शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या खजिन्यातच जमा व्हावी असा प्रघात त्यांनी पाडला.मिळालेली लूट सैनिकांनी परस्पर घरी न्यावी असे कधीच चालु दिले नाही.कोणत्याहि लुटीमध्ये महाराजांनी धार्मीक स्थळे अन स्त्रीधन याना कधीही हात लावला नाही. सुरतेच्या लुटीच्या वेळची डच स्त्रीची हकिकत तर त्यांच्या उच्च नितिमत्तेचे उत्कृष्ठ उदाहरण आहे आणि विशेष म्हणजे ही हकिकत डच कागदपत्रांमधे सापडते.सुरत शहरामधील लुटीच्यावेळी सुरत शहरामध्ये एक विधवा स्त्री रहात होती.तिचा पति व्यापारी होता,पण तो मरण पावला होता.त्या विधवा स्त्रीजवळ खुप संपत्ती होती.पण महाराजांनी तिला कोणिही त्रास देऊ नये,तिच्या संपत्तीला हातहि लाऊ नये अशी सक्त ताकीत सर्व सैन्याला दिली होती.... महाराजांच्या लुटीमध्ये अशी नैतिकता पाळली जात असे.
महाराजांची लुटीचीहि एक पद्धत होती.प्रथम त्या पेठेमधील व्यापारांकडे खंडणी मागितली जात असे.जर त्या शहरामधील व्यापार्यांनी ठरलेली खंडणी दिली तर महाराज लुट न करता खंडणी घेउन निघुन जायचे.जिथे खंडणीस विरोध होई तेथे मनमुराद लुट करण्यात येत असे. सुरतच्या लुटीअगोदर महाराजांनी तेथील व्यापार्यांकडे खंडणी मागितली होती,पण ती न दिल्यामुळे मग सुरतेची बेसुरत झाली. लुटीमध्ये सोनेनाणे, जवाहिर,पैसा,शस्त्रास्ते,दारूगोळा यांचा समावेश असे.
शिवाजी महाराजांच्या कालापुर्वि मुसलमानांनी आणि सागरी मार्गाने अक्रमण करणार्या सिद्दी व पोर्तुगिजांच्या अक्रमणामध्ये पहिली धाड पडत असे इथल्या स्रियांच्या अब्रुवर.(शिवाजी महाराजांच्या सैन्याने असे कधीच केले नाही हे खाफीखान या मुसलमान इतिहासकारानेहि लिहीले आहे.)पुर्वि गरिब-श्रीमंत यांची भयंकर लुट करावी,घरादारांची जाळोपाळ करावी.शेतामधील ऊभी पिके कापुन न्यावीत असे चालायचे .गुरेढोरे जनावरे हेसुद्धा यांच्या लुटीमधुन सुटत नसे.पुरुषांना गुलाम करुन घेउन जावे आणि स्त्रियांना पळवुन नेणे याला तर राज्यकर्त्यांचीच मान्यता असे.राज्यकर्तेच सुंदर खानदानी स्त्रियांना आपल्या जनानखान्यात डांबायचे.सुंदर असणे हा त्याकाळी स्त्रियांना शाप ठरला होता.आणि इथल्या हिंदूंनी हात चोळत चडफडत गप्प बसावे हा त्यावेळचा प्रघात.यामुळे मुसलमान आणि इतर अक्रमकांबद्दल इथल्या हिंदूंमध्ये दहशत,भिती निर्माण झाली होती.पण शिवरायांनी ही परिस्थिती पुर्ण बदलली.शत्रुच्या प्रदेशात खुप आंतमध्ये घुसुन(ऊदा.सुरत.बुह्राणपुर,कारंजा,हुबळी)व्यापरी पेठा व शहरे लुटली,आणि ही सर्व लुट सरकारी खजिन्यातच जमा करण्याचा नविन शिरस्ता महाराजांनी घालुन दिला....स्त्रियांच्या नखालाहि धक्का न लावता, कोणत्याहि धर्माच्या धार्मिक स्थळांना हातहि न लावता,गरिब दिन दुबळ्याना न पिडता!!!!शत्रुच्या प्रदेशात खोलवर हल्ले केल्यामुळे व शहरे लुटुन रिकामी केल्यामुळे शिवरायांनी मोगल,अदिलशहा,कुतुबशहा.सिद्दि,पोर्तुगिज़्,इंग्रज यांच्या मनात धाक,दरारा निर्माण केला.मराठ्यांकडुन अशा प्रकारच्या धडाकेबाज मोहिमा मुसलमान सुलतानाना अपेक्षित नव्हत्या.महाराजांनी सुरत,बुह्राणपुर,हुबळी,कारंजा अशा खुप आतल्या शहरांवर छापे घतल्यमुळे शत्रुच्या मनात सतत भिती व काळजी निर्मान करुन ठेवली व यासत्ताधिशांची ईज्जत धुळिला मिळविली.महाराजांनी सुरत लुटली हे जेव्हा इराणच्या बादशहाला समजले तेव्हा त्याने यागोष्टीबद्दल खरमरीत पत्र औरंगजेबाला पाठविले. यागोष्टीने औरंगजेब किती शरमला असेल, किती संतापला असेल.....आपण कल्पनाच करा !!!!
