बॅलन्स 'शीट'

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
4 Mar 2009 - 12:17 pm

" सर, जरा मदत हवी होती".
एका मिपा वाचकाचा मला फोन आला. ह्या सदस्याने त्याच्या १० वीत असलेल्या मुलाकरता मला ऑक्टोबर मधे संपर्क केला होता. त्याच्या बरोबर आणखी २० मुले आणि पालक होते. नेहेमीप्रमाणे कार्यक्रम झाला. मुले आणि पालक खुष झाले. मी अशा कार्यक्रमाची फी घेत नाही हे आधीच सांगितले होते तरीसुद्धा सर्वांनी मिळुन एक सुंदर सरस्वती ची मुर्ती दीली आणि मी ती घेतली. घरी नेउन मुर्तीची देवघरात स्थापना केली.
पण हा फोन वेगळ्या कारणाकरता होता. त्यांना आर्थिक नियोजनात मदत हवी होती. आता मला आर्थिक नियोजन विचारणे म्हणजे "उघड्याकडे गेल वागडे, आणि रात्रभर कुड्कुडले" अशातली गत होती. जे मी कधीच केले नाही त्यावर सल्ला देणे योग्य नव्हते. मान'सिक' किंवा शारि'रिक' ला माझी काहीही हरकत नसते. आज घरी सकाळी एका विदेशी चॅनेल वर अशा नियोजनावर संपुर्ण चर्चा बघुन वाटले अशी चर्चा मिपावर घडवुन आणण्यास काय हरकत आहे. तात्यांची परवानगी घेउन खालील लेख मिपावर टाकत आहे.
३ जणांचे कुटंब. मुलगा दहावीत. बायको सध्या काम करत नाही. एका अपघातानंतर नोकरी सोडावी लागली. वडीलांनी ही तुट भरुन काढण्याकरता आपल्या कांमाचे तास वाढवले. नवीन फ्लॅट घेउन ३ वर्षे झाली होती. फ्लॅट च्या डाउन पेमेंट मधे साठवलेले पैसे संपले होते. बायकोच्या हॉस्पिटलायझेशन चा खर्च भागवण्याकरता एक पॉलीसी वेळेच्या आधी सरेंडर केलेली. दोन वर्षापुर्वी गाडी घेतली होती. गाडीचा इ.एम्.आय रुपये ७ हजार. सध्या वापर अगदी कमी. बँकेत शिल्लक रुपये ५५०००. असो.
मला फोन करायचे कारण असे की इतके दिवस मुलाला ६०% मार्क मिळत होते. कार्यक्रमानंतर मुलाने मनावर घेतले. आणि पुर्वपरिक्षेत ८२% मार्क आणले. आता नेहेमीप्रमाणे 'कॉम्प्युटर इंजिनियरींग' स्वप्ने सुरु झाली. (अरे देवा) आता पुढच्या नियोजनाचे काय.?
त्यांची 'बॅलन्स शीट' खालील प्रमाणे
आवक : महीन्याला सुमारे ४०००० हातात.
प्रोफेशनल असल्यामुळे प्रॉविडंड फंड वगैरे काही नाही.
बॅकेत शिल्लक : ५५००० जाव़कः महीना ८००० घराचा इ.एम.आय + ७००० गाडीचा हफ्ता. +१०००० घरखर्च
पॉलीसी प्रिमियमः २००० (दोन लाखाची मनीबॅक) १००० (५ लाखाची टर्म) ३००० (मुलाची आणि बायकोची मिळुन सुमारे ३ लाखाची एंडावमेंट) एकंदरीत प्रिमीयम ६०००
महीना : ३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता.९अजुन ५ वर्ष चालणार)
महीना: ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे)
बचतः महीना २ हजार
येते दोन वर्षातले जादा बोझः ११वी १२ वी सायन्स साठी महीना ५०००/-
इंजीनीयरींगला ऍड्मिशन मिळाल्यावरचा वाढीव खर्च दोन वर्षानंतर महीना ९०००/-
आता ह्या बॅलन्स शीट मधे काय केल्याने पुढील आयुष्यातील आर्थीक आव्हाने जास्त कर्ज न काढता पेलणे शक्य आहे ह्यावर मान्यवरांनी सल्ला द्यावा.
जाता जाता: मुलाची आई बोर्डात दहावी आली होती. त्यामुळे जरा जास्त आक्रमक होती. सतत मुलाचा मार्कावरुन जाच होत होता.
तो बंद झाला रे झाला लगेच मुलाची प्रगती झाली.
ता.क. वय झाल्यामुळे 'दम' लागणार्‍या म्हातार्‍या सल्लागारांनी जरा मनावर घेउन आपल्या अनुभवांचा फायदा ह्या सदस्यांना करुन द्यावी ही नम्र विनंती.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 12:28 pm | विनायक प्रभू

सल्ल्यासाठी वयाची अट नाही. अनुभव महत्वाचा.

मराठी_माणूस's picture

4 Mar 2009 - 12:35 pm | मराठी_माणूस

गाडी खुप गरजेची आहे का ?

महेश हतोळकर's picture

4 Mar 2009 - 12:34 pm | महेश हतोळकर

गाडी आणि इतर खर्चाच्या बाबतीत काही करता येईल का? म्हणजे गाडी विकायची नाही पण एखाद्या ट्रॅव्हल एजंटबरोबर बोलून गाडी व्यवसायाला लावली तर? तसाही वापर कमीच आहे.

