http://www.misalpav.com/node/6371
http://www.misalpav.com/node/6418
गेल्या आठवड्यात मंदी आणि जागतीक मंदीचा सर्वसामांन्यांवर होणारा परीणाम याची बरीच चर्चा आपण सगळ्यांनी केली.प्रभू सरांनी एक प्रातिनीधीक स्वरुपाचे उदाहरण दिले होते.समस्या मला समजली ती अशी होती.
पुढच्या दोन वर्षात आणि त्यानंतर येणार्या साधारण दोन वर्षात येणार्या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद कशी करायची.?
मी वर उल्लेख केलेल्या चर्चाप्रस्तावाच्या आणि त्यात आलेल्या प्रतीसादाच्या आधाराने माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
१ :आता लक्षात घ्या की मंदी आहे हे खरं आहे ,येते आहे हे खरं आहे पण ती एका रात्रीत अंगावर कोसळणार नाही आहे.
मंदी हळूहळू पकड घेते. चड्डीचे इलास्टीक एका दिवसात ढिलं पडत नाही तसंच कुठल्याही आर्थीक परीस्थीतीचं असतं.येणार्या दिवसाचे संकेत बरेच दिवस आधी मिळत असतात.त्यासाठी आवश्यकता असते ती प्रोऍक्टीव्ह उपचाराची.आततायी स्वरुपाचे बदल एकाएकी करावे अशी अपेक्षा नाही.उदा:शेती करणे.घरातली गाडी टॅक्सी सारखी वापरणे /वापरायला देणे.परंतू वेळ पडल्यास काही कठोर निर्णय घेण्याची मनाची तयारी ठेवणे गरजेचे आहे.अशा वेळी बरेच जण काहीतरी करू या अशा नादात नव्या खड्ड्यात पडत असतात.उदा :मल्टीलेव्हल मार्केटींग च्या एखाद्या स्कीममध्ये सहभागी होणे.लक्षात घ्या मार्केटींग शेती करण्याइतकेच कठीण आहे.ते कौशल्य आत्मसात करायला बरीच वर्षे लागतात.तेव्हा असे निर्णय घेण्याआधी तारतम्याने विचार करावा.
तयारी करायला बराच वेळ मिळतो हे मला म्हणायचे आहे.
२ :येणारी मंदी पुढची चार वर्षंच राहील असे काहीही नाही.
कदाचीत दोन वर्षात रीव्हायवल होईल .कदाचीत पाच वर्षं लांबेल.काही गोष्टी भारतातल्या लक्षात घेतल्या तर येणारा काळा कालखंड सुसह्य होण्याची शक्यता आहे.
अ) आपला डोमेस्टीक सेव्हींगचा रेट जगात इतर देशापेक्षा जास्त आहे.
आ) आपल्या गरजा कमी खर्चाच्या आहेत.(पी.एल. ४८० चा गहू खाउन लोकसंख्येतत काही कमी नाही.ह.घ्या.)
इ)येणारे सरकार स्थिर राहीले तर आर्थीक धोरणात बरेच पॉजीटीव्ह बदल दिसून येतील.
हे बदल कशा स्वरुपाचे असतील ?
स्थिर सरकार तात्पुरत्या स्वरुपाचे बदल आणणार नाही.(ऍड हॉक मेजर्स नसतील) कायम स्वरुपी निर्णय घ्यायला वाव मिळाल्यावर कुठल्या सेक्टरमध्ये खरच आणि गुंतवणूक करायची याचा निर्णय सरकारला सहज घेता येतो.त्यामुळे अनाठायी खर्चाला कात्री लागून दरडोई उत्पन्न सावरले जाईल.
ई) इराकचे युध्द बंद झाले तर बाकीच्या देशातली मंदी आटोक्यात येईल त्याचा फायदा आपल्याला होईल.
३ :आता आपण प्रभू सरांनी दिलेल्या समस्येकडे पाहू या.बॅकेत शिल्लक : ५५००० जाव़कः महीना ८००० घराचा इ.एम.आय + ७००० गाडीचा हफ्ता. +१०००० घरखर्च
पॉलीसी प्रिमियमः २००० (दोन लाखाची मनीबॅक) १००० (५ लाखाची टर्म) ३००० (मुलाची आणि बायकोची मिळुन सुमारे ३ लाखाची एंडावमेंट) एकंदरीत प्रिमीयम ६०००
महीना : ३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता.९अजुन ५ वर्ष चालणार)
महीना: ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे)
बचतः महीना २ हजार
येते दोन वर्षातले जादा बोझः ११वी १२ वी सायन्स साठी महीना ५०००/-
इंजीनीयरींगला ऍडमिशन मिळाल्यावरचा वाढीव खर्च दोन वर्षानंतर महीना ९०००/-
१) ८००० घराचा इ.एम.आय + ७००० गाडीचा हफ्ता.+ ३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता = एकूण १८००० रुपये कर्जफेडीपोटी जात आहेत.
