मंदी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
2 Mar 2009 - 4:38 pm

सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.
काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय?
हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा. अगदी बालवर्गात असलेल्यांना शिकवातात तसे. सर्व माहीत असलेल्यांनी माहीत नसलेल्यांना 'मंद' आहेत म्हणुन सोडुन द्यावे. मार्ग दाखवावा.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Mar 2009 - 4:39 pm | ब्रिटिश टिंग्या

+१

विजुभाऊ's picture

2 Mar 2009 - 7:15 pm | विजुभाऊ

मंदीच्या लग्नात सुद्धा तीचे येवढे नाव निघत नव्हते

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 8:48 pm | विनायक प्रभू

मंदीचा नवरा कोण?

दशानन's picture

2 Mar 2009 - 4:54 pm | दशानन

मी काय करत आहे.

१. फालतु खर्च कमी केला आहे, जेवढा जमेल तेवढा.
२. मार्केटमधील "ए" ग्रुप वाले शेयर सोडून बाकीचे छोटे मोठे मागेच काढून टाकले लिस्ट मधून
३. पैसा कसा येईल व कसा वापरु ह्यांचे नियोजन करत आहे.
४. बँक बॅलन्स व फिक्स डिपॉजिट कडे बघत सुध्दा नाही आहे.
५. नवीन कामधंदा शोधणे व त्यावर काम करणे चालू केले आहे.
६. एकाचं धंदावर अवलंबुन नाही.
७. जमीनीकडे लक्ष द्याला चालू केले.

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 4:56 pm | विनायक प्रभू

लक्ष म्हणजे काय?

दशानन's picture

2 Mar 2009 - 4:57 pm | दशानन

मला येणा-या काळात जमीन ही सर्वात उपयोगी व पैसे कमवून देणारी मालमत्ता वाटते..
जर स्वतः शेती करु शकत असाल तर छानच. पण जमत नसेल तर शिका.
पुढील काही वर्ष त्यावरच तग धरता येईल.

मराठी_माणूस's picture

2 Mar 2009 - 5:03 pm | मराठी_माणूस

उपयुक्त धागा

मी असे ऐकले आहे की शेतकरी नसलेल्या माणसाला शेतीची जमीन विकत घेता येत नाही. मग जमीनीकडे लक्ष देउन काय उपयोग

दशानन's picture

2 Mar 2009 - 5:07 pm | दशानन

ह्या बाबतीत मला माहीत नाही ... कोणी जाणकार सांगेल काय असा कायदा आहे काय ?

*पळवाट = शेयर्ड इनव्हेस्टमेंट करु शकताच की. मामा / काका कोणी तरी असेलच ना ज्याच्या कडे शेती आहे तो

मला शेतकरी व्हायचा अधिकार कायदा नाकारु शकत नाही...
कित्येक लोक व्यवसाय वा नोकरी यांची कार्यक्षेत्रे बदलतात.

माझ्या माहितीप्रमाणे शेतीची जमीन कोणीही विकत घेऊ शकते. फक्त शेतीची जमीन इतर व्यावसायिक वा तत्सम बांधकामासाठी वापरता येत नाही...

उद्या मला शेतकरी व्हायचेच असेन तर कोण अडवेल? :)

प्रशांतकवळे's picture

2 Mar 2009 - 5:13 pm | प्रशांतकवळे

नाही, हा कायदाच आहे, पण त्यात पळवाटा पण आहेत...

तुम्ही शेतजमीन घेण्यापुर्वी शेतकरी असणे गरजेचे आहे, तुमचे नाव शेतजमीनीच्या ७/१२ वर असेल तर उत्तम, पण तुमच्या आई/वडीलांच्या नावावर शेतजमीन असेल तरीही चालते. गावाकडली वाडीही शेतजमिनीत मोडते (बागायती)

दशानन's picture

2 Mar 2009 - 5:13 pm | दशानन

मी पण आता हेच विचारले फोन करुन एकाला ;)

सागर's picture

2 Mar 2009 - 6:11 pm | सागर

आज ज्ञानात भर पडली...

कायद्याची कलमे बदलायचा कायदा करायला पाहिजे :D

संदीप चित्रे's picture

4 Mar 2009 - 1:17 am | संदीप चित्रे

अमिताभ आणि आमीर खानला काय काय उपद्व्याप करावे लागले होते शेतजमीन विकत घेताना !

अवलिया's picture

2 Mar 2009 - 5:08 pm | अवलिया

कायदा तिथे पळवाटा असतात.
खरोखर अडले असेल तर व्यनी करा, पळवाट देतो

--अवलिया

सखाराम_गटणे™'s picture

2 Mar 2009 - 5:30 pm | सखाराम_गटणे™

फुकट??

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

अवलिया's picture

2 Mar 2009 - 5:31 pm | अवलिया

मंदीत फुकट काम करु नये.

--अवलिया

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 4:59 pm | विनायक प्रभू

बद्दल काय वाटते?

