सॄष्टीची युक्ती

मीनल गद्रे.'s picture
मीनल गद्रे. in जनातलं, मनातलं
22 Jan 2008 - 1:40 am

मेघानी केली अवनीची पूजा
कधी थेंबांनी आला पाऊस राजा
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या
अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या.

नवरस ,नव आल्हाद ताजा
वाटे पूजेची मज मौजमजा
मेघाची काय वर्णावी भक्ती
कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

मीनल गद्रे.'s picture

22 Jan 2008 - 1:42 am | मीनल गद्रे.

हे मी लिहिलेले आहे .गैरसमज नसावा.

प्राजु's picture

22 Jan 2008 - 1:45 am | प्राजु

हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या
अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या.

हे खूप छान.. आवडले..

- प्राजु

धनंजय's picture

22 Jan 2008 - 1:50 am | धनंजय

हा शब्द खास आवडला.

अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!

ऋषिकेश's picture

22 Jan 2008 - 8:05 pm | ऋषिकेश

हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय?
बाकी कविता आवडली. अजून येऊ देत
-ऋषिकेश

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jan 2008 - 9:36 pm | बिपिन कार्यकर्ते

छान कविता.

मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...

बिपिन.

कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात.
चपखल शब्द!

चतुरंग

ऋषिकेश's picture

22 Jan 2008 - 9:58 pm | ऋषिकेश

अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...

वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :)

-ऋषिकेश

वरदा's picture

23 Jan 2008 - 10:39 pm | वरदा

खूप आवडली...

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 3:39 pm | सुधीर कांदळकर

आवडली धन्यवाद.

अलगदल्या हा नवा शब्द आवडला. यथार्थ आहे.