 10:20 pm | मराठमोळा

आज अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे हि कविता सुचलेली दिसते तुम्हाला.. :)
पाउस, थंड हवा आणी मातीचा सुगंध मन वेडं करायला समर्थ असतात.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

प्राजु's picture

13 Mar 2009 - 10:20 pm | प्राजु

मोतिपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला
हळूवार गूज काही वारा कानात बोलला

मस्तच. काय सुरेख कल्पना आहे!! अप्रतिम.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

13 Mar 2009 - 10:29 pm | मदनबाण

वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला?
मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला

व्वा. :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

शितल's picture

14 Mar 2009 - 12:48 am | शितल

संपुर्ण कविताच सुंदर आहे. :)

दत्ता काळे's picture

14 Mar 2009 - 11:34 am | दत्ता काळे

कविता आवडली.