दशानन's picture

2 Mar 2009 - 5:01 pm | दशानन

रियल इस्टेट मध्ये मला जरा काळजी वाटत आहे... कारण अजून रियल इस्टेट चा फुगा व्यवस्थीत फुटला नाही आहे, जर का फुटलाच व अमेरिके प्रमाणे हाल झाला तर ? रियल इस्टेट हि डेड इनव्हेस्टमेंट मानतो मी . त्यापेक्षा शेत जमीनी मध्ये गुंतवणूक कधीही चांगली, कमी कमी पोटापाण्याला तरी काही ना काही तरी देऊ शकते ही इनव्हेस्टमेंट बाकी भरोसा नाही !

झेल्या's picture

2 Mar 2009 - 5:04 pm | झेल्या

पुण्यात (काही भागांमध्ये तरी) गेल्या ३ वर्षांत ३००% वाढलेले भाव सध्या फक्त १०-१५% खाली आले आहेत. बिल्डर लोक भाव वाढण्याची वाट पाहत आहेत आणि ग्राहक भाव कमी होण्याची.
व्याजदर्ही कमी झाले आहेत आणि सिमेंटही स्वस्त झाले आहे.
येत्या काही दिवसात सध्या सुरू असलेले दर +/- ५% स्थिरावतील असे वाटते.

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

इकडे बंगळूरात १३-१८ लाखात चांगला २ बीएचके मिळतो आहे
एका स्कीम बहाद्दराने तर २.५ लाखात २ बीएचके ची जाहीरात केली आहे ..५ लाखाला पडला तरी काय वाईट आहे?

पुण्यातले सगळे बिल्डर्स एकजात युनिटी करुन भाव कमी नाही करत.

पण जेव्हा बँका व वित्तीय संस्था या सगळ्यांच्या कचेर्‍यांना टाळे लावतील ना तेव्हा जागे होतील...

मागच्या महिन्यात मी १-२ प्रोजेक्ट्स मधे चौकशी केली तर ३५-४० लाखाचेच भाव सांगत आहेत...
कोण देणार आहे त्यांना एवढी किंमत

माझ्यामते पुण्यात २ बीएचके १५-२४ लाखाच्या रेंजमधे मिळायला हवा... ती किंमत खूप होते

(पुण्यातील माजोर बिल्डरांमुळे घराचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ न शकलेल्या अनेक लाखांपैकी एक) सागर

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 5:01 pm | विनायक प्रभू

३ नंबर कळले नाही हो.
बाकी सर्व कळाले.

सागर's picture

2 Mar 2009 - 5:03 pm | सागर

मंदीवर प्रकाश टाकू शकणार्‍या लेखकांची यादी...
१. नाना
२. प्रमोदकाका
३. तात्या
४. अनेक तज्ञ आहेत इथे... :)

माझ्यामते मंदीतून बाहेर येण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, तुम्ही जसे आहात तसेच रहा ....

म्हणजे दरमहा तुम्ही २ चित्रपट थिएटर मधे बघता, ४ वेळा हॉटेलात जेवण करता.... तेच करित रहा

मंदीमुळे तुम्ही पैसे खर्च केले नाहीत व सेव्हिंग केले तर बाजारात मागणी कमी होईल. परिणामी बाजारात नकारात्मक संकेत जाईन
क्रेडिट कार्ड वापरले नाही तर वित्तिय संस्थांचा धंदा बसेल.इ....इ.....

हे सगळे लोक करणार नाहीत हे मलाही माहित आहे. पण यातून बाहेर येण्याचा हाच उत्तम मार्ग आहे....

मंदीच्या काळात शहाणपणाची गोष्ट हीच की क्रेडीट कार्ड वापरा पण वेळेत पेमेंट करा...
खर्च करा पण उधळपट्टी करु नका. बँकेत ठेवी ठेवा पण बँकेची पत पहा...

बाकी बरेच तज्ञ आहेत , म्या पामर काय बोलणार? :)

(मंदीतून जग बाहेर येण्याची प्रतिक्षा करणारा ) सागर

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 5:05 pm | विनायक प्रभू

वाढला

दशानन's picture

2 Mar 2009 - 5:09 pm | दशानन

जेवढे मते / प्रतिसाद तेवढा गोंधळ

तात्या / रामदास काका ह्यांना बोलवा आता.

झेल्या's picture

2 Mar 2009 - 5:08 pm | झेल्या

या मंदीतही जोमाने वाढणारे काही व्यवसाय आहेत का? कोणते?

(लोकं फ्रस्टू झाल्याने सिगारेट-दारूवाल्यांचा धंदा वाढला असेलच :) )

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

:) :) :)

१. (डोक्याला लावायचे) तेल विकणार्‍या कंपन्या (डोक्याचे टेंशन वाढल्यावर घरोघरी तेल न लावणारेही तेल लावून मालिश करुन घेतील)
२. घरगुती भांडी दुरुस्त करणारे कारागीर (मंदीच्या टेंशनमुळे घरात पैसा कमी आला की होणार्‍या भांडणात भांड्यांचा वापर होणारच)
३. बँका (सध्या सगळे लोक आपला शेअरबाजारातला उरलेला पैसा काढून फिक्स्ड डिपॉझीट मधे ठेवत आहेत )
४. मंदीमुळे टेंशन आणि त्यामुळे दारु ... :)

सागर

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 5:10 pm | विनायक प्रभू

चा खप ३०% वाढला.

