हत्या !!!

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
7 Mar 2009 - 12:15 pm

खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती .

*

"फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर.. निपचित पडलेले होते म्हणून मी घाबरुन फोन केला तुम्हाला."- शेजारी म्हणाला.

शहराच्या पॉश एरिया मध्ये राजकिय व व्यवसायी मंडळी मध्ये उठबैस असलेल्या अरविंद ची हत्या झाली होती, बाहेर प्रेसवाले / टिव्ही वाले हल्लाकोळ करत होते व पोलिस अधिकारी आपले काम करत होते, अरविंद चे शव डाव्या बाजूला कललेल्या अवस्थेमध्ये सोफ्यावर होतं, जवळच मोबाईल, सिगरेटचे पॉकिट व समोर टेबलावर दारुची बाटली एक ग्लास गाडीची चावी व टिव्हीचा रिमोट पडलेला होता, ग्लास मध्ये थोडी दारु होती अजून . जवळच एक स्कार्प पडला होता व शक्यतो त्याचा वापर करुनच अरविंदा गळा दाबला गेला असावा. जवळ पास झटापटीच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. वयाने अडतीस-चाळीस च्या दरम्यान असलेल्या व शरिराने ताकतवर असलेल्या अरविंद ने कसा काय वाचण्याचा प्रयत्न केला नसेल हा विचार करत असताना पोलिस अधिकारी इकडे तिकडे पाहू लागले होते त्यांना जी गोष्ट हवी होती ती दिसत नव्हती, पाण्याचा जग अथवा सोड्याची बाटली, म्हणजे काय अरविंद डायरेक्ट पॅग घेत होते व जास्त झाल्यामुळे त्यांच्या कडे आपल्या बचावाची ताकतच राहिली नसावी, हा विचार करत असताना त्या अधिका-याने जेथे ग्लास ठेवला होता तेथे जरा निरखून पाहीले व म्हणाले " येथे अजून एक ग्लास असला पाहीजे, ह्याचा अर्थ ह्यांच्या बरोबर दुसरा कोणी तरी होता जो दारु पण पीत होता व ती शक्यतो शेवटची व्यक्ती होती ज्यांने अरविंदला जिवंत पाहिले असेल. त्यांनी रुमालानेच मोबाईल उचलला, चांगल्या कंपनीचा मोबाईल होता, शेवटची कॉल कुणातरी शर्माची होती जी चाळिस एक सेकंदाची होती पण त्याच्या आधीची कॉल सतिशची होती जी जवळ जवळ अर्धातास चालू होती जी ८ च्या सुमारास आली होती व डॉक्टरांच्या टिम ने सांगितले की हत्या रात्री साडे नऊ ते दहा च्या आसपास झालेली असावी.

*

काही विचार करत पोलिस अधिका-याने सर्व घर व्यवस्थीत पाहून घेतले जवळ जवळ प्रत्येक वस्तू जागेवरच होती, त्यामुळे चोरी हा उद्देश नव्हताच हत्येचा, परत ते किचन मध्ये आले व शोधक नजरेने काही तरी शोधू लागले व त्यांच्या चेह-यावर एक अस्पष्ट असे समाधान दिसले, ते समोरील ग्लासच्या रॅक कडे पाहत होते, १२ ग्लास पैकी एक ग्लास बाहेर टेबलावर होता व एक गायब होता. तो सेट पुर्ण नव्हता, पण शक्यतो एकाद दुसरा ग्लास फुटला असेल कधी तरी हा विचार करुन त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर प्रत्येक वस्तूचा बरोबर सेट होता, १२ प्लेट, १२ बाऊल्स, चमचे सर्व काही १२ च्या संख्ये मध्ये. ह्यांच्या घराचा नंबर पण डी-१२ होता, तेव्हा शक्यतो अरविंद आपल्या स्वतःसाठी बारा नंबर लकी समजत असावेत, तेव्हा जरी ग्लास फुटला असेल तर त्यांनी तो सेट नक्कीच पुर्ण केला असेल मग. आता तो ग्लास शोधणे गरजेचे होते कारण तो शक्यतो तो हत्या-याला पकडण्यासाठी मदत करेल.

