क्षण

जागु's picture
जागु in जे न देखे रवी...
7 Mar 2009 - 2:22 pm

क्षण क्षण जगावे
आयुष्य हे वसूल करावे

जीवनात क्षण समजू नका
प्रत्येक क्षणात आहे जीवन

सुखाचे क्षण, दु:खाचे क्षण
सुखात आनंदे डुंबायचे
दु:खातही तितकेच रमायचे

क्षण असतात प्रेमाचे, विरहाचे
प्रेम क्षणात साठवायचे
विरहात त्यांना स्मरायचे

क्षण हे मौजेचे, कंटाळ्याचे
मौजेमध्ये उधळायचे
कंटाळ्याला सावरायचे

क्षण असतात रागाचे, लोभाचे
रागामध्ये जळायचे
लोभामध्ये साधायचे

क्षण असतात रुसण्याचे, मनण्याचे
रुसताना तट्ट फुगायचे
मनताना थोडे आखूडच व्हायचे

क्षण असतात कष्टाचे, विसाव्याचे
कष्ट करत धगधगायचे
विसावा घेत शांत व्हायचे.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

दशानन's picture

7 Mar 2009 - 2:32 pm | दशानन

>>प्रेम क्षणात साठवायचे
विरहात त्यांना स्मरायचे

खासच :)

सुंदर !

येथे प्रेम तेथे विरह... जेथे विरह, तेथे दुखः, जेथे दुखः तेथे खांदा व जेथे खांदा तेथे आपोआप येतो खंबा =))

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

धमाल मुलगा's picture

7 Mar 2009 - 6:10 pm | धमाल मुलगा

ह्म्म....
अवघड आहे बॉ! जीव कुठे गुंतवणे म्हणजे घोडचुकच झालीय हल्ली!

जेथे विरह, तेथे दुखः, जेथे दुखः तेथे खांदा व जेथे खांदा तेथे आपोआप येतो खंबा

=)) राजे, एकदम मोक्काट सुटला आहात की!
ह्या वाक्यावरुन मला पेठकरकाकांनी धीर दिला होता आणि तुम्ही त्यांना अनुमोदन दिलेला प्रसंग आठवला ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म

क्रान्ति's picture

7 Mar 2009 - 8:12 pm | क्रान्ति

खूप सुंदर कविता आहे.
क्रान्ति

जागु's picture

9 Mar 2009 - 11:08 am | जागु

राजे, क्रांती तुमच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.