अवलिया's picture

2 Mar 2009 - 5:12 pm | अवलिया

काय झाले?
वाढला ना गोंधळ... !!
सांगत होतो नका टाकु धागा...
पण नाही... १०० लेख पुरे करायची घाई... !!!
चालु द्या

--अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Mar 2009 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण नाही... १०० लेख पुरे करायची घाई... !!!
=))
प्रभूदेवा, कठीण आहे. काँँपिटीशन आली म्हणून लगेच असे सल्ले??

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अमृतांजन's picture

2 Mar 2009 - 5:14 pm | अमृतांजन

Penny-wise, pound-foolish

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 5:15 pm | विनायक प्रभू

१०० चे विषेश काय नाय हो.
पण तु म्हणता तां खरां गोंधळ वाढलो.
एक गाठ सोडवुक गेलो.
आण्खी दोन बसल्या असां झालाय खरां

दशानन's picture

2 Mar 2009 - 5:17 pm | दशानन

हा गुंता आहे असा सहजासहजी सुटत असता तर अमेरिकेच्या नाकातून पाणी आलं असतं का :?

अवलिया's picture

2 Mar 2009 - 5:22 pm | अवलिया

नाकातुन?
अरे मिपावर काही शब्दांचे वावडे नाही... अधिक योग्य शब्द वापरला असतास तरी चालले असते. असो.

--अवलिया

दशानन's picture

2 Mar 2009 - 5:26 pm | दशानन

=))

नाय वापरला.. ;)

सायली पानसे's picture

2 Mar 2009 - 5:19 pm | सायली पानसे

मला आलेल्या एका (forwarded) ईमेल मधली माहिती आहे.. मला लिन्क देता येत नाहिये.. म्हणुन जसच्या तसा देत आहे... इंग्रजी मधे आहे पण खुप उपयुक्त आहे म्हणुन देत आहे. एकदा जरुर वाचा...

i am an employee - What do I do during recession?

Simple tips for employees during recession times

Markets
We all know that markets have slumped
We read about job-loses in news papers
People talk about atleast 24 months of recession
Early entrants are not getting jobs
Companies are closing
Sales are not picking up
Suddenly cash has evaporated from the market
Profitability is severely hit
Simple tips for employees during recession times

I am employee

i need to keep my job
I need to pay EMIs
I have a family to run
I need to keep working to sustain myself
I need to feel secure
i need to save a little money for a rainy day
….
Simple tips for employees during recession times
Basic Don’ts
do not take too much vacation
Do not complain
Do not waste time gossiping
Don’t resist a transfer
Don’t resist travel
Don’t resist a salary cut
Don’t resist extra-work load
Don’t resist extra time at office if needed
Don’t change jobs in this market. It is too risky.

Simple tips for employees during recession times
Basic Do’s
Be punctual to office
Ensure you pick up new skills
Ensure you deliver as per deadlines
Ensure that you contribute to knowledge forums etc
Do something innovative
Take training programs
Organize team meeting to improve productivity
Always be engaged & productive
Work doubly hard and save money for your company
Be cheerful, keep smiling, life goes on 

Simple tips for employees during recession times

Daily Expenses
Take a stock of your expenses – actually write it down
Tick “Need to have” vs. “Nice to have”
Knock off all “Nice to have expenses” – Right Now!
Assuming you didn’t have a job – Plan for cash to survive for 24 months. Apparently, this recession will take atleast 24 months to come out of. Sit on cash!

Other tips to cut expenses –

Going to malls is expensive
Good restaurants are expensive
Impulsive shopping is expensive
Taking flights is expensive
Eating out daily is expensive
Check services which you are not using but have subscribed to
Going on vacations is expensive

Simple tips for employees during recession times

The big loans
Home Loan & EMI If you own one home and you are living in it and paying EMI, then see if you can partially fore-close it.
If you have two homes and paying EMI on both –

See if you can rent the second home – don’t bother about amount of rent. Rent to get cash flows going. Don’t feel bad that rental is not good enough. Trust me – it will soon be a great feeling to rent.
If you have enough money, then fore-close a significant part of it. If your interest rate is less than bank FD (which I doubt), then you don’t have to fore-close.
If you think the property will fetch a decent value, then sell it (though it is a buyer’s market)
Simple tips for employees during recession times
Do I buy anything now? Do I invest?
Investing in stock and mutual funds?
Generate spare money every month – take a Systematic Investment plan (about 15% of your salary) – keep buying at low values for the next 24 months

Buy an asset – buy a house/apartment/land?
If you have cash and feel secure, this is a great time to buy. You can negotiate hard with builders/developers. Actually, you can write your own terms on the agreement.
First preference – Buy Land (always buy small sites, it is easier to dispose. Else farm land is a great option – big land, low cost)

Second preference – Buy House + Land (again buy from known developers)

Third preference – Buy apartment (you always wanted to buy that 3-bed/4-bed apartment from a reputed builder, but could never afford) – now is the time to ask for free. Some are being sold at ridiculous prices.

I am looking for a job – what do I do?

