स्त्रीत्वदिना निमित्ताने...

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
8 Mar 2009 - 1:40 am

१.
इव्ह, "मी खूप विचारात पडलेय..."
दैवीशक्ती, "काय चाललय तुझ्या मनात?"
इव्ह, "हे बघ, तु मला बनवलंस, ही सुंदर बाग बनवलीस, पशु-पक्षी बनवलेस, पण आजकाल मला जरा भीती वाटायला लागलीय."
दैवीशक्ती, "बोलत रहा..."
इव्ह, "बऱ्याच वेळा मला कंटाळा येतो- काही मजाच नाही आयुष्यात. आणि हे इकडे तिकडे फ़िरणारे जंगली श्वापदं, विषारी साप...मला खूप भीतीपण वाटते."
दैवीशक्ती (विचारात पडून), "बरं..."
"हे बघ इव्ह माझ्याकडे एक कल्पक विचार आहे. मी एक "पुरुष" बनविणार तुझ्यासाठी"
इव्ह, "पुरुष?" हे काय प्रकरण आहे?"
दैवीशक्ती, "पुरुष हा एक दोषपुर्ण प्राणी असेल. त्याला अनेक कमकुवती असतील व हलक्या सवयी असतील. तो खोटं बोलेल, फ़सवेल आणि मुर्खासारखा वागेल- खरं म्हणजे तो एक कायमची डोकेदुखी असेल. पण त्याला काही चांगल्या बाजुही आहेत. तो ताकदवान असेल, आडदांड असेल. तो तुझे रक्षणही करेल, तो शिकार करेल आणि हे तुला बरेच फायद्याचे असेल."
इव्ह, "हं..मला असे वाटतेय की ही "पुरुष" कल्पना राबवायला बरी आहे. पण मला सांग, मला आणखी काही माहिती करुन घ्यायला हवी आहे का?"
दैवीशक्ती, "एव्हढेच..की, पुरुष एका अटीवर मी तयार करीन...जसे आपण बोललो की, त्याच्या उद्धटपणाचा विचार करता, ताळतंत्र सोडून वागण्याच्या सवयीनुसार व स्वकेंद्रीत व्यक्तिमत्वाला धरुन, पुरुषाला नेहमी असे वाटत राहील की, जगात सर्वप्रथम तोच आला. आणि तुला माहितच आहे की, जगात इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत वाद घालण्यासाठी त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य ठरेल. आणि हे बघ ही गोष्ट आपल्या दोघांतच राहीली पाहिजे.. तुला तर माहितीच आहे बायका-बायकांमधील गोष्टी...

२.
एक लहान मुलगा आणि त्याचे वडील कारने जात असता त्यांना अपघात होतो व त्यात ते दोघे जबर जखमी होतात. यथावकाश त्यांच्यापर्यंत मदत पोहोचते व त्यांना रुग्णवाहीकेतुन हॉस्पिटलला आणले जाते. ते दोघेही तो पर्यंत बेशुद्ध झालेले असतात. हॉस्पिटल मधे ही अपघाताची बातमी आधीच पोहोच्ल्यामुळे डॉक्टर तयारच असतात व त्यांचा स्टाफ दारार स्ट्रेचर घेऊन वाट पहात असतात. डॉक्टर आत ऒपरेशन्ची तयारी करत असतात.
रुग्णवाहीका हॉस्पिटल मधे पोहोचते पण तो लहान मुलगा आणि त्याचे वडील कोण आहेत हे कोणालाच माहित नसते. त्यांच्या नातेवाईकांना कसे कळवावे ह्या विवंचनेत असतानाच, त्यांना ऑपरेअशन थिएटर्मधे नेले जाते.
नर्स डॉक्टरांना माहिती देते की, पेशन्ट कोण आहेत हे अजुन कळले नाही.
ह्यावर डॉक्टर म्हणतात, त्याची काही गरज नाही, तो माझा नवरा आणि मुलगा आहे.

