माझा हा स्व-अनुभव आहे.
क्रुपया वाचण्याठी वेळ द्यावा. ही. नम्र विनंती.
मि. पा. करांनी / करींनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.ही. (दुसरी )नम्र विनंती.
माझ्या जवळ्च्या काही मित्रांना मी काहि रुपये उधार दिले आहेत.
मागतांना अत्यंत गरज आहे, महत्वाचे काम आहे, असे काहिजण म्हणाले होते, मी पण मित्राला मदत म्हणुन रुपये दिले. सगळेजण २-३ महीन्याच्या आत परत करु असे म्हणाले होते. पण आज पर्यत्न कोणी सुध्दा परत केले नाहि.
काहिना मी तर क्रेडीट काड वरुन रुपये काडुन दिलेले आहेत. (प्रोसेसिग फी, व्याज मीच भरले, भरत आहे)
माझ्या मते, जसे रुपये मागायला हे आले होते, तसेच परत करण्यासाठी सुध्दा त्यांनिच यायला हवे. 'श ब्दाला' सुध्दा काहि मह्त्व असते की नाहि ?
मी १दा हि कुणाकडे माझ्या रुपयांची मागणी केलेली नाही.
काय करावे तेच कळत नाही.
क्रुपया योग्य मार्गदशन करावे.
प्रतिक्रिया
2 Mar 2009 - 4:37 pm | दशानन
>काहिना मी तर क्रेडीट काड वरुन रुपये काडुन दिलेले आहेत. (प्रोसेसिग फी, व्याज मीच भरले, भरत आहे)
मुर्ख आहात.
स्पष्ट बोलत आहे राग मानू नका.
स्वतः कर्जात जाऊन दुस-याला मदत करणे ह्या प्रकाराला मी मुर्खपणा समजतो... बाकी तुमचे चालू द्या.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
2 Mar 2009 - 4:38 pm | ब्रिटिश टिंग्या
हे मित्र आंतरजालावरचे होते काय हो?
असले तर लिहुन घ्या....एक पैसा माघारी मिळणार नाही ;)
2 Mar 2009 - 4:39 pm | अवलिया
आता कळले :?
--अवलिया
2 Mar 2009 - 4:40 pm | ब्रिटिश टिंग्या
उशीर केलात!
2 Mar 2009 - 4:40 pm | JayGanesh
पैशेमाघारी मिळयासाठी काय करावे ?
2 Mar 2009 - 4:42 pm | दशानन
काय करायला जाऊ नका.. फालतु मध्ये परत पैसा खर्च कराल.. व दमडी पण परत येणार नाही ;)
2 Mar 2009 - 4:43 pm | ब्रिटिश टिंग्या
अनुभवी दिसताय ;)
2 Mar 2009 - 4:44 pm | झेल्या
मेमरी - माईंड पावर इ. विषयांवर फुकट इंट्रोडक्टरी कार्यक्रम होत असतात. अशा एखाद्या कार्यक्रमाला एकेक करून या मित्रांना घेऊन जा. व कार्यक्रमानंतर अचानक साक्षात्कार झाल्याचे नाटक करत "अरे! आज या मेमरी वरून आठवलं, मी तुला ते पैसे दिले होते ना ते कधी देतोयंस? मला सध्या फार गरज आहे रे..." असे काहीसे बोलावे.
तुमच्या त्या मित्रांचे तर मित्र महत्त्वाचे, की पैसे महत्त्वाचे यापेक्षा 'मित्राचे पैसे महत्त्वाचे' असे धोरण दिसते.
स्वतःचेच पैसे परत मागण्यात संकोच करू नये. ते खरे मित्र असतील तर त्यांना पैसे परत मागितल्याबद्दल तुमचा राग येणार नाही असे वाटते.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
2 Mar 2009 - 6:30 pm | योगी९००
स्वतःचेच पैसे परत मागण्यात संकोच करू नये. ते खरे मित्र असतील तर त्यांना पैसे परत मागितल्याबद्दल तुमचा राग येणार नाही असे वाटते.
अगदी बरोबर..
असले मित्र असण्यापेक्षा पैसा असलेला महत्वाचा...बिन्धास्त आपला पैसा मागा...मी सुद्धा असेच करतो.
नाहीतर सरळ आठवड्यातले २ दिवस त्यांच्याघरी जेवायला जा...काही दिवसांनी आपोआप पैसे येतील..मी सुध्दा असे केले आहे. यावर एक लेख लिहीन.
खादाडमाऊ
2 Mar 2009 - 4:48 pm | विसोबा खेचर
अहो गणेशराव, आपल्याकडे थोडं काम होतं! ;)
तात्या.