अशा प्रकारे लुट करण्यामागचे महाराजांचा उद्देश स्वच्छ आहे.एव्हढी लुट करुन महाराजांनी स्वतःसाठी एखाधा तरी संगमरवराचा महाल बांधलेला दिसत नाही.नाच-गाण्यासाठी रंगमहाल बांधलेले दिसत नाहित.हा सर्व पैसा महाराजांनी चैनीसाठी अजिबात वापरला नाही. महाराज भोगी नव्हते---ते तर योगी होते.....श्रीमंत योगी ! नविन किल्ले बांधले,पुर्विचे किल्ले दुरुस्त करुन भक्कम केले.शस्त्रास्ते,दारुगोळा यांची निर्मिती केली,साठवण केली.सैन्यदलामध्ये पायदळ,घोडदळामध्ये प्रचंड वाढ केली.स्वराज्य स्थापनेच्यावेळी महाराजांचे सैन्य होते फक् १५००/२००० अन म्रुत्युसमयी घोडदळ अन पायदळ मिळुन सैन्य होते जवळ जवळ एक लाख !सैन्याच्या सर्व अधिकार्यांना अन सैनिकांना पगार प्रत्येक मराठी महिन्याच्या पहिल्या तिथीला मिळालाच पाहिजे असा दंडकच होता. आरमार तर नुतनच निर्माण केले.आरमारी युद्धनौका बांधल्या सागरी किल्ले बांधले,होते ते दुरुस्त करुन बळकट केले आणि सागरावर आपली सत्ता निर्माण केली.सिंधुदुर्ग किल्ला पुर्ण नविन बांधला.काय होते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जागी पुर्वि?कुरटे या नांवाचे ते तर एक ओसड बेट होते .सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया शिश्यामध्ये घातला आहे,चुन्यामध्ये नाही.राज्य राखयचे असेल्,राज्य वाढवायचे असेल तर नविन किल्ले बांधले पाहिजेत्,आहेत ते किल्ले दुरुस्त केले पाहिजेत......जावळीच्या खोर्यात भोरप्याचा डोंगर होता,त्यावर किल्ला बांधला...प्रतापगड ! कुठुन आणायचा पैसा यासाठी? राज्यातील महसुलाचे उत्पन्न यासगळ्यासाठी पुरे पडणे शक्यच नव्हते.लुटीमधुन मिळालेले धन अशा चांगल्या कामासाठी खर्च व्हायचे.महाराजांवर सतत कोणाच्या तरी स्वार्या सतत सुरुच होत्या.वर्षामधील सहा/आठ महिने युद्धमान रहाणे सोपे नसते.३५ वर्ष सतत लढाया करुनहि महाराजांना पैशाची,सैन्याच्या पगाराची,शस्त्रांची,दारुगोळ्याची कमतरता कधीच भासली नाही.महाराज्यांच्या हिंदवी स्वराज्याचा कोष सदैव तुडुंब भरलेला होता याचे रहस्य हेच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
सुभाष खडकबाण.
