दाल बाटी व दाल बाफले

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in पाककृती
23 Jan 2008 - 12:00 am

चतुरंगजींच्या विनंतीस मान देउन हे लेखन वेगळे देत आहे.

परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो.
लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा.

दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे.
ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते.

बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे:

बाटी:
माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्‍यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते.

ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात.

बाफले:
माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात.
ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्‍यांवर मंदपणे भाजावेत.

हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत.

टीपः शहरात गोवरर्‍यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो.

संजय अभ्यंकर

पाकक्रियाआस्वादशाकाहारीडाळीचे पदार्थइंदुरीवन डिश मीलरस्सा

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

23 Jan 2008 - 12:05 am | संजय अभ्यंकर

वरिल लिखाणात, चतुरंगजींच्या ऐवजी सुनीलजी असे हवे होते.
चुकि बद्दल क्षमस्व!

संजय अभ्यंकर

स्वाती राजेश's picture

23 Jan 2008 - 7:12 pm | स्वाती राजेश

बाटी करताना त्यात १/२ च. जीरा आणि १/२ च.ओवा घालतात.
बाकी मस्त च लागतो हा पदार्थ.

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 7:11 am | विसोबा खेचर

वा वा! ही आमची आवडती पापकृती..

संजयराव, अजूनही पाककृत्या येऊ द्यात!

तात्या.

अवांतर - शक्य झाल्यास आपले नांव (लॉगीन आयडी) देवनागरीत करा ही विनंती..

आपला,
(मराठी) तात्या.

संजय अभ्यंकर's picture

24 Jan 2008 - 7:53 pm | संजय अभ्यंकर

लगेच करतो.

धन्यवाद!

संजय अभ्यंकर

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 10:19 pm | विसोबा खेचर

अभ्यंकर साहेब,

धन्यवाद!

(आपला आणि केशवसुमारांचा आडनांवबंधू) तात्या.

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 10:30 pm | पिवळा डांबिस

तात्या,
संजय अभ्यंकर हे मान्य!
पण तुम्ही आणि केशवसुमार कसले "अभ्यंकर"? तुम्ही तर "भयंकर"! :))

(थट्टेखोर) पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 10:32 pm | विसोबा खेचर

ठीक आहे बुवा! भयंकर तर भयंकर! :)

कबूल...!

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 10:56 pm | पिवळा डांबिस

थोडकी थट्टा केली, राग नसावा.

तुझ्या लिखाणावर मी फिदा आहे रे!!!

चटोरी वैशू's picture

15 Aug 2008 - 9:40 am | चटोरी वैशू

अय्या असाच कहिसा थोडा वेगळा ... प्रकार म्हणजे बट्टी ....

जाड्सर गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. १/२ च. जीरा आणि १/२ च.ओवा ., चवीनुसार मीठ.... ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. मग ते गोळे गार झाल्यावर त्याचे २-२ तुकडे करावे. कढईत तेल्/तूप गरम करुन ते तुकडे मस्त पैकी तळून घ्यावे. कुर्कुरित .. ही झाली बट्टी ... ही तुम्ही साध्या वरणा सोबत्...मस्तपैकि मोडुन त्यावर साधे वरण ... गावराण तूप... आणि सोबत वान्ग्याची भाजी... आहा !.... हा झाला... खान्देशी वरण बट्टी चा बेत....

लवंगीमिरची's picture

6 Mar 2009 - 1:04 am | लवंगीमिरची

कृपया वरील रेसिपी ओवनमधे कशी करता येइल हे शक्य असल्यास सांगावे
धन्यवाद !!

विंजिनेर's picture

6 Mar 2009 - 5:38 am | विंजिनेर

जरी गोवर्‍या मिळत नसतील तरी कोळशाची शेगडी सहजी मिळते.
त्यात सुद्धा बट्ट्या खुसखुशीत भाजता येवू शकतात.
ओवन पेक्षा हा पर्याय नक्कीच खुमासदार चव आणतो.