Enroll in a course / training / education as you are searching for a job. It enhances your skills

Enroll as a trainee anywhere you get an opportunity. Most trainees end-up getting confirmed employment as a build relationships in the company

Do not have any preferences regarding – City, Salary, Designation, Location, Shift etc. Just take it and gain experience. It is the first step to a long career

Go through references of people who are already working.

During job-interviews – the keyword which employers are looking for is “flexibility”

Agree for “any place/date/time” to take job interviews. If you don’t somebody else will take that interview slot.

Please improve your communication skills – this one skill fetches jobs!
Simple tips for employees during recession times

These suggestions are tough – do I live life or not?

The new principle – “Happiness is inversely proportional to expectations/desires”. More the expectations / desires – lesser the happiness and vice versa

Some other ways to live great life –

Spend time with family – go for a picnic in a nearby garden
Exercise and walk a lot, drink lots of water
Listen to Radio, watch some TV
Visit Libraries, read books which you purchased, but never had a chance to open them
Go to friends place a for a dinner
Enroll into a hobby – music, painting etc
Do social service – start teaching, mentoring etc
Spend more time with your children
Join laughter forum, attend conferences and meet interesting people
Go for concerts
Simple tips for employees during recession times

Don’t worry – what goes down will always go up
Markets will rebound – these tips will prepare you to be a winner

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 5:32 pm | विनायक प्रभू

धन्यवाद तै

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Mar 2009 - 5:21 pm | बिपिन कार्यकर्ते

आपल्याला तर आवडते बॉ मंदी.... कशाला घालवताय तिला. ;)

बिपिन कार्यकर्ते

सागर's picture

2 Mar 2009 - 5:25 pm | सागर

बिपीनराव, तुमची मंदीला तोंड द्यायची चांगलीच तयारी दिसते आहे
जरा तुमच्या खात्यातील असलेले बक्कळ पैसे आमच्या खात्यावर ट्रान्स्फर करा भाऊ ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Mar 2009 - 5:28 pm | बिपिन कार्यकर्ते

मंदीला ऑब्जेक्शन नसेल तर तीला तोंड द्यायची पण तयारी आहे माझी.

अवांतरः आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार बरेच जण मंदीच्या बाजूने आहेत.

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

2 Mar 2009 - 5:31 pm | दशानन

मी बी !

मोठाले मासे मला ह्याच मंदिमुळे लै स्वस्त मध्ये मिळाले आहेत.. पुढे पण मिळणार... ;)

* मासे = शेयर + जमीन + सोने विक्री.

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

सागर's picture

2 Mar 2009 - 6:17 pm | सागर

बिपीनराव
तसे मंदीचे फायदे पण आहेत... पण सध्याची मंदी जरा जास्त मोठा ताण निर्माण करत आहे हीच चिंतेची बाब आहे

तात्पुरती मंदी मी पण मानतो... पण सध्याची परिस्थिती भयावह आहे एवढेच...

कंपनीचे खर्च कमी करण्यासाठी
१ - प्रिंटिंग करणे खरंच गरजेचे आहे का हे पाहून प्रिंटिंग करा.
२ - कागदाच्या दोन्ही बाजूला, प्रत्येक बाजूला दोन दोन पाने ह्याने ४ पट कागदाची बचत होते (संपूर्ण कंपनीतल्या एकूण प्रिंटिंगचा विचार केलात तर हा खर्च अवाढव्य असतो हे लक्षात येते!)
३ - प्रत्यक्ष मीटिंगला जाण्याऐवजी वेबेक्स सारख्या प्रणाली वापरुन वीडियो कॉन्फरंसिंग करा - वेळ, पैसा, श्रम, वरकड खाणे-पिणे सगळ्याची बचत होते.
४ - ऑफिसवरुन घरी जाताना तुमच्या डेस्कवरचे, लॅबमधले लाईट्स बंद ठेवत जा, सद्य स्थितीत वापरली न जाणारी उपकरणे वीज बंद करुन ठेवा.
५ - चहा कॉफीसाठी पेपर कप्स वापरण्याऐवजी धुवून वापरता येतील असे कप वापरा.
६ - बाहेर विकत घेतलेल्या तयार चहा/कॉफी ला जास्त किंमत मोजावी लागते - डिप्-डिप (टी बॅग्ज) चहा किंवा घरुन कॉफी पावडर घेऊन गेलात तर खूप बचत होते
६ - मधल्या सुट्टीत (लंचटाईम) जेवायला घरी जात असलात तर आता डबा घेऊन जायला सुरुवात करा - ह्याचे दोन फायदे एक इंधन बचत, दुसरा योग्य प्रमाणातच खाल्ले जाते! ;)

आता तुमचा जॉब टिकवण्यासाठी
१ - फक्त नेमून दिलेले काम करुन गप्प बसू नका जास्तीचे काम शोधून करा
२ - सहकार्‍यांना स्वतः पुढे होऊन मदत करा
३ - एरवी जात असाल त्यापेक्षा फक्त १५ मिनिटे लवकर ऑफिसला गेलात/जास्त थांबलात तरी किती फरक पडतो ते पहा आश्चर्य वाटेल!
४ - नवीन गोष्टी शिकत रहा
५ - नेहेमीच्या सरधोपट मार्गानेच ठराविक गोष्टी का करायच्या असा प्रश्न मनात आला तर तो विचारा - बिचकू नका, कदाचित नवीन मार्ग सापडतात.
६ - संशोधन आणि विकासाशी संबंधित असलात तर नवीन गोष्टी शोधायची हीच वेळ असते - जेव्हा मार्केट वर येईल तेव्हा त्या नवीन गोष्टी जगापुढे नेणारे तुम्ही पहिले असू शकता!