प्रतिक्रिया
5 Mar 2009 - 6:37 am | शेन्डेफळ
जावळीच्या खोर्यात भोरप्याचा डोंगर होता,त्यावर किल्ला बांधला...प्रतापगड
प्रतापगड नाहि राजगड..
शेन्डेफळ
5 Mar 2009 - 9:24 am | भडकमकर मास्तर
राजगड मुरुंबदेवाच्या डोंगरावर बांधला...
राजगड माझ्या माहितीप्रमाणे जावळीत येत नाही.... की येतो?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Mar 2009 - 1:10 am | सुभाष
जावळीच्या खोर्यात भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगड बांधला.राजगड मुरुमदेवाच्या डोंगरावर बांधला.
5 Mar 2009 - 7:35 am | सखाराम_गटणे™
चांगला लेख
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
5 Mar 2009 - 9:35 am | पिवळा डांबिस
शिवाजी महाराजांनी केलेल्या लूटीबद्दल कधीच कुणा मराठी माणसांनं आजवर तक्रार केलेली वाचनात नाही.........
जर शत्रूने तक्रार केलेली असेल तर "टू बॅड!!!!!!!!!"
शत्रूला लुटून पूर्ण नागवायचंच असतं........
हा तर खास मराठी बाणा आहे.......
मग या लेखाचे प्रयोजन ते काय?
कॄपया शिवाजी महाराजांना गांधीवादात बसवू नका!!!!
ते गांधीवादापेक्षा कितीतरी पटीने थोर आहेत!!!!!!
5 Mar 2009 - 6:17 pm | विकास
एकदम मान्य.
लेखाचा उद्देश कळला नाही पण उगाच गरज नसताना "जस्टीफाय" अथवा "बचावात्मक" पवित्रा घेण्याची गरज नाही. इतर कोणी काही म्हणले (असले भारतीय महाभाग मला माहीत आहेत पण तो वेगळा विषय...) टू बॅड...
6 Mar 2009 - 2:19 am | सुभाष
श्री.विकास.
कोणाचीहि लुट ही कांही आनंदाची गोष्ट नसते.महाराजांनाहि नाइलाजाने लुट करवी लागत होती......स्वराज्याच्या संरक्षणाकरिता,स्वराज्य वाढविण्यासाठी.इस्लामी अक्रमकांच्या लुटी मध्ये अन महाराजांच्या लुटीमध्ये काय फरक होता हे समजण्यासाठीच आणि महाराज न समजलेल्या मराठी आणि अमराठी लोकांना ते समजावेत इतकाच या लेखाचा उद्देश आहे.
6 Mar 2009 - 7:03 am | विकास
नमस्कार सुभाष,
खुलाशाबद्दल धन्यवाद. मात्र वर आधी म्हणल्याप्रमाणे शिवाजी संदर्भात बचावात्मक होण्याचे काहीच कारण नाही. अगदी त्याच्या विरोधात पण बोलणारे आले तरी.
समाजाला खरा परतंत्र कधी होतो? जेंव्हा त्याला स्वत:च्या इतिहासाबद्दल हकनाक लाज बाळगायला लावणारे यशस्वी होतात तेंव्हा. शिवाजी हे असे एक ऐतिहासीक महत्व आहे ज्याला धक्का लागला तर त्याचे निगेटीव्ह पडसाद हे समाजमनावर मोठ्याप्रमाणावर अगदी "सटली" पडू शकतात. आज अनेक "बुद्धीवंत" तसा प्रयत्न करत आहेत. त्यांना उत्तरे देयची ती "तुका म्हणे ऐशा नरा..." सारखीच.