यापैकी प्रत्येक कर्ज रीस्ट्रक्चर करावे.कर्जाची मुदत वाढवून घ्यावी. परीणामी कर्जफेडीचे वर्षं वाढली तरी ताबडतोब कॅशफ्लो वाढेल.भारतात बर्याचशा सरकारी बँका हा बदल करण्यास नाखूष असतात.ह्याचे मुख्य कारण म्हणजे बँकात हे करायला वेळ जातो.परंतू एकदा अकाउंट एन.पी.ए. झाल्यावर (नॉन परफॉर्मींग ऍसेट) बदल करणे जास्त कठीण होते.हा बदल केल्यावर कॅशफ्लो साधारण सात ते आठ हजारानी वाढेल.म्हणजे हातात वर्षाला ऐंशी हजार शिल्लक राहतील.
२) पॉलीसी प्रिमियमः २००० (दोन लाखाची मनीबॅक) १००० (५ लाखाची टर्म) ३००० (मुलाची आणि बायकोची मिळुन सुमारे ३ लाखाची एंडावमेंट) एकंदरीत प्रिमीयम ६०००
बर्याच वाचकांनी पॉलीसी बंद करणाया सल्ला दिला आहे .त्यामुळे वर्षाकाठी बहात्तर हजार वाचतील असा होरा आहे.यात संभावना बर्याच आहेत.
अ) वेळेआधी पॉलीसी बंद केल्यामुळे विम्याचे संरक्षण मिळणार नाही.
आ) हातात पॉलीसीची डिस्काउंटेड वॅल्यु येईल.
इ) मंदी टळल्यावर पुन्हा विमा घ्यायला गेल्यास विमा मिळेलच याची खात्री नाही.(वय वाढलेले असेल.शारीरीक व्याधी वर आल्या असतील.)
आता असं बघा की पॉलीसी सरेंडर न करता कॅश फ्लो वाढवता येतो.
तो कसा ते पाहू या: पहीली पायरी: विम्यात क्लेम कन्सेशनची तरतूद आहे का याची पडताळणी करा.
क्लेम कन्सेशन म्हणजे विम्याचे हप्ते नाही भरले तरी विम्याचे संरक्षण चालू राहते.असे जर असेल तर पावणेदोन वर्षं हप्ते नाही भरले तरी चालेल.हातात वाढीव रक्क्म बहात्तर हजार रुपये.
दुसरी पायरी : हप्ते नाही भरले तरी पॉलीसीचे हप्ते जेव्हढी वर्षं भरले असतील त्या प्रमाणात विमा चालू राहतो.ह्याला पेडअप वॅल्यु असं म्हणतात.(एकूण विमा= पेडअप वेल्यु +ऍक्रुड प्रॉफीट्स)
तिसरी पायरी : पेडअप पॉलीसीच्या ९०% कर्ज कधीही मिळू शकते.हे कर्ज घेउन त्यातून एकरकमी टर्म इन्शुरन्स घ्यावा.बाकीच्या पैशातून विज, सोसायटी, गॅस ,टेलीफोन यांची वर्षभराची तरतूद एकरकमी भरावी.फायदा सहा ते सात टक्के.(मानसीक ताण १०० % दूर राहतील.) विमा कंपन्या पसिशाचा तगादा करत नाहीत .व्याज वेळेवर भरावे.अन्यथा फोरक्लोजर होऊ शकते.
३) गाडी काढून टाकावी का ?
जर घसारा पूर्णपणे वापरला असेल तर गाडी विकायला हरकत नाही.घरात वृध्द माणसे आहेत की नाहीत याचा उल्लेख नाही.राहण्याची जागा शहरापासून दूर असेल तर गाडी अत्यावश्यकही असेल.
गाडी भाड्यानी लावणे ही मोठ्ठी चूक ठरेल.खाजगी गाडी टॅक्सी म्हणून वापरायची झाल्यास परमीटचा वाढीव खर्च येतो.गाडीच्या इन्शुरन्सच्या काँट्रॅक्टचे उल्लंघन होईल ते वेगळेच.
