पोटात कावळे काव काव,
नकोस आणू उगीच आव.
मिळेल शहरी अन गावोगाव,
मस्त चव आणि स्वस्त भाव.
पावमिसळ कुणा नाही ठाव ?
मिसळ पाव, मिसळ पाव. ||१||
पावाला थोडं बटर लाव.
उसळ,दाणे,टमाटर दाव,
लिंबाला मधेच घाल घाव,
जरासा रस मग त्यात श्राव.
शेवेखालचा कांदा खाव,
कोथिंबीरीला वर असेल वाव.||२||
तोंडाला पाणी वासाने याव,
पहाणा-याला फार सुटेल हाव,
खाणा-याची ती पोटात जाव,
मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव,
चवीने खा पण मार ताव,
असशील चोर अथवा साव.||३||
नसेल थारा ऐकताच नाव,
असो नसो भूक ,घेतील धाव,
गरीब रंक अन राजा राव,
गरम मिसळ जशी उन्हात छाव,
मिसळपावाची असे अशीच माव,
मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
*श्राव= गाळ, माव=जादू.
प्रतिक्रिया
23 Jan 2008 - 6:05 am | संजय अभ्यंकर
वाचताना तोंडाला पाणी सुटले.
मजा आली.
संजय अभ्यंकर
23 Jan 2008 - 8:26 am | विसोबा खेचर
वा!
'मिसळगीत' आवडले..:)
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
असंच नेहमी मिसळपाव या पदार्थाच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं!
असो...
मीनल मॅडम, सुंदर काव्य केले आहे. अजूनही येऊ द्यात ही विनंती..
आपला,
(मिसळप्रेमी) तात्या.
23 Jan 2008 - 8:27 am | प्राजु
मीनल...
लय भारी...
अशीच भारी अन वॉव..
कविता तुझी इथे याव
मिसळपाव मिसळपाव...
एकदम खूश...
-प्राजु
23 Jan 2008 - 12:15 pm | बिपिन कार्यकर्ते
ही कविता मिसळपाव चे राष्ट्रगीत म्हणून वापरली जावी असा आमचा प्रस्ताव आम्ही येथे मांडत आहोत.
सरपंच आणि इतर सदस्य, काय म्हणणे आहे आपले?
बिपिन.
23 Jan 2008 - 5:05 pm | विसोबा खेचर
चांगली आहे! :)
आपला,
(राष्ट्राध्यक्ष) तात्या.
23 Jan 2008 - 6:13 pm | ब्रिटिश टिंग्या
आमचे पण.....
- छोटी टिंगी
23 Jan 2008 - 2:26 pm | ध्रुव
आहाहा, जबरदस्त कविता...
--
ध्रुव
23 Jan 2008 - 4:33 pm | स्वाती राजेश
मस्तच आहे..
ही कविता वाचून शाळेमधील निवडणुकांचे दिवस आठवले. आम्ही सर्व मित्र मंडळी मधल्या सुट्टीत आपल्या उमेदवाराच्या नावाने घोषणा देत शाळेभर फिरायचो.
येऊन येऊन येणार कोण,
..... शिवाय आहे कोण.
तुझी कविता याप्रमाणे चाल लावून वाचली.मजा आली.
23 Jan 2008 - 6:06 pm | प्रकाश घाटपांडे
बर झालं ष्टार मारला त्ये. नाही त मंग आमाला वाटल आता ह्यो रसात "स्त्राव" कंचा आला?
प्रकाश घाटपांडे
24 Jan 2008 - 10:58 pm | अन्या दातार
मिसळपाव संकेतस्थळाची ही प्रार्थना म्हणून मान्यता (संजूबाबाची नव्हे) मिळायला हरकत नसावी.
आपला,
(अजूनही शाळेत रमणारा) अनिरुद्ध दातार
27 Jan 2008 - 4:22 pm | सुधीर कांदळकर
मधल्या सुट्टीत देखील म्हणावी.