धक्कादायक पाकिस्तानात श्रीलंकन क्रिकेट टिमवर फायरिंग

दिपक's picture
दिपक in जनातलं, मनातलं
3 Mar 2009 - 10:22 am

धक्कादायक पाकिस्तानात श्रीलंकन क्रिकेट टिमवर फायरिंग... पाच पोलीस ठार... दोन खेळाडु जखमी..
http://www.zeenews.com/archives/2009-03-03/512050news.html

समाजबातमी

प्रतिक्रिया

वेताळ's picture

3 Mar 2009 - 10:24 am | वेताळ

पाकिस्तानची लवकरात लवकर वाट लागु देरे देवा.
वेताळ

झेल्या's picture

3 Mar 2009 - 10:26 am | झेल्या

सर्व देशांनी पाकिस्तानशी (निदान) क्रीडा संबंध तोडले पाहिजेत.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

कारण पाकिस्तानी नागरिकांना कोणत्याही देशात प्रवेशच दिला नाही तर आतंकवादी हल्ला करायला येतीलच कसे?
अर्थात या तालिबानी आतंकवाद्यांना इतर देशांची बनावट कागदपत्रे तयार करता येतात म्हणा... पण मोठ्या प्रमाणात आळा बसेन....

दशानन's picture

3 Mar 2009 - 10:31 am | दशानन

जय्सुर्या... जयवर्धने व समरविरा.. मॅड्रिस ... आठजण जखमी

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

विसोबा खेचर's picture

3 Mar 2009 - 10:31 am | विसोबा खेचर

पाकिस्तानात श्रीलंकन टीमच्या बसवर गोळीबार. लंकेचे ६ खेळाडू जखमी. चामिंडा वास, उपुल थरंगा, अजंता मेंडीस, संघकारा हे खेळाडू जखमी, समरवीराच्या छातीत आणि जयवर्धनेच्या पायाला गोळी लागली आहे अशी बातमी आहे!

पाकिस्तानकडून दुसरी काय अपेक्ष????????

पाक आणि तलिबानावर सर्व जगानेच बहिष्कार टाकणे, त्यांना वाळीत टाकणे आणि प्रसंगी गर्दीस मिळवणे हाच एकमेव उपाय आहे!

अत्यंत धक्कादायक आणि नींदनीय बातमी.

पाकिस्तानाला नेहमीच अंतर्गत पाठिंबा देणार्‍या अमेरीकेचा जाहीर निषेध...!

तात्या.

दशानन's picture

3 Mar 2009 - 1:15 pm | दशानन

पाकिस्तानाला नेहमीच अंतर्गत पाठिंबा देणार्‍या अमेरीकेचा जाहीर निषेध...!

अवलिया's picture

3 Mar 2009 - 1:23 pm | अवलिया

पाकिस्तानाला नेहमीच अंतर्गत पाठिंबा देणार्‍या अमेरीकेचा जाहीर निषेध...!

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2009 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दहशतवाद निपटून काढण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. पाकिस्तान आमचा मित्र आहे. असे म्हणनार्‍या अमेरिकेला अक्कल कधी येईल कोणास ठाऊक. आंतराष्ट्रीय राजकारण काही असू दे, असे म्हणू नये, पण अमेरिकेला पाकड्याकडून एखादा मोठा धक्का बसल्याशिवाय त्यांची खोड मोडणार नाही असे वाटते.

श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो !

-दिलीप बिरुटे

माझी दुनिया's picture

3 Mar 2009 - 1:54 pm | माझी दुनिया

पाक आणि तलिबानावर सर्व जगानेच बहिष्कार टाकणे, त्यांना वाळीत टाकणे आणि प्रसंगी गर्दीस मिळवणे हाच एकमेव उपाय आहे!

अगदी १०१% सहमत. दुसरा मार्गच नाही. श्रीरामसेनेला पाकिस्तानी पाठवावे.

आता सुद्धा हे अतिरेकी पाकिस्तानी नव्हतेच, भारताने पाठवलेले होते असे म्हणायला पाकिस्तानी मिडीया कमी करणार नाही. नुसते वाळीत टाकून भागणार नाही. समस्त जगाने पाकिस्तानशी अणुयुद्ध पुकारावे. जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नामशेष झाले पाहिजे. ना रहेगा बाँस ना बजेगी बासुरी X(
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