*

बाहेर गार्डन मध्ये, मागे सर्विस कॉटर मध्ये, गॅरेज मध्ये सर्वत्र शोधा सोध करुन झाली पण काहीच सापडले नाही ज्याच्या द्वारे हत्या करणा-याची ओळख होऊ शकेल, अरविंद एकटाच राहत असे व जवळ जवळ तो रोजच पार्टी ला बाहेर जात असे त्यामुळे फक्त सकाळी घरकाम करण्यासाठि एक गडी होता जो घर स्वच्छ करणे, कपडे धुणे इत्यादी करुन २ वाजता निघून जात असे, घराची एक चावी त्याच्या कडे व एक अरविंद कडे होती, व्हिआयपी एरिया असल्यामुळे सर्वत्र गार्ड फिरत असतचं त्यामुळे समोरच्या घराचा गार्डच अरविंदच्या घरावर ही लक्ष ठेऊन असे.

*

गार्ड कडे थोडी फार माहीती मिळाली पण जरा ही कामाची नव्हती, सात-आठ जणे वेगवेगळ्या गाड्या घेऊन आले होते व थोड्या थोड्या अतंराने निघून गेले होते पण रात्री एक गाडी परत आली होती, व लगेच पाच मिनिटात गेली होती, पण काही कारणामुळे गार्ड त्या गाडिचा नंबर सांगू शकत नव्हता.. नाही तो गोंधळला होता, त्यांचे म्हणणे होते की अरविंद हे १२ च्या आसपास गाडी घेऊन बाहेर गेले होते व १२.४५ च्या आसपास परत आले पण डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार हत्या साडे नऊ च्या आसपास झाली आहे, व सर्वात महत्वाचे गाडी तर आत गॅरेज मध्ये उभी आहे व हा म्हणतो आहे गाडी बाहेर गेली .. तर मग हे गाडीचे काय लफडे .. हा विचार करत पोलिस अधिकारी पुन्हा गॅरेज कडे आला व येथे असलेली स्विफ्ट गाडी ला एक चक्कर मारली व विचार करु लागले. त्यांनी काही तरी नक्की ठरवले व जी फिंगर प्रिंन्ट ची टिम आत ठस्से घेत होती त्यांना ह्या गाडीचे पण ठस्से घेण्यासाठी सांगितले.

*

"यु आर अंडर अरेस्ट मीस्टर सतिश "- पोलिस अधिकारी म्हणाला, " तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे ते " - सतिश जरा गुर्मीतच म्हणाला, " हम्म, हो मला माहीत आहे तुमचे कनेक्शन खुप वर पर्यंत आहेत पण सबळ पुरावा माझ्या हाती आहे की तुम्हीच अरविंदचा खुन केला आहे व तुमचे हाताचे ठस्से व सर्वात मोठा पुरावा अरविंदचा मोबाईल आहे, ज्या मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे."
सतिशचा चेहरा पडला व तो मटकन आपल्या खुर्ची वर बसला. " मिस्टर सतिश, तुम्ही अरविंदशी फोन वर अर्धा तास बोललात, काही तरी तुमचा वाद झाला व तु सरळ अरविंदच्या घरी आलात, अरविंद आधी पासून दारु पीत होताच, त्याच्या बरोबर तुम्ही ही दारु पिली व जेव्हा तुम्हाला असे वाटले कि आता अरविंद प्रतिकार करु शकणार नाही तेव्हा त्याच्याच गळ्यातील स्कार्प ने त्याचा गळा आवळला व आपल्या काहीच खाणाखुणा राहू नयेत ह्यासाठी तुम्ही तो ग्लास पण आपल्या बरोबर घेतलात, सरळ गाडीत बसून घरी निघून गेलात, पण येथे तुम्ही एक मोठी चुक केली होती, अरविंद कडे व तुमच्या कडे एकाच कंपनीची , एकाच रंगाची व एकाच मॉडेलची गाडी होती व तुम्ही दोघांनी एकाच दिवशी घेतली होती, व पळून जाण्याच्या गडबडी मध्ये तुम्ही चुकून अरविंदची गाडी घेऊन गेलात, शक्यतो तुम्ही घरी पोहचला असाल तेव्हा तुम्हाला तुमची चुक लक्षात आली, तुम्ही ती आपली चुक सुधारण्यासाठी परत अरविंदच्या घरी आलात, त्याची गाडी जी तुम्ही घेऊन गेला होता त्याला तुम्ही गॅरेज मध्ये उभी केले, येथेच तुम्ही चुकला, अरविंद गाडी गॅरेज मध्ये कधीच उभी करत नसे, हे गॅरेज मध्ये असलेल्या धुळीमुळे आम्हाला समजलेच होते व आजू बाजूला विचारणा केल्यावर पण सर्वांनी घेच सांगितले की गाडी कधीच गॅरेज मध्ये उभी नसते. त्यांनतर तुम्ही अजून चुक केलीत जो ग्लास तुम्ही टेबला वरुन घेऊन आला होता तो नष्ट न करता तुम्ही त्या गाडी मध्येच ठेवला जी गाडी तुम्ही आपली गाडी समजून घेऊन गेला होता, दुसरी चुक तुम्ही केली अरविंदच्या गाडीची चावी तुम्ही परत आत जाऊन अरविंदच्या प्रेता जवळ ठेवली पण त्यावेळी तुम्ही त्यावरचे ठस्से पुसणे विसरलात, घरात तुम्ही सर्व जागी आपले ठस्से साफ केले पण त्या चावी वर व गाडी वर तुमचे ठस्से राहीलेच, आम्ही तुमच्या नकळत तुमच्या हाताचे ठस्से तुमच्या ऑफिस व घरातून घेतले व त्यांची खातर जमा झाल्यावरच तुम्हाला पकडण्यासाठी आलो आहोत वारंट घेऊन. व हत्येचे कारण ही आम्हाला अरविंदच्या मोबाईल मध्येच मिळाले "