2 Mar 2009 - 4:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझंही! =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
2 Mar 2009 - 4:50 pm | JayGanesh
तात्या.
पैशे सोडुन ---सगळी कामे मी करायला तयार आहे !!
2 Mar 2009 - 5:27 pm | सखाराम_गटणे™
>>पैशे सोडुन ---सगळी कामे मी करायला तयार आहे !!
क्या बात है !!!.
तुमचीच गरज आहे आम्हाला.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
2 Mar 2009 - 6:07 pm | नरेश_
पैशे सोडुन---सगळी कामे मी करायला तयार आहे !!
असेच ठणकावून सांगा. बाकी मी पण अशाच नुकसानीत गेलो आहे.
पुन्हा कुणालाच पैश्यासाठी दाराशी उभं करु नकोस.
गेलेल्या पैशांबदली अक्कल विकत घेतली असे समज नि विषय सोडून टाक.
पुन्हा अशी चूक हातून होता कामा नये.
तुझ्या दु:खात सहभागी आहे.
अवांतर : तुज्यामुले आज लै हासलो, देव करो नि तुजे पैसे परत मिलो.
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
2 Mar 2009 - 4:49 pm | विनायक प्रभू
माझ्या आधी पोचले तुम्ही तात्या.
2 Mar 2009 - 5:00 pm | विसोबा खेचर
काय हो गणेशराव, एकूण सगळा मामला किती रुपायांचा आहे? वसूल करून दिले तर मला किती देणार? :)
आपला,
(मुंबईचा रंडीबाजार, चोर-उचक्के, मटकेवाले, दारूवाले शेट्टी, पोलिस, गुंड, यांच्यात उठबस असलेला!) तात्या :)
2 Mar 2009 - 5:02 pm | दशानन
पाच खोक्यापुढे २०% चा भाव चालू आहे तात्या.
2 Mar 2009 - 5:15 pm | मृगनयनी
मि. पा. करांनी / करींनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.ही. (दुसरी )नम्र विनंती.
हे "मिपाकरी" काय असते हो ? नवी पा. कृ. आहे का ;)
जय गणेश (की बाल गणेश) तुम्ही फार भोळ्या आणि भिडस्त स्वभाचाचे दिस्ता!
पण तुमच्या समश्य्श्येवर एकच उपाय आहे.. की तुम्ही पहिल्यान्दा स्वतः हुन सभ्यपणे मित्रांकडे पैसे मागावे..... त्यान्ना समजावुन सांगावे, की "मैत्री आणि व्यवहार यात खूप फरक असतो..." इ. इ..
तरीही ते नाही आइकले, तर पोलिसकेस करण्याची सौम्य धमकी द्यावी... व मित्रान्च्या कुटुम्बीयांना सत्य परिस्थितीची जाणीव करुन द्यावी.
या उपायाचा इफेक्ट ८० % होतोच होतो.
आणि तरीही तुमच्या मित्रान्नी नाय आइकलं, तर माझ्याजवळचा "रामपुरी" घेऊन जावा....
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
2 Mar 2009 - 5:19 pm | दशानन
>>माझ्याजवळचा "रामपुरी" घेऊन जावा....
उजव्या पायातील की डाव्या :?
2 Mar 2009 - 5:20 pm | मिंटी
>>माझ्याजवळचा "रामपुरी" घेऊन जावा....
उजव्या पायातील की डाव्या
=)) =))
2 Mar 2009 - 5:22 pm | मृगनयनी
उजव्या पायातील की डाव्या
:-? मी पायात नाय घालत रामपुरी.... तो माझ्या बौडी-गार्डकडे असतो....
मल्ला गरज लागली के देतो!
;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
2 Mar 2009 - 5:23 pm | छोटा डॉन
=)) =))
दोन्हीही प्रतिक्रिया भारीच ...!!!
------
छोटा डॉनपुरी
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 5:23 pm | JayGanesh
मि. पा. कर म्हणजे '' मिसळपाव वरील पुरुष मंडली., आणी ''मि. पा. करींनी '' म्हणजे '' मिसळपाव वरील बाई माणुस !!
ह्याच स्वभाचाचे चटके लागतात ग मला सध्या!!
2 Mar 2009 - 5:06 pm | छोटा डॉन
आत्ता मी हेच विचारणार होतो ...
असो. आता तुम्ही हे काम करताय तर हरकत नाही ...
तात्या, फक्त काम झालं की मिळाल्या पैशाचा ४० % हिस्सा आपल्याला "हप्ता" म्हणुन द्या ...
काय प्रॉब्लेम आला तर मला सांगा.