शिवाजीने स्वतःसाठी लूट केली नाही, शिवाजीने आधी अफझलखानाला मारले नाही तर अफझलखानाने त्यावर वार केला म्हणून शिवाजीने वार केला वगैरे म्हणणे याला काही अर्थ नाही. शिवाजी हा परकीय सत्तेच्या, ती ही अमानुष सत्ता, विळख्यातून स्वजननांना सोडवण्यासाठि ३ तपे झटला. युद्धातील सर्व कूटनिती त्याने वापरली. मला वाटते सावरकरांच्या या संदर्भात ओळी आहेत ज्या त्यांनी शिवाजी कसा वागला हे सांगताना लिहील्या आहेत, त्या लक्षात ठेवा आणि असला बचावात्मक पवित्रा विसरून जा...
साप विखारी देशजननीचा ये घेया चावा,
अवचीत गाठूनी ठकवूनी भुलवुनी, कसाही ठेचावा.
अर्थात याचा अर्थ शिवाजीच्या नावाने आज लूट करावी अथवा (जसे असेल तसे पण) स्वराज्यात कायदा हातात घ्यावा असा मात्र याचा अर्थ नाही! त्याचा आदर्श आणि त्याचे "ऍप्लिकेशन" आता वेगळ्या पद्धतीने करावे लागेल.
आशा करतो की माझी भुमिका समजली असेल. बाकी आपले शिवाजी आणि इतर विषयांवरील लिखाण अवश्य चालू ठेवा ही विनंती.
असो.
6 Mar 2009 - 2:10 am | सुभाष
श्री.पिवळा डांबिस यांस
शत्रूला लुटून पूर्ण नागवायचंच असतं........
हा तर खास मराठी बाणा आहे.......
असं आपले म्हणणे दिसते....पण महाराजांचे म्हणणे/वागणे आपल्या म्हणण्याच्या अगदी उलट आहे.शत्रुप्रदेशातसुद्धा लुट करताना स्त्रिया,धार्मिक स्थळे,गरिब प्रजाजन यांना लुटीमधुन वगळण्याच्या महाराजांच्याच आज्ञा होत्या हे आपल्याला माहिती दिसत नाही.शत्रुला पूर्ण लुटून नागवायचं असते असे शिवाजी महाराजांचे धोरण होते की हे आपले मत आहे कां ?आपण म्हणता त्याप्रमाणे महाराजांचे धोरण असले तर त्यांनी सुरत लुटीच्या वेळी डच विधवा श्रीमंत स्त्रीच्या संपत्तीला हातहि लाऊ नका अशा आपल्या सैन्याला आज्ञा होती आणि ती सैन्याने पाळली होती हे कसे?
शत्रूला लुटून पूर्ण नागवायचंच असतं........
हा तर खास मराठी बाणा आहे.......
माफ करा.. हा बाणा मराठी नाही.... हा औरंगजेबी बाणा आहे.मुस्लिमांनी लुटालुट करताना शत्रुला पूर्ण लुटायचे...धन्,जवाहिर्,धान्य,बायका,जनावरे...घरेदारे उध्वस्थ करायचे.इतकेच नाही तर निरापराध नागरिकांची कत्तल व्हायची. हाच खरा मराठी बाणा आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? शत्रु प्रदेशामधिल सर्वसामन्य नागरिकांना...प्रजेला महाराजांच्या सैन्याने कधीच नागवले नाही,पण शरण आलेल्या सत्रुच्या सैनिकांचीहि महाराजांनी कत्तल केली नाही.त्याना कैद केले,जे आपल्याकडे येण्यास तयार असतील त्यांना आपल्या नोकरीत ठेवले ज्यांना महाराजांकडे नोकरी करयची नाही त्याना त्यांच्या इच्छेप्रमाणे जाऊ दिले जायचे...कदाचित ही आपल्याला गांधीगिरी वाटेल पण हे सत्य आहे.महाराज अतिशय नितिमान,चारित्रवान,सुसंस्कृत होते...शत्रुला लुटून पुर्ण नागवायला ते इस्लमी अक्रमकांसारखे असंकृत नव्हते.माफ करा...आपल्याला महाराज समजलेच नाहीत.
