(आच्छू)

विकास's picture
विकास in जे न देखे रवी...
4 Mar 2009 - 9:48 am

बोचर्‍या थंडीत हळू हळू पडणारा बर्फ
विश्व गोठलेले असे वाटताना नाक मात्र वितळते...
आच्छू आच्छू

वसंताच्या हालचालीने झाडांना येणारा मोहर
हवे मधून परागकण पसरवत जातो आणि परत...
आच्छू आच्छू आच्छू

पावभाजी करताना कांदे, बटाटे, मटार, टोमॅटो वगैरे घालून
शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो
आच्छू आच्छू आच्छू आच्छू

-

विडंबनभाषांतर

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

4 Mar 2009 - 10:07 am | प्रकाश घाटपांडे

काय हाय कि थंडिमदी जरा "आवशिद" घ्याव मान्सान. म्हजी आक्छु व्हत नाई.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुक्या's picture

4 Mar 2009 - 10:08 am | सुक्या

बराबर हाय . . अवशिद घावं नायतर जरा नवटाक टा़कुन यावी . .

(नवटाक्या) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

सहज's picture

4 Mar 2009 - 10:25 am | सहज

कविता व्हायरस जबरी संसर्गजन्य!!!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लय भारी विकासराव ... तुम्हीसुद्धा मैदानात आलात. :-D

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

झेल्या's picture

4 Mar 2009 - 10:27 am | झेल्या

'आच्छी' कविता हय..!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 10:50 am | विसोबा खेचर

आयला, विकासभौजी फुल फॉर्मात! :)

तात्या.

दिपक's picture

4 Mar 2009 - 10:53 am | दिपक

भारी शिंकलात !

जागु's picture

4 Mar 2009 - 11:39 am | जागु

शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो
आच्छू आच्छू आच्छू आच्छू
आहो नाकात उडुन जातो की नाकातुन उडुन पावभाजीत जातो ? :?

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 4:15 pm | लिखाळ

सचित्र काव्यमय शिंक ठसकेदार :)
-- लिखाळ.