जुन्या गाण्याच्या चालीवर पुढील काव्य गावे.
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सरू
जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू
शरीराच्या त्या गरजेसाठी यज्ञकर्म ते करू
खाऊ नाही तर मरू,खाल्ल नाही तर मरू
खाऊ नाही तर मरू
लढतिल सैनिक , लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू
मरतील बक-या तसेच पक्षी
मरतील मछल्या,पडतील भक्षी
आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू
देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू
देह आमुचा हाडमासांचा,रक्त आणिक जिवपेशींचा
शक्तिवान तो करू, खाऊ नाहीतर मरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू
भेकेसाठी खाद्यच उत्तर, जिव्हा न थांबे जरा तसूभर
पोट आपुले भरू, खाऊ नाही तर मरू
हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
रोग होवो किती भयंकर,पिठ्या पिठ्या तो चालो नंतर
आम्ही कशास डरू ,खाऊ नाही तर मरू
खाल्ल नाही तर मरू ,खाऊ नाही तर मरू
प्रतिक्रिया
24 Jan 2008 - 6:55 am | धनंजय
चांगला सराव करत आहात. अशा सरावाने विडंबने अधिकाधिक सुधारत जातील.
24 Jan 2008 - 7:02 am | विसोबा खेचर
मरतील बक-या तसेच पक्षी
मरतील मछल्या,पडतील भक्षी
आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू
वा वा! अप्रतिम विडंबन...
मिनल मॅडम, आपल्या प्रतिभेला प्रणाम! अजूनही अशीच उत्तमोत्तम विडंबने येऊ द्यात प्लीज..
आपला,
(खादाड) तात्या.
24 Jan 2008 - 8:23 am | मीनल गद्रे.
भेकेसाठी ऐवजी भुकेसाठी वाचावे.
मीनल
24 Jan 2008 - 11:10 am | इनोबा म्हणे
वाह! छान
मिपावर आलेल्या काही इतर कवितांची विडंबने करा... त्यात जास्त मजा वाटते...
-इनोबा
24 Jan 2008 - 6:36 pm | किशोरी
मीनलजी छान आहे विडंबन
आम्ही सतत चरु,खाऊ नाहीतर मरु..मस्त!
24 Jan 2008 - 11:42 pm | प्राजु
मिनल,
मस्त आहे हे विडंबन..
देह आमुचा हाडमासांचा,रक्त आणिक जिवपेशींचा
शक्तिवान तो करू, खाऊ नाहीतर मरू
आणि
भुकेसाठी खाद्यच उत्तर, जिव्हा न थांबे जरा तसूभर
पोट आपुले भरू, खाऊ नाही तर मरू
हे एकदम जबरा...
- प्राजु
27 Jan 2008 - 4:30 pm | सुधीर कांदळकर
त्रिवार अभिनंदन. छान कविता. मिसळपाव देखील बहुधा आपलीच कविता होती. येऊ द्यात आणखीन. आम्ही खाण्यास समर्थ आणि आतुर आहोत.