चतुरंग

नितिन थत्ते's picture

2 Mar 2009 - 6:00 pm | नितिन थत्ते

मी काही यातला तज्ञ नाही पण थोडीफार (गमभन इतकीच) कल्पना मला आहे. म्हणून माझे दोन पैसे.
भांडवलशाहीचे (किंवा आता ज्याला बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था म्हणतात) कार्य पूर्णपणे बाजाराच्या प्रेरणांवर चालू असते. या प्रेरणा म्हणजे गुंतवणूक, नफा, मागणी, पुरवठा, ग्राहक, विक्रेता आणि याहून महत्त्वाचे म्हणजे बर्‍याच प्रमाणात अपेक्षा आणि भावना या होत.
आदर्श बाजार प्रणाली म्हणजे ज्या बाजारात ग्राहक आणि विक्रेता यांना बाजारातील सर्व परिस्थिती पूर्णपणे ज्ञात आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूची नेमकी मागणी (किंमतीनुरूप) किती आहे हे पुरवठादारांना माहिती आहे आणि त्यामुळे पुरवठादार नेमक्या वस्तूंचे उत्पादन करतो आणि जेवढ्या प्रमाणात पुरवठा कमी आहे तितक्याच प्रमाणात नवी गुंतवणूक करतो. त्या पुरवठादाराला इतर लोकांनी यात केलेली नवी गुंतवणूकही माहित असते. त्यामुळे गुंतवणूक गरजेइतकीच होते. त्याच प्रमाणे ग्राहकालाही यासर्व गोष्टी माहित असतात. अशा संतुलित अवस्थेत किंमती स्थिर असतात, नफा स्थिर असतो. वगैरे वगैरे.
अशी आदर्श व्यवस्था अर्थातच प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकत नाही. शिवाय काही ब्रेक थ्रू तंत्रांमुळे किंवा घटनांमुळे बाजारव्यवस्था मुळातून हलते. परंतू असे ब्रेक थ्रू आले नाही तरी बाजारातील इम्परफेक्शन मुळे बाजारात तेजी आणि मंदीचे आवर्त येत असतात.
आपण काही उदाहरणे पाहू
काही वर्षांपूर्वी (१९९५) गृहकर्जाचे दर १४-१५% असत. त्यावेळी मुंबईसारख्या शहरातील नोकरदार मंडळी १ बी एच के घर घेण्याचे स्वप्न पहात असत. त्यांच्या तेव्हाच्या वेतनात जो मासिक हप्ता परवडू शकत असे त्यानुरूप १ बी एच के घरे घेतली जात आणि बिल्डर तशी घरे बांधत. त्या व्यवस्थेत एक संतुलन होते. किंमती वाढत असल्या तरी माफक वाढ होती. त्यानंतर हे व्याजदर कमी होऊन ७-९% केले गेले. याचा परिणाम कर्जाचे मासिक हप्ते कमी होण्यात झाला. किंवा दुसर्या शब्दात तितक्याच मासिक हप्त्यात जास्त कर्ज घेणे शक्य झाले. त्यामुळे घरांना मागणी वाढू लागली. ज्यांना १ बी एच के घर परवडत नसे त्यांना ते परवडू लागले आणि ज्याना १ बी एच के परवडत असे त्यांना २ बी एच के घर आवाक्यात आले. याचा परिणाम घरांच्या एकूण मागणीत वाढ होण्यात झाला. परंतु पुरवठ्यात काही लगेच वाढ होत नाही त्यामुळे किंमती वाढू लागल्या. किंमती वेगाने वाढू लागल्याचे पाहून बिल्डरांनी नवीन संकुले बांधण्याचा सपाटा लावला. (ही झाली तेजी)
दरम्यानच्या काळात या तसेच अनुषंगिक किंमती वाढल्याने महागाईवाढू लागली. त्यावर चाप लावण्याचे उपाय रिझर्व बँकेने सुरू केले. व्याजाचे दर हळूहळू वाढवण्यात आले. ते ११ टक्क्यांपर्यंत गेले. आणि पुन्हा घरे खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली. त्यामुळे वरच्या ब्रॅकेट मधील ग्राहक खालच्या ब्रॅकेट्मध्ये आले व मागणी घटू लागली. परंतु बिल्डरांनी मात्र संकुलांचे काम सुरू केले होते. म्हणजे आता मागणीपेक्षा पुरवठा भलताच जास्त झाला होता. (ही आली मंदी).
यातून बाहेर कसे पडायचे? बाजारवादी म्हणतात बाजारच यावरचे सोल्युशन आहे. म्हणजे काय तर आता या बिल्डरांनी बांधलेली घरे कमी किंमतीत विकायचा प्रयत्न करावा. बाजाराचे विक्राळ स्वरूप इथे दिसते. कमी किंमतीत घरे विकून काहीच पदरात पडणार नसेल तर काय? तर ज्याला कमी किंमतीत घरे विकणे परवडत नाही त्या बिल्डरने आपला गाशा गुंडाळायला पाहिजे. म्हणजे त्याने आपल्या संकुलातील न विकली गेलेली घरे दुसर्या बिल्डरला (दोघांना मान्य असलेल्या किंमतीला) विकावी. दुसरा बिल्डर शक्यतो ती घरे होल्ड करून ठेवील (कारण त्या दुसर्या बिल्डरची ही घरे होल्ड करण्याची आर्थिक 'ताकद' आहे).
याच स्वरूपाचा व्यवहार शेतकरी आणि व्यापारी यांच्यात असतो. शेतकर्‍याची आर्थिक ताकद व्यापार्‍यापेक्षा नेहमीच कमी असते म्हणून त्याला आपला माल भाव पाडून विकावा लागतो.