४) ह्या सदगृहस्थांच्या प्लॅनींग मध्ये एक मोठी कमतरता आहे ती म्हणजे मेडीक्लेमचा
अभाव.मेडीक्लेम अत्यंत आवश्यक असतानाही(आधीचा अनुभव पदरात असताना )
थोडक्यात काय तर रीस्ट्रक्चरींग केले तर वाढीव कॅश फ्लो तर एंजीनीअरींग शिक्षणाचा खर्च भरून काढेल.
५) बॅकेतले पंचावन हजार हाताशीअसलेले बरे पण ते मुदतबंद करावे. वार्षीक रुपये दोनशे पन्नास भरून बर्याच बँका एक लाखाचा जीवन विमा देतात.मेडीक्लेम बँकेच्या स्किम मधून घेतल्यास स्वस्त पडेल.
हे सगळे बदल घडवून आणले आणि काही बदल जर नाही केले तर या नियोजनाचा काही फायदा होणार नाही.
जीवनमानात बदल घडवून आणणे ऐच्छीक आहे पण ते सक्तीचे होण्याआधी करावे.जीवनमान प्रिमीयम एंडचे असेल तर त्यात काटछाट करावी लागेल.पहेल्या दर्जाचा पास दुसर्या दर्जाचा करावा असे मी नाही म्हणणार कारण त्याचा कार्यालयीन कामावर परीणाम होतो.(मुंबईत)मिशा कापून मुडदा हलका होत नाही हे पण आहेच.
मनोरंजनासाठी एटीफाईव्ह टू वन सिक्स्टीफाईव्ह असा फरक करावा.पहीला पेगचा रेट आहे तर दुसरा क्वार्टर सिस्टीमचा आहे.(ह.घ्या.)
थोडेसे शेतीसंबंधी :महसूल खात्याच्या नियमाप्रमाणे शेतजमीन फक्त शेतकर्याला घेता येते.शेतकरी होण्याचे प्रमाणपत्र कलेक्टर देऊ शकतात.खर्च आहे.ह्यात एक प्रयोग मी करून पाहीला होता.शेती करायची जमीन विकत न घेता वार्षीक भाड्यानी घेतली. त्यात तुळशीची लागवड केली.तुळस ढोरं खात नाहीत. किड कमी पडते. वर्षभर विकली जाते.साप्ताहीक रजेला मित्रांसोबत जायला एक कारण मिळते.
मंदीच्या काळात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुढत न बसता आपले नातेवाईक ,मित्रपरीवार
यांच्या कायम संपर्कात रहावे.विचाराची देवाणघेवाण करीत रहावे.तोपर्यंत तेजीची सकाळ येतेच येते.
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 5:09 pm | घाटावरचे भट
_/\_
7 Mar 2009 - 5:09 pm | अमोल केळकर
संपुर्ण लेखाचे आकलन व्हायला थोडा वेळ लागेल.
अभ्यास करतो आहे.
यातील हे वाक्य
मार्केटींग शेती करण्याइतकेच कठीण आहे - पुर्णपणे सहमत
आपला
(सेल्समन ) अमोल
अवांतर : यातील ही काही वाक्ये आवडली
१).(मुंबईत)मिशा कापून मुडदा हलका होत नाही हे पण आहेच.
२ ) मनोरंजनासाठी एटीफाईव्ह टू वन सिक्स्टीफाईव्ह असा फरक करावा.पहीला पेगचा रेट आहे तर दुसरा क्वार्टर सिस्टीमचा आहे.
सगळ्यात महत्वाचे
'जीवनमानात बदल घडवून आणणे ऐच्छीक आहे पण ते सक्तीचे होण्याआधी करावे.'
'विचाराची देवाणघेवाण करीत रहावे.तोपर्यंत तेजीची सकाळ येतेच येते.'
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Mar 2009 - 5:13 pm | मराठी_माणूस
अत्यंत मुद्देसुद पध्दतीने समजावुन दीले आहे. धन्यवाद.
एक शंका शेतकरी होण्याचे प्रमाणपत्र कलेक्टर देऊ शकतात , हे कसे ? त्या साठी काय करयला हवे
7 Mar 2009 - 5:19 pm | विनायक प्रभू
छान सल्ला दिलात रामदास.
तुमच्या ताजमहाला माझ्या विटा.
गाडी विकली तर वर्षाला ८४,००० + किंमतीतला फरक सुमारे ५००००
११वी १२ वी च्या सायन्स ला क्लासेस लावताना जरा घाई करु नका. त्याना तुमची तेवढीच गरज असते. शेवट्ची बॅच ह्या थापांना बळी नपडता जरा धीर धरा. त्यांचा फोन आल्यास सुमारे ४०००० हजाराची बचत होईल. एकंदरीत कॅश फ्लो मधे वाढ= साधारण १७५०००
कॉलेज घराजवळचे निवडा. आणखी १०००० ची बचत होईल दोन वर्षात.
