तुम्ही कोण आणि कसे आहात पडताळा!

क्रान्ति's picture
क्रान्ति in जनातलं, मनातलं
10 Mar 2009 - 11:38 am

काल नागपूर सकाळचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. त्या निमित्त विवेक मेहेत्रे यांनी राशीवर्ष हा डिजिटल शो सादर केला. त्यात त्यानी चिनी पद्धतीनुसार राशीवर्ष कसे गणले जाते, त्याची विस्तृत माहिती दिली. मिपावरील सदस्यांना ती द्यावी म्हणून हा लेखनप्रपंच!
१२ वर्षांच्या कालांतराने मूषक, वृषभ, व्याघ्र, मांजर, गरुड, सर्प, अश्व, मेन्ढा, मर्कट, कुक्कुट, श्वान, वराह या प्राण्यांच्या नावाने राशीवर्ष गणले जाते. त्या राशीवर्षात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव त्या प्राण्यासारखा असतो, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. पहा आता आपण कोण आहोत, आणि खरेच तसे आहोत का!
१] मूषक :- १९१२, २४, ३६, ४८, ६०, ७२, ८४, ९६ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- बिन्धास्त जगतात, गोतावळा जमवतात, बचत करतात, चमचमीत खाणे आवडते. कुशाग्र व तीव्र बुद्धी.
महनीय व्यक्ती :- अटलबिहारी बाजपेयी, शेक्सपीअर, कुसुमाग्रज, राज कपूर, सौरव गान्गुली, जयवंत दळवी.
२] वृषभ:- १९१३, २५, ३७, ४९, ६१, ७३, ८५, ९७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- परिस्थितीच्या रणांगणात पाय रोवून उभे असतात. प्रबळ इच्छाशक्ती, रुक्ष असतात.
महनीय व्यक्ती :- हिटलर, पं. नेहरु, मनोहर जोशी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुल्कर, नसिरुद्दिन शाह, हृतिक रोशन, सद्दाम हुसेन, ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडकर.
३] व्याघ्र :- १९१४, २६, ३८, ५०, ६२, ७४, ८६, ९८ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- एकाग्र, प्रसिद्धी आवडते, टोकाचे निर्णय घेतात.
महनीय व्यक्ती :- बाळासाहेब ठाकरे, सत्य साईबाबा, सूर्यकान्त मान्ढरे, करिश्मा कपूर, ट्विन्कल खन्ना. {मी सुद्धा!}
४] मांजर :-१९१५, २७, ३९, ५१, ६३, ७५, ८७, ९९ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- शांत, सभ्य, संयमी, धूर्त, निवान्तपणा आवडतो, बिन्धास्त जगतात, जीवन तृप्त असते.
महनीय व्यक्ती :- श्रीदेवी, जाकीर हुसेन, डॉ. श्रीराम लागू, अझरुद्दीन.
५] गरुड :-१९१६, २८, ४०, ५२, ६४, ७६, ८८, २००० या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- काहीतरी भव्य करण्याची इच्छाशक्ती असते, त्यासाठी सतत झटतात, बरेचदा यशस्वीही होतात.
महनीय व्यक्ती :- लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, लालूप्रसाद यादव, ब्रूस ली, अभिषेक बच्चन, शरद पवार, दादा कोंडके.
६] सर्प :-१९१७, २९, ४१, ५३, ६५, ७७, ८९, २००१ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- शान्त, सद्गुणी, कमी पण मार्मिक बोलतात, यांचे वागणे कळत नाही, मार्गदर्शक असले तर यशस्वी होतात.
महनीय व्यक्ती :- इन्दिरा गान्धी, सुशिलकुमार शिन्दे, लता मंगेशकर, नर्गिस, शाहरुख, आमिर, सलमान खान.
७] अश्व :- १९१८, ३०, ४२, ५४, ६६, ७८, ९०, २००२ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- दिल्दार, रंगतदार, पाय एका ठिकाणी रहात नाही, धडधाकट, मिश्किल, चन्चल. यांच्या वाट्याला न गेलेले बरे!
महनीय व्यक्ती :- छत्रपति शिवाजी महाराज, अमिताभ बच्चन, रेखा, राजेश खन्ना, नेल्सन मंडेला.
८] मेंढा :- १९१९, ३१, ४३, ५५, ६७, ७९, ९१, २००३ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- भाग्य घेऊन जन्माला आलेले असतात, कमालीचे चोखंदळ, दानशूर असतात.
महनीय व्यक्ती :- पु. ल., रजनीश, नरसिंहराव, शम्मी कपूर, माधुरी दिक्षित, जुही चावला, बिल गेट्स.
९] मर्कट :- १९२०, ३२, ४४, ५६, ६८, ८०, ९२, २००४ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- जबर आत्मविश्वास, यशस्वी होतात.
महनीय व्यक्ती :- राजीव गांधी, सुभाषचन्द्र बोस, मोरारजी देसाई, पं. रविशंकर, धीरुभाई अम्बानी.
१०] कुक्कुट :- १९२१, ३३, ४५, ५७, ६९, ८१, ९३, २००५ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- कॉमेंट्स करणे आवडते, टोक गाठतात, फटकळ, सतत बोलत राहतात, कधी काय करतील याचा नेम नाही, हिशेबी.
महनीय व्यक्ती :- सत्यजित रे, विलासराव देशमुख, लादेन, स्टेफी ग्राफ, राम गणेश गडकरी, डिम्पल कापडिया.
११] श्वान :-१९२२, ३४, ४६, ५८, ७०, ८२, ९४, २००६ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- निष्ठेने प्रेम करतात, मैत्री आयुष्यभर टिकवतात, कमालीचे प्रामाणिक, मदतीसाठी कधीही धावून येतात.
महनीय व्यक्ती :- बिल क्लिन्टन, सोनिया गान्धी, मदर तेरेसा, कपिल देव, प्र. के. अत्रे, गोविन्दा, मनिषा कोईराला, दिलिप कुमार, मायकेल जॅक्सन.
१२] वराह :-१९२३, ३५, ४७, ५९, ७१, ८३, ९५, २००७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- दुस-यांचा नको तेवढा विचार करतात, नको तेवढे भाबडे, आपल्याला जे हवे ते मिळवण्यासाठी टोकाला जातात.
महनीय व्यक्ती :- सरदार पटेल, साने गुरुजी, धर्मेन्द्र, अनिल कपूर, संजय दत्त, देव आनंद, छगन भुजबळ, शाहीर साबळे.
तर आता पहा आपण कुठे बसतो ते! {ता. क. :- नियमाला अपवाद असू शकतात. तेव्हा---------------}
सगळ्या सदस्यांना होळीच्या शुभेच्छा!

