उद्या महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा होणार पण खरेच आज ती स्वतंत्र आहे.
तिचे माहेर खुप श्रीमंत नाही पण खाउन पिउन सुखी. चार बहीणी लग्न होउन चांगल्या घरी गेल्या. आई नाही ती पहील्या वेळेस गरोदर असताना नवव्या महिना चालू असताना अचानक गेली.
लग्न झाल्यावर एक वर्ष व्यवस्थित गेले. तिचा नवर्याचा कॉम्प्युटर व्यवसाय ती पण त्यात त्याला मदत करती . दोघांचा प्रेम विवाह आई वडिलांच्या समंतीने झाला. एकाच जातीचे असल्याने बरेच रीतीरिवाज एक. तिचे सासरचे तीन मजली घर शिवाय भावासारखे दोन दिर. त्यांची लग्ने होवून ती परगावी असतात. सासू हिला सोडून त्यांच्याकडे जात नाही . पण ती आपल्या मुलाला मदत करते असा विचार करत नाही . रोज तिच्या मुलांना कुचके बोलणे. (पण त्यांना खायला प्यायला देते) ती सुग्रण असुन तिच्या स्वयंपाकाला नांवे ठेवणे.
ती सकाळी ११ वाजता कामाला गेली की रात्री ९.३०वा. येते. तोपर्यंत त्या काही स्वयंपाकाचे सुद्धा करत नाहि. मुलांना वर खाणे देतात मग ती मुले जेवत नाही. एक वेळ स्वयंपाक करावा तो चालत नाही. दोन्ही वेळेला गरम पाहीजे. व्यवसाय , घरातले सगळे बघून ती पार खचून गेली आहे .
एवढे सगळे करुन ती स्वतंत्र आहे.
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 8:40 pm | वेताळ
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?
वेताळ
9 Mar 2009 - 5:57 pm | चटपटीत
वेताळजी
मी फक्त न दिसणार्या मनात कुढत असणार्या स्त्री ची होणारि चलबिचल मांडली.
चटपटीत.
7 Mar 2009 - 9:08 pm | चित्रा
वर उल्लेखलेली स्त्री स्वतंत्र आहे हा प्रश्न आहे, की स्वतंत्र आहे हे एक विधान केले आहे ते कळले नाही, पण बहुदा हा प्रश्न असावा म्हणून त्या पद्धतीने लिहीते आहे. ही स्त्री तुमच्या ओळखीची आहे का? अजूनही असे अनेक घरात होते आहे हे पाहून आश्चर्य वाटते, मीही पाहिले आहे, पण अनेकदा मला याचे कारण वाटते ते असे की मुली आपल्या नेहमीच्या वागण्याच्या पठडीतून बाहेर येण्याचे धैर्य दाखवत नाहीत.
जागतिक महिला दिनासंबंधी माहिती मिळाल्याने निदान असे प्रश्न समोर आणावेसे वाटत आहेत, हे उत्तम. याचा अर्थ हा दिन उपयुक्त ठरत आहे.
आता या स्त्रीचा प्रश्न. मुख्य प्रश्न असा दिसतो आहे, की तिला घरची सर्व कामे करूनही, पैसा मिळवण्यात हातभार लावूनही तिला स्वातंत्र्य आहे असे वाटत नाही.
स्वातंंत्र्य म्हणजे नक्की काय याचा त्या स्त्रीने नक्की विचार करावा. माझ्या माहितीतील पूर्वीच्या काळातील काही घरांतील स्त्रिया या कामे करीत नसूनही "स्वतंत्र" होत्या, कारण घरातील सर्व निर्णय घेण्याच्या प्रक्रियांमध्ये त्यांचा सहभाग असे/होता, आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. या स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य असेल असे वाटते आहे. स्वातंत्र्य हे स्वयंपाकघरात नाही हा मुख्य प्रश्न आहे असेही दिसते आहे. याखेरीज निर्णयस्वातंत्र्य नसणे हा स्वातंत्र्य नसण्यातला मुख्य भाग आहे. त्याबाबतीत किती अन्याय होतो आहे हे तिनेच तिच्यापुरते ठरवले पाहिजे.
प्रश्न सासू घरात आहे हा मला वाटत नाही. किंबहुना ती घरात नसली तरी प्रश्न असणार आहेत याची जाणीव तिला बहुदा असावी. हल्लीच्या संयुक्त कुटुंबांत न राहणार्याही अनेक स्त्रियांचे हे होताना दिसते.
