गौतम बुद्धांची एक कथा.
बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला.
प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या. जमलेले लोक अस्वस्थ झाले, संतापलेही. पण तथागत शान्त होते. त्यांच्या चेहरयावरील स्मित जरासुद्धा ढळले नव्ह्ते. तो माणूस बराच वेळ अद्वातद्वा शिव्याशाप देत होता. बरयाच वेळाने तो थकून थांबला व डोळे तारवटून गौतमांकडे पहात राहिला.
तथागतांनी स्मितहास्य केले व शान्त स्वरात ते बोलले,
"मी तुला एक प्रश्न विचारू काय?"
"विचारा" तो गुरगुरला.
"जर तुला कोणी एखादी वस्तू भेट दिली आणि ती भेट स्वीकारण्यास तू नकार दिलास तर त्या भेटीवर मालकी कुणाची?"
"मालकी?"
"हां, ती भेटवस्तू कोणाकडे राहील?"
"इतकही कळत नाही? सोपं आहे, ती वस्तू त्या देणारयाकडे राहील" तो माणूस म्हणाला.
"अगदी बरोबर!" तथागत स्मित करीत म्हणाले, "मग जर मी तुझे हे शिव्याशाप स्वीकारण्यास नकार दिला तर ते कोणाकडे रहातील?"
तो माणूस सुन्न झाला आणि तथागतांच्या चरणी लागला.
तात्पर्य: जगात कोण आपल्याला काय बोलेल यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण त्यांच्या स्तुतिशापांचा स्वीकार करणे न करणे हे पुर्णपणे आपल्याच हाती असते. आपण स्वताचा अपमान करून घ्यायचा म्हटला तर तो घोर अपमान होऊ शकतो अन्यथा ते असतात केवळ शब्दांचे बुडबुडे! ऑफिसात, समाजात वावरतांना हे जर लक्षात ठेवले तर खूपच मनस्ताप कमी होऊ शकतो. मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा.
प्रतिक्रिया
26 Jan 2008 - 11:27 am | इनोबा म्हणे
वाह!खरे आहे. मन शांत ठेवायचे तर असले प्रयोग करायला हरकत नाही. पण फक्त शिव्याशापापुरते... आपल्याला कोणी हात लावल्यावर मात्र हा विचार डोक्यात येत नाही,त्यावेळी डोक्यात असते ते फक्त आपला हात आणि मारणार्याचे थोबाड.
भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेले एक वाक्य आठवते;ते म्हणाले होते "स्वतःला जिंकणारा हा विश्वविजेत्यापेक्षा मोठा विजेता असतो".
(बुद्धं शरणं गच्छामी) -इनोबा
26 Jan 2008 - 11:37 am | विसोबा खेचर
मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा.
शाब्बास रे माझ्या गौतमा! :)
पाहू पाहू, आम्हीही हा अनुभव घेऊन पाहू...
बाय द वे, बोधकथेची ष्टोरी आवडली बरं का रे पिवळ्या डांबिसा...
आपला,
तात्या आंबेडकर.
26 Jan 2008 - 2:01 pm | बिपिन कार्यकर्ते
खरंच बुद्धाच्या सगळ्याच बोधकथा छान आहेत. आवडली.
अशीच एक गोष्ट म. गांधींची पण आहे बहुतेक. लहानपणी शाळेत एक धडा होता आम्हाला. एकदा त्यांना एक अतिशय शिव्या देणारे पत्र येते. ते त्या पत्राला लावलेली टाचणी काढून घेतात आणि बाकीचे पत्र परत त्या पाठवणारर्या व्यक्तिलाच पाठवून देतात. सोबत एक ओळ लिहितात, "तुम्ही जे पाठवले त्यातले मला जे उपयोगी होते तेवढे मी ठेवून घेतले, ज्याचा मला उपयोग नाही ते मी परत पाठवत आहे."
बिपिन.
27 Jan 2008 - 9:03 am | संजय अभ्यंकर
......त्या भेटीवर मालकी कुणाची?
फारचा सुंदर!
संजय अभ्यंकर
27 Jan 2008 - 9:28 am | प्राजु
कोणी एक स्वामी असेच शांत असत . प्रसन्न असत. राग त्याना माहितीच नव्हता.