घ्या. आजून एक फाटका खीसा बोलला.

प्रमोद देव's picture

4 Mar 2009 - 12:38 pm | प्रमोद देव

काटकसर करायला शिका.
अनाठायी खर्च बंद करा(त्यासाठी कठोर आत्मपरीक्षणाची जरूर आहे.)
हे जमणार नसेल तर आवक वाढवा. कशी? त्याचा विचार ज्याने त्याने करावा.

दशानन's picture

4 Mar 2009 - 12:40 pm | दशानन

खरं आहे.. !

मुंबई सारख्या सार्वजनिक वाहतुक मुबलक असलेल्या शहरामध्ये स्वतःची गाडी ही चैनीची च वस्तु आहे.. जर तो एक खर्च घटवला तर थोडा हात भार लागेल.

>>३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता.९अजुन ५ वर्ष चालणार)

१८०००० हजारचे हफ्ते भरायचे आहेत अजून :(
अवघड आहे.. !

>>महीना: ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे)

ह्या मध्ये अजून काट कसर केली तर... ८००-१००० रुपयांची बचती मध्ये भर पडेल.

>>+१०००० घरखर्च

तीन जणांच्या कुटुंबामध्ये हे खुपच अती आहे.
ह्याच कमी करणे.. वायफळ सामान न खरेदी करणे .. ह्यामुळे कमीत कमी २५०० ची बचत होऊ शकते.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 12:46 pm | विनायक प्रभू

घरखर्च १०००० रुपये कारण त्यात १०वी इन्क्लुड आहे. १० वी एक लय भारी प्रकरण असते रे बाबा.

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 4:55 pm | लिखाळ

दहावीतल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला ३ ते ४ हजार रुपये मासिक खर्च !!! ???
बापरे बाप ! हा आकडा भारीच आहे... इतका खर्च का येतो?
-- लिखाळ.

दशानन's picture

4 Mar 2009 - 4:57 pm | दशानन

हाच मी विचार केला, डोक्यातून इचार जात नव्हता म्हणुन दोन्-चार फोन लावले .. येतो राव येवढा खर्चा आरामात येतो.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 5:06 pm | लिखाळ

बापरे .. म्हणजे आपण फुकटात शिकलो असेच वाटत आहे.
-- लिखाळ.

दशानन's picture

4 Mar 2009 - 5:10 pm | दशानन

हो... मला तर उलट शाळेनेच पैसे दिले.. गप्प घरी जा म्हणून =))

* पन खरंच राव, आपल्या काळी एवढा खर्च नव्हता. १५ रुपये शाळेची फी + गणवेश + चपला + एक दप्तर + वह्या+पुस्तके = वर्षाचे १०००-१५०० म्हणजे पण पंचगंगेची मच्छिंद्री... राव !

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सहज's picture

4 Mar 2009 - 12:48 pm | सहज

१) बँकेतील शिल्लक ५५००० हजार शक्यतो हात न लावता आपत्कालीन तशीच ठेवणे. एफ. डी.
२) गाडीचा फारसा उपयोग नसल्यास, ती काढून महीना ७००० वाचवता येतील. रोज गाडीने जात-येत नसतील तर नक्कीच काढावी व सार्वजनीक वाहतुकीत किती खर्च आहे बघावे. नाही तरी इन्शुरन्स, तेल, पाणी, दुरुस्ती, खर्च वाचतीलच. किमान ५०००/- वाचावेत हा अंदाज.
३) टर्म सोडून दोन्ही पॉलीसी बंद केल्या तर नक्कीच महीना ५०००/- वाचणार, थोडी का होईना आधी खर्च केलेली रक्कम मिळणार. जमल्यास टर्म पॉलीसी रक्कम वाढवावी.
४) महीन्याचे बजेट ठेवुन पै न पै चा हिशेब ठेवला की नक्की कुठल्या खर्चाला आळा घालता येईल हे लवकर लक्षात येईल.

जर शिक्षण खर्च पहीली प्रायोरिटि असेल तर असेच करावे. महागडे इंजीनीयरिंग न करता पदवी, पदव्युत्तर असा मार्ग हाताळायचा विचार करायला हरकत नाही. आणि हो जमल्यास शैक्षणीक कर्ज घ्यावे व मुख्य म्हणजे स्वताच्या म्हातारपणासाठी जोरदार पैसे साठवण्यास सुरवात करावी. मुलाचे शिक्षण दुसरे साधे झाले तर चालेल पण म्हातारपणी मुलावर आर्थीक दृष्ट्या अवलंबुन रहाण्यात मोठी चूक करत आहे हे माझे मत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 12:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अपघाताचा उल्लेख केला आहेत. पण सध्याचं औषध-पाणी, किंवा कसं यांचा उल्लेख नाही. तेव्हा शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर मुलाची आई बोर्डात दहावी आली होती या कमाईवर प्रचंड व्याज मिळू शकेल. कसं ते मी काय सांगणार तुम्हाला विप्र?

(आता मी पळते, नाहीतर पुन्हा मला फटके मिळायचे, मी व्याज खात नाही आहे म्हणून!)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 1:43 pm | विनायक प्रभू

पुराणातली वांगी.
उपयोग काही नाही.
त्रासच जास्त

कुंदन's picture

4 Mar 2009 - 2:23 pm | कुंदन

>>तेव्हा शारीरिकदृष्ट्या शक्य असेल तर मुलाची आई बोर्डात दहावी आली होती या कमाईवर प्रचंड व्याज मिळू शकेल.