ज्योतिषविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Mar 2009 - 11:43 am | अवलिया

प्रत्येक वैशिष्ट्यातील एकेक असेल तर हो.. :)

(मनुष्य) अवलिया

दशानन's picture

10 Mar 2009 - 11:46 am | दशानन

ओह माय गॉड !

ज्यांना ज्यांना मी ओळखतो... व ज्यांच्या जन्म वर्ष माहीत आहे, ते तर सर्व जुळत आहे यार.. मला विश्वास होत नाही आहे :O

क्रान्ति's picture

10 Mar 2009 - 11:50 am | क्रान्ति

म्हणूनच तर शेवटी ता.क. टाकल आहे ना! नियमाला अपवाद असणारच! मिपावर तर नक्कीच! तसही हे चिनी पद्ध्तीच ज्योतिष आहे, मेड इन चायना.
क्रान्ति

जृंभणश्वान's picture

10 Mar 2009 - 11:57 am | जृंभणश्वान

मी ८२ चा की
श्वान :-१९२२, ३४, ४६, ५८, ७०, ८२, ९४, २००६ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.

लेखात तेवढे महनीयचे कृपया प्रसिध्द व्यक्ती करता का?
धन्यवाद

सहज's picture

10 Mar 2009 - 12:24 pm | सहज

कमालीचे प्रामाणीक आणी पहीले नाव बिल क्लिंटन आता विचारा हिलरीला.