कोणाचीहि लुट ही कांही आनंदाची गोष्ट नसते.महाराजांनाहि नाइलाजाने लुट करवी लागत होती......स्वराज्याच्या संरक्षणाकरिता,स्वराज्य वाढविण्यासाठी.इस्लामी अक्रमकांच्या लुटी मध्ये अन महाराजांच्या लुटीमध्ये काय फरक होता हे समजण्यासाठीच आणि महाराज न समजलेल्या मराठी आणि अमराठी लोकांना ते समजावेत इतकाच या लेखाचा उद्देश आहे.
5 Mar 2009 - 12:18 pm | पाषाणभेद
शिवाजी महाराज खरोखरच महान होते. अजूनही आपण सामान्य माणूस त्यांची महती ओळखू शकत नाही. त्यांच्याकडे सर्व धर्माचे लोक नोकरीस होते. परस्त्री बद्द्ल आदर, माणुस ओळखणे, मॅनेजरेकल स्किल्स, युध्दनिती आदी. गुण तर वाखाणण्याजोगे होते. (हे दाखवणे हेच लेखकाचे प्रयत्न असावे.)
दुसर्याचा हिरमोड करू नये.
असले वाद घालु नका. लेख चांगलाच आहे.
-( सणकी )पाषाणभेद
5 Mar 2009 - 12:23 pm | दशानन
शिवाजी महाराज .. ह्या शब्दा पलीकडे मला काहीच माहीत नाही व माहीती करुन घ्यायची ही नाही आहे, एकदा देव मानला की देवच... शंका कुशंका... आम्ही मनात घेतच नाही.
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
9 Mar 2009 - 1:59 pm | घाशीराम कोतवाल १.२
एकदा देव मानला की देवच... शंका कुशंका... आम्ही मनात घेतच नाही.
राजेंशी सहमत आहे
6 Mar 2009 - 2:35 am | सुभाष
श्री.पाषाणभेद यांस,
परस्त्री बद्द्ल आदर, माणुस ओळखणे, मॅनेजरेकल स्किल्स, युध्दनिती आदी. गुण तर वाखाणण्याजोगे होते. (हे दाखवणे हेच लेखकाचे प्रयत्न असावे.)असे आपण म्हणता.मी आपल्या मतांशी ५०% सहमत आहे.फक्त याच गुणांचा अभ्यास व्हावा असा आपला अट्टाहास कां? महाराजांचा गनिमी कावा,नुतन आरमार उभारणे,राज्याभिषेक,गडकोटकिल्ल्यांबद्दलची त्यांची आस्था..काळजी अशा महाराजांच्या अनेक अंगांवर अभ्यास झाला पाहिजे.तत्कालीन राज्यकर्ते अन शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारपद्धतीमधील फरक्..उदा.वतनदारी पद्धती संपविणे...यावरहि अभ्यास झाला पाहीजे असे मला वाटते.इतर इस्लमिक राज्यकर्ते अन शिवाजी महाराजांच्या लुटी मधील फरक लक्षात यावा या उद्देशाने हा लेख लिहीला आहे
सुभाष
5 Mar 2009 - 12:24 pm | पाषाणभेद
तेच म्हणतो
-( सणकी )पाषाणभेद
5 Mar 2009 - 4:09 pm | चिरोटा
एकच गोष्ट नमुद कराविशि वाटते-इतिहास्कालिन राजे/महाराजे/बादशहा ह्यान्चे राज्य चालवणे आणि त्याचा विस्तार हे प्रमुख धोरण असे.खुद्द शहाजि राजे अदिल्शाहाकडे सरदार होते.आणि औरन्ग्झेबाकडे तर रजपुत,ब्राम्हण सेवेस होतेच. शिवाजि महराजान्चा मोठेपणा ह्यात की स्वराज्यच्या कारभारात कधि धर्म आणला नाहि. अनेकानि धर्म फायद्यासाठि वापरला.
5 Mar 2009 - 5:27 pm | शैलेन्द्र
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=21177&tid=2507303423813126...
हे वाचा, फार मजेदार आहे... शेवटुन सुरवात केलीत तरी चालेल...
मग हेहि वाचा..
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=21177&tid=2541434779463605...