बिसीनेस चा तो रुल आहे ... ;)
------
( घरातच उठबस करुन फोनवर बिसीनेस संभाळणारा )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 5:08 pm | JayGanesh
श्रीमंत योगी तात्यांना पैशाची काय गरज ?
१४०००/- आहेत.
2 Mar 2009 - 5:22 pm | विसोबा खेचर
हम्म..! हल्लीच्या मंदीच्या काळात रक्कम तशी मोठीच आहे..
नाऊ, जोक्स अपार्ट,
यापुढे कुणालाही पैसे देतांना दहा वेळा विचार करा.. पैसा ही जगातल्या दोन महत्वाच्या गोष्टींपैकी एक.
पैसा आणि बाई!
या दोन गोष्टींभोवतीच सारी दुनिया सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गरागरा फिरत असते असे माझी दुनियादारी मला सांगते..
मित्राने मागितले तर अवश्य द्या, परंतु १०० मागितल्यास तीसच द्या. मोकळ्या मनाने द्या. परत येणार नाहीत असं समजूनच द्या. समोरच्या व्यक्तिला मित्र समजता ना? मग नेकी कर आणि दर्यामे डाल!
आणि मुख्य म्हणजे समोरचा इसम हा आपला खरोखरच मित्र आहे का? आपल्या गरजेला तो वेळीअवेळी धावून येईल का? हे ओळखायला शिका. यापुढे तरी थोडी दुनियादारी शिका आणि आत्तापासूनच सावध व्हा. पैशांना जपा. एक धडा मिळाला, त्याची १४००० रुपये फी दिली असं समजा आणि पुढे चला..
मी चाळीशीचा. आपण माझ्यापेक्षा वयाने लहान आहात की मोठे आहात हे माहीत नाही. लहान असाल तर हा गुरुपदेश समजा आणि मोठे असाल तर अजून थोडे मॅच्युअर व्हा! :)
अगदीच निकड असेल आणि १४००० वाचून काम अडलं असेल तर त्यापैकी ५०० रुपायांचा खारीचा वाटा उचलायला मी वैयक्तिकरित्या तयार आहे. यात मिपा अथवा मिपाकरांचा काहीही संबंध नाही. मी पैशाला भयंकर घाबरतो त्यामुळे प्रथमपासूनच मी मिपाला पैशांच्या व्यवहारापासून दूर ठेवले आहे. (विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका, परंतु आजच्या घडीला मिपाकरता मला काही लाखांची ऑफर आहे!)
असो...
आपलाच,
तात्या.
2 Mar 2009 - 5:35 pm | JayGanesh
मी ३० चा आहे
मनापासुन धन्यवाद !!
2 Mar 2009 - 5:36 pm | बिपिन कार्यकर्ते
अगदी असंच टायपायला आलो होतो... तात्याने त्रास वाचवला.
माझे पण पैसे असेच मित्रांकडे आहेत. त्यातल्या काहींना जाणिव आहे आणि काही जण विसरले आहेत. ज्यांना जाणिव आहे ते मोकळेपणाने कबूल करतात की मी तेईन रे पण नड आहे आणि खरंच त्यांची नड आहे. दिले ते दिले. देताना शक्य तेवढेच दिले. स्वतः कर्ज काढून कधीच नाही दिले. ज्यांना आपण मित्र म्हणतो त्यांना आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण नकार दिल्याने राग आला तर ते मित्र नाहीत हे खुश्शाल समजा. सुंठीवाचून खोकला गेला.
आणि आता पैसे दिले आहेत चुकीच्या व्यक्तींना तर क्लेम सोडू नका. त्यांना मधून मधून डिवचत रहा. त्यातले खरे मित्र कोणी असतील तर काणाडोळा करा.
बिपिन कार्यकर्ते
2 Mar 2009 - 5:27 pm | सखाराम_गटणे™
पहीली गोष्ट व्यवहार आणि मैत्री ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
तुम्ही एकत्र केल्यात, आता मिपावरील वसुली एजंट मदत करतील तुम्हाला.
कमीशन किती द्यायचे ते ठरवा?
आणि कोणाला बांळतपणाला पैसे तर दिले नाहीत ना??
नाही, तुम्ही नाव सुचवायचा धागा टाकला होता सकाळी.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
2 Mar 2009 - 5:28 pm | विसोबा खेचर
आणि कोणाला बांळतपणाला पैसे तर दिले नाहीत ना??
नाही, तुम्ही नाव सुचवायचा धागा टाकला होता सकाळी.
वारलो..!
साला हा सख्या जात्याच भिकारचोट! :)
तात्या.
2 Mar 2009 - 5:48 pm | JayGanesh
माझ्या पैशे न मिळण्याच्या वेदना मिपाकराना कळ्त नाहित.