अदिती शी सहमत.
शिकवण्या घेणे वगैरे जमु शकणार नाही का?

>>पुराणातली वांगी.
जर असे असेल तर , रोज रोज भरीत खावे लागेल मग.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 2:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुराणातली वांगी. उपयोग काही नाही.
मग समुपदेशकाचं काम काय? पोरांपेक्षा आधी पालकांचेच कान ओढा; पोरांचे कान ओढण्याऐवजी पाठीवर हात ठेवण्यापुरतेच रहाल.

आणि हो, हा धागा योग्य ठिकाणी पोहोचेल याचीही काळजी घ्याच.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

सुनील's picture

4 Mar 2009 - 12:47 pm | सुनील

तुम्ही दिलेल्या माहितीचे थोडक्यात विश्लेषण केले -

घर खर्च - ३५%
कर्ज फेड - ४५%
इन्शुरन्स हप्ते - १५%
बचत - ५%

पैकी, घरखर्चात बचत करायला थोडा वाव असावा.

नक्की कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स आहेत ते कळले नाही. पण त्यापैकी वॅनिला इन्शुरन्स चालू ठेऊन बाकीच्या पॉलिसी बंद करता येतील आणि ते पैसे थोड्या अधिक परतावा देणार्‍या योजनांत गुंतवता येतील, असे वाटते.

गाडी आणि फर्निचरच्या कर्जाची मुदतपूर्व फेड करता येईल का ते पहावे.

केवळ ५% बचत, हे कोणत्याही अर्थाने सुरक्षित नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्मिता श्रीपाद's picture

4 Mar 2009 - 12:47 pm | स्मिता श्रीपाद

१०००० घरखर्च + ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे)
= १४०००

३ जणांच्या कुटुंबाला महिन्याला इतका खर्च येतो का?

२००० = किराणा ( मला वाटतं ३ जणांसाठी याहुन कमी येत असेल...)
१००० = घरकामच्या बायका ( धुणी ,भांडी,ई..)
३५० = सिलेंडर
१००० = लाईट बील (यापेक्शा कमी येउ शकतं)
१०००=फोन बील (यापेक्शा कमी येउ शकतं)
४००० = ईतर ( हॉटेलिंग,चित्रपट्,दवाखाना,रेल्वे पास,मोबाईल ई..)
१०००=भाजी,दुध,पेपर....ई....
====
१०३५०

इथे ३०००-४००० ची बचत होउ शकते.....असं मला वाटतं

मनिष's picture

4 Mar 2009 - 5:09 pm | मनिष

१०००=भाजी,दुध,पेपर....ई....

कुतुहल म्हणून नाव पाहिले तर 'स्मिता श्रीपाद', निदान गृहिणींना तरि खर्च माहित असतील असे वाटते.
दूध आहे २६ रु/लि पुण्यात. मुंबईत २८ ते ३० रू आहे. घरपोच चा निदान ३० रु आकार धरला तरी ८०० च्या वर जाते. भाजीचे म्हणाल तर दिवसाला ३०-४० रू सहज होतात (८-१० रु पाव भाजी आहे, लिंबू, मिरची, कढीपत्ता, काकडी, टोमॅटॉ, नारळ, दही, पनीर...खूप खर्च असतो हो!). भाजीचा खर्चच १०००-१२०० महिना होतो आणी १ पेपर असेल तर १०० रु २ असतील तर २००. तर हे बघा --

दूध + भाजी + पेपर = ८०० + १२०० + २०० = २२००. शिवाय धोबी, केबलवाला वेगळेच. ३ जणांच्या कुटुंबाला १०,००० अगदी सहज लागतात, निदान मोठ्या शहरात तरी.

- (आटे-डालचा भाव नीट माहित असलेला) मनिष

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 5:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेपर ऑनलाईन वाचा. इंटरनेटचा इतरही बराच फायदा आहे. केबलची गरजच काय, मुलगा तसाही दहावीत आहे आणि टी.व्ही.सुद्धा बकवासच असतो. धोबी, कामाला बायका कशाला? मशिन्स+आपला हात जगन्नाथ! व्यायाम होतो, घर सगळ्यांचं असल्याची जाणीव होते आणि पैसेही वाचतात. (आणि हा सल्ला उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार नाही.)

मनीषचं गणित मान्य. दोघांसाठी, पुण्यात, दूध आणि भाज्या+फळांचाच खर्च प्रत्येकी १००० च्या आसपास होतो.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 12:55 pm | विनायक प्रभू

३००० दहावी साठी लागतात. म्हणुन १४००० खर्च

योगी९००'s picture

4 Mar 2009 - 1:26 pm | योगी९००

मुलगा साधारण १६/१७ वर्षाचा आणि पुर्वी दोन्ही पालक कमावते असून फक्त ५५००० बँकेतील शिल्लक हे पटत नाही. जरी अपघात आणि घराच्या डाऊन पेयमेंट मध्ये शिल्लक संपली असे नमूद केले आहे तरी.. याचा अर्थ पुर्वी काही इतर जबाबदारी किंवा शेयर मार्केट मध्ये नुकसान असे काही झाले असावे किंवा आधी काही आर्थिक नियोजन केले नसावे.

सध्या गाडी विकणे हाच एक उत्तम सल्ला दिसतोय.

