"लव टू मरेज" प्रवासवर्णन

सौरव जोशी's picture
सौरव जोशी in जनातलं, मनातलं
12 Mar 2009 - 6:37 am

महाराष्ट्र टाईम्स मध्ये मागे एक सदर आल होत... विषय होता "लव टू मरेज प्रवासवर्णन" मी थोड वेगळ पण स्वानुभवाने लिहीण्याचा प्रयत्न केला, आज "मिसळ पाव" चा मेम्बर झालोय तर म्हटल सुरुवात त्या लेखानेच करु कारण तो लेख ह्रदयाच्या अगदी जवळ आहे! पहा तुम्हाला आवडतो का... लि़खाण सुधारण्यासाठी आलेल्या सूचना व टिका, दोन्हीचे स्वागत!

प्रेम काय असते हे कळायच्या अगोदरच प्रेम करून मोकळा झालेला मी!! (Thanks to Bolywood Movie संस्कार)... जेव्हा विचारांमध्ये प्रगल्भता आली, सारासार विवेक बुद्धी जागृत झाली तेव्हा."मी कोणावर खरच प्रेम करू शकतो का?" हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला. त्यातही अगदी अजुन Bolywood स्टायलमध्ये प्रेम करायचा फायनल.प्रयत्न केला कारण प्रेमाचा कीडा वळवळत होता ना! पण तोही प्रयत्न तोंडघशी पडला. आयुष्याचा बट्ट्याभोळ होता होता वाचला आणि स्वत:च्या निर्णयक्षमतेवर बिलकुल विश्वास उरला नाही. मग मात्र आई-बाबा यांनी सूत्रे हाती घेतली.

त्यांना कस काय कळणार मला कसा जोडीदार हवा असा फाजिल आत्मविश्वास पण तरीही आपल्याला या जगात आणलेल्या आईबाबांना नाही कळणार तर कोणाला कळणार अशी ठाम बाजू घेत मी सर्वांना चकीत करणारा आणि "चल फेकु नकोस","अशक्य","जोक्स पुरे" वेडा झालास का?" अशा प्रतिक्रिया व्यक्त होणारा निर्णय घेतला. मनात कुठे तरी खंत होती की "अरेंज मॅरेज" कराव लागतेय आणि आता जबरदस्त अड्जस्टमेंट करावी लागणार हे देखील कुठेतरी सलत होतच! घरून स्वत:च्या आवडीचा जोडीदार निवडायाच स्वातंत्र्य असूनही आपण अपयशी ठरलो याची खंतही उराशी बाळगून होतोच. आणि मला मुलगी पसंतच पडणार नाही हा तोरा!

मला स्टुडिओ मध्ये जाउन आर्टीफिशियल फोटो काढायचे फर्मान सोडण्यात आले पण मी त्यांचा बेत हाणून पाडला आणि दुबईमध्ये हॉलिडे करतानचा एक फोटो दिला... पण आई आणि बाबा मात्र युद्ध्पातळीवर तयारीला लागले होते. विवाह मंडळे काय.. बायो डेटा बनवणे काय आणि काय काय... या सर्व प्रकारावर हसण्याखेरीज काहीच करत नव्हतो पण आईचा उत्साह आणि धडपड पाहून सुखावत होतो. तिला मनपसंत सून शोधण्याचा ध्यास लागला होता. मला हवी होती सुशिक्षित, सूसंस्कृत, मॉडर्न आणि मॉडर्न असूनही काकूबाई अशी अगदी बायको मटेरियल. थोडक्यात काय तर मृगजळ... कधीही अस्तित्वात न येणारे जोड स्वप्न! ३१ डिसेंबर ला मी रात्रभर धिंगाणा करायला निघणार होतो आणि चक्क मला कोणीतरी पाहायला आले होते... मला हे सगळ भयानक वाटल! शी मला बघायला लोक आले म्हणजे जरा जास्तच झाल , असो! मित्रांना सांगणे शक्यच नव्हत कारण जगाला हसणारा मी आणि जगाला माझ्यावर हसायची संधी कशी पुरवून देऊ? असो, अपेक्षेप्रमाणे मी त्यांना आवडलो,(प्रचंड हशा) आणि आता मात्र बाबांनी उतवळेपणाच्या सगळ्या हद्द पार केल्या व चक्क "उद्या मुलगी पाहायला येतो" सांगून मोकळे झाले. मी तोंड विस्फारल पण त्याच्याकडे त्यांच फारस लक्ष नव्हत! का कुणास ठाउक पण आईच त्या दिवशीच हसण मला असुरी वाटत होत :)

