शिक्षक असाल तर, किंवा शिकवण्याची आवड असेल तर, ही फ़ित जरुर बघा...
http://www.youtube.com/watch?v=pMcfrLYDm2U
ही फित तुम्हाला येणारे बदल किती वेगाने येणार आहेत व त्यासाठी विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये ह्यांनी स्वतःत काय बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते समजते.
पाहून तुमची मते जरुर कळवा.
आजच मी ही फित मी एका महाविद्यालयात माझ्या पेपर रिडींग साठी वातावरण निर्मिती साठी वापरली व त्याचा अत्यंत चांगला परिणाम झाला.
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 6:55 pm | लिखाळ
चित्रफित छान आहे. येणारे बदल वेगवान आहेत हे खरेच आहे. शिक्षकांनी अपडेटेट राहणे गरजेचे (नेहमीच) असते.
येणारे युग मानसिक ताण तणावांचे असेल असे म्हणतात. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची यासाठी सुद्धा तयारी करुन घ्यावी असे वाटते.
-- लिखाळ.
10 Mar 2009 - 7:09 pm | अजय भागवत
"येणारे युग मानसिक ताण तणावांचे असेल असे म्हणतात."
सहमत.
ज्यावेगाने माहिती तयार होते आहे तो वेग मानवाच्या आवाक्याबाहेरचाच असेल.
दुसरे भाष्य त्या चित्रफिती मधे असे केले आहे की, आता जन्माला येणारे मुल कमीतकमी १७ वेगवेगळ्या नोकर्या करेल त्याच्या ४०शी पर्यंत. ह्याने ताणतणाव वाढणारच.
त्यामुळे सतत नवे-नवे तंत्र कसे शिकावे ह्याचाही विचार करणे आवश्यक आहे. अथातो धर्म जिज्ञासा!
10 Mar 2009 - 7:26 pm | लिखाळ
बरोबर आहे. पण अर्थार्जन करण्यासाठी आपण आपले व्यक्तित्व घडवावे? की चांगले जीवन जगणे हा हेतू साध्य करण्यासाठी अर्थार्जन करावे?, याबाबत शिक्षकांनी मुलांना काही मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
या बाबत जी मते असतील ती व्यक्तीगणिक वेगळी असतील. पण असा काही विचार करण्याची सवय मुलांना लावणे हे एक मार्गदर्शक म्हणून शिक्षकाने करावे असे मला वाटते.
बदल होत जाणारच. काळाच्या रेघेवर एनट्रॉपी वाढतच जाते असा काही नियम आहे असा समज झाला आहे. त्यानुसार प्रचंड साधने, पर्याय उपलब्ध होत जातील. समस्यांचे तपशील बदलतील पण असमाधानाची आणि समाधानाची मूळ कारणे-उकल, 'काय हवे आणि काय नको' हे समजण्यातच राहतील. याबद्दलचे मार्गदर्शन विद्यार्थीदशेत मुलांना व्हावे असे मला वाटते.
माझे म्हणणे विषयांतर वाटेल. पण शिक्षक जेव्हा नव्या आव्हानांबद्दल बोलतो तेव्हा ओघानेच हा विषय येतो असे वाटल्याने मी लिहिले.
-- लिखाळ.
10 Mar 2009 - 8:17 pm | अजय भागवत
"चांगले जीवन जगणे हा हेतू साध्य करण्यासाठी अर्थार्जन करावे"
खरे आहे त्यात मतांतर होऊ शकते.
बाकी भौतिक गरजा आवश्यक तेव्हढ्याच ठेवुन जगावे ह्या संदर्भात एक खूपच सुचक लेख न्युयॉर्क टाईम्स मधे नुकताच वाचनात आला- जरुर वाचा-