झाले की नियोजन. तुमची जबाबदारी ग्रॅजुएशन पर्यंत. पोस्ट ग्रॅजुएशनचा खर्च तुम्हाला परवडणार नाही.
एम्.बी.ए. करायचे झाल्यास दोन वर्ष नोकरी चा अनुभव घेउन स्वःत च्या पैशावर शिकावे असे आधीच बोलुन ठेवावे.
7 Mar 2009 - 5:31 pm | सुनील
सल्ले बरेचसे पटले. तुमचा मुख्य भर हा कर्जाच्या रीस्ट्रक्चरींगवर आहे आणि ते साहजिकच आहे कारण एकूण मिळकतीच्या ४५% रक्कम ही कर्जफेडीवर जाते आहे.
बाकी मनोरंजन वगळता राहणीमानात फारसे बदल करणे जमणार नाही आणि ते योग्यही नाही.
आता एक प्रश्न - जर का एखाद्याला मुदतपूर्व कर्जफेड करायची असेल (अंशतः, पूर्ण नव्हे), तर कर्जाचा हप्ता कमी करणे श्रेयस्कर ठरेल की मुदत?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Mar 2009 - 10:19 pm | रामदास
कर्जाची वेळेआधी परतफेड आवश्यकता भासत असल्यास करावी.
लिक्वीडीटी हातात असेल तर चांगलेच.येत्या काही दिवसापूर्वी टाटाचे एनसीडी आले होते किंवा स्टेट बँकेचे येऊ घातलेत त्यात पार्कींग करावेत.
परंतू कर्ज परतद्यायचे झाल्यास हप्ता कमी करणे सध्यातरी सोयीचे.
7 Mar 2009 - 5:53 pm | धमाल मुलगा
रामदासकाका,
उत्तम उपाय सांगितले. धन्यवाद.
बाकी, विमाक्षेत्रातला दांडगा अनुभव कामाला येतो तो असा :)
छोटे छोटे बारकावे छान सांगितले.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता
7 Mar 2009 - 6:01 pm | अवलिया
उत्तम सल्ला. अभिनंदन
अवांतर - फक्त एकच प्रश्न, डिप्लेशन स्पायरलच्या ब्लॅक होल मधे अर्थव्यवस्था गेली(च) तर .... जे होण्याची शक्यता आता खुप वाढली आहे.
--अवलिया
7 Mar 2009 - 6:18 pm | सहज
>विम्यात क्लेम कन्सेशनची तरतूद आहे का याची पडताळणी करा.
तुमचे मत काय? दोन लाख, ३ लाख अश्या पॉलीसी विकताना अशी फ्लेक्सीबीलिटी बाय डिफॉल्ट दिली असते/असेल?
तसेच समजा नसेल दिली पण आता त्या विमा अधिकार्याकडे गेल्यावर त्याच्या हातात असु शकते अश्या प्रकारच्या कन्सेशन देणे?
कारण हा एक अतिशय उच्च सल्ला आहे. ज्याचे सगळे ठीक चालले आहे सध्या तरी त्यांनी निदान आपल्या एजंटशी बोलून ह्या तरतुदींविषयी आताच माहीती करुन ठेवायला हरकत नाही.
आरोग्यविमा व टर्म पॉलीसी असल्यास, मनीबॅक व एन्डोव्हमेंट आदी पॉलीसी बद्दल आपले मत काय ?
घराचा मासीक हप्ता मासीक उत्पन्नाच्या २५% पेक्षा आधीक असावा का?
हा धागा अजुन पुढे चालू ठेवुन रामदास यांनी आर्थीक नियोजन विषयातील अजुन महत्वाचे पैलु आपल्यापुढे मांडावेत अशी त्यांना सगळ्यांतर्फे विनंती करतो.
7 Mar 2009 - 6:30 pm | धमाल मुलगा
सहजरावांच्या ह्या विनंतीला आमचं पुर्ण अनुमोदन.
आवाजी मतदान पध्दतीमध्ये आमचं मत ह्या विनंतीला :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म
7 Mar 2009 - 6:42 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो.
ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे.
गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली.
पण पुर्ण विचारांती आवडली.
आज बचो तो कल लढोगे.
7 Mar 2009 - 6:43 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो.
ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करणारे एक वेगळे सदर चालु करावे.
गृह कर्जाच्या रीस्ट्रक्चरींग ची कल्पना सुरवातीला जर जड गेली.
पण पुर्ण विचारांती आवडली.
