आजपर्यंत खुपदा असे पहावयास मिळ्ते कि एखाद्या कल्पनेवर एखादी स्त्री काय लिहु शकेल ? असा विचार करुन लेखकांनी लिहलेले आहे, म्ह्नणुन सहज च असा विचार आला कि पुरुषांच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर मी त्यांच्या नजरेतुन काही वेगळे लिहु शकेन का?
जिव्हाळ्याचा विषय म्हणले तर सहजच आठ्वते ती मदीरा किंवा चेतन्यनलिका...
खुप सहज पणे या सवयीवर येता जाता ताशेरे मारले जातात... तर या विषयावर पुरुषांना काय वाटत असावे... जर घरात सुसंवाद असेल तर कदचीत या प्रकारचे नेराश्य कमी होउ शकेल...या अर्थाची ही १ मुक्त कविता...
अशाप्रकारचे लिह्ण्याचा पहिलाच प्रयत्न चु.भु.दे.घे.
पोटभर रडुन तरि तुम्हाला
तुमचे मन येत हलकं करता
मेत्रीणीत मारत असताना गप्पा
हलकेच उघडता येतो हद्याचा कप्पा
आम्हाला मात्र आमचे सारे ताण
असेच उराशी बाळगावे लागतात
रडु जरी फुटत असलं तरी थोपवावं
नाहीतर नामर्द विशेषण लावून घ्यावं
मित्र मंडळीतही मन, नाही येत उघडता
हळवेपण चारचोघात नाही येत दखवता
पोलादी प्रतिमेत आमच्याच आम्ही बंदिस्त
वाढत्या ताण - तणावांची मनावर गस्त
असह्य होतं , जेव्हा हे सगळं
घ्यावासा वाटतो एक कश
वा जवळ करावा एकचं पेग
असा ताण कमी करण्यापेक्षा, वाटतं..
घुसमटत्या क्षणी घालावी तुलाच साद
आपणा दोघात तरी असावा सुसंवाद !!
सुचेता सुळे
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 1:03 pm | सहज
वा वा! चांगला प्रयत्न.
घुसमटत्या क्षणी घालावी तुलाच साद
आपणा दोघात तरी असावा सुसंवाद !!
आवडले!
10 Mar 2009 - 1:05 pm | अवलिया
घुसमटत्या क्षणी घालावी तुलाच साद
आपणा दोघात तरी असावा सुसंवाद !!
क्या बात है !!! मस्त प्रयत्न !!
--अवलिया
10 Mar 2009 - 2:01 pm | बिपिन कार्यकर्ते
छान... पुकशु.
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2009 - 2:53 pm | सूहास (not verified)
"मित्र मंडळीतही मन, नाही येत उघडता"
"हळवेपण चारचोघात नाही येत दखवता"
सत्य आहे .अनेक वेळा हे असच॑ होत.
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
10 Mar 2009 - 2:59 pm | शरदिनी
हे व्यसनाचं उदात्तीकरण असलं तरी कविता आवडली....