बंड

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
11 Mar 2009 - 1:06 am

तो कोणत्या पक्षाचा झेंडा आहे ...?
कोणत्या दलाची झुंड आहे..
कि जुनाच क्रांतीकारकांचे,]
ते मतीमंद बंड आहे...?

सारे द्रुष्टीकोन त्यांचे..
मी फेकले, न जुमानले,
माझ्या अशा क्रुतीने..
ते हतबुद्ध क्रुद्ध झाले..!

त्या जुन्या माणसांनी
ठरविले आता मरायचे..
जगलीच नाही कधी ती..
त्यांनी काय मरायचे...?

मी चंद्र , सुर्य, तारे..
डोळे भरून पाहिले.
सारे सुगंध स्रुष्टीचे..
श्वासात भरून घेतले...!!

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

सहज's picture

11 Mar 2009 - 8:31 am | सहज

समजले नाही. :-(

चन्द्रशेखर गोखले's picture

11 Mar 2009 - 8:41 am | चन्द्रशेखर गोखले

माझ्या मुलाची अगदी हिच प्रतिक्रिया होती !
खोटे लिहिले , कि खोटेच वाटते.. न झेपणारे लिहु नये, हे समजलं !!!
धन्यवाद!!!