टर्म सोडून दोन्ही पॉलीसी बंद केल्या तर नक्कीच महीना ५०००/- वाचणार, थोडी का होईना आधी खर्च केलेली रक्कम मिळणार.
हे अजिबात करू नका. पुढे कधी कर्ज घ्यायची वेळ आली (शिक्षणासाठी वगैरे) तर विमा पॉलीसी असणे फायद्याचे ठरेल. तात्या या वर अधिक चांगला सल्ला देतील.

आता नेहेमीप्रमाणे 'कॉम्प्युटर इंजिनियरींग' स्वप्ने सुरु झाली. (अरे देवा) आता पुढच्या नियोजनाचे काय.?
फक्त हेच एक करियर आहे का?

महीन्याचे बजेट ठेवुन पै न पै चा हिशेब ठेवला की नक्की कुठल्या खर्चाला आळा घालता येईल हे लवकर लक्षात येईल.
हे बरोबर.. बियर वगैरे चैन सध्या तरी बंद करावी. बाकी सगळे विचार सहज यांच्या प्रतिक्रियेप्रमाणे

खादाडमाऊ

दत्ता काळे's picture

4 Mar 2009 - 2:17 pm | दत्ता काळे

खर्च करण्याच्या सवयीमध्ये बदल करण्यानी फारसा उपयोग होत नसतो. कारण त्या सवयी आहेत आणि त्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्यामुळे केलेले नवीन उपाय फार काळ टिकत तर नाहीच, उलटपक्षी कधीतरी त्याचा उद्रेक होऊन एखाद्यावेळी जास्तच खर्च होऊ शकतो आणि केलेल्या बचतीचा फारसा उपयोग होत नाही . त्यापेक्षा,

१. व्यवसाय वाढीचा जास्तीत जास्त विचार करून नवीन आराखडे तयार करणे,
२. नवीन आराखड्याप्रमाणे दररोजचे नियोजन करणे, त्यानुसार कामे वाढविणे,
३. सध्या जे चार्जेस रिवाईझ करता येऊ शकतात कां ते बघा, आणि
४. सध्याच्या व्यवसायाला पूरक ( Forward OR Back Integration ) असा किंवा एखादा जोड व्यवसाय सुरु करावा.

जरा अवांतर : मी पण एक स्वतंत्र व्यावसायिक आहे आणि माझ्याही मुलाला दहावी पास झाल्यावर Comp.Science ला ऍडमीशन मिळाली आहे. फक्त त्याची इच्छा एन्.डी.ए. मध्ये ऑफिसर व्हावे किंवा आर्टीलरी इन्जिनिअरींग करावे अशी आहे. पुढे काय होईल, देव जाणे.

दत्ता काळे's picture

4 Mar 2009 - 2:20 pm | दत्ता काळे

( Forward OR Back Integration ) च्या ऐवजी ( Forward OR Backward Integration ) असे वाचावे.

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 2:33 pm | विसोबा खेचर

मास्तर, धागा टाकलात हे चांगलेच झाले. कुणी सुचवलेला पर्यात उपयोगी पडल्यास उत्तमच आहे...

बाकी, मी त्या मुलाच्या जागी असतो तर आपल्या आईवडिलांची ऐपत आहे किंवा नाही हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता..

आम्ही दुनियादारी खूप केली, २०० ते ३०० रुपये महिना, या दराने १९८९ पासून नौकरी केली. टक्केटोमणे खाल्ले. आज आमचं काय वाईट झालं आहे? स्वत:च्या हिंमतीवर दोन वेळचा आमटीभात सुखा-समाधानाने खात आहोत. शेवटी संगणक अभियांत्रिकी/उच्चशिक्षण म्हणजेच काही सर्वस्व नाही. आज तिच्यायला संगणक अभियंत्यांच्याच नौकर्‍या जाऊन त्यांच्यावर मंदीची आणि बेकारीची कुर्‍हाड कोसळल्याच्या बातम्या ऐकत आहोत..!

मास्तर, त्या पोराला आईवडिलांना आर्थिक ताण देऊन शिकण्यात काही मतलब नाही हे समजावा. काय उपाशी मरत नाहीस, स्वत:च्या हिंमतीवर मोठा हो असं सांगा.

तेच खरं समुपदेशन..

तुम्ही समुपदेशक मंडळीच नाही नाही ते समुपदेशन पोरांच्या डोक्यात भरवून प्रॉब्लेम वाढवून ठेवत असता असं माझं वैयक्तिक मत आहे!

तात्या.

सहज's picture

4 Mar 2009 - 2:35 pm | सहज

>हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता..

कदाचित ह्या धाग्यामागे मास्तरांचा हाच हेतु असेल की खर्च, शिक्षण खर्च दाखवून देणे. जागरुकता घडवणे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी, मी त्या मुलाच्या जागी असतो तर आपल्या आईवडिलांची ऐपत आहे किंवा नाही हे पाहूनच उच्चशिक्षणाचा विचार केला असता..
अगदी सहमत.

(अशी ना तशी डॉक्टर) अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 5:33 pm | विनायक प्रभू

तात्या मी त्यातला नाही हे आधीच बर्‍याच वेळा सांगितलेले आहे.
तुम्ही म्हणता ते अगदी स्पष्ट्पणे पालकांना आणि मुलाला सांगुन चुकलो आहे.
पण काय करणार?