रात्रभर थर्टी फस्ट सेलेब्रेट करून सकाळी घरी आलो तेव्हा लक्षात आल की आज तर आपली मॅच आहे पण मी टेस्ट मॅच खेळायच्या तयारीत होतो आणि विकेट सांभाळून खेळायच आणि इतक्या लवकर बाद व्हायच नाही असा हिय्या करून होतो. तसा प्रतिस्पर्धी पक्षाचा फोटो आणि प्रोफाइल पाहील होत, थोबाड छान होत पण काही विशेष स्पार्क नाही जाणवला. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत होती की माझी जन्मतारीख १ जून आणी तिची २ जून!

अखेर तो दिवस उजाडला.. १ जानेवारी २००८! वर्षाची सुरवात फारच मजेशीर आणि काहीशी विक्षिप्त! तिला पाहायला गेलो... स्वागत झाल्यावर सगळे स्थानापन्न झाले पण कोणी काहीच बोलेना मला हसू येऊ लागले पण उगाच मुलगा आगाऊ आहे असे वाटू नये म्हणून मी चेहरा प्रयत्नपूर्वक गंभीर करून बसलो होतो. पोहे न दिल्यामुळे आमच्या गोटात जोक्स झाले.. अखेरीस "नवरी मुलगी" (प्रचंड हशा) चहा घेऊन आली. काहीतरी शोभिवंत वस्तू असल्यासारखे सर्व तिच्याकडे पाहू लागले.. दृष्य प्रेक्षणीय होत, सगळे तिला पाहत होते आणि मी तिला सोडून इतरांच्या चेहर्याकडे बघून कसबस हसू आवरत होतो! चहा झाल्यावर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम... माझे "स्क्यूबा डायविंग" "पॅरा
सेलींग" मध्ये इंट्रेस्ट आहे का हे वाहयात ठरवलेले प्रश्न बाजूला सारून जेवण बनवता येते का? हा अगदी साळसूद आणि बावळट प्रश्न विचारला. अपेक्षेप्रमाणे त्याच आगाउ "हो तर, येते म्हणजे काय? येतेच" अस उत्तर आल तेव्हाच ही "जोशी" आडनावाला सॉलिड फिट आहे हा साक्षात्कार मला झाला, सुंदर तर होतीच दिसायला पण बोलणही लाघवी होत, नजर खाली, चेहर्यावर औत्सुक्य आणि भीती अशा संमिश्र भावना पण त्याचबरोबर मी आवडलो असल्याची पोचपावती! मला हव्या असलेल्या काकूबाईचे मुर्तिमन्त उदाहरण! आणि जे व्हायच तेच झाल... पिचवर टिकून खेळायचा निर्धार करून आलेला गडी पहिल्या बॉलमध्ये क्लीन बोल्ड!

