वाळवंट

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
13 Mar 2009 - 3:35 pm

"सात वर्ष झाली काका, आयुष्याचे जवळ जवळ वाळवंट झाले आहे". श्रीयुत करमरकर
रंगपंचमीची सुट्टी होती. अख्खा दिवस लोळुन काढला. संध्याकाळची वाट बघत होतो. सामुदायिक तिर्थप्राशनाचे आमंत्रण होते संध्याकाळी. बायकोला साधारण सालाबादचे कार्यक्रम माहीत असतात. सुमारे ५ वाजता तीचा फोन वाजला. साधारण बोलणे कानावर आले. मला न विचारता कुणाला तरी संध्याकाळी घरी यायचे आमंत्रण दीले होते. आज्ञा पण झाली, संध्याकाळी ६ ते ७ पर्यंत कुठेही जायचे नाही. चुलत बहीणीच्या ओळखीचे दांपत्य येणार होते मला भेटायला. काय नेमका त्रास होता त्याबद्दल नक्की काय कळाले नाही.
पुरणपोळीचा मान ठेउन मी पण जास्त खोलात शिरलो नाही.

________________________________________________________

श्री. सौ. करमरकर बरोबर सहा वाजता पोचले. बायकोने चहा दीला आणि ती नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भा़जी आणायला निघुन गेली.
बायको बाहेर गेल्यावर लगेच करमरकर आढेवेढे न घेता मुळ प्रश्नावर आले. करमरकर उवाच खालीलप्रमाणे:
आमचे लव मॅरेज. ४ वर्ष हिंडलो फिरलो. नंतर लग्न केले. दोन्हीकडुन विरोध होता लग्नाला. लग्नानंतर दोन वर्षानंतर मुलगा झाला. सात वर्ष खरेच कशी गेली ते कळालेच नाही. मुलगा ५ वर्षाचा असताना ही गोष्ट झाली. मुलाची झोप जरा सावध. अचानक मधेच उठला. गडबडलो आम्ही दोघेही. पण वेळ मारुन नेली. दुसर्‍या दिवशी मुलाने मोघम प्रश्न विचारला. तो येणारच अशी खात्री होती त्यामुळे उत्तर तयार होते. त्या दिवसापासुन हीच्या मना॑तली अपराधी पणाची भावना काय जायला तयार नाही. चार दिवसापुर्वीची गोष्ट. सुट्टीचा दिवस होता. कोचवर बाजुला बसली होती. बर्‍याच दिवसाने दिवसाने बाजुला बसली, कधी नव्हे ती खांद्यावर मान ठेवली. बरे वाटले.इतक्यात मुलाची चाहुल लागली आणि पटकन उठुन बाजुला झाली. आतापर्यंत साधारण १०० वेळ तोच प्रश्न विचारला आहे हीने. " मुलाने बधितले असेल का? त्याला काय वाटले असेल. मला लाज वाटते त्याच्याकडे बघायची." आता तुम्हीच काय ते बघा. माझ्याकडे उत्तर नाही. आणि खरे सांगायचे झाले तर She was the wildest one for all these 7 years of marriage. That is why her behaviour about married life is confusing.
________________________________________________________
साध्या गोष्टीचा नासुर करण्याची काय हौस असते काही जणांना. ५ वर्षाच्या मुलाने बघीतले. फारसे लक्षात राहायचे काहीही कारण नव्हते.
मुलाच्या वागण्यात तरी तसे काहीही नव्हते. २०० चॅनेलवर पोसल्या गेलेल्या पीढीला त्याचे फारसे कौतुक असण्याचे काय कारण? फारच टोकाची भुमिका घेण्यात काय अर्थ. काळजी घ्यायला हवी. पण अशा गोष्टीना घाबरुन सहजिवनाचे वाटोळे करण्यात काय अर्थ होता. मुलगा समोर आहे म्हणुन बायकोपासुन १० फुट अंतर.??? ठीक आहे, वन बी.एच्.के. मधे थोडीशी कुचंबणा होते. पण देवाने दीलेल्या डोक्याचा वापर कधी करणार. मिळाला तो वेळ आपला. तो अमुक एक असावा असे काय स्टँप पेपर वर लिहुन दीले होते काय?
इतर अडचणीवर मात करताना युक्ती वापरतो की नाही. तसेच इथे.
मी दोघानाही मुलासमोर आपल्यातले अंतर हळु हळु कमी करायचा सल्ला दीला. शक्यतो नॉर्मल रहा.
आधी बाजूला बसा.
बोलण्यात एकमेकाना साथ द्या. त्याच्या समोर एखादा विनोद सांगुन खळखळुन हसा दोघेही.
नंतर हातात हात धरा.
खांद्यावर हात टाका. साधारण ३ महिन्यात येथे पोचलात तर बाकीच्या गोष्टी आपोआप व्यवस्थीत होतील.
कुणीतरी सल्ला दिला होता की मुलांना अशा गोष्टींचा ट्रॉमा होतो. आजकाल मुलांना कशाकशाचा ट्रॉमा होतो हे सांगणे कठीणच आहे.
मुलांची सुट्टी आणि श्रीयुतांची सुट्टी मॅच होत होती. ती मिसमॅच केले की सर्व प्रश्न सुटणार होते.