कवटी's picture

3 Mar 2009 - 3:26 pm | कवटी

समस्त जगाने पाकिस्तानशी अणुयुद्ध पुकारावे.
म्हणजे काय होइल? पाकिस्तानवर अणुबाँब टाकला तर तेथील निरपराध जनता होरपळून मरेल... त्याचे पाप कुणाच्य शिरावर? आणि समजा २-४ देशानी ठरवून अणूबाँब टाकला पाकवर आणि तेथील सामान्य लोक मेले तर आंतरराष्ट्रीय सहानभूती लगेच पाकिस्तानच्या बाजुने वळेल. त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरु होइल. तेथील राज्यकर्ते / लष्कर / आतंकवादी ती मदत/ मिळालेली साधनसामग्री भारताविरुध वापरायला सुरुवात करतील.
शिवाय असल्या आतंकवादी कारवायात सामान्य जनतेचा सहभाग किती टक्के असतो? मग कशाला त्याना जिवंत जाळून मारायचे? आपल्याकडे रामसेनेच्या किंवा मालेगाव बाँबस्फोटा साठी कुणी भारतावर अणुबाँब टाकायला आले तर आपल्याला कसे वाटेल?
शिवाय झा*भर पाकिस्तानवर टाकलेल्या अणुबाँबचे दु:परिणाम सिमाभागातल्या भारतियाना भोगायला लागतील त्याचे काय?

जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नामशेष झाले पाहिजे.
नामशेष करायचा म्हणजे काय करायचे?
१)निर्मनुष्य करायचा ? का? तिथल्या सामान्य जनतेने काय घोडे मारलय?
२)पाकिस्तान हा देश नष्ट करुन तो इतर कुठल्यातरी देशाने आपल्यात सामाउन घ्यायचा. जर अफगाणिस्तान किंवा चीन ने तसे केले तर आपली डोकेदुखी आजच्यापेक्षा दसपटीने वाढेल. जर आपणच पाकिस्तान आपल्यात सामाउन घेतला तर तिथल्या धर्मांध लोकाना भारतात कुठेही जाउन काहीही करायचा मुक्त परवाना मिळेल.

त्यापेक्षा तेथे चांगले राज्यकर्ते कसे येतील जेणे करुन ते ही डोकेदुखी काबूत ठेउ शकतील हे पाहीले पाहिजे.

एखाद्या आजारी माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल ते पहाणे श्रेयस्कर की त्याला ठार मारून त्याच्या प्रेताची दुर्गंधी घेत बसणे?

श्रीलंकन टीमला नीट सुरक्षाव्यवस्था न पुरवणार्‍या पाकी राज्यकर्त्यांचा धिक्कार! भारतीय टीम पाकला गेली नाही म्हणून हे गेले. आपली टीम गेली असती तर कदाचीत हे आपल्या खेळाडूनवर ओढवले आसते. हे न झाल्या बद्दल देवाचे शतशः आभार.
पाकीस्ताने राज्यकर्ते / लष्कर / आतंकवादी यांचा धिक्कार! त्याना पाठीशी घालणार्‍या अमेरिकेच त्रिवार धिक्कार!!!

कवटी

बाप्पा's picture

3 Mar 2009 - 5:13 pm | बाप्पा

छान कवटी फोडु स्पष्टीकरण दिले कवटी ने.. =))
(हाडफोड्या)-- बाप्पा लंबोदर.

विकास's picture

3 Mar 2009 - 5:28 pm | विकास

>>>आता सुद्धा हे अतिरेकी पाकिस्तानी नव्हतेच, भारताने पाठवलेले होते असे म्हणायला पाकिस्तानी मिडीया कमी करणार नाही.

ही बातमी पहा...

Pak hints at Indian involvement in attack on Lanka team

आणि आपले टाईम्स ऑफ इंडीया छापतात. असो.

सुनील's picture

4 Mar 2009 - 7:27 am | सुनील

आणि हा त्या मंडळींना मिळालेला घरचा आहेर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खरा डॉन's picture

3 Mar 2009 - 7:35 pm | खरा डॉन

पाकिस्तानाला नेहमीच अंतर्गत पाठिंबा देणार्‍या अमेरीकेचा जाहीर निषेध...!

निषेध!! अमेरिकेचा आणि तिथे गुलामगिरी करत असलेल्या आपल्या लाचार जनतेचा देखिल. आता तरी त्यांचा आत्मसन्मान जागा होवो ही आई भवानी कडं प्रार्थना!!

खरा डॉन

आपण पाकिस्तानचा दौरा रद्द केला (२६/११ मुळे) म्हणून श्रीलंकन टीम वर हल्ला झाला. त्यांना नको तेथे शौर्य दा़खवणे महागात पडले.

