काही मुक्तके

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
11 Mar 2009 - 9:11 am

युद्धे

रोज नवी युद्धे होतात,
शस्त्रेही नवीच असतात,
युद्धांची कारणे मात्र,
अजुनही जुनीच असतात....!

आरक्षण

कितीही मोठे झालो तरी,
पांगुळ गाडा सोडणार नाही,
माणुस बनुन दोन पायावर,
आम्ही कधीही चालणार नाही....!

सबंध

पोप प्रेमाचे पोवाडे गात आहेत
संत शांतीचा संदेश देत आहेत
शास्त्रज्ञ शस्त्रांची निर्मिती करत आहेत
राजकारणी राजकारण करत आहेत
आता तुम्ही मला सांगा...
तुमचा, माझा याच्याशी ,
काय सबंध ?....!!!

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

सहज's picture

11 Mar 2009 - 9:14 am | सहज

मुक्तके आवडली.

लेक देखील असेच म्हणाला असेल ना? ;-)

अडाणि's picture

11 Mar 2009 - 9:41 am | अडाणि

नुसत्या चार ओळीत खाउन टाकलं की...
-
अफाट जगातील एक अडाणि.

सुनील's picture

11 Mar 2009 - 9:49 am | सुनील

मस्त आहेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्रान्ति's picture

11 Mar 2009 - 1:45 pm | क्रान्ति

माणूस बनून दोन पायांवर,
आम्ही कधीही चालणार नाही.........खरय.
क्रान्ति{मी शतजन्मी मीरा!}

अनिल हटेला's picture

11 Mar 2009 - 1:48 pm | अनिल हटेला

छान आहेत !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धनंजय's picture

11 Mar 2009 - 9:11 pm | धनंजय

तांत्रिक दृष्ट्या उत्तम.

सौंदर्याबरोबर काही उद्बोधनही कवीला अभिप्रेत आहे, म्हणून सांगतो : त्यातील काही मुद्दे मला पटलेले नाहीत.

पांगुळगाड्याची कल्पना अर्धसत्यात्मक आहे. पाय प्लास्टरमध्ये घातल्यावर नेमके किती दिवस अपंग-खुर्चीत (पांगुळगाड्यात) बसणे ठीक आहे, याबाबत मतभेद असू शकतात. हाडे अजून जुळली नाहीत तेव्हा पांगुळगाड्यातून उठवणे धोक्याचे, आणि हाडे जुळू लागल्यानंतर न उठणे धोक्याचे. पण आता पुरे झाले/नाही पुरे झाले असे वेगवेगळ्या लोकांना "स्पष्ट" दिसते, ते तितके स्पष्ट नसावे, क्लिष्ट असावे. या क्लिष्ट प्रकाराचा नीरक्षीरविवेक (नीरक्रीमविवेक) सर्वोच्च न्यायालयाने करायचा प्रयत्न केला, पण ती कार्यपद्धती शासनाकडून अमलात आणणे वाटते तितके सोपे नाही.
मुक्तक २ मध्ये "सर्व काही स्पष्ट सोपे आहे, हा केवळ पांगळेपणाचेच भूषण केलेल्यांचा कोतेपणा आहे" असा एकांगी विचार सांगितला आहे.

मुक्तक तीन मधील "शास्त्रज्ञ शस्त्रांची निर्मिती करत आहेत" ओळ वाचून वाईट वाटले. शास्त्रज्ञांचे काम शास्त्र-निर्मिती आहे, शस्त्र-निर्मिती नव्हे. पण याबाबत मी कवीला दोष देत नाही. वेगवेगळ्या देशांत चांगला 'रॉकेट सायंटिस्ट' ते माथेफिरू 'मॅड सायंटिस्ट' या एका मितीतच शास्त्रज्ञांचे प्रकार समाजमानसात चित्रित असतात.

शिवाय राजकारणाचा समाजकारणाशी अतूट संबंध आहे, असे लोकशाहीतल्या नागरिकांना पटले तरच लोकशाही प्रगती करू शकेल, असे मला वाटते.

शास्त्र आणि राजकारणाबद्दल लोकांत जो तिटकारा आहे, त्याचीच पुनरावृत्ती ("हे तर स्पष्टच आहे" जणू) कवी करतात, त्याबद्दल मला वाईट वाटते.

उद्बोधन करायचा कवीचा हेतू नसेल, आणि रोचक शब्दखेळ हाच हेतू असेल तर वरील मुद्दे मी मागे घेतो.

लिखाळ's picture

11 Mar 2009 - 9:43 pm | लिखाळ

मुक्तक तीन मधील "शास्त्रज्ञ शस्त्रांची निर्मिती करत आहेत" ओळ वाचून वाईट वाटले. शास्त्रज्ञांचे काम शास्त्र-निर्मिती आहे, शस्त्र-निर्मिती नव्हे. पण याबाबत मी कवीला दोष देत नाही. वेगवेगळ्या देशांत चांगला 'रॉकेट सायंटिस्ट' ते माथेफिरू 'मॅड सायंटिस्ट' या एका मितीतच शास्त्रज्ञांचे प्रकार समाजमानसात चित्रित असतात.

शिवाय राजकारणाचा समाजकारणाशी अतूट संबंध आहे, असे लोकशाहीतल्या नागरिकांना पटले तरच लोकशाही प्रगती करू शकेल, असे मला वाटते.

शास्त्र आणि राजकारणाबद्दल लोकांत जो तिटकारा आहे, त्याचीच पुनरावृत्ती ("हे तर स्पष्टच आहे" जणू) कवी करतात, त्याबद्दल मला वाईट वाटते.

छान विचार. पटले. शास्त्राबद्दल लोकांत तिटकारा नसावा. राजकारणाबाबतच असावा.

(नीरक्रीमविवेक)

:)

गोखलेसाहेबांची मुक्तके आवडली.
-- लिखाळ.

वाहीदा's picture

11 Mar 2009 - 11:47 pm | वाहीदा

चारोळ्या बरेच काही सांगून जातात !
खुपच आवडले !!
~ वाहीदा

प्राजु's picture

12 Mar 2009 - 12:05 am | प्राजु

मस्त.
थोडक्या ओळीत बरंच काही. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/