एकदा काही लोकांनी त्यांची फजिती करायचे ठरवले. स्वामी स्नान आटोपून नदीतून बाहेर येताना पाहून त्यातील काही लोकांनी पान खाऊन त्यांच्या अंगावर पिंक थुंकली. ते स्वामी पुन्हा नदीत गेले आणि स्नान करून बाहेर आले. पुन्हा तसेच झाले. असेच ५-६ वेळा झाले. पण ते स्वामी काहीही न बोलता नदीतून पुन्हा पुन्हा स्नान करून बाहेर येत होते. शेवटी त्या लोकांनी स्वामींना विचारले, "आम्ही इतक्या वेळेला ही घाण आपल्या अंगावर थुंकली, तुम्हाला राग नाही का आला?"
स्वामी म्हणाले, "घाण? पण ही तर काही वेळापूर्वी तुमच्या तोंडात होती.. तुम्ही घाण खाता का?" ते लोक काय समजायचे ते समजले आणि स्वामींची माफी मागून खाली मान घालून निघून गेले.
लहानपणी बाबांनी सांगितली होती ही गोष्ट.
- (गोष्टीत रमणारी) प्राजु
21 Nov 2008 - 8:07 pm | लिखाळ
बहुधा एकनांथाच्या जीवनातील प्रसंग आहे.
ते म्हणतात की चला या योगे मला १०८ वेळा स्नान घडले.. असे काहीतरी..
-- लिखाळ.
21 Nov 2008 - 7:49 pm | आजानुकर्ण
डांबीसपंत,
नाक पुसून कथा वाचली. बोधकथा फार आवडली.
आम्हालाही कोणी सहजपणे शिव्या घातल्या तर आम्ही त्या स्वतःकडे घेत नाही. त्या त्यांच्याकडेच राहतात.
आपला,
(बुद्धम् शरणम् गच्छामि) आजानुकर्ण
21 Nov 2008 - 8:06 pm | लिखाळ
देणार्यांची तोंडे हजारो.. माझ्याकडे आरसा :)
कथा छान आहे.. आवडली..
याचसारखी एक कथा (बहुधा ओशोंच्या पुस्तकात) वाचली होती.
एका साधूला एक मनुष्य शिवी देतो. त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो. माणूस चमकतो.. साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '.
-- लिखाळ.
21 Nov 2008 - 8:19 pm | आजानुकर्ण
मस्त!!!
आपला,
(साधू) ओशो आजानुकर्ण
21 Nov 2008 - 8:16 pm | सुनील
हम्म. वाचायला छान पण आचरणात आणायला कठीण आहे बॉ.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Nov 2008 - 8:18 pm | कपिल काळे
सध्याच्या तंग वातावरणात सर्वांनी हे आचरणात आणावे
.
http://kalekapil.blogspot.com/
21 Nov 2008 - 8:23 pm | लिखाळ
सर्वांनी?
अहो कुणी एकाने शिव्या दिल्या तर दुसर्याला शिकवण आचरणात आणण्याची संधी मिळणार ना ! त्यामुळे जो शिव्या देईल तो समोरच्याला बुद्धाची शिकवण आचरण्याची संधी देत आहे असे समजावे. कुणी आपणहून समाजसेवा करत असेल तर करु द्यावी :) (हघ्याहेसांनलगे)
-- लिखाळ.
21 Nov 2008 - 9:01 pm | अभिज्ञ
डांबिसि बोधकथा आवडली.
अभिनंदन.
असो,
अभिज्ञ.
अवांतर (फाटे)-सध्याचे तंग वातावरण?
असे अचानक काय घडले आहे कि वातावरण तंग व्हावे?
कपिलदादा तुम्ही बुवा फारच लोड घेताय असे दिसते.
;)
नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते.
23 Nov 2008 - 6:08 am | सर्किट (not verified)
नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते.
अभिज्ञशी सहमत आहे...
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
21 Nov 2008 - 8:19 pm | शितल
कथा माहित होती,
आणि त्या कथे नुसार वागण्याचा प्रयत्न तरी नक्की करेन. :)
आता पर्यत अधे मध्ये तो प्रयत्न डळमळायचा, पण जाणिव पुर्वक तो न डळमळण्याचा प्रयत्न करेन. :)
21 Nov 2008 - 8:21 pm | टवाळचिखलू
मस्तच.
