ट्रीट्मेंट

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
6 Mar 2009 - 1:23 pm

You need to go out and have blast mate. You are currently drowning in cesspool of self pity mate. 'सावल्यांच्या झळा या मालिकेतल्या कथा नायकाला त्याच्या कंपनीच्या सायकीऍट्रीस्ट ने दिलेला सल्ला. ऑगस्ट २००८ मधे ह्या माझ्या मित्राला भुतकाळाचा खुपच त्रास व्हायला लागला. त्याचा आउट्पुट वर परिणाम झाला. 'संवेदनशील' पोस्ट वर असलेल्या माणसाचे सुरु झालेले हाल कंपनीला परवडणारे नव्हते.
But to do that you need to connect with somebody positive from your past. Without that even I can not help you mate. ऑस्ट्रेलीयन असलेल्या ह्या डॉक्टरने सोशल साईट चे रेकमेंडेशन सुद्धा केले.
कुठेतरी कळाले मिसळ पाव बद्दल. वाचनमात्र आहे इतके दिवस हा माझा मित्र. माझे लिखाण वाचत होता. पण संपर्क करायला त्याला धीर होत नव्हता. एकदा मी चुकुन खरडी मधे लिहीलेला माझा मोबाईल नंबर वाचण्यात आला त्याच्या. त्रास सहन होइनासा झाल्यावर मला फोन केला.
मला वाटते आपण सर्व जण आपल्या खांद्यावर ही भुतकाळातली मा़कडे घेउन वावरतो. कोण छोटी छोटी पिल्ले तर कोणी मोठी वानरे.
काहीजण तर खांद्यावर 'कीगकॉंग' घेउन वावरतात. माझ्या खांद्यावरचे एक छोटे पिल्लू मी 'मिपाकरांच्या' मदतीने हाकलले होते.
त्याचा फोन आल्यावर मी जरा आश्चर्यचकीत झालो. अचानक २७ वर्षाचा मधला काळ पटकन नाहीसा झाला. गप्पा झाल्या. मुळ त्रास कळला. रात्री घरी आल्यावर लेखमालिकेतील पात्रे फेर धरुन नाचायची डोळ्यासमोर. बोलायची. कधी कधी दिसायची सुद्धा.
समजायला जरा कठीण आहे. पण असेच होत होत हे खरे.
इथे दोन प्रसंग सांगतो दहावीत असतानाचे.एका वेळी सहा सहा पतंग आणण्याची परिथीती आमची नव्हती. त्यामुळे पतंग फाटला की शिजवलेल्या भाताची खळ करुन तो परत चिकटवायचा आणि परत वापरायचा. एका संध्याकाळी पतंग उडवत असताना हा आला माझ्याकडे.
पेपरात ठेवलेल्या भाताकडे बघुन म्हणाला, "हा भात मी खाउ" पतंग उडवण्यात मी गर्क होतो. मी लक्ष नाही दीले. त्याने तो थोडासा भात चक्क खाल्ला. घरी आईला आल्यावर हा किस्सा सांगितला. आईचा चेहेरा पडला. "त्याला एकदा जेवायला बोलव" आई म्हणाली.
तेंव्हा फारसे महत्व वाटले नाही पण आज कळते.
शाळा सुटल्यावर आईने सांगितल्याप्रमाणे त्याला जेवायला घरी घेउन आलो. आईने अगदी बाजुला बसुन प्रेमाने वाढले. पोट्भर जेवला. जेवण झाल्यावर डोळ्यावरची पेंग बघुन '"झोप आज इकडे" असे म्हटले. झोपला तो. साधारण १० मिनिटानी त्याने झोपायची पद्धत बघीतल्यावर मी पण चक्रावलो. आईला बोलवले. संपुर्ण 'फीटल' पोझिशन मधे होता. आईच्या डोळ्यात पाणी.
बाजुला बसुन केसात हात फिरवु लागली. जवळ जवळ १५ मिनीटे तशीच बसुन होती.
------------------------------------------------------------------------------------------------फोनवर इथुन अमेरीकेला गेल्यावरचे रामायण कळाले. मी त्याला त्याच्या डॉक्टरचा फोन नंबर विचारला. फोनवर त्याच्याशी बोलल्यावर प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही ह्याचा अंदाज आला. डॉक्टर सुद्धा मीच तो एकमेव मित्र हे कळल्यावर मोकळे पणाने बोलला. He needs to connect with you. How are you going to manage that.- Dr.
That is not a problem. He also needs to be trained to forgive a lot of people.- मी
Are you a shrink -Dr.
No, just a good friend. मी
-----------------------------------------------------------------------------------------------ही कहाणी मिपावर टाकुन 'किंग कॉग' पासुन सुटका हा एकच उपाय मला दिसत होता. पुढील कहाणी तर तुम्हाला माहीत आहे.
ही कहाणी माझ्या लेखन शक्ती बाहेरची होती. अवलियाना साद घातली. लेखन मिपावार येत गेले. प्रतिसाद पण ट्रीटमेंट मधे भरच घालत होते. किंबहुना हे असेच होणार अशी मला आणि अवलियाला खात्री होती. आणि तसेच झाले. २ र्‍या भागानंतर त्याने भारतामधे यायचा माझा सल्ला मानला. आई कडे आला. तीला क्षमा केली. एकमेकांच्या कुशीत हमसुन रडले माय लेक.
काल आईला घेउन वॉशिंगटन ला रवाना झाला. जाताना सर्व मिपाकरांचे आभार मानण्यास विसरला नाही. आता झळांचा त्रास नाही.
अमेरिकेला गेल्यावर बायको ला पण क्षमा करुन परत येण्यास सांगणार आहे. (बायकोची इच्छा असल्यास).मुलाशी संपर्क वाढवणार
आहे.
जाता जाता: ७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय?

-----------------------------------------------------------------------------------------------

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

6 Mar 2009 - 1:28 pm | दशानन

आनंद वाटला !

तुमच्या बद्दल असलेला आदर द्विगणीत झाला.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

घाटावरचे भट's picture

6 Mar 2009 - 1:31 pm | घाटावरचे भट

जाता जाता: ७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय?

टु ईच हिज ओन....

विनायक पाचलग's picture

6 Mar 2009 - 2:07 pm | विनायक पाचलग

प्रथमत; या अर्थाचे विधान आम्ही मागे खरडीतुन केलेले होते
त्याबद्दल आम्ही संपुर्ण मिपा परीवाराची माफी मागतो
बाकी लेखावरची प्रतिक्रिया
या लेखमालेतले सर्व लेख पुन्हा वाचल्यावर देण्यासाठी राखुन ठेवत आहे
(सदर वाक्यावर(मी म्हणलेल्या) इथे चर्चा होवु नये ही इच्छा कारण मुळ विषय गंभीर असुन त्याला भरकतवणे योग्य नव्हे.मी फक्त माफी मागाय्ची ऐती संधी साधी साधली आहे इतकेच..)

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

प्रकाश घाटपांडे's picture

6 Mar 2009 - 1:32 pm | प्रकाश घाटपांडे

चला आजचा दिवस सार्थकि लागला म्हणायचं. वाचुन बर वाटल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दिपक's picture

6 Mar 2009 - 1:37 pm | दिपक

हेच म्हणतो.

खुप बरं वाटलं.

सखाराम_गटणे™'s picture

6 Mar 2009 - 1:41 pm | सखाराम_गटणे™

+२
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

सहज's picture

6 Mar 2009 - 1:44 pm | सहज

तुमच्या मित्राला अनेकोत्तम शुभेच्छा.

प्रभुसरांकडे देखील पुण्याईची गाठोडीच्या गाठोडी आहे. :-)

सुखांत कोणाला आवडत नाही. :-)

>७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय?

माझ्यापुरते उत्तर - नाही.

असेच म्हणतो.

सुखांत झालेला खरच आवडला.

>७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय?

मी मिपावर वाचायला येतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Mar 2009 - 2:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या मित्राला अनेकोत्तम शुभेच्छा.
झळा कमी झाल्या, हे वाचून खरंच खूप आनंद झाला.

>७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय?
वाक्य थोडं फिरवलं तर विदा खोटा नाही. लोकं ~ ७०% वेळ मिपावर टाईमपास करत असतील.

अदिती

भाग्यश्री's picture

6 Mar 2009 - 1:53 pm | भाग्यश्री

खूप दिलासा मिळाला हो !
बरे झाले..
चुटपुट लागून राहीली होती नाहीतर..

http://bhagyashreee.blogspot.com/

छोटा डॉन's picture

6 Mar 2009 - 2:07 pm | छोटा डॉन

शेवटी समाधान वातले बॉ आम्हाला, उगाच कसेतरीच झाले होते वाचुन ...
असो. आजचा दिवस सार्थकी लागला ...

जाता जाता :
आकडेवारीबद्दल शिरीष कणेकर असे म्हणतात की फारीनचा कुणीतरी समिक्षक असे म्हणतो की " आकडेवारी ही नेहमीच स्त्रियांच्या पोहण्याच्या पोषाखासारखी असते. जे दाखवते ते मनोरंजक असतेच पण जे लपवते ते जास्त महत्वाचे असते."
असो.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री's picture

6 Mar 2009 - 3:50 pm | आनंदयात्री

There are three kinds of lies: lies, damned lies, and statistics

इती मार्क ट्वेन. तुमच्या बोलण्याला वजन आणायचे असेल अन मुळातच बोलण्यात फारसे तथ्य नसेल तर वापरा आकडेवारी ..

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2009 - 2:02 pm | परिकथेतील राजकुमार

खुप आनंद झाला गुर्जी आज :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

6 Mar 2009 - 2:14 pm | अनिल हटेला

खुप आनंद झाला गुर्जी आज

:-) :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

निखिल देशपांडे's picture

6 Mar 2009 - 2:11 pm | निखिल देशपांडे

हे वाचुन खुप बरे वाटले..... आनंद झाला....

७०% लोक मिपावर टाईमपास ला येतात हा विदा खरा आहे काय?
मी मि पा वर वाचायला येतो .....

पक्या's picture

6 Mar 2009 - 2:14 pm | पक्या

सहज ने म्हटल्याप्रमाणे कथेचा सुखांत आवडला.
He also needs to be trained to forgive a lot of people - हे तुमचं उत्तर आवडलं .
तुमच्या मित्राला पुढील आयुष्यास शुभेच्छा!

विनायक प्रभू's picture

6 Mar 2009 - 2:39 pm | विनायक प्रभू

पक्या राव,
कहाणी सुखान्त होण्याचे एकमेव कारण ते वाक्य

अमोल नागपूरकर's picture

6 Mar 2009 - 3:21 pm | अमोल नागपूरकर

बरोबर. उत्तम स्मरणशक्तिपेक्षाही काही गोष्टी विसरण्याची क्षमता असणे ही आयुष्य सुखी ठेवण्याकरिता जास्त आवश्यक आहे.

टुकुल's picture

6 Mar 2009 - 7:32 pm | टुकुल

सहमत..
वाचुन खुप बरे वाटले..

रेवती's picture

6 Mar 2009 - 4:07 pm | रेवती

हे एक बरं झालं!
बाकीच्याही लोकांना आपले हे मित्र असेच माफ करत जातील असे वाटते.
एकदा ओझं उतरवण्यातला आनंद समलाय म्हणजे ते होणारच....

रेवती

विसोबा खेचर's picture

6 Mar 2009 - 4:42 pm | विसोबा खेचर

असं काही वाचलं की खूप बरं वाटतं! समाधान वाटतं..अभिनंदन प्रभूसाहेब!

खरं सांगतो प्रभूसाहेब, ऑनलाईन आल्यापासून इतका वेळ आलेल्या व्य निं ना, खरडींना उत्तरं देत होतो, मिपाकंटकांचा बंदोबस्त करत होतो. एकट्या मिपावर कंपूबाजीचा आरोप करणारी नुकतीच एक कविताही वाचनात आली..!

पण हा लेख वाचला आणि मिपा काढल्याबद्दल अलिकडे रोजच्या रोज अत्यंत मनस्ताप सहन करतो आहे त्याचं कुठेतरी सार्थकही झाल्यासारखं वाटलं!

मिपाचा, मिपाच्या यशाचा त्रास अनेकांना होतो. मिपाबाहेर आणि खुद्द मिपावरही! परंतु कुणाच्या तरी आयुष्यात मिपाने सुखाचे दोन क्षण आणले याचे खूप खूप समाधान वाटले!

असो, अधिक काही लिहीत नाही!

तात्या.

प्राजु's picture

6 Mar 2009 - 8:04 pm | प्राजु

मिपामुळे जर इतकी क्रांती होणार असेल तर, हजार कंटकांचे त्रास सुद्धा मिपा, मिपा मालक, मिपा संपादक आणि मिपा सदस्य.. अभिमानाने खांद्यावर मिरवतील..
सकाळ सार्थकी लागली प्रभूकाकांच्या मुळे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुनील's picture

6 Mar 2009 - 5:29 pm | सुनील

एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

6 Mar 2009 - 5:30 pm | चतुरंग

प्रभूदेवा आज सक्काळी सक्काळी हा लेख वाचलाआणि धन्य झालो!
कल्पिताहुनी सत्य अद्भुत म्हणतात ते असेच असावे!! एक माणूस झळांमधून बाहेर येतो आहे आणि ह्यात मिपाचा आणि मिपाकरांचा कळत नकळत सहभाग आहे हे समजून खूप बरे वाटले.
अशा एखाद्या केसमुळे ह्या माध्यमाचे महत्त्व ध्यानात यायला मदत होते.

(मध्यंतरी ईसकाळमधे एका माणसाचा निनावी लेख आला होता की अत्यंतिक गरिबी, सावकारांचा-देणेकर्‍यांचा तगादा, घरातली आजारपणे ह्याने कंटाळून तो लवकरच आत्महत्या करण्याच्या विचाराप्रत येणार आहे! त्यावरचे वाचकांचे भरभरून आलेले प्रतिसाद, सकाळकडे जाऊन आर्थिक मदतीची त्यांनी दाखवलेली तयारी याने तो एवढा भारावला की साधारण महिन्याभरानंतर त्याने पुन्हा लेख लिहून सर्वांचे आभार मानले 'मला माहीतही नसलेले इतके सुहृद आज समाजात आहेत त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांनी पुढे केलेल्या मदतीच्या हातासाठी मी माझे विचार बदलले आहेत आणि पुन्हा जगणे सुरळित होत आहे!'
त्याच घटनेची आठवण झाली.)

चतुरंग

विनायक प्रभू's picture

6 Mar 2009 - 8:30 pm | विनायक प्रभू

माध्यमाचे (मिपा)महत्व समजुन घ्या हेच सर्व मिपाकरांना माझे हात जोडुन विनंती

मदनबाण's picture

6 Mar 2009 - 6:45 pm | मदनबाण

कोण कुठल्या ट्रान्स मधे कधी जाईल याची काही खात्री नाही,,, मनातल्या गूढ हालचाली कधी आणि कशा तीव्र हातील व त्या कशामुळे होतील हे त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या आणि घडणार्‍या घटनांवर अवलंबुन आहे !!!..पण मिसळपावमुळे या गोष्टींनी हलके करण्यास मदत होत असेल आणि आहे तर हेच मिपाचे सर्वात मोठे यश आहे असे मानण्यास काहीच हरकत नसावी...

जय हो महाप्रभू !!! :)
(मिपाकर)
मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

स्वाती२'s picture

6 Mar 2009 - 7:19 pm | स्वाती२

प्रभूसर, झळा वाचून अगदी सुन्न झाले होते. आज हा सुखान्त वाचला. खुप आनंद झाला.

सुमीत भातखंडे's picture

6 Mar 2009 - 7:32 pm | सुमीत भातखंडे

खूप बरं वाटलं वाचून.
सगळी लेखमाला वाचली, तरीही काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं.

मिसळपावमुळे या गोष्टींनी हलके करण्यास मदत होत असेल आणि आहे तर हेच मिपाचे सर्वात मोठे यश आहे असे मानण्यास काहीच हरकत नसावी...

सहमत.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Mar 2009 - 8:49 pm | बिपिन कार्यकर्ते

ही लेखमाला सुरू झाली आणि पहिल्याच भागात लेखकाच्या आणि कथानकाच्या ताकदीचा अंदाज आला. शेवटपर्यंत तो टिकला. कुठेही घसरली नाही कथा. खरं म्हणजे ही कथाच अशी आहे की कोणालाही त्रास होईलच... जो जगला त्याचे काय झाले असेल, कल्पनाच करवत नाही.

ही कथा नानाची नाहीये हे कळल्यावर 'चला, आपल्या मित्राची तर नाहीये ना' असं वाटून बरं नक्कीच वाटलं. पण कोणाची तरी आहे ना... काय जगला असेल तो बिचारा असं वाटून तेवढंच वाईटही वाटलं. पण त्याच्या आयुष्यात सावल्यांच्या झळांनंतर प्रत्यक्ष सावली आली असल्याचे पाहून खरंच बरं वाटलं. तुमचा त्याचा संपर्क असेलच. माझ्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोचवा. जरूर.

मिपाच्या माध्यमातून हीच नव्हे तर बर्‍याच वेळा चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत. तुम्ही जो ७०% चा विदा म्हणत आहात, त्या बद्दल, स्वतः तसं म्हणणार्‍यानेच दिलगिरी व्यक्त केल्याचे पाहिले. मिपावर बराच टीपी चालतो हे खरे आहे आणि मी स्वतः सुद्धा त्यात भाग घेतो. पण मला त्यात गैर काहीही वाटत नाही. खरं तर हा मिपाचा एक खूप चांगला आणि महत्वाचा पैलू आहे. आजच्या तणावाच्या आणि धावपळीच्या जीवनात मिपा असं एक स्थान आहे जिथे, सगळी लफडी सोडून थोडावेळ धिंगाणा करता येतो आणि प्रत्यक्ष जीवनातला त्रास कमी होतो. आणि या धिंगाण्यामुळेच बरेच नविन मित्र मिळाले, ज्यांची मैत्री शाळेतल्या मित्रांच्या मैत्रीच्या बरोबरीने घट्ट आहे. आज भारतात / भारताबाहेर अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे गेलो तर भेटायला हक्काचे मित्र आहेत मला. तर इथे चालणारा टाईमपास हा अभिमानास्पदच आहे, त्यात वाईट अथवा खराब असे काहीच नाही.

अजून एकः मिपासारख्या, माध्यमाच्या एका नविन प्रकाराचा तुम्ही एका ट्रीटमेंटसाठी जो काही इनोव्हेटिव उपयोग केला आहे.... मान गये उस्ताद!!! माध्यम त्यांना कळले हो....

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

6 Mar 2009 - 8:53 pm | चतुरंग

...मिपासारख्या, माध्यमाच्या एका नविन प्रकाराचा तुम्ही एका ट्रीटमेंटसाठी जो काही इनोव्हेटिव उपयोग केला आहे.... मान गये उस्ताद!!! माध्यम त्यांना कळले हो....

अशा प्रकारच्या दुखण्याला थेटपेक्षा असे हे दूरस्थ समुपदेशन हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो हे या निमित्ताने सिद्ध झाले. विप्रंच्या कल्पनाशक्तीला सलाम!