*

" अरविंद, हा नेहमी राजकिय नेते व इतर व्यवसायीक लोकांच्या पार्टि मध्ये मला भेटायचा, माझा पण स्वतःचा बिझनेस होता व त्याला वाढवण्यासाठी मी देखील अरविंदच्या ओळखीचा फायदा घेत असे, पण तो पर्यंत मला माहीत नव्हते की अरविंद हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, त्याच्या बरोबर मी पार्टीमध्ये असताना कधी कधी त्यांने मला कॉल गर्ल्स पुरवल्या व हारामखोराने त्यांचे मोबाईल वर शुटींग केले हे त्यांने मला एकदा दाखवले व म्हणाला की माझ्या गरजापुर्ण करत रहा मी हे प्रेसला देणार नाही पण जेव्हा तु मला पैसे नाही देणार तेव्हा मात्र मी ते प्रेसला व आधी तुझ्या बायकोला दाखवणार म्हनून." सतिश बोलत बोलत थांबला व पाणी पिऊन पुन्हा बोलू लागला " त्यांने आधी गाडी मागीतली मी पण घेणार होतो गाडी, उगाच आपली अब्रु रस्त्यावर येऊ नये म्हणून मी त्याला गाडी घेऊन दिली व त्यांने माझ्या गाडीला व्हिआयपी नंबर दिला व स्वतःच्या गाडीला पण १२ नंबर घेतला, असे तो नेहमीच करु लागला कधी पन्नास हजार तर कधी लाख... अशी त्यांची पैशाची हवस वाढूच लागली होती, मी बरबाद होत होतो, धंद्याचा पैसा त्याला देऊन देऊन माझा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आला व शेवटचा पर्याय म्हनून मी त्याला एक करोड ची ऑफर दिली व म्हणालो की ते क्लिप्स मला दे. पण त्या हारामखोराला मी सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटत होतो त्यामुळे त्यांने त्याला नकार दिला व शेवटचा उपाय म्हनून मी त्याला मारण्याचा प्लान तयार केला मला माहीत होतं की हा रोज संध्याकाळी घरी बसून दारु पितो व फुल्ल टल्ली होऊ पर्यंत पितो व त्या नंतर रात्री १ - दिडच्या आसपास क्लब मध्ये जातो नाचायला. पण तो मरायला एवढा तयार झाला होता की त्या दिवशी त्यांने परत माझ्या कडे दोन लाखाची मागणी केली तेव्हा मात्र मी त्याच्या शी फोन वर भांडलो व पैसे द्यायला येतो म्हणुन त्याच्या घरी गेलो, बाकी पुढचे तुम्हाला माहीत आहेच सर्व." असे म्हणून सतिश शुन्यामध्ये डोळे लावून बसला.