दोघांच्या घरातील मॉडर्न वातवरणामुळे आमच बोलण भेटण सुरू झाल! तीच साधेपणच तीच खर सौंदर्य आहे. पैसा, दिखावा यांपेक्षा माणुसकी, प्रेम यांना महत्व देणारी, हसत-खेळत माझ्यातील सन्वेदनाक्षम, हळव्या मला ओळखणार्‍या "तिच्या" मी प्रेमात पडलोय.. पडलो नाही खरतर ग डा ब डा लोळलोय! आम्ही तासन तास बोलतो... लोकांना आमच्या बोलण्याचा कंटाळा येतो पण आम्ही नॉन स्टॉप चालूच असतो. मोबाईल कंपनी वाले भारी खूष असतात आमच्यावर.. लवकरच आमचा सत्कार होईल असे वाटते. मी परदेशात असलो तरी परिस्थिती वेगळी नसते. आमच प्रेम पैसे आणि वेळ या मर्यादा कधीच पार करून गेलेय! घरून परवानगी असतानाही आम्ही लपून छपून भेटतो, खोटही बोलतो. आमच्याकडे बघून लोकांना संशय येतो की हे अरेंज मॅरेज नाही, यांच नक्की काहीतरी लफड होत :) लव मॅरेजच सगळ थ्रील आम्ही दोघाणने पुरेपूर अनुभवलय.. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलय पण नेक्स्ट वीकेंड्ला आम्ही बॅंड स्टॅंड्ला जाणार आहोत, चोरी चुपके! अरेंज मॅरेजच्या सर्व मर्यादांच भान आम्हा दोघांनापण आहे पण प्रेम करण्याच थ्रिल आम्ही अनुभवतोय!

लोकांचा लव ते मॅरेज असा प्रवास फार सुखावह असतो पण तो मॅरेज या अखेरच्या स्टेशनला येऊन बरेचदा संपतो! कदाचित ध्येयपूर्तीच समाधान झाल्यमुळे पण आमचा हा मॅरेज ते लव असा उलटा सुरू झालेला प्रवास प्रेमाच्या क्षितिजावर अखंड सुरू राहावा... ध्येयपुर्तीच्या शोधात आणि ते एकमेव ध्येय म्हणजे "आमच प्रेम"....

सौरव जोशी ( आमची मुंबई )

साहित्यिकविरंगुळा

प्रतिक्रिया

वेलदोडा's picture

12 Mar 2009 - 6:59 am | वेलदोडा

छान लेख. मजा आली वाचताना.

प्राजु's picture

12 Mar 2009 - 7:37 am | प्राजु

आणि अभिनंदन!
लेख आवडला.

आणि आता फॉर्मॅलिटी.. मिपावर स्वागत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सँडी's picture

12 Mar 2009 - 7:41 am | सँडी

मस्त!
मजा आली वाचताना(प्रचंड हशा).

- हसरा सँडी

मुक्ता २०'s picture

12 Mar 2009 - 7:57 am | मुक्ता २०

छान लेख! :)

शितल's picture

12 Mar 2009 - 8:00 am | शितल

प्रवास आवडला. :)
मस्त लिहिले आहे.

मन्जिरि's picture

12 Mar 2009 - 9:59 am | मन्जिरि

वेलकम जोरात झाले आहे आगे बधो

विंजिनेर's picture

12 Mar 2009 - 10:07 am | विंजिनेर

उत्तम लेख
प्रभाकर पाध्यांच्या काळात (६०-७०?)गाजलेला "प्रेमानंतर लग्न" की "लग्नानंतर प्रेम" हा प्रश्न आजही पडतो की लोकांना :)

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2009 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे

चांगली सुरुवात केली. मज्जा आली वाचायला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

छोटा डॉन's picture

12 Mar 2009 - 10:33 am | छोटा डॉन

... माझे "स्क्यूबा डायविंग" "पॅरा सेलींग" मध्ये इंट्रेस्ट आहे का हे वाहयात ठरवलेले प्रश्न बाजूला सारून जेवण बनवता येते का? हा अगदी साळसूद आणि बावळट प्रश्न विचारला. अपेक्षेप्रमाणे त्याच आगाउ "हो तर, येते म्हणजे काय? येतेच" अस उत्तर आले

=)) =))
हा हा हा, मस्त पंच आहे ह्या वाक्यात ...

बाकी लेख उत्तमच, खुसखुशीत शैलीमुळे मज्जा आली वाचताना ...
अगदी रोजच्या आयुष्यात ( अर्थातच आमच्या नाही ) जे घडते ते अगदी सोप्या रोजच्या वापरातल्या भाषेत लिहल्यामुळे लेख रोचक झाला आहे.

आणि हो, मिपावर स्वागत. असेच अजुन येऊद्यात ...
पुलेशु.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सौरव जोशी's picture

12 Mar 2009 - 10:45 am | सौरव जोशी

धन्यवाद मित्रहो....