अशा रीतीने पुरवठादारांची संख्या कमी होणे हाच मंदीवरचा बाजाराधिष्ठित उपाय आहे. हेच सर्व क्षेत्रात खरे आहे.

सध्याची मंदी जागतिक वगैरे असल्याने तिची झळ अधिक बसणार आहे.
मंदीवर सर्व सरकारे काही मोनेटरी उपाय करीत आहेत. त्यात व्याजदर, सी आर आर कमी करणे, पैशाचा पुरवठा वाढवणे वगैरे उपाय करीत असतात. परंतु त्यांचाही परिणाम लगेच दिसत नाही. याचे कारण पुढील काळातील वस्तूंच्या मागणीच्या, किंमतींच्या अनिश्चिततेमुळे कारखानदार गुंतवणुक करण्यास तयार नसतात (म्हणून नोकर्‍या निर्माण होत नाहीत). तर नोकर्‍यांच्या अनिश्चिततेमुळे ग्राहक कर्जे काढून खर्च करण्यास तयार नसतात (म्हणून मागणी वाढत नाही).

मंदीच्या सुरुवातीच्या काळात कारखाने (मागणीच्या कमतरतेमुळे) बंद होत जातात. त्यामुळे नोकर्‍या कमी होतात. त्यामुळे काही प्रमाणात मागणी आणखी कमी होते. शेवटी पुन्हा एक संतुलन साधले जाते. हे संतुलन लवकरात लवकर साधले जावे हाच सर्व सरकारी उपायांचा हेतू असतो. हे संतुलन आले की कारखाने बंद होत नाहीत (कारण त्यांचे बंद पडणे अगोदरच झालेले असते). त्यामुळे नोकर्‍या जाणे थांबते. म्हणजे नोकरीत असणार्‍यांना आता आपली नोकरी जाणार नाही अशी खात्री वाटू लागते. मग ते कर्जाऊ पैसे घेऊन खर्च करण्यास उद्युक्त होतात.
आणि पुन्हा तेजीचे चक्र सुरू होते. :)

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

चतुरंग's picture

2 Mar 2009 - 6:31 pm | चतुरंग

अशा गोष्टीत गुंतवणे शक्य नाहीये/जोखमीचे वाटते त्यांनी काही पैसे नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स, पीपीएफ अशात गुंतवावेत. काही वर्ष अडकून रहातात पण त्याचा फायदाही दिसू लागतो सहा वर्षात. विशेषतः नुकतेच नोकरीला लागलेत त्यांनी पीपीएफ अकाऊंट उघडा असा सल्ला देईन! माणशी दरवर्षी ७०,००० टाकू शकता तेही टॅक्सफ्री!जमेल तसे सोने घेत रहा.
गेलाबाजार बँकेचे एफ्डी सुद्धा वाईट नाहीतच!
शेवटी बाजारातल्या दरवर्षीच्या चलनवाढीला तोंड देणे गरजेचे. ८% ने व्याज मिळाले तरी व्याजात खर्च भागवून तुम्ही मुद्दल टिकवताच!
चक्रवाढ व्याजावर भरवसा ठेवा. थेंबेथेंबे तळे साचे हे खरेच.

चतुरंग

अमृतांजन's picture

2 Mar 2009 - 6:36 pm | अमृतांजन

सायन्स ऑफ ह्युमानिटीज मधे तेजी-मंदीला मार्केट फेल्युर असे म्हंटले जाते.

मार्केट फेल्युर म्हणजे काय- एखादी वस्तू ज्या 'किंमती'ला आहे त्या किंमतीत आणि त्याच्या खर्या 'मुल्या'त जो फरक असतो तो +वाढला की त्याचा अर्थ मागणी पेक्षा पुरवठा कमी. ह्या उलट म्हणजे फरक कमी (किंवा मुल्याच्याही पेक्षा किंमत कमी झाली की) झाला की पुरवठा मागणी पेक्षा जास्त.
वरील स्थिती कोणीही आजपर्यंत जगाच्या पाठीवर समर्थपणे नियंत्रीत करु शकले नाही.

