मिपावर भरभरून लिहिणार्या मिपाकरहो,
सध्या आम्ही पोटापाण्याच्या उद्योगामागे व दोन टायमाची भाकरी कमावण्यामागे प्रचंड व्यग्र आहोत..
अनेक मंडळी मिपावर भरभरून लिहीत आहेत, नवे नवे लेखन वरचेवर येत आहे हे आम्ही पाहतो आहोत. ते लेखन वाचणे किंवा त्याला प्रतिक्रिया देणे तर दूरच राहिले परंतु एखादा लेख उघडून पाहायला सध्या आम्हाला वेळ नाही..
मिपाच्या संग्रहात मोलाची भर घालणार्यांचे लेखन उघडूनही न पाहणे हे मालक या नात्याने आम्हाला शोभत नाही याची जाणीव आहे परंतु तूर्तास अजून तरी टाईम भेटेल असं वाटत नाही. तो पर्यंत आम्ही जेमतेम मुखपृष्ठ, आजची खादाडी बदलण्यापुरते आणि एक्का-दुक्का पाकृ वाचण्यापुरतेच मिपावर सक्रिय राहू...
तूर्तास तरी मिपा हे त्याच्या मायबाप मिपाकरांच्याच ताब्यात.. :)
आपला,
(व्यग्र मिपाकर) तात्या.
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 6:06 am | लवंगी
: (
10 Mar 2009 - 7:53 am | सँडी
>>सध्या आम्ही पोटापाण्याच्या उद्योगामागे व दोन टायमाची भाकरी कमावण्यामागे प्रचंड व्यग्र आहोत..
तुम्ही एलेक्शन मधे व्यग्र झालेले दिसताय!
चालु द्या!
- सँडी
10 Mar 2009 - 8:11 am | अवलिया
तूर्तास तरी मिपा हे त्याच्या मायबाप मिपाकरांच्याच ताब्यात..
सुटलो !!!!
--अवलिया
10 Mar 2009 - 9:20 am | भडकमकर मास्तर
खरंय..
मार्च महिना लै बिझी असण्याचा अस्तोय...
...
असो...
मिपाकर हे संस्थळ छान संगोपित (!) करतील
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Mar 2009 - 9:20 am | दशानन
:D
10 Mar 2009 - 9:30 am | दिपक
तूर्तास तरी मिपा हे त्याच्या मायबाप मिपाकरांच्याच ताब्यात..
आधी कुणाच्या होते..? :)
10 Mar 2009 - 12:10 pm | मॅन्ड्रेक
काम असणारच ,परंतु त्या निमित्ताने फिरताना काळजी घ्या.
उन्हाळ्याचे दिवस आहेत .
at and post : janadu.