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 6:19 pm | विनायक प्रभू

आणि हो. कसला 'आयशीच्या घोवाचा समुपदेशक' हो तात्या.
खुप बदल झाला आहे चित्रात.
मुलांना कानफटात मारुन मला परवडत नाही, शिकायचे तर शिक नाहीतर गेलास बाझवत असे म्हणता येत नाही. लगेच उत्तर येते " मी काय ऍप्लीकेशन दीले होते का मला जन्माला घालायला".
असो.
निदान आय. आय.टी नावाच्या षौकातुन त्या मुलाला बाहेर काढू शकलो ह्यात समधान मानतो.
नाहीतर ११वी १२ वी चा खर्च ३.५ लाख.
दोन वर्षानंतरची एक शोकसभा टळली.

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 6:23 pm | लिखाळ

निदान आय. आय.टी नावाच्या षौकातुन त्या मुलाला बाहेर काढू शकलो ह्यात समधान मानतो.
नाहीतर ११वी १२ वी चा खर्च ३.५ लाख.
दोन वर्षानंतरची एक शोकसभा टळली.

हे समजले नाही.. आय आय टी मध्ये जाण्याबद्दल आपले मत अनुकुल नाही का? असे का?
आय आय टी साठी दहावीमध्ये अभ्यास.. त्यासाठी स्पेशल शिकणी असे काही आहे का.. आणी त्याचा खर्च फार आहे का.. पण आय आय टीचा पर्याय १२ वी नंतर अथवा ग्रॅज्युएशन नंतर खुला होतो ना...
-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 6:29 pm | विनायक प्रभू

प्रत्येक ८५% + वाल्याला आय आय टी सबकुच्छ ची भुरळ घालण्यात येते. सध्याचा १०वीचा अभ्यासक्रम एवढा भाकड आहे की जर नीट अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला ८५ % आरामात पडतात.
पण ते आय आय टी ला लागणार्‍या बुद्धिमत्तेचे द्योतक नव्हे.
सोम्या जातो म्हणुन गोम्या जातो.
सर्व क्लासेस दोन वर्षाचे मिळुन सुमारे ३.५ लाख खर्च होतात.
९९.९९% केसेस मधे हातात काहीच लागत नाही.

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 6:35 pm | लिखाळ

हम्म.. असे आहे तर.. म्हणजे क्लासचाच खर्च जास्त.. असो..
कोचिंग क्लासेसचे प्रस्थ फारच झाले आहे असे दिसते...
-- लिखाळ.

रेवती's picture

4 Mar 2009 - 7:20 pm | रेवती

असं ऐकलय की आजकाल इयत्ता आठवीपासूनच आय. आय. टी. चे क्लासेस लावतात मुलं (म्हणजे पालक).

रेवती

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 7:42 pm | लिखाळ

>असं ऐकलय की आजकाल इयत्ता आठवीपासूनच आय. आय. टी. चे क्लासेस लावतात मुलं (म्हणजे पालक).<
बापरे.. हे अतीच झालं.. अश्या पालकांचे पराठेच करायला हवेत :)

-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 7:57 pm | विनायक प्रभू

पाचवी पासुन तयारी सुरु होते असे कानावर आले.

संजय अभ्यंकर's picture

4 Mar 2009 - 10:47 pm | संजय अभ्यंकर

सध्याचा १०वीचा अभ्यासक्रम एवढा भाकड आहे की जर नीट अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला ८५ % आरामात पडतात.
सत्य आहे!

९९.९९% केसेस मधे हातात काहीच लागत नाही.
सहमत!

१) प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःची व त्याच्या पालकांना पाल्याची (अभ्यासातली) कुवत माहीत असणे आवश्यक.
ह्या विषयावर घरात दीर्घ चर्चा करून त्यावर एकमत करणे आवश्यक.
१२वी नंतर निवडायच्या मार्गासाठी दहा पट न काढता एक मार्ग निवडून त्या साठी अभ्यास करणे आवश्यक.

२) पालकांनी पाल्याला घरच्या आर्थीक परिस्थीतीची जाणीव करून देणे आवश्यक.
त्यामुळे पाल्याला जर इंजिनियरिंग करायचे असेल तर आवश्यक मार्क मिळवले पाहीजेत.
अन्यथा PAID सिट्स साठी पालकांचे कंबरडे मोडेल. प्रभू साहेब हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठासवतात.

३) प्रभूसाहेबांनी सांगितलेल्या कुटुंबाची केस हातघाईवर आलेली आहे. त्यामुळे सल्ला देणे मला अवघड वाटते.
तरी ते कुटूंब ज्या समाजातले / ज्ञातीतले आहे, त्या समाजातील संस्था / ज्ञातीबंधू शिक्षणाचा काही खर्च उचलू शकतात.

आमचे ब्राम्हण सहाय्यक संघ व चित्तपावन संस्था एके काळी अभियांत्रीकी, वैद्यकीय शिक्षणाचा काही भार विनामोबदला उचलत.
(आजचे ठाऊक नाही, कारण ह्या संस्थांशी माझा संबंध आला नाही)

मी V.J.T.I. ला असताना (आमचे एक ज्ञातीबंधू) सायनच्या एका आर्कीटेक्ट साहेबांनी (त्यांची नांव गुप्त ठेवायची अट आहे), माझ्या पूर्ण अभ्यासक्रमाची पुस्तके मला दिली होती. अन्यथा टॅक्सी ड्रायव्हर असलेले माझे वडील घायकुतीला आले असते.