आणि हो..अतिरेक्यांनी श्रीलंकन टीम होती म्हणून जास्त गोळीबार केलेला दिसत नाही. हिच जर भारतीय टीम असती, तर त्यांनी आपल्यापैकी कोणाही खेळाडूला सोडले नसते.

आश्चर्य म्हणजे सगळे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

खादाडमाऊ

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Mar 2009 - 10:34 am | घाशीराम कोतवाल १.२

दहशतवादाचा भस्मासुर त्यांच्या वर उलटला आता पाकिस्तानातील क्रिडा विश्व संपले
पाकिस्तानातुन २०११ च्या विश्वचषकाचे यजमानपद जाणार नक्कीच

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अन्वय's picture

3 Mar 2009 - 11:25 am | अन्वय

श्रीलंका सरकारने एलटीटीईचे जाळे उद्‌ध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे. गेल्या महिनाभरात एलटीटीईचे असंख्य दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत. आता फक्त प्रभाकरन राहिला आहे. याचा संबंध कदाचित पाकिस्तानमधील हल्ल्याशी असू शकतो. दहशतवादाला जात, धर्म नसतो. तसेच देशाचाही अडसर नसतो. त्यामुळे एलटीटीईच्या सांगण्यावरून मुस्लिम अतिरेकी हल्ला करू शकतात.

सरकारच्या गव्हर्नरचे वक्तव्य : No any Srilankan Player seriously Injured
मरायची वाट पहात होते की काय हे महाशय? माफी मागणे तर लांबच. पण हे महाशय ही घटना जास्त मोठी नाहिये हे दाखवायचा प्रयत्न करत आहेत

पाकिस्तान या देशावर बंदी घातली तरच जग आतंकवादापासून वाचू शकेल...

पाकीस्तानचा निषेध !!! निषेध !! निषेध !!!

दशानन's picture

3 Mar 2009 - 1:21 pm | दशानन

१०० च्या वर मिपाकर (सदस्य+पाहूणे) ऑनलाईन असताना साधा निषेध देखील कोणी व्यक्त करत नाही आहे ?

* परवाच शहिद आझाद ह्यांच्या पुण्यतीथीच्या लेखावर देखील मिपाकर असे अचानक उदासीन का होते ?

घटनेचे गाभिर्य कळाले नाही ?

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.

विसोबा खेचर's picture

3 Mar 2009 - 5:51 pm | विसोबा खेचर

१०० च्या वर मिपाकर (सदस्य+पाहूणे) ऑनलाईन असताना साधा निषेध देखील कोणी व्यक्त करत नाही आहे ?

इतर संस्थळांवर काय परिस्थिती होती हे कळेल का???

तात्या.

केवळ_विशेष's picture

3 Mar 2009 - 1:41 pm | केवळ_विशेष

गुणी खेळाडूंची कारकीर्द संपू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

अवांतरः- पाकिस्तानातुन २०११ च्या विश्वचषकाचे यजमानपद जाणार नक्कीच
पण ह्यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार... कारण भारत्/श्रीलंका यांच्यावर सामन्यांचं लोड वाढेल... त्या बरोबरीनी येणारी खेळाडूंची सुरक्षीतता...
या पाकड्यांना भारतात धुडघूस घालायला कारणंच हवीयेत...
या महा मा***द पाकड्यांचा लैच णिषेध

दशानन's picture

3 Mar 2009 - 1:52 pm | दशानन

पाकिस्तान बरोबर भारताचे पण यजमानपद धोक्यात.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

केवळ_विशेष's picture

3 Mar 2009 - 2:01 pm | केवळ_विशेष

पाकिस्तान बरोबर भारताचे पण यजमानपद धोक्यात
येणं कठीण वाटतंय... कारण प्रचंड पैसा ओतला गेला आहे यात... प्रायोजकांपासून ते सर्व क्रिकेट बोर्ड...

हे सर्व लोक्स सरकारवर दबाव वाढवतील... प्रचंड

वैयक्तिक मला असं वाटतंय की आपल्या कडे यजमानपद राहील...

आणि बेक्कार म्हणजे हा कप आशिया सोडून इतरत्र होईल... पण इतक्या शॉर्ट नोटिसवर कोण ऑर्गनाईज करेल...?