मला आनंद आहे की तुम्हाला माझा प्रयत्न आवडला.

सौरव जोशी...!

अमोल नागपूरकर's picture

12 Mar 2009 - 10:49 am | अमोल नागपूरकर

चांगला लेख आहे, आवडला.

जागु's picture

12 Mar 2009 - 11:11 am | जागु

सौरव तुमच मि.पा. वर स्वागत.
लेख खुप छान आहे. आवडला.

लोकांचा लव ते मॅरेज असा प्रवास फार सुखावह असतो पण तो मॅरेज या अखेरच्या स्टेशनला येऊन बरेचदा संपतो! कदाचित ध्येयपूर्तीच समाधान झाल्यमुळे पण आमचा हा मॅरेज ते लव असा उलटा सुरू झालेला प्रवास प्रेमाच्या क्षितिजावर अखंड सुरू राहावा..
तुम्हाला शुभेच्छा. :)

सायली पानसे's picture

12 Mar 2009 - 11:48 am | सायली पानसे

लेख खुप छान आहे.. वाचताना मजा आली.
पुढच्या लेखांसाठी शुभेच्छा.

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 11:51 am | निखिल देशपांडे

लेख वाचताना मजा आली.... छानच झाला आहे लेख.....

दशानन's picture

12 Mar 2009 - 11:56 am | दशानन

लै भारी बॉस !!!!!

मज्जा आहे बॉ ;)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2009 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

जोशी बुवा 'प्रवास वर्णन' आवडले हो. अगदी चुरचुरीत लिहिले आहेत.
पु.ले.शु.

प्रवासाच्या तिकीटाच्या प्रतिक्षेतला..
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सहज's picture

12 Mar 2009 - 12:37 pm | सहज

सौरव लव श्टोरी आवडली.

नंतर सांगा चांगला स्वयंपाक येतो की नाही ते :-)

मदनबाण's picture

12 Mar 2009 - 12:55 pm | मदनबाण

जोशीराव तुमचे प्रवास वर्णन आवडले.... अभिनंदन... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

धमाल मुलगा's picture

12 Mar 2009 - 2:22 pm | धमाल मुलगा

लढ जोश्या, लढ!
मस्त प्रकटन आहे रे. पहिलाच लेख असुनही नाझी छळछावणीतला हुकमाचा एक्का वाटत नाही हे तुझं यश! :)

बाकी, येव्हढं मस्त रंगलायस, आता लगीन करतोयस म्हणे?
"वेलकम टू क्लब ऑफ इडियट्स ;) "
(ही सदिच्छा समस्त आंतरजालीय विडंबकांचे गुरुवर्य श्री.श्री.श्री.केशवसुमार ह्याचेकडून साभार!... मलाही लग्न झाल्यादिवशीच त्यांनी ह्याच शुभेच्छा(!)दिल्या होत्या) :D

अवांतरः ओ पेठकरकाका, बिपीनदा ऐकताय ना? एक और साथी मिळेल आपल्या बैठकीला :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते

कथेकर्‍यांच्या घोळक्यात अजून एक जोश्या आला. छान लिहिलं आहे. धम्या म्हणतो तसं... वेलकम इ.इ.इ. :)

अवांतरः पहिलाच लेख असला तरी खूप सफाईदार पणे लिहिला आहे. टंकनचुका नाहीतच जवळ जवळ. तुम्ही बाहेरून टंकून घेता का हो? (ह. घ्या) ;)

बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी's picture

12 Mar 2009 - 4:15 pm | ऍडीजोशी (not verified)

पहिलाच लेख असला तरी खूप सफाईदार पणे लिहिला आहे

ओ बिपिनदा, तो जोशी आहे, लिहिणारच सफाईदार पणे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 5:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ बिपिनदा, तो जोशी आहे, लिहिणारच सफाईदार पणे.
अगदी १००% टक्के सहमत.

ए जोश्या, मस्त लिहिलं आहेस रे.