हे नक्की २००९ साल चालु आहे का?
जाता जाता: छापलेल्या चित्रात बेस कलर मॅजेंटा हा महत्वाचा असतो.
आजकाल गाडीचा वापर अगदी कमी असतो. मुलाला गाडी फुल टँक ठेवणे आवडत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आठवड्याला एकदा पाच लीटर पेट्रोल भरतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

13 Mar 2009 - 4:32 pm | दशानन

ह्म्म्म्म !!!

>>मुलांची सुट्टी आणि श्रीयुतांची सुट्टी मॅच होत होती. ती मिसमॅच केले की सर्व प्रश्न सुटणार होते.

:)

गुड !

राघव's picture

13 Mar 2009 - 4:53 pm | राघव

साध्या गोष्टीचा नासुर करण्याची काय हौस असते काही जणांना
खरंय. मी सुद्धा हे अनुभवलंय.
उदा: आता साधं कुणाला जेवायला घरी बोलावलं असेल. बायको खपून ४ पदार्थ करते. चांगले झालेले असतात. पण नेमके ज्याला जेवायला बोलावले तो काही जास्त खात नाही. आता तो मला सांगतो की बाबा रे सकाळपासून पोट जाम तट्ट फुगलंय, जात नाही आता जास्त. आग्रह करू नकोस. तर तो गेल्यावर कितीतरी वेळ तोच विषय चालू .."नीट नाही जमलेत ना पदार्थ? हट् ब्वॉ.."
कितीही समजावून सांगीतले तरीही ते पटत नाही.. मग २-३ तासांनी जरा शांत होतं वातावरण. पण तोवर स्वतःचा मूड खराब केलेला असतो.. जेवण नीट केलेले नसते.. :)

राघव

दशानन's picture

13 Mar 2009 - 5:06 pm | दशानन

प्रभुचं क्रिप्टीक जरा वेगळ्याच विषयावर आहे ;)

शेखर's picture

13 Mar 2009 - 5:09 pm | शेखर

विप्र काका ,
सुंदररित्या मांडले आहे.

आजकाल गाडीचा वापर अगदी कमी असतो. मुलाला गाडी फुल टँक ठेवणे आवडत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आठवड्याला एकदा पाच लीटर पेट्रोल भरतो.

आठवड्यातुन एकदा ५ लि. भरण्यापेक्षा , फु्रसतीचा व आरामाचा वेळ मिळाला की थोडे थोडे पेट्रोल भरावे.

शेखर

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2009 - 5:14 pm | परिकथेतील राजकुमार

छान !
गुर्जींचे व इतर अनुभवी तज्ञांचे सल्ले वाचत आहे...

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शशिधर केळकर's picture

13 Mar 2009 - 9:02 pm | शशिधर केळकर

प्रभूसर, नेहेमीप्रमाणे थोडक्यात पण मुद्याचं! मजा आली.

गम्मत म्हणजे, 'मुलाला काय वाटेल्/वाटले असेल' हे किंवा बायको ने १० फुटावर लांब उभे राहाणे जसे जुनाट विचारसरणीचे आहे, तसे बायकोशी शरीरसंबंध अबाधित चालू ठेवण्याची मानसिकता 'मॉडर्न' ही आहे. नाहीतर मूल होऊन ५ वर्षे 'लोटली' असे म्हणणारे वाटणारे, कुढणारे महाभाग संख्येने जास्त असावेत. वागण्यात असा विपर्यास नेहेमीच होतो असे दिसते. एका परीने कमालीचे परिपक्व, पण काही बाबतीत टोकाचे अपरिपक्व असे वागणारे लोकच बहुतांशी सापडतात.

या कथेतून काय बोध घ्यायचा? किती टिकावू असेल तो? माहीत नाही! समुपदेशन करून एक चूक सुधाराल, पण बाकी नवीन १० चुका निस्तरायला निर्माण झाल्या असतील.

(अद्याप अपरिपक्व) शशिधर

प्रभूकाका,
आवडला लेख. अशा प्रकारची परिस्थिती भारतात जास्त असण्याचे काही विशेष कारण असू शकते काय?
म्हणजे, पश्चिमेकडील देशांत राहणार्‍या भारतीयांना याचा त्रास नाही होत कारण मुलांना लहानपणापासूनच सगळे डोळ्यासमोर असते.
कदाचित तिकडे श्रीमंतीमुळे १बी.एच्.के. चा प्रश्न येत नसेल.
बाकी मुद्दा काळजी करण्यासारखा आहे. मुलाने जर चार-चौघांसमोर/नातेवाईकांसमोर चुकून काही बोलले तर चांगलाच बभ्रा होउ शकतो ना?