कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
7 Mar 2009 - 11:26 pm

"मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो त्याकडे सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो. "

शोभना मला ह्यावेळी भेटली तेव्हा आमच्या लहानपणच्या आठवणी काढून आम्ही बराच वेळ आनंदात घालवला.मी माझ्या आठवणी तिला सांगत होतो.ते सांगता सांगता शोभनाच्या कमाआत्याची आठवण मला निक्षून आली.
मी तिला म्हणालो,
"शोभना,तुझी कमाआत्या तुला खूप आवडायची.नव्हे तर तुला वरचेवर तुझ्या नातेवाईकांना भेट द्दायला तू बाजूच्या गांवात अगदी खूप उत्साही होऊन जायचीस आणि तिला भेटायचीस.मी पण एकदा तुझ्या कमाआत्याकडे आलो होतो.ती तुला नेहमीच काही ना काही तरी उपदेश करायची.तू तिचं सगळं ऐकून घ्यायचीस आणि करायचं तेच करायचीस.मला आठवतं एकदा तुला तिने शिवणकाम, भरतकामावर लेक्चर दिलं होतं. सांग बघुया काय होतं ते."
शोभना म्हणाली,

"त्यावेळी मी दहा वर्षाची असेन.जवळच्या गांवात वरचेवर जाऊन माझ्या नात्यातले वयस्कर नातेवाईक राहायचे त्यांना भेटायला जायला मला आवडायचं.त्या नातेवाईकात कमाआत्या माझी एक वयस्कर आत्या होती.ती तिच्या एका अविवाहीत मुली बरोबर राहायची.मी माझ्या कमाआत्याला वरचेवर भेटायची.तिला मी सदानकदा विणकाम, भरतकाम किंवा शिवणकाम करीत असलेली पाहायची.तिला भेटल्यावर ती मला नेहमीच ती करते ते काम शिकून घ्यायला मागे लागायची.
म्हणायची,
"ही कला शिकून घेतलीस तर तुझ्या रिकामटेकड्या वेळेचा उपयोग काही तरी लभ्यांश मिळवण्यात होईल."
मला तिला नकार देण्याचं कारण, कमाआत्या ज्या कामात वेळ घालायची ती कलाकृती रंगाच्या दृष्टीने आकर्षक नसायचीच त्याशिवाय त्या कामाची बनावट पण एव्हडं स्वारस्य घेण्यालायक नसायचं.मला हवं होतं ते म्हणजे आकर्षीत रंग असलेले गळपट्टे, हातमोजे, आणि झालर असलेले पेटीकोट असले प्रकार करायला मला आवडलं असतं.अशावेळी कमाआत्या मला एक तत्व सांगून जायची-जरी त्या तत्वामुळे माझ्या प्रवृतीत काही फरक पडला नसला तरी- त्याचा प्रभाव मात्र साफसाफ माझ्या भविष्यातल्या वागणूकीत कायमचा पडून गेला.
ती म्हणायची,
"कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं"
वर नंतर म्हणायची,
"तू सिधीसाधी मुलगी आहेस.तुझ्यात काही उत्कृष्ठ अशी कला मला सध्या दिसत नाही. आतापासूनच तू तुझ्या सुखाच्या दृष्टीने कोणतं काम उपयुक्त ठरेल हे पाहिलं पाहिजे.
ह्या बनावटीच्या गोष्टी जरी तुला सटरफटर दिसल्या आणि त्यात तुला स्वारस्य नसलं तरी ह्या मी बनवलेल्या वस्तू अनाथाश्रमातल्या मुलांना वापरायला,वृद्धाश्रमातल्या लोकाना वापरायला आणि हॉस्पिटातल्या गरीब रोग्याना वापरायला जातात.
मला ते बनवून गरजूंच्या सेवेला कार्यान्वित करायला- कुणी जरी त्याची उपेक्षा केली तरी- धन्य वाटतं.माझ्या लक्षात आलंय की एखाद्दा आवश्यक कामाकडे ते कितीही नीरस असलं तरी पाठ फिरवणं ही एक घातक गोष्ट आहे.असलं कुठचंही काम नुसती भरपाईच करीत नाही तर ते अत्यंत गोड असतं."

माझ्या आत्याचे हे बोलणं जरी माझ्या मनावर लगेचच परिणाम करू शकलं नव्हतं. तरी माझ्या कमाआत्याचं म्हणणं अगदीच काही फाल्तु नव्हतं.
मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण जे काय करतो ते सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो.
मी माझंच आश्चर्य करते कारण माझ्या लक्षात आलं की माझ्या ऍडल्ट जीवनात माझा वेळ ज्यात आत्याला समाधान वाटत होतं तशाच काहीशा प्रकारच्या कामात समर्पीत केला होता. अर्थात तसे उपयोगी कपडे मी तयार करीत नव्हते कारण आता फॅक्टरीमधे असले कपडे सर्रास बनवले जात आहेत त्यामुळे हाताने बनवायची गरज संपली होती.
मी अजाणपणे उपयुक्त आणि पाठमोडून जाईल अशी कामं करीत राहिले.
कुणी तरी म्हटलंय,
"जे काही काम हाताला लागेल ते सर्व शक्तिसामर्थ्याने करावं"
मी म्हणालो,
"शोभना आपल्याला अनुभवी मंडळी जे काय सांगतात,ते ऐकून घ्यायला काहीच हरकत नसतं.त्यांच म्हणणं अगदीच काही फाल्तु नसतं हे तुझं म्हणणं मला पटलं."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

मृदुला's picture

8 Mar 2009 - 3:46 am | मृदुला

भाषेच्या लहेजामुळे हे इंग्रजीतून केलेले भाषांतर वाटते आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture

8 Mar 2009 - 7:38 am | श्रीकृष्ण सामंत

लहेज म्हणजे हो काय मृदलाताई
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

क्रान्ति's picture

8 Mar 2009 - 3:16 pm | क्रान्ति

लहेजा म्हन्जे शुद्ध मराठीत [?] स्टाईल!
लेख छान आहे. खरच काम करत रहाण्यातच जगण्याचा आनंद आहे.
क्रान्ति

सूहास's picture

9 Mar 2009 - 9:17 pm | सूहास (not verified)

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "