ती पहाट

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
5 Mar 2009 - 7:29 pm

ती देखणी पहाट
हासुनी हळूच गाली
फुलवीत पाकळ्यांना
वार्‍यासवे निघाली

दंवबिंदूचे तुषार
उधळीत आसमंती
थरकून पैंजणाना
जणू चालते रति ती

रक्तिम ओठ हसरे
दिसताच पाखरांना
घुमवीत शीळ निघती
नादावूनी स्वरांना

लयदार चाल बघुनी
तिजला फुले म्हणाली
घेऊनी गंध वारा
कोठे गडे निघाली ?

लाजूनी ती पहाट
त्यांना हळूच सांगे
दिवसाशी घेत असते
जुळवून प्रेम धागे

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

जयवी's picture

5 Mar 2009 - 8:35 pm | जयवी

सुरेख..... कल्पना मस्तच आहे :)

बेसनलाडू's picture

6 Mar 2009 - 12:50 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

क्रान्ति's picture

5 Mar 2009 - 8:51 pm | क्रान्ति

खूप छान पहाट.
क्रान्ति

प्राजु's picture

5 Mar 2009 - 9:07 pm | प्राजु

अतिशय सुरेख कविता.!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

6 Mar 2009 - 1:17 am | विसोबा खेचर

अतिशय सुरेख, मन प्रसन्न करणारी कविता...!

ती देखणी पहाट
हासुनी हळूच गाली
फुलवीत पाकळ्यांना
वार्‍यासवे निघाली

या ओ़ळी तर अतिशय सहजसोप्या, परंतु तेवढ्याच सुरेख,,!

तात्या.

लवंगी's picture

6 Mar 2009 - 1:19 am | लवंगी

छान कविता वाचायला मिळाली.. सुंदर कविता.

पक्या's picture

6 Mar 2009 - 2:49 am | पक्या

छान . लयबध्द आहे कविता.

राघव's picture

6 Mar 2009 - 11:27 am | राघव

सगळीच कविता छान आहे.
त्यातही,
लाजूनी ती पहाट
त्यांना हळूच सांगे
दिवसाशी घेत असते
जुळवून प्रेम धागे

या ओळी विशेष आवडल्यात. शुभेच्छा!
मुमुक्षु