डीप्लोमा करताना मी शिकवण्या, तसेच दारोदार पेपर टाकून बस तिकिटाचा खर्च काढत असे.

४) ज्यांची मुले इ. १०वी पासुन अजून दूर आहेत, त्यांनी दीर्घ कालीन आर्थीक योजना अत्तापसून राबवणे आवश्यक.
भविष्यात शिक्षण अजून महाग होत जाईल.

५)एकंदर आजच्या काळात आपल्या अवती भवती घडणार्‍या / दिसणार्‍या घटनांनी बावॠन न जाता, एकमार्गी (धोपटमार्गी) वाटचाल करणे आवश्यक. उदा. लोकांच्या हातातले महागडे मोबाईल पाहून जेव्हा मी त्यांना त्यांच्या उत्पन्न बद्दल विचारतो, तेव्हा त्या मोबाईलची किं. पगारच्या कुवती पलिकडची आढळते.
समाजात प्रतिष्ठा, तोरा मिरवण्यासाठी लोक ज्या उचापत्या करतात, ते पाहून दुखः होते.
आमच्या कंपनीतल्या काही मंडळींनी भिशी काढून महागडे मोबाईल घेतले, कर्जे काढून सिंगापूर वार्‍या केल्या.
ह्या मंडळींना दीर्घकालीन बचती विषयी यत्कींचितही जाणीव नाही.

कृपया लेक्षात घ्या, हे विषयांतर नाही, ह्या सार्‍या गोष्टींपेक्षा मुलांचे शिक्षण कित्येक पट मोलाचे आहे. ह्याची पालकांनी जाणीव ठेवावी.

६) आमची आजची शिक्षणपद्धती, अभियांत्रीकी, वैद्यकीय या पलीकडे फार मोठी क्षेत्र उपलब्ध आहेत, ह्याकडे मुलांना जाऊ देत नाही. ज्याला ingenuity म्हणतात, ती अर्हता शाळेत मिळत नाही. हे अमेरिकन, जर्मन समाजाला कळते, आम्हाला नाही.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

4 Mar 2009 - 10:56 pm | चतुरंग

अतिशय योग्य विचार मांडल्याबद्दल अभ्यंकरांचे आभार!
भपका आणि मोठेपणा ह्याच्या मागे लागून लोक स्वतःलाच नव्हे तर पुढच्या पिढ्यांनाही बरबाद करण्याच्या मागे लागे लागतात हे खरे आहे!

चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

4 Mar 2009 - 11:09 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

5 Mar 2009 - 11:19 am | विनायक प्रभू

२) पालकांनी पाल्याला घरच्या आर्थीक परिस्थीतीची जाणीव करून देणे आवश्यक.
त्यामुळे पाल्याला जर इंजिनियरिंग करायचे असेल तर आवश्यक मार्क मिळवले पाहीजेत.
अन्यथा PAID सिट्स साठी पालकांचे कंबरडे मोडेल. प्रभू साहेब हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर ठासवतात.
सांगायचे काम माझे बाकी पालक आणि विद्यार्थ्याचा निर्णय.

मोहन's picture

4 Mar 2009 - 3:22 pm | मोहन

प्रश्न कठीण आहे. विम्याच्या मनीब्याक ई. लुटारु पॉलिसी बंद कराव्या ( टर्म पॉलिसी सूरु ठेवावी व शक्य असल्यास वाढवावी.) त्यातून जे काही पैसे मिळतील ते फर्नीचर लोन फेडण्यात खर्च करावे.

गाडीला प्रॉडटीव्ह असेट करता आले तर ठीक. नाही तर सरळ विकावी व कर्ज फेडून उरलेले पैसे परत फर्नीचर लोन फेडण्यासाठी वापरावे. यामुळे गाडीच्या देखरेखीचा व ईंश्यूरन्सचा खर्च वाचेल.

ब्यांकेच्या खात्यात सुद्धा आवश्यक तेवढीच शिल्लक ठेवून फर्नीचर लोन मधून लवकरात लवकर मोकळे व्हावे.

३ जणाच्या कुटुंबाला किती खर्च लागायला हवा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बियर नाही प्यायची, सिनेमा-नाटक नको तर जगाचे कशाला? ;)

मोहन

आपलाभाउ's picture

4 Mar 2009 - 5:20 pm | आपलाभाउ

मनात आले तर होउ शक्ते............ईच्च्चा शक्ति पहिजे................ईश्वर मार्ग दाखावतो..........

चतुरंग's picture

4 Mar 2009 - 6:50 pm | चतुरंग

१ - तातडीने गाडी काढून टाकणे (कमीच वापरली जाते असे सांगितले आहेत म्हणून) = ७०००रू. वाचले = त्यातले १००० घराचा आणि १००० फर्निचर हप्त्यात वाढवावेत उरलेले ५०००रु. बँकेत गेले पाहिजेत
२ - रेल्वे पास फर्स्टक्लासचा असेल तर दोन वर्षे सेकंड क्लासने प्रवास करावा - मला पासेसचे दर माहीत नाहीत पण नक्कीच भरपूर बचत होईल असे वाटते.
तसे नसले तर कारपूलिंग किंवा इतर कुठले पर्यायी मार्ग आहेत का ह्याची चाचपणी करावी, तेजीच्या काळात हे मार्ग आपण बघितलेले नसतात.
३ - घरखर्च कमी कसा करता येईल? ग्राहकपेठेसारख्या होलसेल दुकानातून खरेदी करावी, काही दिवस थोडे साधे कपडे घ्यावेत (म्हणजे एरवी रेमंड्सशिवाय पानच हलत नाही असे असेल तर..),
बाहेरून खाण्याचे पदार्थ रेडीमेड आणण्याकडे कल असेल तर त्यावरचा जोर कमी करावा, इस्त्रीला कपडे बाहेर टाकत असाल तर घरीच करावी, एकूण घरखर्चाकडे अगदी बारकाईने बघितल्यास अनेक फटी दिसतात ज्या जास्त आवक असताना निर्माण करुन ठेवलेल्या असतात त्या बुजवता येतील.
महिना १००० जरी कमी करु शकले तरी फायदाच!