किंमत(जास्त) आणि मुल्य (कमी): म्हणजे आय टी तल्या लोकांचे पगार. इतर ठिकाणी ज्यांना रोजगारावरही घेणार नाही असे कित्येक फडतुस लोक खोटी सर्टीफिकेट लावुन कंपन्यात घुसले. त्यांचे पगार आणि त्यांचे खरे मुल्य. [आय टीत कित्येक अत्यंत हुषार लोक आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही]

किंमत (कमी) आणि मुल्य (जास्त): एका चांगल्या शिक्षकाला जो पगार मिळ्तो तो म्हणजे त्यांचे खरे मुल्य आणि किंमत ह्यातील तफावत.

सारांश हा सगळा मागणी-पुरवठ्याचा खेळ आहे.

अशा वेळी आपापली आमदनी पाहून खर्च करणे हेच योग्य.

हे अगदी बरोबर!
आयटी च्या जोराने इतर क्षेत्रातले लोकही तिकडे घुसले काही खर्‍या क्षमतेवर, काही 'टेकू' लावून. टेकू लावलेले पडतील ती कामे करुन भरपूर पगार आहे म्हणून गाढवकाम करत रहातात! शेवटी पैशाचा फायदा कोण सोडेल. पण त्यांचे दिवस मंदीत फिरण्याची शक्यता जास्त! तुम्हाला स्किल अपडेट्स करणे खरे गरजेचे असते. गाढवकामाने तुमची मार्केट वॅल्यू वाढत नाही.

त्यातही आत्ता तुमची आमदनी चांगली असेल तर त्याचा फायदा पावसाळ्यासाठी करुन घ्या, गरजा/खर्च मर्यादित असणे कधीही फायद्याचे असते/ठरते.

तुलनेने शिक्षकांन कमी पगार मिळतो हे सत्य आहे. पण मुळात आपले काम नीट करणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे दुसर्‍याच्या जास्त मिळणार्‍या पैशांवर डोळा ठेवून कोणी सुखी होत नाही. त्यातली दु:खेही बर्‍याचदा दिसत नसतात. तेव्हा पैसा हा फक्त सूखच घेऊन येत नाही नाण्याची दुसरी बाजू महत्त्वाची असतेच!

चतुरंग

रामदास's picture

2 Mar 2009 - 7:31 pm | रामदास

कळत नाही पण थोडंस लिहीतो.
मंदीची भीषणता ताबडतोब जाणवणार नाही.आपण इतर मार्केटच्या चार महीने मागे असतो.पण आताची परीस्थीती म्हणजे टायगर बाय टेल आहे.आपल्याला वाघाची फक्त शेपूट दिसते आहे. पुढे सात आठ फुटाचा वाघ शिल्लक आहे.मनाची तयारी करायला वेळ आहे.आपल्या शिलकीला शिस्त लावा.पैसे साठवायचे म्हणून कुठेही ठेवू नका.उदा: अचानक शेती करायचे मनात घेऊन बैल विकत घ्यायला पळू नये.शेती करण्यासाठी मन भक्कम लागते.भारतीय शेतकर्‍याच्या घरी कायम मंदी असते.आक्काबाईचा फेरा फक्त आपल्याकडे आला आहे असं समजून अतिरेकी विचार टाळा.दिवस रात्र हाच विषय घरी दारी कुटून मनःस्थिती विकल करू नका.खास फॅमीलीवाल्यांसाठी: पैशाची चर्चा मुलांसमोर करू नका.त्यांच्या अनाठायी खर्चाला कात्री लावायला हरकत नाही मंदीचे गुर्‍हाळ त्यांच्या समोर सुरु करू नका .नविन घर घेण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवा.कर्ज घेणे टाळा.घेतल्यास ते बुडवायची तयारी ठेवा.खरेदीचे प्लॅन लांबणीवर टाका.सहल .दौरे यांचा खर्च करू नका.याचा अर्थ असा नाही की नागाव किंवा चौल ला जाऊ नका.फक्त सगळ्यांना सांगा की गेल्या वर्षी आम्ही हिमाचला गेलो नव्हतो यावर्षी नेपाळला जाणार नाही आहे.
मध्यमवर्गीयांनी लगडी शेअर स्वस्तात मिळत आहेत असं समजून शेअर बाजारात खरेदी करू नये.लगडी विकताना पण त्रास होतो.
थोडक्यात काय तर अगतीक होण्याइतका खर्च वाढवू नका.आपण १९७१-७२ चा दुष्काळ पाहीला आहे. आपला शिलकीचा दर सगळ्या जगात बहुतेक जास्त असेल .यापेक्षा वाईट मंदी आपण भोगली आहे.आता आशेचे किरण :इराक युध्द लवकर संपावे.भारतात मान्सून वेळेवर यावा. निवडणूकांनंतर स्थिर सरकार यावे.
फावल्या वेळात सेकंड स्किल डेव्हलप करावे.
हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच.

