टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक
अबक दुबक अबक दुबक अबक दुबक करीत ती निघाली......
स्वतःशीच हसत पर्सच्या बन्दाशी उगाचच चाळा करत......
रस्त्यातून जाणारांचे श्वास अद्धर राहिले. शीळ घालायला म्हणून केलेले ओठांचे चम्बू तसेच राहिले.
रणरणत्या उन्हात एखादी थंड झुळूक यावी तसे जीव सुखावले.
त्याच लयबद्ध हालचाली करीत ती नजरेपार होऊ पर्यन्त सगळ्या नजरा तीलाच न्याहाळत राहिल्या....
ती आता दिसेनाशी झाली.....
कोणीतरी हा.....य करत उसासा टाकाला.
आता संध्याकाळी बोलायला मस्त विषय मिळाला होता..........ती.......
अवांतरः
शेरः: वो आये सामनेसे मचलते उछलते बलखाते
वो आये सामनेसे मचलते उछलते बलखाते
और दबे होटोंसे बोले....................
..................... भाकर वाढा जी
अती अवांतर: ;) ( क्रमशः)
प्रतिक्रिया
4 Mar 2009 - 9:22 pm | विनायक प्रभू
आणखी एक आवाज
लै भारी
4 Mar 2009 - 9:29 pm | अवलिया
नेहमीचे आहे हे विजुभाउंचे...
सगळे हसुन झाले की हसतात...
मग म्हणतात...
मला लोक हसतात
--अवलिया
4 Mar 2009 - 9:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाना, उ(हु)च्च प्रतिसाद! "तो", "ती", "ते" चा कंटाळा आला आहे आणि डुर्रडुर्रायचाही.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.