अदिती (डब्बल ब्यारल) जोशी
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अतिशय छान लिहिलंय तुम्ही.
आवडलं. पुढील लेखनाची आवर्जुन वाट पाहतोय.

आम्ही तासन तास बोलतो... लोकांना आमच्या बोलण्याचा कंटाळा येतो पण आम्ही नॉन स्टॉप चालूच असतो.

हे माझ्या प्रेमप्रवासी मित्रांना तंतोतंत लागू होतंय.
"च्यायला काय बोलत असता रे इतकं" असं माझ्यासारखे फलाटावरचे विचारत बसतात मग. :)

भाग्यश्री's picture

12 Mar 2009 - 11:30 pm | भाग्यश्री

हेच वाक्य मी ही हायलाईट करणार होते... दोन्ही आई बाबा, मित्र मंडळी सगळी वैतागली होती आमच्या गप्पा (ऐकून नाही!) किती वेळ चालतात ते पाहून..

सेम अनुभव वाटला रे अगदी.. कसलं क्युट लिहीलंय !! हेहे... फार आवडलं...
अजुन येऊदे ! मिपावर स्वागत तर झालंच आहे !!

http://bhagyashreee.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 11:39 pm | बिपिन कार्यकर्ते

साखरपुडा ते लग्न हे अंतर ८-९ महिन्यांचं... दोघं दोन वेगळ्या गावात होतो... एक एफ.डी. मोडल्याचं आठवतंय, फोनचं बिल भरायला!!! :)

बिपिन कार्यकर्ते

शितल's picture

12 Mar 2009 - 11:41 pm | शितल

>>साखरपुडा ते लग्न हे अंतर ८-९ महिन्यांचं... दोघं दोन वेगळ्या गावात होतो... एक एफ.डी. मोडल्याचं आठवतंय, फोनचं बिल भरायला!!!
=))

टारझन's picture

21 Mar 2009 - 2:43 am | टारझन

अर्रे यही तो धोका खा गया बिपीनदा !!! च्यायला ..मस्त एयरटेल फ्रेंड्स घेतलं असतं तर एफ.डी अजुन शाबुत राहिली असती ..

बाकी मला कंपनीच्या फोनचं बिल फुगवल्या बद्दल समज देण्यात आल्याची आठवण झाली

जोशीबुवांनी उत्तम लिहीले आहे ..अजुन रंजक करता आले असते का ? असो .. पुलेशु.

(इंटरणेट + फोनबिल फुगवलेला) टारझन

भाग्यश्री's picture

12 Mar 2009 - 11:51 pm | भाग्यश्री

एफ्डी मोडले !! हाहा... =)) माझ्या नवर्‍यानेही असंच काही केले असण्याची शक्यता आहे !

मी माझं इंटरनेटचे आणि फोनचे बिल किती आले होते हे नाहीच सांगत जाऊदे..
पण बाबांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ते बिल पाहून एवढेच आठवतेय आता..
दुसर्‍या दिवशी लगेच जाऊन मी अनलिमिटेड प्लॅनला ऍप्लाय केले होते ! :))
मज्जाय सगळी! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

सौरव जोशी's picture

13 Mar 2009 - 12:37 am | सौरव जोशी

भाग्यश्री,

तुम्ही बिलावरुन चांगली आठवण करुन दिलीत, हा लेख लिहिल्यानंतरचा किस्सा आहे त्यामुळे लेखात नोंद नाही त्याची!

लग्नाला दोन महिन्याचा अवकाश होता, मी UK ला होतो कामानिमित्त! दोघही कमवते असल्यामुळे फोन बिलाचा तसा फारसा काही प्रॉब्लेम नव्हता पण आम्ही रोज इंटरनेटवर वेबकॅमवर तासन तास (दिवसन दिवस म्हणा ना हव तर) बोलत रहायचो. काहीही, कसही आणि कितीही! हे अस महिनाभर चालु राहिल. तिच्या घरच फोनच बिल आल तेव्हा आमच्या काकु घरात नव्हत्या. बिलावरचा आकडा बघुन माझा साला तावातावाने MTNL वाल्यांकडे गेला.. त्यांनीही तावातावाने आमचे ऑनलाइन तास त्याच्या तोंडावर फेकुन मारले.