आईचा आजार असाध्य वगैरे नसला आणि जर तिला पार्टटाईम नोकरी करणे शक्य असेल तर जरूर करावी त्याने थोडा घरखर्च भागायला मदत होईल. तसे शक्य नसले तर शिकवण्या सुरु करणे शक्य आहे का ते बघावे. (आता चार परखड शब्द -माझ्या बघण्यात दहावी बारावीला बोर्डात आलेली मंडळी ही स्वतःला फार शहाणी समजतात असे बहुतांश चित्र आहे, अपवाद असतातच - कृपया मिपाकरांपैकी कोणी बोर्डात आलेले असल्यास मनावर घेऊ नका - पण सगळीकडेच ती झूल अंगावर ठेऊन वावरतात बर्‍याचवेळा. वेळेप्रमाणे पडेल ते काम अंगावर घेण्यात कमीपणा वाटतो. व्यवहारी जगात ती झूल उपयोगाची नसते हे कळते पण वळत नाही - ह्या केसमधे असे असेल की नाही माहीत नाही पण असलेच तर समुपदेशकांनी कौशल्याने मार्ग काढता आला तर पहावा!)

तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट. मनस्थिती उत्तम असलेला एखादा छानसा दिवस बघून आई-वडील-मुलगा ह्यांनी एकत्र बसून घराचा जमाखर्च मुलाला समजावून द्यावा. महिन्याला किती मिळतात. बचत किती खर्च किती. बचतीत वाढ करण्यासाठी आई-वडील काय काय करत आहेत हे सगळे मुलाला समजले पाहिजे. त्याचे टेंशन वाढेल अशी भीती वाटू देऊ नका. मुले समंजस असतात त्यांना परिस्थितीची योग्य जाणीव दिली तर त्याचा उपयोगच होतो. मुलांपासून दडवून ठेवायचे आणि येताजाता आदळाआपट, धुसफूस, संतापून आरडाओरडा, मुलावर चिडचिड असे होत असेल तर दुष्परिणाम जास्त होतात!

समुपदेशक आणि त्यांचे क्लायंट्स सर्वांना शुभेच्छा! :)

चतुरंग

विनायक प्रभू's picture

4 Mar 2009 - 7:12 pm | विनायक प्रभू

नीट वाचताय ना. बघा कसे धाउन आले तुमच्या मदतीला.
रंगा शेठ धन्यवाद

अवलिया's picture

4 Mar 2009 - 7:44 pm | अवलिया

समस्या अवघड आहे खरी. रंगाशेटशी सहमत.
बाकी 'जिंदगी सबकुछ सिखा देती है..' यावर माझा तरी विश्वास आहे.

--अवलिया

विसोबा खेचर's picture

5 Mar 2009 - 12:35 am | विसोबा खेचर

बाकी 'जिंदगी सबकुछ सिखा देती है..' यावर माझा तरी विश्वास आहे.

माझाही आहे..!

आणि पोराच्या वेळीच दोन कानफटात मारणे हेच सर्वात उत्तम समुपदेशन..!

तात्या.

आपल्या पिढीत मूल अगदी १५-१६ वर्षाचे होईपर्यंत वडिलांना हात साफ करुन घेता येत असे ;)
आताशा फार तर मूल सहा-सात वर्षाचे असेपर्यंत तुम्ही माराचा थोडा धाक दाखवू शकता. त्यानंतर त्याचा उलटा परिणाम होतो - कोडगेपणा वाढतो. पण थोडा धाक हवा अगदीच मोकाट वळू सुटल्यासारखे नसावे हे मात्र नक्की!

चतुरंग

विकास's picture

4 Mar 2009 - 8:23 pm | विकास

भारतातील खर्चाचा या निमित्ताने अंदाज आला. बर्‍याच सुचना आल्या त्या परत लिहीत नाही.

एक प्रश्नः मुलाने काँप्युटर्सला जावे हे मुलाला वाटते का आईवडलांना? ह्या "एल के एम" कितपत येते? (एल के एम: लोक काय म्हणतील, अर्थात पीअर प्रेशर)

बाकी चतुरंगच्या शेवटच्या मुद्याशी विशेष सहमत. सारेगमप, सास-बहू, अजून काही कार्यक्रम, ऑफिसातील कटकटींचा नकोतितका विचार, अजून काही अवांतर विचार करत एका टेबलावर साधे जेवण करणे विसरले जात आहे. वास्तवीक सर्वात महत्वाचे असते ते संवाद पण तो होण्यासाठी, "सहनाववतु सहनौभुनक्तु..." करावे लागते (नुसतेच पाठ असून उपयोग नसतो). सध्या भारतात नवीन कुटूंब पद्धती निर्माण झाली आहे: एकत्र विभक्त कुटूंब. राहतात एकत्र पण मुलगा/गी एसएमएस करत बसतात, आई फोनवर, वडील टिव्ही, वगैरे आणि त्याची काही काँबिनेशन्स! असो.