2 Mar 2009 - 5:49 pm | दशानन
तुमच्या चुकिला आम्हाला का दोष :?
तुमची चुक आहे तुम्ही स्वतः सुधरा ती .... मित्रच आहेत तर दिले दान म्हणून सोडून द्या.
जास्तच त्रास आहे तर खाली तात्याने उपाय दिलाच आहे.
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
2 Mar 2009 - 5:51 pm | JayGanesh
चुक झाली आहे, म्हणुनच तर मदत मागतोय ना ?
2 Mar 2009 - 5:52 pm | दशानन
काय मदत अपेक्षित आहे तुम्हाला :?
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
2 Mar 2009 - 5:43 pm | अन्वय
मीदेखील एका मित्राला किरकोळ रक्कम उधार दिलीय. तीन-चार दिवसांत परत करतो म्हणाला होता. आठ दिवस झाले... पंधरा दिवस झाले. पैसे परत मिळण्याचे काही नाव नाही. पहिल्या आठ दिवसांनंतर तो रोज सकाळी फोन करून ख्याली खुशाली विचारत असे. "तुझे पैसे द्यायचे आहेत,' असे तो बोलून दाखवत असे. काही दिवसांपासून त्याचे फोन बंद झाले आहेत. ऑफिसात गेल्यानंतर रोज जवळ येऊन बोलणारा तो लांबूनच हातवारे करून "अंतर' राखू लागलाय. आता पैसे परत मिळतात की नाही, याची काळजी लागलीय; पण मला त्याच्याकडे पैशाची मागवेसे वाटत नाहीत. कारण मी त्याची गरज भागविली आहे. त्यानेही आता नीतीमत्तेची आब राखली पाहिजे, असा आदर्शविचार मी करतो. बघुया त्याला लाज वाटते का?...
मिळाले तर आपले, नाहीतर ओवाळून टाकले.
2 Mar 2009 - 5:45 pm | JayGanesh
अगदी बरो बर आहे,
मी देखील असाच आहे
2 Mar 2009 - 6:08 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी बरो बर आहे,
मी देखील असाच आहे
तु जर अगदी असा हातिमताई आहेस तर काय उगा आमचा छळ करायला काढला काय हा धाग ? एकदा स्वतःला हातिमताई म्हणवतो , एकदा माझे पैसे परत न मिळाल्याचे दुखः मिपाकरांना कळत नाही म्हणतो आणी वरती बारशाला मदत म्हणुन नाव शोधत बसतो ! कसले वांझोटे धंदे हो हे ? राग नका मानु पण लैच बेकार शॉट बसला तुमचे निरर्थक धागे सकाळ पासुन बघुन म्हणुन बोललो.
पैसे देताना आम्हाला विचारायला आला होता का बाबा ? नाही ना ? मग आता कशाला विचारायला येतो ? उद्या मिपाकर म्हणाले झाले गेले विसरुन जा आणी परवा तुमचा मित्र पैसे द्यायला आला तर पैसे घेणारच आहात ना परत ? का मिपावाले विसरुन जा म्हणाले सगळे विसरुन जाणार आहात ?
जरा कडक शब्दात बोलतोय त्याबद्दल क्षमस्व.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
2 Mar 2009 - 6:34 pm | नरेश_
चुकले म्हणतो ना तो ?
कशाला त्याच्या दु:खावर मीठ चोळतोस.
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
2 Mar 2009 - 5:50 pm | अन्वय
अरे हो... तुम्हाला सल्ला द्यायचा राहिलाच मघाशी. एक काम करा. तुमचे मित्र संगणक साक्षर असतीलच. त्यांना "मिपा'ची वाट दाखवा. सभासद करा आणि त्यांना या चर्चेची लिंक पाठविण्याची व्यवस्था करा.
2 Mar 2009 - 5:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
डानराव, तुम्ही एक धागा टाका, कविता करून दाखवा या विषयावर असा! ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
2 Mar 2009 - 6:10 pm | अमृतांजन
"पैशे महत्वाचे की, मित्र."
ते सर्वस्वी तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे. तुम्हाला जे वाटते ते योग्य.
काही नातेसंबंधामधे किंवा मित्र खूपच जवळचा असेल तर कधी-कधी घोडा हरणार आहे हे माहीत असुन सुद्धा त्याच्यावर पैसे लावावे लागतात.
2 Mar 2009 - 6:12 pm | सखाराम_गटणे™
धन्यवाद, तुम्ही आमच्या डोळ्यात अंजन घातले.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
2 Mar 2009 - 6:30 pm | नरेश_
धन्यवाद, तुम्ही आमच्या डोळ्यात अंजन घातले.
----
तात्पर्य : तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर पैसे उसने देत चला ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.