:-)

जृंभणश्वान's picture

10 Mar 2009 - 12:35 pm | जृंभणश्वान

वाचून जोरदार हसलो होतो.
आणि "मदतीसाठी कधीही धावून येतात", दिसली गाडी की धावून येतात मदत करु का, मदत करु का विचारत :)

limbutimbu's picture

10 Mar 2009 - 12:06 pm | limbutimbu

व्याघ्र - मी सुद्द्या
>>>> ३] व्याघ्र :- १९१४, २६, ३८, ५०, ६२, ७४, ८६, ९८ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
>>>> स्वभाव :- एकाग्र, प्रसिद्धी आवडते, टोकाचे निर्णय घेतात.
>>>> महनीय व्यक्ती :- बाळासाहेब ठाकरे, सत्य साईबाबा, सूर्यकान्त मान्ढरे, करिश्मा कपूर, ट्विन्कल खन्ना. {मी सुद्धा!}
मी सुद्धा! :) व्याघ्र
यावरील लेख्/पुस्तक वाचनात आले होते, पटते
इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :)

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

मॅन्ड्रेक's picture

10 Mar 2009 - 12:22 pm | मॅन्ड्रेक

वृषभ:- १९१३, २५, ३७, ४९, ६१, ७३, ८५, ९७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- परिस्थितीच्या रणांगणात पाय रोवून उभे असतात. प्रबळ इच्छाशक्ती, रुक्ष असतात.
महनीय व्यक्ती :- हिटलर, पं. नेहरु, मनोहर जोशी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुल्कर, नसिरुद्दिन शाह, हृतिक रोशन, सद्दाम हुसेन, ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडकर.

आणि सध्याचे-

Barack Hussein Obama II born August 4, 1961)
the 44th and current President of the United States

आ.
म्यॅन्ड्रेक
at and post : janadu.

यशोदेचा घनश्याम's picture

10 Mar 2009 - 12:35 pm | यशोदेचा घनश्याम

वृषभ:- १९१३, २५, ३७, ४९, ६१, ७३, ८५, ९७ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- परिस्थितीच्या रणांगणात पाय रोवून उभे असतात. प्रबळ इच्छाशक्ती, रुक्ष असतात.
महनीय व्यक्ती :- हिटलर, पं. नेहरु, मनोहर जोशी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुल्कर, नसिरुद्दिन शाह, हृतिक रोशन, सद्दाम हुसेन, ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडकर.

मी : १९८५ :)
मला आता वृषभ रास पण मिळाली. (वरील लेखात वृषभ रास नसून वर्षाला दिलेले प्राण्याचे नाव आहे.)
चंद्र्रासः मिथुन
लग्नरासः वृश्चिक
सूर्यरासः कन्या (पाश्च्यात्य पद्धत)

आणि आता चायनिझ क्रांतिमुळे, मी वृषभ!

यशोदेचा घनश्याम

limbutimbu's picture

11 Mar 2009 - 8:43 am | limbutimbu

तुमचा जन्म सात ऑक्टोम्बर एकोणीशे पन्चाऐन्शी, सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यानचा का? :)
(सहजच विचारले, बर का)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

विंजिनेर's picture

10 Mar 2009 - 12:31 pm | विंजिनेर

कुठल्याच राशीचे टोकाचे दुर्गुण दिलेले नाहीत !

(किमान) भारताबाहेरच्या चिनी रेस्टॉरंट मधे जेवण झाल्यावर बिलाबरोबर तांदळाच्या गोडसर, भाजलेल्या बिस्किटात तुमचं भविष्य असलेला कागद देतात(कागदाच्या दुसर्‍या बाजूला तुमच्या वजनाचा अंदाज नसतो म्हणा ;)).
त्यात सुद्धा वर सांगितल्याप्रमाणे सगळं भविष्य नेहेमी गोड-गोड, छान-छान असं असतं त्याची आठवण झाली ;)

संदीप चित्रे's picture

11 Mar 2009 - 12:52 am | संदीप चित्रे

चायनीज रेस्टॉरंटसमधे टेबलावर प्लेस मॅट म्हणून हा तक्ताही ठेवलेला दिसतो.
(महनीय व्यक्तींची नावं बदलून किंवा वगळून)

चिरोटा's picture

10 Mar 2009 - 12:51 pm | चिरोटा

दर बारा वर्षे झालि की पब्लिक सेम स्वभावाचे. सही आहे. आपले तर जुळतय बौ.

सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.

सँडी's picture

10 Mar 2009 - 4:58 pm | सँडी

तुम्हाला "विशाल कर्नाटका" सह महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणायचे आहे का? ;)

महाराष्ट्र-कर्नाटक एकत्रीकरण समिती

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2009 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार

हे काय कामाचे नाही हो !
आमच्या राजमातेने आम्हाला कधिच आम्ही कोण ते सांगितले आहे आणी अध्ये मध्ये ती ते रिपिट करत असते ! 'खायला कहार आणी भुईला भार.'

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

शितल's picture

10 Mar 2009 - 6:50 pm | शितल

>>'खायला कहार आणी भुईला भार.'
=))

शरदिनी's picture

10 Mar 2009 - 1:30 pm | शरदिनी

साने गुरुजि आणि संजय दत्त
एकाच क्याटेगरीत पाहून गंमत वाटली का कोणाला?

चिरोटा's picture

10 Mar 2009 - 2:23 pm | चिरोटा

साने गुरुजि आणि संजय दत्त
एकाच क्याटेगरीत पाहून गंमत वाटली का कोणाला?

दोघेही गान्धिवादी ना? चिनी सान्गत आहेत म्हणजे काहितरी साम्य असलेच पाहिजे.

हा पुढे जन्मणार या विचारानेच ते दु:खी झाले होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2009 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळ्या सदस्यांना होळीच्या शुभेच्छा!
सहमत.

ओ मानसशास्त्रवाले, गुंडाळा तुमची पुस्तकं आणि तीस-चाळीस ओळींचा अभ्यास करा फक्त!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक प्रभू's picture

10 Mar 2009 - 5:02 pm | विनायक प्रभू

मेंढा.
आय्ला रजनीस पण आप्ल्याच कॅटॅगरी मधे

सँडी's picture

10 Mar 2009 - 5:05 pm | सँडी

कुक्कुट :- १९२१, ३३, ४५, ५७, ६९, ८१, ९३, २००५ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती.
स्वभाव :- कॉमेंट्स करणे आवडते, टोक गाठतात, फटकळ, सतत बोलत राहतात, कधी काय करतील याचा नेम नाही, हिशेबी.
महनीय व्यक्ती :- सत्यजित रे, विलासराव देशमुख, लादेन, स्टेफी ग्राफ, राम गणेश गडकरी, डिम्पल कापडिया.

लादेन आणि आम्ही बरोबरच! B) कुक्कुच्च्यु कुSSSSSSSSS

- सँडी

क्रान्ति's picture

10 Mar 2009 - 5:09 pm | क्रान्ति

मी स्वतः श्वान नामक राशीवर्षातल्या एका [माणूस} प्राण्याला जवळून ओळखते. त्याच्या स्वभावात वर दिलेल अर्ध पण वैशिष्ट्य नाही, एवढच काय, पण अगदी उलट असा त्याचा स्वभाव आहे. निष्ठेने प्रेम, आयुष्यभर मैत्री, प्रामाणिक वगैरे वगैरे शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीत, उलट तो इतराना शिडीसारखा वापरतो, काम संपल की टाकल अडगळीत! अशा लोकांपुढे जगातले सगळे ग्रह-तारे, ज्योतिषाचार्य हात टेकत असावेत! नियमाचे अपवाद!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

एक's picture

10 Mar 2009 - 10:12 pm | एक

चायनीज वर्ष फेब्रुवारी मधे चालू होतं.

त्यामुळे ज्यांचा जन्म जानेवारी मधे झाला आहे त्यांनी आधीचं वर्षानुसार बघावं.
उदा. १ जानेवारी १९८६ असेल तर तो व्याघ्र नसून वृषभ होतो.

-एक गरूड

प्राजु's picture

11 Mar 2009 - 8:42 am | प्राजु

सह्ही!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हरकाम्या's picture

11 Mar 2009 - 5:00 pm | हरकाम्या

आयला मी श्वान पन्थातला हे कळल्यावर धक्काच बसला,
उध्यापासून मुन्शिपालिटीचे खांब मोजायला सुरुवात करावी म्हणतो.
कुणी पार्टनर आहेका ?