सप्तरंगी दुनिया

राजा's picture
राजा in जे न देखे रवी...
13 Mar 2009 - 2:56 pm

सप्तरंगी दुनिया

विविध रंग मिळुन
जग बनले आहे
रंगी बेरंगी दुनियेत
खुप रंग आहे.

प्राण्यांच्या शरिरात सुध्दा
खुप रंग असतात
म्हणुनच त्यांची पिल्लं सुध्दा
रंगी बेरंगी जन्मतात.

प्राणी हिरवं खातात
तरी रक्त लाल असते
कातडं काळं तांबड
दुध मात्र सफेद असते

आकाश सकळी सोनेरी
दुपारी उन्हाने पांढरे होते
संध्याकाळी मावळतांना तांबडे
रात्री मात्र निळे निळे असते

झाडाची मुळं पांढरिइ
साल काळसर असते
पानाचा रंग हिरवा
फळं फुलं मात्र रंगी बेरंगी

माती सुद्धा असते काळी भोर
हिरवं उगवतं पेरल्यावर
हिरवं पिवळं होतं बाळ्ल्यावर
पिठ पांढर निघतं दळल्यावर

सोने चांदी तांबे पितळ
ह्यांचे रंग निराळे
म्हणुनच त्यांचे आहे
मोल वेगवेगळे

प्रेमातला गुलाबी रंग
विरहात धुसर होतो
लग्नाआधीचा सप्तरंग
लग्नानंतर बेरंग होतो

झोपल्यावर पांढरा
राग आल्यावर लाल
दुखामध्ये काळा
असा हा चेह-याचा रंग निराळा

रंगावीना जीवनात
सारे व्यर्थ आहे
रंगावीना जगन्याला
काय अर्थ आहे

जो पर्यंत आपल्याला
रंगाची संगत आहे
तो पर्यंतच खरी
जगण्याला रंगत आहे

भले बुरे अनुभव
विसरुन जावे
वर्षातुन एकदा स्वत:ला
रंगात रंगुन घ्यावे.

राजा गायकवाड.

कविताविचार

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Mar 2009 - 4:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

भले बुरे अनुभव
विसरुन जावे
वर्षातुन एकदा स्वत:ला
रंगात रंगुन घ्यावे

मस्त जियो राजा जियो
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

प्राजु's picture

13 Mar 2009 - 7:33 pm | प्राजु

रंगात रंग तो श्याम रंग...

रंगीत कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

13 Mar 2009 - 9:51 pm | क्रान्ति

मस्त! रंगतदार कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

शितल's picture

14 Mar 2009 - 12:36 am | शितल

रंगीत कविता आवडली. :)