मी जगतो आहे

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
9 Mar 2009 - 9:44 am

मी झुंडी बरोबर जगतो आहे,
झुंडी बरोबर तडजोड करतो आहे,
दुस-याशी जुळवुन घेण्यासाठी,
अ़खंड धडपडतो आहे....!

मी जसा आहे तसा कुणी च
स्विकारत नाही मला,
म्हणुनच दुस-यांना पाहिजे तसा..
बनाव लागतं आहे मला...!

स्वतःच रुप , मी कधीच उघड करत नाही,
उघडा बोडका नग्न मी कधी च होत नाही...
मी सतत लपवत राहिलो आहे स्वतःला,
पहिल्यांदा ..दुस-यापासुन.....
अन आता , स्वतःलाच.. स्वतःपासुन....!
मी अशा खोल अंधारात बळजबरीन लोटल आहे
स्वतःलाच..
कि दर्शनच होउ नये माझ मलाच...!!

कारण....
मला हवा आहे गौरव समाजा कडुन,
हवी आहे वहाव्वा झुंडी कडुन..
मी प्रकाशझोतातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनलो आहे,
गर्दीनी घातलेला मुकुट मला हवा आहे..
म्हणुन......
इतरांना पाहिजे तसा
मी जगणार आहे

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

जागु's picture

9 Mar 2009 - 12:47 pm | जागु

मला हवा आहे गौरव समाजा कडुन,
हवी आहे वहाव्वा झुंडी कडुन..
मी प्रकाशझोतातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनलो आहे,
गर्दीनी घातलेला मुकुट मला हवा आहे..
म्हणुन......
इतरांना पाहिजे तसा
मी जगणार आहे

छान सत्य.

क्रान्ति's picture

9 Mar 2009 - 8:39 pm | क्रान्ति

ही खरच वस्तुस्थिती आहे! खूप मनापासून लिहिली आहे कविता! आवडली.
क्रान्ति

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 9:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता (कळली) म्हणून छान आहे, पण अर्थ पटला नाही. कदाचित मला तसं करता येत नाही म्हणूनही असेल.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बेसनलाडू's picture

10 Mar 2009 - 1:36 am | बेसनलाडू

इतरांसाठी जगणे = स्वार्थाभिमुखता असेमानायचे कारण नाही. लोकानंदासाठी त्यांना हवे तसे वागण्यात काही गैर नसावे, असे वाटते (येथे लोक = तुम्ही स्वतः सोडून सगळे - आई,बाबा,जिवलग मित्र इ. सगळेच असे म्हणायचे आहे) त्यामुळे अदिती म्हणतात तसे कविता चांगली असली, तरी अर्थ पटलाच असे नाही.
(लोकाभिमुख)बेसनलाडू

सहज's picture

10 Mar 2009 - 8:43 am | सहज

असेच काहीसे.

चन्द्रशेखर गोखले's picture

10 Mar 2009 - 9:16 am | चन्द्रशेखर गोखले

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! या कवितीच्या निमित्ताने काही विचार झाला हेही नसे थोडके..!!

पक्या's picture

10 Mar 2009 - 12:07 am | पक्या

कविता आवडली.

मदनबाण's picture

10 Mar 2009 - 1:15 pm | मदनबाण

मी जसा आहे तसा कुणी च
स्विकारत नाही मला,
म्हणुनच दुस-यांना पाहिजे तसा..
बनाव लागतं आहे मला...!

हे एकदम सह्ह्ही आहे...

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

अनामिका's picture

10 Mar 2009 - 1:38 pm | अनामिका

मी जसा आहे तसा कुणी च
स्विकारत नाही मला,
म्हणुनच दुस-यांना पाहिजे तसा..
बनाव लागतं आहे मला...!

एकदम पटेश!
अगदी माझ्या मनातलेच विचार शब्दातीत झालेत असे जाणवले!
"अनामिका"

आपल्या लोकांसाठी हव्वी ती तडजोड आपण करतो कारण आपण त्यांच्यावर अतोनात प्रेम करतो पण समाजाकडुन गौरव हवा म्हणून तडजोड .....(?) पटत नाही काका, अन मी तरी तशी कधीच करणार नाही ...त्यामुळे ही कविता पटत नाही ... अन समजा असे जगत ही असेल कोणी तो घुटन नहीं महेसूस होगी क्या ?? किती घुसमट आहे अश्या जगण्यात ?? घूटी हूईं सांसोंमें जीने को.. जीना कैसे कहेते हो ??
~ वाहीदा