ज्यांनी ज्यांनी दैवीशक्ती आणि डॉक्टरच्या जागी "पुरुष" पात्र मनात पाहिले, त्या मानसिक घडणीला मानसशास्त्रात "इम्प्लिसीट असोशिएन" म्हणतात.

हे माझे वैयक्तिक मत आहे- जेव्हा स्त्रीला पुरुष (व पुरुषाला स्त्री) त्याच्या/तिच्या मनातल्या ह्या अशा "इम्प्लिसीट असोशिएन" मधे न अडकवता "पाहिल", तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष नात्यात प्रगती होईल.

कोणताही प्रतिसाद देण्याआधी हे पहावे अशी नम्र विनंती:
इथे जा- https://implicit.harvard.edu/implicit
मग भारताच्या झेंड्यावर टिचकी मारा, आणि मग "जेंडर" हा विषय निवडा.

[वरील दोन्ही प्रसंग मी भाषांतर केले आहेत. माझे त्यातील कष्ट म्हणजे भाषांतर करणे व डोक्यात असलेल्या सारांशाच्या आषयाला शोभतील अशा कथा शोधून काढणे. पहिली कथा कोणाची आहे हे कोणालाच माहित्य नाही- ती ईटरनेट वर आहे. दुसरी कथा मी माल्कम ग्लडवेलच्या "ब्लिंक" मधे वाचली असावी पण काहीकेल्या मला ते पान आज सापडले नाही.]

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

अजय भागवत's picture

8 Mar 2009 - 2:15 am | अजय भागवत

त्याच प्रमाणे हे ही वाचा: http://www.un.org/cyberschoolbus/womensday/pages/why_content.asp

लिखाळ's picture

8 Mar 2009 - 2:32 am | लिखाळ

मस्त ! डॉक्टर पुरुष असेल असेच मनात होते.. (वातावरण आणि आजवरचा अनुभव दुर्लक्षित करुन मते बनवावी कशी?)
तुम्ही सांगीतलेल्या संकेतस्थळालासुद्धा भेट दिली.. त्यांची कल्पना आवडली.

-- लिखाळ.

घाटावरचे भट's picture

8 Mar 2009 - 3:04 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो!

अजय भागवत's picture

8 Mar 2009 - 7:21 am | अजय भागवत

"वातावरण आणि आजवरचा अनुभव दुर्लक्षित करुन मते बनवावी कशी?"

ह्याबद्दल नंतर लिहीन...तुम्ही इतका योग्य प्रश्न विचारला आहे की बास!

मृदुला's picture

8 Mar 2009 - 3:39 am | मृदुला

उत्तम लेख. आवडला.
दिलेले दुवे बघते.

अडाणि's picture

8 Mar 2009 - 5:38 am | अडाणि

सोबत दीलेले दुवेपण पाहीले... काही टेस्ट पण करून पाहील्या... सुंदर आहे प्रोजेक्ट्ची कल्पना... आणि हो त्याचे रीझल्ट्पण पटले... मला वाटते ईतर धाग्यांमधे आरक्षणावर आपले मौलीक मत मांडणार्‍यांनी ह्या दुव्यावर जावून एक टेस्ट घेतली पाहीजे (तिथे बाकी विषयांबरोबर 'जात' हा पण विषय आहे...)

अफाट जगातील एक अडाणि.

स्वाती२'s picture

8 Mar 2009 - 7:13 pm | स्वाती२

छान लेख. प्रोजेक्ट मधल्या टेस्ट पटतात.
>> "वातावरण आणि आजवरचा अनुभव दुर्लक्षित करुन मते बनवावी कशी?"
यावर लवकर लेख येऊदे. बरेचदा माझे घोडे इथेच अडते. कळ्ते पण वळत नाही.

अजय भागवत's picture

8 Mar 2009 - 8:40 pm | अजय भागवत

नक्की