आजपर्यंत बिलाची रक्कम आणि बोललेले तास काय त्याने सांगितले नाहीत पण त्याला तो प्रकार पाहून आलेली घेरी आणि आमच्या समोर गुडघे टेकल्याची त्याने दिलेली प्रांजळ कबुली कायम स्मरणात राहील.

सौरव जोशी...!

प्राजु's picture

13 Mar 2009 - 12:09 am | प्राजु

जबरदस्त बिपिनदा...!
याला म्हणतात प्रेम!! मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऍडीजोशी's picture

12 Mar 2009 - 4:17 pm | ऍडीजोशी (not verified)

मला हव्या असलेल्या काकूबाईचे मुर्तिमन्त उदाहरण

मेलास तू जोशा.

अधिक माहिती साठी आमच्या साने काकांना भेट तू आता.

शिवापा's picture

12 Mar 2009 - 5:41 pm | शिवापा

लय भारी. लय म्हणजे लय भारी सौरवराव. सोगत है भो तुझं.

स्वाती२'s picture

12 Mar 2009 - 6:00 pm | स्वाती२

छान जमलयं प्रवासवर्णन.
>>परवानगी असतानाही आम्ही लपून छपून भेटतो, खोटही बोलतो
मी आणि माझा नवरा लग्नाआधी एकदा काकांकडे जातो सांगून उनाडायला गेलो आणि नेमका माझ्या काकांनी माझ्या सासरी फोन केला. घरी मस्त पूजा बांधली दोघांची.

सौरव जोशी's picture

12 Mar 2009 - 7:06 pm | सौरव जोशी

ताई... अहो पुजेचा प्रसाद कसा झाला होता ते नाही सांगितल.... :)

सौरव जोशी...!

सौरव जोशी's picture

12 Mar 2009 - 7:14 pm | सौरव जोशी

तुमच्या प्रतिसांदांबद्दल शतशः आभार....!

काही लोकांना आनंद होईल तर काहिंना माझी किव येइल ऐकून कि आता माझ लग्न झालय... असो.

महत्वाचा मुद्दा असा की आमच इतक्या महिन्यांनंतरही बोलण संपलेल नाही. मी सध्या कामानिन्मित्त ब्राझिलला ( बर्याच भुवया उंचावतील) आहे... दोन महिन्याकरता आलो होतो. जेमतेम एक महिना झालाय पण फोनच बिल पगारापेक्षा जास्त... बास म्हटल, शनिवारच्या फ्लाइटने घरी!!!

जाणकार म्हणतात की काही काळ लोटला ही "सुवर्ण वर्ख" उडून जातो वैगरे वैगरे... च्यामारी त्या सुवर्ण वर्खाच्या, बघतोच मी कुठे जातो उडून तो!

सौरव जोशी...!

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2009 - 7:58 pm | पिवळा डांबिस

सौरव, तुझा लेख उत्तम!

जाणकार म्हणतात की काही काळ लोटला ही "सुवर्ण वर्ख" उडून जातो वैगरे वैगरे... च्यामारी त्या सुवर्ण वर्खाच्या, बघतोच मी कुठे जातो उडून तो!

जोडीदार मनासारखा/खी असेल तर सुवर्णवर्ख काही उडूनबिडून जात नाही......
माझी आणि काकूची जोडी बनून आता २६ (अक्षरी सव्वीस!!!!) वर्षे झाली.....
आमच्या तासंतास चालणार्‍या गप्पा अजून संपता संपत नाहीत......
:)

रेवती's picture

12 Mar 2009 - 7:42 pm | रेवती

सौरव,
छान आठवणी!
गप्पा मारणे म्हणजे भयंकरच छान असतो प्रकार.
मलाही आजपर्यंत समजलेलं नाही ते "सुवर्ण वर्ख" उडून जाण्याचं प्रकरण!
लग्नाला साडेतेरा वर्षं झालीत व आम्ही भरपूर गप्पा मारतो, मारत राहू.
फोनच्या बिलाचं वेगळं बजेट आखावं लागलं होतं आम्हालाही.
सेलफोनचं बील तर इतकं आलं आठ वर्षांपूर्वी की फोनवाल्यां नी आम्हाला विचारलं की
ही कामगिरी तुमचीच की काय?
मी मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं की आम्हीच हे एवढे फोन केलेत म्हणून.