आज बचो तो कल लढोगे.
8 Mar 2009 - 10:27 pm | रामदास
आयुर्विमा महामंडळात क्लेम कन्सेशन बहुतेकशा विम्यात अंतर्भूत असते.
काही युलीप पॉलीसीत हे आपोआप आहे.काही युलीप पॉलीसीत नाही.
विमा अधीकार्याच्या हातात मॅन्युअलप्रमाणे फायदे देणे एव्हढेच असते.
घराच हप्ता : कर्ज देणार्या कंपन्या सर्वसाधारण पणे टेक होम च्या चाळीस टक्के धरतात.
चाळीशीच्या आधी पंचवीस टक्के ठिकच आहे.
7 Mar 2009 - 6:44 pm | बिपिन कार्यकर्ते
पुढच्या वेळी विमानतळावरून थेट ठाण्यात येणार...
बिपिन कार्यकर्ते
7 Mar 2009 - 9:55 pm | प्रकाश घाटपांडे
.
एके काळी
उत्तम शेती
मध्यम धंदा
कनिष्ठ नोकरी असे होते ते आता उलट झाले आहे. आधुनिक व बागाईती शेती व्यवस्थित केली तरच फायद्यात जाण्याची शक्यता.
असे प्रयोग केलेल्यांचे लेख वाचनात आहेत. बहुतेक सुधारक व साधनात वाचले आहेत.
(तीन पिढ्यांची शेती नंतर तोट्यात गेल्याने विकलेला)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Mar 2009 - 10:55 pm | संजय अभ्यंकर
आयुर्वीमा कंपन्यानी, विविध पॉलिस्या, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे चालू केल्या.
विमा एजंट अधून मधून भेटतो व अमुक एक पॉलीसी फार छान आहे (घेऊन टाका) म्हणून सांगतो.
अमेरिकेत ज्या प्रमाणे सामान्य माणसाला कळेल अश्या पद्धतीने गुंतवणूकीच्या योजना सांगणारी संकेत स्थळे आहेत.
आयुर्वीमा महामंडळात काम केलेल्यां पैकी कोणालाही ह्या विषयावर सामान्यांना समजेल असे पुस्तक अथवा संकेत स्थळ
चालू करावेसे वाटत नाही (आयुर्विमा महामंडळाला ही नाही).
विमा एजंटांकडे कोष्टके दिसतात, परंतू ती मला आजतागायत कळलेली नाहीत.
एक उत्तम विमा एजंट आपल्याला, आपल्या आर्थीक स्थितीशी सुसंगत अश्या विविध पॉलिस्यांचा गट अथवा शृंखला देऊ शकतो.
जी आपल्याला दिर्घ कालीन लाभ देत रहाते.
माझ्या नशिबाने मला असा विमा एजंट भेटला. वयाच्या तीशीत घेतलेल्या पॉलीस्या, सतत परतावा देत आहेत.
त्यामूळे मला दरवर्षी हप्ते भरावे लागत नाहीत. दर दोन एक वर्षांनी हप्ते (आलेल्या परताव्यातून) परस्पर निघतात.
मला पॉलीस्या देताना त्या विमा एजंटाने केलेली एक गोष्ट म्हणजे, त्याने माझ्या घरी एका विमा अधिकार्याला आणले होते.
त्याने माझ्या उत्पन्नाचा व उत्पन्न वाढीच्या वेगाचा अभ्यास करुन पॉलीस्यांची एक जंत्री मला घ्यायला लावली होती.
येत्या दोन वर्षांनंतर माझ्या एक - एक पॉलीस्या क्रमा क्रमाने पूर्ण होतील.
त्या विमा एजंटाशी आता पासून चर्चा करून मी त्या पुन्हा नव्याने कशा सुरू करता येतील ह्याची योजना बनवत आहे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
8 Mar 2009 - 12:35 am | विसोबा खेचर
रामभाऊ,
उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन..! सुंदर समुपदेशन..!
तात्या.
अवांतर - लग्न न करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्याच लोकांच्या लक्षात येत नाही! :)
8 Mar 2009 - 10:29 pm | रामदास
करणे हा देखील उत्तम आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे हे बर्याच लोकांच्या लक्षात येत नाही!
9 Mar 2009 - 1:33 am | chipatakhdumdum
टवाळा आवडे विनोद.. तात्याचा काळा विनोद , रामदास भाउना bouncer...
9 Mar 2009 - 7:04 am | धनंजय
रामदास यांनी बाउन्सर परतवलाच नाही तर अगदी हलक्या नजाकतीने सीमेपार केला आहे - विनोदावर चढवला नर्मविनोद...