चतुरंग

नंदन's picture

6 Mar 2009 - 9:25 pm | नंदन

बिपिनदांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टिउ's picture

6 Mar 2009 - 9:05 pm | टिउ

खुप छान वाटलं वाचुन. अवलियांचे लेख वाचुन फार अस्वस्थ झालो होतो.
प्रभु सरांचंही अभिनंदन.

या निमित्ताने, आंतरजाल हे (नीट वापरलं गेलं तर) किती प्रभावी माध्यम आहे ते पुन्हा एकदा दिसलं...

मुक्तसुनीत's picture

6 Mar 2009 - 9:18 pm | मुक्तसुनीत

आज हा लेख वाचला आणि मग "सावल्यांच्या झळा" ही कथा आणि त्या कथेबद्दलचा खुलासाही वाचला.

मिसळपाव सारख्या व्यासपीठातली शक्ती ओळखून, तिचा योग्य वापर करून , त्याचा सांधा आपल्या समुपदेशनाच्या सत्कार्याशी जोडणारे विप्र आणि त्यांच्या कार्यातल्या एका व्यक्तीच्या कर्मकहाणीला शब्दरूप देऊन सार्थ न्याय देणारे अवलिया या दोघांचे अभिनंदन करावे तितके कमी आहे.

विप्र , अवलिया यांच्यासारख्या इतरांनीही आपापल्या चांगल्या कामांबद्दल इथे लिहावे. त्या कार्याला जमेल तशी मदत , पाठिंबा देणारे कितीतरी लोक इथे आहेत. आणि जोवर काही करण्याची इच्छा आहे तोवर भौगोलिक अंतर , विचारांमधले फरक , पार्श्वभूमीतला फरक या कशाचाही अडसर येणार नाही.

दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथे मिपावर त्याबद्दल लिहिण्याच्या त्यांनी पाडून दिलेल्या पायंड्यावर इतरांनीही वाटचाल करावी असे सुचवितो.

संजय अभ्यंकर's picture

6 Mar 2009 - 10:38 pm | संजय अभ्यंकर

नानांचे ही आभार!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

7 Mar 2009 - 2:01 am | भडकमकर मास्तर

=D> हे सारे वाचून फ़ार बरे वाटले...
प्रभूजी आणि अवलिया दोघांना दंडवत
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लवंगी's picture

7 Mar 2009 - 6:22 am | लवंगी

आपली दु:ख वाटल्यांवर हलकी होतात. एक तरी असा जिवलग मित्र प्रत्येकाला लाभो. मिपाकरांना धन्यवाद देता हा आपला मोठेपणा आहे. पण आज आपला मित्र परत उमेदिने उभा राहातोय यात आपला वाटा फार मोठा आहे. प्रभूसर आणि अवलिया तुम्हा दोघांना दंडवत.

रामदास's picture

7 Mar 2009 - 10:20 am | रामदास

माकडं खांद्यावर बसवून का घेता ?
ही माकडं गप्प बसत नाहीत. संध्याकाळी आपल्या ग्लासात उतरतात.दारु पितात.
लोकांना वाटतं मास्तरच दारु पितो.

सुप्रिया's picture

7 Mar 2009 - 1:34 pm | सुप्रिया

एवढे दिवस मी झळा पूर्ण वाचत नसे. म्हणजे माझ्याने पूर्ण वाचवले जात नसे. खुलासा वाचल्यावर सगळे पूर्ण वाचले.
पण फार त्रास झाला. ट्रिटमेंट वाचल्यावर मात्र खूप बरं वाटलं. त्रास दिलेल्या माणसांना माफ करणे ही फार मोठी गोष्ट
आहे. तुमच्या मित्राला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

