पाहिजे एकांत थोडा--

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
6 Mar 2009 - 7:00 pm

पाहिजे एकांत थोडा
पाहिजे थोडा अबोला
पाहिजे पहाट थोडी
पाहिजे निशब्द वारा
होउनी मग एक तेव्हा
अंतरी मिसळून जाउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

मिटूनी तू डोळे तुझे ग
काहीशी हरवून जासी
स्पर्शता लाभे दिलासा
तू मला बिलगून जासी
छेडूनी तारा मनाच्या
शब्द तू मी सुर होउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही
त्रुप्ताता देहात ही
त्रुप्ताता विश्वास सार्‍या
त्रुप्ताता श्वासास ही
संपता पहाट थोडी
काहीशी हुरहुर व्हावी
धुसरत्या तारकांना
भेटीचे संकेत देउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

-पुष्कराज

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

सूहास's picture

6 Mar 2009 - 7:04 pm | सूहास (not verified)

सुहास..

आता मी "अजुन"काय करू ?

मराठमोळा's picture

6 Mar 2009 - 7:56 pm | मराठमोळा

छेडूनी तारा मनाच्या
शब्द तू मी सुर होउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ..

हे आवडले....

क्रान्ति's picture

6 Mar 2009 - 9:02 pm | क्रान्ति

खूप सुन्दर.
क्रान्ति

vasumati's picture

6 Mar 2009 - 9:30 pm | vasumati

सुन्दर पद्य!!!!!!!!!खर्रच असा एकान्त हावा असतो कधितारि!
.........vasumati..................
..........वसुमति...................

हरकाम्या's picture

6 Mar 2009 - 10:43 pm | हरकाम्या

पहिल्या ४ ओळी वाचल्यावर असे वाटते की रात्रीची तर्रीबाज मिसळ खाल्ल्याने
सकाळी सगळ्याच्या आधी जाण्याची झालेली घाई....