सासूची गरज जर तिला मुलांकडे दिवसा लक्ष देण्यासाठी असली, तर सासूबरोबर मिळवून जुळवून घेणे आले. त्यासाठी काही बाबतीत माघार घेणे आले. पण तरीही तिचे प्रश्न थोडे ठाम राहून (नवर्यला मदतीला शक्य असल्यास) घेऊन सोडवण्यासारखे आहेत असे मला वाटते. सासू-सून हे शब्द काढून टाकले तरी मुख्य प्रश्न रात्रीचा स्वयंपाक कोणी करायचा? पूर्ण स्वयंपाक जर सासूबाईच करीत असल्या तर त्यांनाही या वयात त्याचा कंटाळा आला असेल. आणि घर तिचे असले तर तिनेच/नवर्याने स्वयंपाकाचा विचार करावा हे उत्तम.
यासाठी काही पर्याय असू शकतात, पण त्याबद्दल स्पष्ट बोलावे हा सल्ला.
अनेकदा आपल्याला असे वाटते की अमूक बोलले तर तमूक व्यक्तीला काय वाटेल? यामुळे आपण जे मह्त्त्वाचे बोलणे करायचे आहे त्यापासून दूर पळतो, आपल्याच दु:खांना गोंजारीत राहतो. मुले हेच पाहतात, आणि नवरा/सासूही. आणि याचा परिणाम म्हणून मुलांनाही तशीच सवय होते, किंवा आई अशीच अशी कल्पना होते, आईबद्दल प्रेम असले तर घरातल्या इतर सामान्य व्यक्तींबद्दल (वडिल/आजी) चीड तयार होऊ शकते. हे होऊ नये, कधीकधी आपले विचार योग्य वाटत असले तर ते स्पष्ट बोलून दाखवण्याचे धैर्य दाखवावे. याचे फायदे दोन -
१. आपल्या मनात काही राहत नाही. कुढत राहण्याने होणारे दु:ख कमी होते. आपले दु:ख गोंजारण्याची सवय कमी होते.
२. समोरच्या व्यक्तीला कळते की ह्या व्यक्तीला मते आहेत, आणि जरा जपून वागावे लागेल, अशामुळे कोणी तुमच्या सौजन्याचा गैरफायदा घेत असल्यास त्याला आळा बसू शकतो.
गरम जेवणच पाहिजे तर तिला पर्याय आहेत का? एक म्हणजे त्यांना स्पष्ट सांगणे की हे मला जमत नाही, त्यांनाच विचारणे की काही पर्याय असू शकतात का? तीही पर्याय सुचवू शकते - जसे -सासूबाईंनी जर भाज्या चिरून ठेवल्या तर मी स्वयंपाक करीन. किंवा सोपे म्हणजे त्यांनी चपात्या करून ठेवल्या तर बाकीचे स्वयंपाकाचे पदार्थ मी करीन असे. नवर्याचा स्वयंपाकघरात सहभाग वाढायला हवा इत्यादी. हे सर्वसाधारण समंजस व्यक्तींनाही कळायला हरकत नाही. टोमणे मारण्यावरूनही स्पष्ट संवाद करावा, की मुलांकडून मला अमूक कळले आहे, हे खरे असल्यास मला आवडलेले नाही इत्यादी. याने ते पूर्ण थांबेल असे नाही, पण आळा मात्र नक्की बसेल.
पूर्णतः असमंजस व्यक्तींच्या बाबतीत टोकाचे पर्याय करावे जसे या घरातल्या सर्वांना जर या स्त्रीने केलेले गरमच जेवण हवे असल्यास सात आठ दिवस रोज रात्री खिचडी/भाजी एवढाच सोपा मेनू करावा. यातून कोणी टोमणे मारले तर त्याकडे दुर्लक्ष करावे, मुलांना शक्यतोवर समजून द्यावे की आईलाही आवडी निवडी आहेत.
7 Mar 2009 - 9:28 pm | मृदुला
मूळ लेखविषय नीट समजला नाही तरी हा प्रतिसाद पटला, आवडला.
9 Mar 2009 - 5:51 pm | चटपटीत
मृदुला
आभारी आहे.
9 Mar 2009 - 5:43 pm | चटपटीत
चित्रा
तुम्ही दिलेले पर्याय खरंच खुप चांगले आहेत. त्या बद्द्ल आभारी आहे.तुमची मते मी निश्चीत पोहचवेन.
चटपटीत.
8 Mar 2009 - 11:47 am | टारझन
फारंच चटपटीत लेख =)) =)) =))