मीही ही युक्ती वापरुन पाहीन.
- (बॉस या व्यक्तीपासुन वैतागलेला) चिखलू
21 Nov 2008 - 9:07 pm | कोलबेर
एका किराणा मालाच्या दुकानात रोज एक गिर्हाइक तिथल्या शेठजीला अर्वाच्य शिव्या देउन जात असतो. ह्यावर एकदा न राहवुन तिथला पोर्या शेठजीला विचारतो, 'आपको गुस्सा नही आता क्या?' ह्यावर शेठजी थंडपणे उत्तर देतो ' कुछ देकेही जा रहा है ना? कुछ लेके तो नही ना जा रहा..फिर ठीक है! "
(बनिया) कोलबेर
23 Nov 2008 - 6:10 am | सर्किट (not verified)
कोलबेरा,
हल्ली आपले शेठजीही असेच काहीसे थंडसे झालेले आहेत, असे फक्त मलाच वाटते आहे, की तुलाही ??
(मार्केट धबाधबा पडल्याने तशी बरीच देवमाणसे सध्या थंड झाली आहेत रे !)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
21 Nov 2008 - 9:07 pm | टारझन
आहो डांबिषकाका ...
हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत .. तेंव्हाच्या गोष्टी आता चालतील असं पटत नाही.
चुकी असेल तर शिव्या खाण्याचा संयम अंगी आहे, पण कोणी विणाकारण णडला तर फोडण्याशिवाय पर्याय आम्हाला णाही.
महाभारतात आम्हाला युधिष्ठीरापेक्षा भिमार्जून आवडले. कारण त्या बैल युधिष्ठीरामुळेच महायुद्ध झालं,नको ते फंडे लाउन दुर्योधनाला सुधारण्याचा मुर्खपणा केला. आजकाल दुर्योधनांची संख्या जास्त आहे .
(आडव्या डोक्याचा) टारझन उभे
21 Nov 2008 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत ......
टारू, म्हणूनच प्लास्टिक सर्जरीची गरज पडते.
बाकी बोधकथा आवडली/ल्या.
अदिती (टारूबाळाची आज्जी)
22 Nov 2008 - 11:45 pm | टारझन
प्रकाटाआ
21 Nov 2008 - 10:41 pm | वेताळ
आता कोण विनाकारण शिव्या देत असेल तर त्याला कृतीतुन उत्तर देण्याचा जमाना आहे. कथा छान आहे. आजकाल रागावर नियंत्रण राहणे खुप कठिण आहे. पण पिडांकाका तुमचा सल्ला लक्षात नक्की ठेऊ.
वेताळ
21 Nov 2008 - 11:15 pm | श्रीकृष्ण सामंत
फार छान लिहिलंय. आवडलं वाचायला
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
21 Nov 2008 - 11:44 pm | यशोधरा
बोधकथा आवडली पिडांकाका.
22 Nov 2008 - 12:00 am | पिवळा डांबिस
तुम्हा मिपाकर मित्रांची पण कमाल आहे राव!!!
मी ही कथा लिहिली होती जानेवारी मध्ये...
तुम्ही अभिप्राय देताय नोव्हेंबर मध्ये.....
नाय म्हणजे इतके महिने काय कथेवर चिंतन-मनन करत होता काय?
ही तर खुद्द गौतम बुद्धाच्या वरताण झाली की!!!!
:)
22 Nov 2008 - 1:03 am | अभिज्ञ
काका,
तुम्ही म्हणता ते खरे आहे,
पण माझ्या वाचनातून हि कथा खरच मिस झाली होती.
अभिज्ञ.
22 Nov 2008 - 12:09 am | यशोधरा
तुम्ही उदाहरणच असा दणदणीत दिल्यात मां काका, मगे काय करतीत मिपाकर तरी?? :)
22 Nov 2008 - 5:50 am | मनीषा
(मी आजच वाचली)
खरोखर बोध घेण्या सारखी ..
या कथेत सांगीतल्या प्रमाणे वागणे जमले तर सगळेच बुद्ध होतील.
पण तसे होत नाही म्हणून इतकी वर्ष झाली तरी दूसरा बुद्ध झाला नाही .
22 Nov 2008 - 9:12 am | पिवळा डांबिस
कोण म्हणतो दुसरा बुद्ध झाला नाही?
एकदा सदर्न कॅलिफोर्नियात चक्कर मारा.....
दुसरा बुद्ध दाखवतो!!!!
:)
आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर....
बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो.......
:)
22 Nov 2008 - 9:14 am | सर्किट (not verified)
आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर....
बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो.......
मस्त !!!!
मी मात्र महावीर...
-- (बाहुबली) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
22 Nov 2008 - 10:52 pm | पिवळा डांबिस
मी मात्र महावीर...
-- (बाहुबली) सर्किट
होय रे होय!!!!
तो दिगंबर महावीर मात्र तूच!!!:)
ती "जालनागडा" (संदर्भः मिसळप्रेमी!) ही पदवी काय उगाचच मिळाली काय तुला?:)
कासोटा घट्ट आवळलेला,
पिडां
23 Nov 2008 - 2:13 am | चतुरंग
असे हे आधुनिक बुद्ध आणि महावीर बघून मी मात्र हतबुद्ध झालोय खरा!! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, आता तू ही शंकराचार्य बनणे सुरु कर बाबा!! ;) )
चतुरंग
23 Nov 2008 - 6:13 am | सर्किट (not verified)
Namo ariha.ntaaNaM
Namo siddhaaNaM
Namo aayariyaaNaM
Namo uvajjhaayaaNaM
Namo loe savvasaahuNaM
eso pa.ncha Namokaaro
savva paavapaNaasaNo
ma.ngalaaNaM cha savvesim
paDhamaM hava{ii} ma.ngalaM
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
23 Nov 2008 - 9:02 am | जैनाचं कार्ट (not verified)
क्या बात है !
आमच्या खानदानात एकुलता एक मी ज्यानं याची देही.. याची डोळी.... विदेशी भाषा मध्ये नमोकार मत्रं वाचला =))
धन्य हो प्रभु सर्किट ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
23 Nov 2008 - 11:54 am | पिवळा डांबिस
सर्किटभाऊ,
आपण ह. घेतल्याबद्दल आभारी आहे.
-पिडां
22 Nov 2008 - 11:49 am | मनीषा
ती शिवास रिगल कि काय ... ती कुठे मिळते?
पुजे साठी आणखी काय काय साहित्य लागते?
22 Nov 2008 - 11:01 pm | पिवळा डांबिस
ती शिवास रिगल कि काय ... ती कुठे मिळते?
आरारारं! तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला इकती शिंपल गोष्ट म्हायती नाय?
सांगतो....
मध्य रेल्वेची लोकलगाडी पकडून ठाण्याला उतरायचं....
तिथे अभ्यंकरभटजी कुठे रहातात म्हणून विचारायचं......
त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे "उसाचा रस" मागायचा......
आणि ते फडताळात लपवलेली (त्यांच्या मातोश्री लय कडक आहेत!!!!) बाटली देतील ती घेऊन तडक आमच्याकडे यायचं!!!!
:)
पुजे साठी आणखी काय काय साहित्य लागते?
आणखी बर्फ लागतो. पण तो आम्ही देवस्थानातर्फे मोफत पुरवतो....
:)
22 Nov 2008 - 11:30 pm | टारझन
समदे लोकंच कासोटा सोडून नवी बोधकथा देउन रायलेत. ...
आधुनिक म्हाविर आणि आधुनिक बुद्धाला आधुनिक टारझणाचा ___/|\___
- टारझन
23 Nov 2008 - 12:15 am | अनामिका
तुमची बोधकथा आवडली
पण हे करता आल तर बर्याच अंशी आमच देखिल आयुष्य सुसह्य होईल.
प्रयत्न करुन बघु एकदा जमतय का ते?
कठीण दिसतय पण?????????
"अनामिका"
3 Sep 2010 - 11:06 am | शिल्पा ब
कधीही उपयोगी सल्ला...छान..
पण आम्ही असे वागलो कि लोक म्हणतात " कोडगी आहे "..त्यांना पण आम्ही फाट्यावरच मारतो म्हणा. ;)