*

काय बोलावं हेच त्या पोलिस अधिका-याला समजले नाही पण तो म्हणाला " सतिशराव, तुमच्या विरुध्द पुरावे सबळ आहेत, पण तुम्ही असा हत्येचा मार्ग शोधावयास नको होता जर तुम्ही आधीच पोलिसांच्या कडे आला असता तर, जी आब्रु वाचवण्यासाठी तुम्ही हत्या केली तीच आबरु कोर्ट व प्रेस समोर उघडी होणारच ना. ठीक आहे तो दोषी होता पण तुम्ही ही कमी दोषी नाही आहात. तुम्ही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चुकिचा मार्ग वापरलाच व त्याचा फायदा अरविंद सारखे लोक घेतात.. चला, तुम्हाला आपल्या कबुली जबाबावर सही करायाची आहे आता...

** समाप्त ***

कथामाहिती

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

7 Mar 2009 - 12:20 pm | मृगनयनी

राजे तुमच्यावर सरस्वती देवी प्रसन्न आहे, हे नक्की!

एक वेगळा विषय! आणि यथोचित मान्डणी!

समाजात असे प्रकार थोड्याबहुत फरकाने सर्रास चालूच असतात.....
तुम्हे त्याच्यावर झगझगीत प्रकाश टाकलात!

एखाद्या सिरियल साठी ही कथा द्यायला हरकत नाही! :)

लगे रहो!
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मिंटी's picture

7 Mar 2009 - 1:09 pm | मिंटी

+१ असेच म्हणते. सी.आय.डी साठी देऊयात का आपण ही कथा ???? ;)

बाकी मस्त लिहिलं आहे.छान जमलाय लेख. हल्ली रोजचं लेख येतायत तुझे.पण क्वालिटी टिकुन आहे. ते अशीच टिकवुन ठेव कायम.

खालिद's picture

7 Mar 2009 - 1:17 pm | खालिद

फक्त पात्रांच्या जागी ए सी पी प्रद्युम्न, दया, अभिजीत, डॉ. साळुंखे ही नावे टाका आणि शेवटी सतीश च्या एक कानफडात भडकवा. झाली सी आय डी ची स्क्रीप्ट.

:)

(इन्स्पेक्टर दया चा पंखा)

खालिद

अवलिया's picture

7 Mar 2009 - 12:22 pm | अवलिया

मार्केटमधे फार नुकसान झाले का रे तुझे ?

--अवलिया

सुक्या's picture

7 Mar 2009 - 12:26 pm | सुक्या

रहस्यकथा एका दमात ? इतके दिवस क्रमशः वाचायची इतकी सवय झालीय की एका दमात समाप्त जरा चुकल्यासारखं वाटतयं.
बाकी कथा छान जमलीय . . राजे. जोपर्यंत मार्केट वर येत नाही तोपर्यंत येउदेत अजुन. ;)

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

सहज's picture

7 Mar 2009 - 1:30 pm | सहज

राजे यांनी क्रमशः वापरले नाही हे एक मोठे रहस्य आहे. :-)

राजे छोटेखानी मर्डर स्टोरी आठवली बर का! मस्त राजे पर्यटन, वैचारिक, रहस्यकथा सही जा रहे हो!

अवांतर - "रायटर्स ब्लॉक" आला तर दिल्ली/नोइडा ला पाठवले पाहीजे.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2009 - 12:24 pm | प्रकाश घाटपांडे

अशाच कथा येउ द्यात. दक्षता मासिकासारख्या.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आजकाल रोजच लेख येत आहेत आपले. ले भारि
बाकि दिल्लिमध्ये काहि काम नाहि का?
हे आपल उगाच बर का!

सगळे प्रकारचे लेख येत आहेत हे मात्र खरे

धन्यवाद

दशानन's picture

7 Mar 2009 - 12:39 pm | दशानन

हे पण काम आहे भाउ !!!!