रेवती

मराठमोळा's picture

12 Mar 2009 - 9:09 pm | मराठमोळा

खरा कलाकार जसा प्रेक्शकांना खुर्चीत खिळवुन ठेवतो तसे तुम्ही मला हा लेख वाचताना संगणकासमोर बसवुन ठेवलत.
छान लेख.
येउ द्या आणखी.

मराठमोळा.
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नाच्यापधिष्टति!!

मुशाफिर's picture

12 Mar 2009 - 10:50 pm | मुशाफिर

लेख फारच छान उतरलाय. पु. ले. शु.

मुशाफिर.

भडकमकर मास्तर's picture

12 Mar 2009 - 11:44 pm | भडकमकर मास्तर

चांगली सुरुवात...
मिपावर प्रचंड स्वागत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पक्या's picture

13 Mar 2009 - 1:52 am | पक्या

भारी प्रवासवर्णन. मजा आली वाचताना. येऊद्यात अजून असेच खुसखुशीत लेख.

चतुरंग's picture

13 Mar 2009 - 4:41 am | चतुरंग

झकासच लिवलं आहेस! एकदम बोलल्यासारखा लिहिला आहेस त्यामुळे एका दमात संपला वाचून ते कळलंही नाही!
मिपावर स्वागत आणि तुम्हाला दोघांना शुभेच्छा.

अरे मी आणि माझी बायको, आम्ही तासनतास बोललो आहोत. अजूनही गप्पा मारत असतो सारख्या.

(एक कानगोष्ट - ते 'सुवर्णवर्ख' उडणारे बिडाणारे जे लोक असतात ना ते वेगळे! अरे, सारख्या काही गोग्गोड गप्पाच मारायला पाहिजेत असं नाही, भांडायचं सुद्धा एकदम जोर लावून! की पुन्हा नंतर बोलताना जास्त मजा येते! एव्हाना कळलेही असेल तुला कदाचित! ;) )

चतुरंग

धनंजय's picture

13 Mar 2009 - 5:04 am | धनंजय

अभिनंदन!

असेच खुसखुशीत लेखन येऊ द्या.

दिपक's picture

13 Mar 2009 - 2:04 pm | दिपक

नजरेतुन सुटलं कसं ... एका दमात वाचुन काढलं .. झकास म्हणजे झकासच जमलाय..
येउद्यात अजुन :)

घासू's picture

13 Mar 2009 - 5:13 pm | घासू

ज्यांची फर्स्ट इनिंग मधे विकेट गेली आहे त्यांनी सेकंड इनिंगची सुरवात अशी करावी. मस्तच

लिखाळ's picture

13 Mar 2009 - 6:27 pm | लिखाळ

सौरव,
लेख मस्त आहे :)
मिपावर स्वागत !
-- लिखाळ.

सौरव जोशी's picture

14 Mar 2009 - 9:57 am | सौरव जोशी

888 वाचने ...??

वाह, मजा आली! आता खरच लिहाव लागेल.... धन्यवाद!

सौरव जोशी...!

प्रमोद देव's picture

14 Mar 2009 - 10:59 am | प्रमोद देव

मस्त लिहीलंय.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्रिया८'s picture

21 Mar 2009 - 1:57 am | प्रिया८

फारच छान लिहिलय...
तुमचे दोघांचेही अभिनंदन!!!
अश्विनि.

अनिल हटेला's picture

21 Mar 2009 - 8:00 am | अनिल हटेला

अनुभव कथन आवडेश !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

यशोधरा's picture

21 Mar 2009 - 10:00 am | यशोधरा

मस्तच लिहिलय! आवडलं.