मी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
8 Mar 2009 - 2:33 pm

मी
मुक्त तरीही बन्धनात मी
फुलाफुलाच्या स्पन्दनात मी
मंद ज्योत ती मीच तेवती,
विरघळणा-या चन्दनात मी

कधी मीरेची एकतारी मी
कधी राधेच्या मन्थनात मी
वससी माझ्या अंतरात तू,
अविरत तुझिया चिंतनात मी

कळी पाकळी फुलवित जाते
जणु भ्रमराच्या गुन्जनात मी
पारिजातकापरी शिंपिले
सौख्य तुझ्या रे अंगणात मी

तुझ्या प्रीतीचा चन्द्र जडविला
नक्षत्रांच्या कोंदणात मी
भाग्यदैवता, तुलाच जपले
भाळावरच्या गोंदणात मी!

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

8 Mar 2009 - 2:45 pm | नरेश_

>> मुक्त तरीही बन्धनात मी
फुलाफुलाच्या स्पन्दनात मी
मंद ज्योत ती मीच तेवती,
विरघळणा-या चन्दनात मी

'विरघळणार्‍या' ऐवजी 'झिजणार्‍या' म्हणायचे होते का ?

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

चन्द्रशेखर गोखले's picture

8 Mar 2009 - 2:56 pm | चन्द्रशेखर गोखले

सुंदर..! खुप छान लिहीता..
विरघळणा-या शब्दच योग्य वाटतो..!

क्रान्ति's picture

8 Mar 2009 - 3:07 pm | क्रान्ति

विरघळणे हा शब्द एकजीव होणे, एकरूप होणे या अर्थाने वापरला आहे. झिजणे हा थोडा एकतर्फी किंवा त्रासदायक प्रकार वाटू शकतो ना गृहिणीच्या संदर्भात! [मी एकटीच झिजते या घरासाठी! बाकी कुणाला काय त्याच? वगैरे वगैरे!]
क्रान्ति