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

विनायक प्रभू's picture

7 Mar 2009 - 12:32 pm | विनायक प्रभू

एकदम हुडनइट वर

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Mar 2009 - 1:19 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो...

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2009 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो राजे ;) येउ द्या अजुन !

करमचंद
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

7 Mar 2009 - 1:15 pm | छोटा डॉन

एकदम मस्त कथा, अजुन येऊद्यात असेच म्हणतो ...
मासिकावगैरे अशा कथा येतात ...

हाय लेव्हल बिसीनेस्/कॉर्पोरेट लाईफ आल्याने मस्त वातावरणनिर्मीती झाली आहे.
पुलेशु.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

धमाल मुलगा's picture

7 Mar 2009 - 1:24 pm | धमाल मुलगा

राज,
राज़ इतक्या पटकन का उलगडला? मस्त गुंतत चाललो होतो गोष्टीत एकदम धाडकन संपलीच राव :(

सही लिख्खा भिडू :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

दशानन's picture

7 Mar 2009 - 2:24 pm | दशानन

>>> इतक्या पटकन का उलगडला?

सुरवातीला मला पण दोनदा वाचल्यावर असेच वाटले... जरा अजून खुलवू शकलो असतो, पण मग तो वेग कायम राहीला नसता असे वाटतं आता !

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

निखिल देशपांडे's picture

7 Mar 2009 - 2:08 pm | निखिल देशपांडे

राजे छानच जमली आहे कथा..... असेच चालु द्या

जागु's picture

7 Mar 2009 - 2:34 pm | जागु

खुप छान कथा आहे.

आपलाभाउ's picture

7 Mar 2009 - 3:30 pm | आपलाभाउ

खरच छा न आहे,पन कओमन आहे

मुत्सद्दि's picture

7 Mar 2009 - 5:08 pm | मुत्सद्दि

वरिल प्रतिक्रियांमध्ये जेवढे कौतुक केलेले आहे त्यामानाने कथा फारच सुमार वाटलि.
कथा अजून बरीच खुलवता आली असति.(अर्थात लेखकाने हि तसे मान्य केलेले आहेच.)
माझे निरिक्षण- रहस्य उलगडवयाचि घाई वाचकांपेक्षा लेखकालाच जास्त दिसलि.
कथेत फार काहि ट्विस्ट नसल्याने सिरियल वगैरेला पाठविण्यासारखी अजिबात वाटत नाहि.

मुत्सद्दि.

दशानन's picture

9 Mar 2009 - 9:03 am | दशानन

>>>रहस्य उलगडवयाचि घाई वाचकांपेक्षा लेखकालाच जास्त दिसलि.

:)

शक्यतो.. असु शकते की मलाच जास्त घाई असावी.

धन्यवाद.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मदनबाण's picture

7 Mar 2009 - 5:28 pm | मदनबाण

मस्त कथा..टायटलवरुन मला गोविंदाचा "हत्या" नावाचा चित्रपट आठवला,,एकदा दोनदा पोलिस टाईम्स नावाचे वर्तमानपत्र वाचले होते त्यानंतर गुन्हेगारी विश्वावर काही वाचण्याची इच्छाच मेली होती!!
मस्त लेख...

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

अनिल हटेला's picture

8 Mar 2009 - 12:07 pm | अनिल हटेला

फूल्टूस सही कथा !! :-)

आंदे और भी !!!

( सॅम डीसील्वा) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

यशोधरा's picture

8 Mar 2009 - 12:11 pm | यशोधरा

आवडली.

सर्वसाक्षी's picture

8 Mar 2009 - 12:28 pm | सर्वसाक्षी

वा राजे,

रहस्यकथेतील पदार्पण जोरात आहे. आता आणखी कथा येउ द्यात, हा विषय जर कमीच हाताळला गेलाय.

मनिष's picture

9 Mar 2009 - 10:38 am | मनिष

मस्तच आहे गोष्ट राजे.. थोडी अजून फुलवता आली असती, क्रमशः टाकून! ;)

सँडी's picture

9 Mar 2009 - 1:11 pm | सँडी

अजुन येऊ द्यात राजे!

- सँडी
राजेंच्या "मंदी"लिखाणाचा फ्यान