मला वाटते आज पैशापेक्षा जास्त समस्या ही नाते आणि (तरूणपणात येत असलेल्या) मुलांच्या संदर्भात व्यक्तीमत्व विकास ही आहे.

जाता जाता एक उदाहरण देतो:

इंजिनियरींगची मी अमुक एक ब्रँच का निवडली अथवा नावडीच्या ब्रँच मधून आवडीच्या ब्रँच मधे मी कसा आलो यावरील एक चौथ्या वर्षातील मुलांची भाषणे मी पहील्या वर्षात असताना ठेवली होती. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात नोकर्‍या कशा चांगल्या आहेत म्हणून गेलो वगैरे सांगत भलावण अथवा "डिफेन्स" करत होता.

नंतर आमचा एक जुना जाणता प्राध्यापक जो मुलांशी मित्रासारखा संवाद करण्यामुळे सर्वच कॉलेजात प्रसिद्ध होता, तो उठला आणि म्हणाला: " उपदेशोही मुर्खाणां प्रकोपाय न शांतये..." अर्थात तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. पण तुम्ही इंजिनियर्स होणार आहात. engineers should create jobs, not demand one... पण तुम्हाला ते कळतच नाही आणि कुठली ब्रँच चांगली म्हणून वायफळ बोलत बसला आहात..."

अर्थात हे सांगायला नको, पण भाषणे ठोकणारी मुले मराठी होती आणि त्यावर उत्तर देणारा प्राध्यापक गुजराथी!

सहज's picture

4 Mar 2009 - 8:28 pm | सहज

प्रतिसाद आवडला!

चतुरंग's picture

4 Mar 2009 - 8:41 pm | चतुरंग

आपल्या क्षमता पुढे जाण्याऐवजी घाण्याच्या बैलासारख्या गोलगोल फिरण्यात जात नाहीत ना हे बघणे फार महत्त्वाचे!

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2009 - 11:29 am | प्रकाश घाटपांडे

अर्थात हे सांगायला नको, पण भाषणे ठोकणारी मुले मराठी होती आणि त्यावर उत्तर देणारा प्राध्यापक गुजराथी!

मार्मिक
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मुक्ता २०'s picture

5 Mar 2009 - 9:23 am | मुक्ता २०

१) मुलाला सांगा, घरचा खर्च किती आणि कसा आहे! मुलगा १०वीत आहे, म्हणजे तेवढा समजुतदारपणा असणार!!
२) आजकाल engg चं फॅड आहे! जो -तो तेच करतोय. असो, त्याला engineering करायचय ना, त्याला म्हणाव, १०वी ची परिक्षा झाली कि part-time जॉब कर आणि थोडेफार तरी पैसे जमव. atleast कळेल दाल्-आटे का भाव! (experience बोलतोय :P)
३) गाडीची गरज नसल्यास सरळ विकावी.
४) जमत असल्यास आइने घरी शिकवण्या घ्याव्या.
५) १०वी आहे नं,केबल काढुन टाका , तेवढिच बचत.

जाता-जाता: सगळेच engg किंवा medical करतात म्हणुन ते करु नये. आपली क्षमता काय, आपल्याला काय जमतं काय नाही हे नीट पाहा. १०वीत ८४% मिळाले म्हणुन हवेत उडु नका. अशी बरीच मुलं-मुली पाहिली आहेत जी १०वीत छान marks मिळले म्हणुन engg किंवा medical घेतात आणि मग रडतात, " हे जमत नाहिये." म्हणुन. असं होऊ देऊ नका. :)

बघा कितपत पट्तय ते. :)

मुक्ता. :)

स्वाती२'s picture

5 Mar 2009 - 10:23 pm | स्वाती२

चतुरंग , विकास , आणि मुक्ता यांचे म्हणणे बरोबर आहे. तसेच हल्ली शिक्षणासाठी कर्ज मिळ्ते. ते मुलगा नंतर फेडू शकतो. मात्र पालकांना रीटायरमेंट साठी कोणी कर्ज देणार नाहीये हे लक्षात घ्यावे. तसेच १-२ महीने सर्व खर्च लिहावा. अगदी एक वडा पाव घेतला तरी लगेच नोंद करावी.आपलेच आपल्याला लक्षात येते वायफळ खर्च कुठे होतोय ते.
माझा स्वताचा अनुभव - मी नोकरी करत नाही. नवरा foundry mgr. दोन प्लांटस बघतो. माझा मुलगा आठवीत आहे. घरी केबल नाही. इथल्या मंदीमूळे मुलाचा college fund 37% loss मध्धे. त्याला statement दाखवले. मुलाने आत्तापासून scholarship साठी शोधाशोध सुरू केलेय. तीन महीने एक नोकरी केली. आता tutor म्हणून काम मिळेल का ते शोधतोय. तसेच private university ची स्वप्नं सोडून state university ला जायची मानसीक तयारी सुरू झालेय. मुलांना खरी परीस्थीती कळ्ली तर ती खुपदा मोठ्यांपेक्षाही समजुतदार वागतात.
टीप- प्रायव्हेट/स्टेट असा वाद सुरू करायचा नाहीये. या वयात मुलांना IU पेक्षा Butler सांगायला छान वाटतं.