चतुरंग's picture

2 Mar 2009 - 7:47 pm | चतुरंग

फक्त एकच पटले नाही -
खास फॅमीलीवाल्यांसाठी: पैशाची चर्चा मुलांसमोर करू नका.त्यांच्या अनाठायी खर्चाला कात्री लावायला हरकत नाही मंदीचे गुर्‍हाळ त्यांच्या समोर सुरु करू नका .
माझ्यामते असे करायला नको. अगदी सतत पडेल चेहेर्‍याने त्यांना ऐकवत राहू नका हे जरी खरे असले तरी मुले जाणत्या वयात असली तर त्यांना मंदी काय असते हेही कळायला हवे. जपून खर्च कसे असतात ह्याचा वस्तुपाठ तुम्ही देऊ शकता. पैशाचे महत्त्व आणि मर्यादा जेवढ्या लवकर मुलांना योग्य प्रकारे समजतील तेवढे गरजेचे/महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच.

हा खास रामदास ट्च आवडला! =))

चतुरंग

रेवती's picture

2 Mar 2009 - 8:01 pm | रेवती

अगदी हेच!
त्यासाठी रामदासजींना व्य. नि. करणार होते.
लिहूनही झाला होता निरोप पण नाही पाठवला.
मुलांपासून फार काळ नाही लपवून ठेवता येत.
त्यांच्या आजूबाजूला रोज हेच बघतात ते.

रेवती

रामदास's picture

2 Mar 2009 - 8:07 pm | रामदास

आईबाबांचा चेहेरा वाचतात.प्रश्न फक्त अजाण मुलांचा असतो.समस्येला ते योग्य पध्दतीनी इंटरप्रीट करू शकत नाहीत म्हणून असं लिहीलं होतं.

रेवती's picture

2 Mar 2009 - 8:30 pm | रेवती

हो ते आहेच.
लहान मुलांना समजावून सांगणं म्हणजे अवघड काम असतं.
मित्र आजकाल खेळायला का थांबत नाही?
त्याचे बाबा घरी का असतात?
ते आजारी आहेत का?
अश्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड असतं ("माझी आई असं सांगत होती" असं त्याला जाऊन सांगायलाही कमी करत नाहीत.)
माझ्या मैत्रिणीच्या मुलानं बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं की आजकाल आई बाबा बरीच भांडणं करतात.
हे सगळं बघून मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तर शोधून काढताना नाकी नऊ येतात.

रेवती

लवंगी's picture

2 Mar 2009 - 8:40 pm | लवंगी

मुलांचा निरागसपणा कशाला संपवायचा. शक्य होईल तेवढे त्यांना या विवंचनेपासुन दूर ठेवावे.

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 8:47 pm | विनायक प्रभू

हा धागा टाकताना एका पालकांने विचारलेला प्रश्न डोक्यात घोळत होता.
एक मुलगा १० वीत. दुसरी मुलगी ४ थीत.
मुलगी सारखे प्रश्न विचारते.
बाबा आता मॅक्डोनाल्ड ला का नेत नाहीत.
आईस्क्रिम का आणत नाहीत.
गाडीने फिरायला का नेत नाहीत.
ह्या वर्षी दिवाळीला कपडे का आणले नाहीत.
तु पहिल्यासारखी हसत का नाहीस.
आता ह्याला मी काय उत्तर देणार.

नोकरी जाऊ शकते. अशीच परिस्थिती कायम राहील असे नाही पण कधीतरी कठिण काळ येऊ शकतो.
आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले समंजस आणि शहाणी असतात! त्यांना बरेच कळते. आईबाप आपल्याला विश्वासात घेऊन सांगताहेत म्हटल्यावर मुलेही समजून घेऊ शकतात.
जेव्हा परिस्थिती सुधारेल त्यावेळी परत आपण नवीन गोष्टी घेऊ शकतो एवढे समजले म्हणजे झाले.

ही आठवण/सवय मुलांना त्यांच्या मोठ्या वयात उपयोगी पडते. परिस्थिती वाईट आली तर आपण ह्यातून पूर्वी कधीतरी गेलोय त्यावेळी जीवनशैलीत केलेले बदल त्यांना मार्गदर्शक ठरु शकतात. असा अनुभव धक्क्याची तीव्रता कमी करतो हे निश्चित!

चतुरंग

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 10:35 pm | लिखाळ

>>हे माझे हौशी मत प्रदर्शन आहे. पंगतीत बसल्यावर अर्धी लाकडं पोचलेली म्हातारी उखाणा घेते तसंच.<<
हा हा .. हे मस्तंच !

चर्चा छानच आहे.. उद्बोधक आहे.

-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

2 Mar 2009 - 7:36 pm | विनायक प्रभू

लय भारी म्हातारी आणि तिचा उखाणा.

घाई करु नका.अजुन पिक्चर खुप बाकी आहे.
वेताळ

मराठी_माणूस's picture

2 Mar 2009 - 10:52 pm | मराठी_माणूस

अजुन पिक्चर खुप बाकी आहे.

हा सुर मंदी वरच्या चर्चेत बर्‍याच ठीकाणी दीसतो. म्हणजे परीस्थीतीती अजुन वाईट कशा प्रकारे होउ शकते हे कोणी सांगु शकेल का ? का हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे .

गुळांबा's picture

2 Mar 2009 - 11:56 pm | गुळांबा

कोणाकडेच सध्या पैसा नाही तर इतके छापलेले चलन गेले कुठे?

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 7:01 am | विनायक प्रभू

असेच म्हणतो