नन्या's picture

3 Mar 2009 - 2:29 pm | नन्या

निषेध ! निषेध !! निषेध !!! दहशतवादाचा त्रीवार जाहीर निषेध

राघव's picture

3 Mar 2009 - 3:04 pm | राघव

त्रिवार निषेध.
मला एकदम वेन्सडे चित्रपटाची आठवण झाली. तेच हवे या लोकांना.
पाकिस्तानची वाट लागण्यात याचा हातभार लागणार यास शंका नाही.
अन्वयराव म्हणतात तसे अजिबात शक्य नाही असे म्हणता येणार नाही.. पण लिट्टे ची ताकद सध्या एवढी खालावली आहे की ते असे करु शकतील असे वाटत नाही. पाकिस्तान सरकारची गोची करण्याचा अन् जगापासून एकटे पाडण्याचा तालिबानचा हा डाव असावा. असो. ही प्राथमिक प्रतिक्रीया झाली. नक्की काय ते समजेलच.
मुमुक्षु

पाकिस्तानी सरकारने जेव्हा स्वात मधे तालिबानी अतिरेक्यांसमोर गुडघे टेकून शरणागती पत्करली तेव्हाच त्यांच्यासाठी पाकिस्तान म्हणजे मोकळे रान झाले. आता तरी झरदारी आणि त्यांचे सहकारी जागे होतील आणि काही करतील अशी भाबडी आशा करण्यापलिकडे कुणी काही करू शकणार नाही.

ह्या हल्ल्यात कोणताही श्रीलंकन खेळाडूला गंभीर इजा झाली नाही हे सुदैवच.

संदीप चित्रे's picture

3 Mar 2009 - 9:12 pm | संदीप चित्रे

अजून १

टायबेरीअस's picture

3 Mar 2009 - 11:15 pm | टायबेरीअस

त्रिवार निषेध! श्री लंका आणि भारत यानी पाकिस्तानावर चढाई करून अतिरेक्यांच्या पार्श्वभागी कायमची खुंटी मारायला हवी आहे..

अनिल हटेला's picture

4 Mar 2009 - 7:52 am | अनिल हटेला

खुंटी ऐवजी खुंटा मारला तरी चालेल..
निषेधाची भाषा ह्या पाकड्याना समजत नाही.
सर्व श्रीलंकन खेळाडू लवकरात लवकर बरे होवोत ,अशी इश्वरचरणी प्रार्थना..

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अमृतांजन's picture

4 Mar 2009 - 8:00 am | अमृतांजन

दहशतवाद्यांवर अंकुश आणण्यासाठी पाकिस्तानावर हल्ले, अणूधोंडे टाकणे हा पर्याय असू शकत नाही.

दहशतवाद्यांकडे शस्त्रे कुठून येतात? ते सगळे मार्ग बंद व्हायला हवेत.

त्यांच्याकडे अफूच्या व्यापारातून पैसा येतो, तसेच जगभरातून खंडण्या, ई मार्गाने पैसे येत अ्सावेत. ते बंद व्हायला हवेत.

ह्या सगळ्या दहशत्वाद्यांच्या यंत्रणे मुळे ज्यांचा फायदा होतो त्यांच्या नसा आवळणे हेच महत्वाचे आहे.

पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर ही सगळी सुत्रधार मंडळी दुसऱ्या देशात पळुन जाईल व सुरक्षित राहिल. मरतील ते सामन्य माणसे आणि लष्करी मनुश्यबळ.

सर्व शांत झाल्यावर सगळी सुत्रधार मंडळी पुन्हा कामाला लागतील.

लोकसभा निवडणुका पार पाडे पर्यंत पाकमधीत दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करण्याचा निर्ण्य भारताकडुन घेतला जाण्याची शक्यता नाही. नवे सरकार आल्या नंतर त्यांचे १ वर्ष एकमेकांचे भले करण्यात जाईल; इकडे कोण लक्ष देणार?

सरकार कोणाचेही आले तरी गृहखाते मंत्री किमान १ वर्ष बदलले जाऊ नये असे वाटते.

झैद हामीद नामक "विचारवंताची" ह्या हल्ल्याबद्दलची प्रतिक्रिया ऐकली. त्यांच्या मते हे सगळे भारताने
घडवून आणले आहे हे "उघड" आहे.
त्याकरता "भक्कम" पुरावा आहे. काय तर म्हणे सगळे अतिरेकी गुळगुळीत दाढी केलेले होते. तालिबानी अतिरेकी दाढ्या वाढवलेले असतात. सबब तालिबान, लष्कर ए तोयबा कुणीही दोषी नाहीत. फक्त भारतच.
भारताची अगदी हजामतच केली लेकाने!

का तर म्हणे भारताचा श्रीलंकेवर जुनाच राग आहे. सोनियापती राजीवला त्यांनी मारल्यापासून भारताने त्यांच्यावर डूख धरला आहे. असा हल्ला करून भारताने म्हणे एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
पाकी विचारवंत असले दिव्य विचार बाळगून असतील तर अतिरेक्यांविषयी काय बोलावे?