नमस्कार मंडळी,

माझ्यासाठी मानसशास्त्र हा विषय अत्यंत जटिल आणि कळायला अवघड आहे. पण आमची हिलरी स्वतः मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक आहे. आणि ती नोकरीबरोबरच समुपदेशनाच्या काही 'केसेस' घेते. तिचा विषय लहान मुलांचे समुपदेशन हा आहे. काही वेळा दत्तक मुलांच्या समस्या तसेच घरच्या किंवा शाळेतील वातावरणामुळे जर मानसिक प्रश्न याविषयीचे समुपदेशन ती करते. तरीही अवलियांच्या 'सावल्याचा झळा' या लेखमालेविषयी मी तिच्याशी बोललो. माझ्या हाडाच्या दुखण्यामुळे गेले काही दिवस तिची बरीच धावपळ होत आहे तरीही तिने या केसविषयी काही गोष्टी सांगितल्या. तिला स्वतःला ते लिहिणे शक्य झाले नाही . तेव्हा तिने सांगितलेल्या गोष्टी मी मिपावर लिहित आहे.

पहिले म्हणजे ही केस अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक आहे. कारण या समस्येचे मूळ आपल्या मित्राच्या आजोबांपर्यंत जाते. तेव्हा 'किंगकाँग' खूपच मोठा आहे आणि ज्याप्रमाणे पायात साखळी बांधून कोणी जोरात धावू शकत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत या दु:खद आठवणी मागे टाकल्या जात नाहीत तोपर्यंत आयुष्यात प्रगती करणे शक्य होत नाही. रूढार्थाने जरी प्रगती केली (पैसा, मानमरातब वगैरे) तरीही त्या मनुष्यास मनात कुठेतरी एकाप्रकारची अनामिक भिती असते.

अशाप्रकारच्या मोठ्या किंगकाँगना उचलून फेकून देण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकाची गरज आहे. प्रशिक्षकाच्या मदतीने अशा किंगकाँगला फेकून देण्यासाठी पुढील उपाय हिलरीने सुचवले.

१) संमोहनः यात समुपदेशक मानसिक रूग्णाच्या 'सबकॉन्शस माईंड' मध्ये काय दडले आहे हे काढून घेतो. असे केल्याने मनात दडलेल्या गोष्टींना वाट मोकळी केली जाते आणि भूतकाळातील दु:खद आठवणींचा रूग्णाच्या भविष्यकाळावर परिणाम होत नाही. अर्थात त्यासाठी तज्ञ समुपदेशकाची गरज असते.

२) दुसरा मार्ग म्हणजे relaxation technique. यात दोन प्रकारांनी समुपदेशक पूर्वीच्या आठवणींना accept करून त्याबरोबर राहायला शिकायला मदत करतो. दुसरा टप्पा म्हणजे त्या आठवणींचा त्या रूग्णाच्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम होऊ न देणे. त्यासाठी पहिला मार्ग म्हणजे bio feedback technique. यात समुपदेशकाकडे ते यंत्र असायची गरज असते. तणावाखाली विविध parametersना (रक्तदाब, नाडीचे ठोके, शरीराचे तपमान वगैरे) मानवी शरीर कसे उत्तर देते हे आधी बघितले जाते. मग progressive muscle relaxation वापरून एकेक स्नायू ढिला सोडला जातो. मग त्याद्वारे ताणतणावापासून सुटका व्हायला मदत होते. दुसरा प्रकार म्हणजे समुपदेशकापुढे आपले पूर्वीचे अनुभव कथन करायचे. आणि त्यासंदर्भात वाटत असलेल्या सर्व गोष्टी समुपदेशकास सांगायच्या. याद्वारे emotional ventilation होते आणि समस्येचे उत्तर मिळायला मदत होते. एखाद्या बोळ्यामुळे पाईपमधला पाण्याचा प्रवाह अडला असेल तर तो बोळा काढताच प्रवाह ज्या पध्दतीने परत चालू होतो तसा हा प्रकार आहे.

३) तिसरा मार्ग म्हणजे ध्यानधारणा. त्यातून जुन्या दु:खद आठवणी दूर सारण्यासाठी मदत होते.

यापैकी कोणता मार्ग मानसिक रूग्णासाठी योग्य आहे हे त्या त्या केसवर अवलंबून असते. एकाला एक मार्ग लागू पडला म्हणजे तो सगळ्यांना लागू पडेलच असे नाही.

---विल्यम जेफरसन क्लिंटन