संवाद-५ [ही मालिका नाही]

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
27 Feb 2009 - 4:35 pm

नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात येतात ते कागदावर उतरवतो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंतर्‍यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही.आणि शेवटी हे मनातलं आहे आणि मनातलं सगळं बरोबरंच असेल असंही नाही.

-------------------------------------------------------------------------------------------
संवाद-५

"वैतागलो यार."
"का रे बाबा?"
"अरे केवढं प्रदूषण आहे बाहेर. सिग्नल ला दहा मिनिटं उभा होतो तर त्रास व्हायला लागला शेवटी धुरामुळे. हे ट्रॅफिक पोलीस कसेकाय उभं राहत असतील दिवसभर कोणास ठाऊक"
"ख्ररंय तु़झं म्हणणं. माझा घसा बसला होता मागच्या आठवड्यात, तेव्हा तर मला बाहेर पडावसंच वाटत नव्हतं. कारण ईतकं प्रदूषण असतं ना बाहेर आजकाल, की औषधं घेतली तरी या प्रदूषणामुळे त्याचा परिणामच होत नाही"
"हो ना, आणि मग डॉक्टर लवकर बरं वाटावं म्हणून स्ट्रॉन्ग डोस देतात. च्यायला त्याचा अजुन त्रास........ अरे आपण मध्यंतरी एक एकांकीका पाहीली होती आठवतीये का रे तुला?"
"कुठली रे?"
"अरे ती नाही का ती, प्रदुषणावरच होती बघ... काय बरं नाव होतं तिचं.... हा, मळभ! मळभ!.. काय सॉलीड होती यार. जबरदस्त मांडला होता प्रदूषणा चा विषय."
"खरच जबरा होती."
" पण यार मला कधी कधी प्रश्न पडतो, प्रदुषण या विषयावर आता इतकी समाज जाग्रुती होते आहे तरी प्रदूषणाची पातळी काही कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस वाढतेच आहे. "
"ती कमी होणारही नाही."
"का?"
"आईनस्टइन चा एक सिद्धांत आहे. ऐकला नसशील तर नीट ऐक- जगात कुठल्याही घडीला असणारे प्रश्न, हे त्या घडीला जगात अस्तित्त्वात असणार्या बुद्धिमत्तेला सोडवता येत नाहीत."
"??"
"म्हणजे, थोडक्यात सांगायचे म्हणजे जी बुद्धिमत्ता प्रॉब्लेम्स क्रिएट करते, ती त्या प्रॉब्लेम्सची सोल्युशन्स शोधू शकत नाही."
"च्या मारी...अजबंच तत्त्वज्ञान आहे. पण या बाबतीत तरी हे तत्त्वज्ञान चूक आहे"
"का?"
"प्रदूषण कमी करण्यासाठी कितीतरी उपाय सुचवले गेलेत आत्तापर्यंत."
"पण प्रदूषण कमी झालंय का त्याने?"
"पण ईतके उपाय सुचवले गेले आहेत म्हणजे कमी होईलच कधीतरी"
"कशावरुन?"
"आता हेच बघ. पेट्रोल, डिझेल यांना पर्याय म्हणून हायड्रोजन सेल चा पर्याय आला आहेच ना. आता हे नको सांगूस की अजून गाड्या पेट्रोल वरच धावतायत म्हणून"
"!!"
"हसू नकोस. ती टेक्नॉलॉजी अजुन प्राथमिक अवस्थेत आहे. पण त्यावर जोरात संशोधन चालू आहे"
"अरे बाबा तुला वाटतं का कि, या ऑटोमोबाईल्स कंपन्यांकडे याची उत्तर सापडली नसतील म्हणून. आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे जरी संशोधन चालू असलं आणि येत्या काही वर्षात जरी ते यशस्वी झाले, तरी ऑईल कंपन्या ते जगापुढे येऊ देतील. त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे तो. फक्त ऑईल कंपन्याच नाही, ईतरही कितीतरी जणांचे हितसंबंध असतील यामागे."
"पण मग बॅटरीवर चालणार्या २-व्हीलर्स आल्या आहेत की बाजारात"
"हो, पण त्या पॉवर मधे मार खातात आणि म्हणून आपण घेत नाही. तुला घ्यायची होती गाडी तेव्हा घेतलीस का तु बॅटरी वरची गाडी. पेट्रोल चीच घेतलीस ना?"
".........हम्म. तू म्हणतोस तसं खरंच असू शकेल?"
"काही अशक्य नाही बाबा आजकाल. हे तर फक्त वाहनांच्या बाबतीत झालं. ईतर कित्येक क्षेत्रात असं होत असेल. आपल्याला कल्पनाही नसेल त्याची. किती उदहरणं देउ तुला- पॉवर जनरेशन आहे, केमिमल्स प्लांट्स आहेत, इंडस्ट्रिअल वेस्ट्स आहेत- अगदी साधं उदाहरण- प्लॅस्टिक- तुला माहीती आहे की ते बायोलॉजिकली डिग्रेडेबल नाहिये तरीही तू वापरतोसच ना? थांबलंय का त्याचं प्रॉडक्शन?"
"मग हे प्रदूषण कमी कधी होणार? का नाहीच होणार कधी? आणि आपण काय करू शकतो ते कमी करायला?"
"हेच प्रश्न मलाही पडले आहेत. शोधतोय उत्तरं ...अजुन तरी समधानकारक मिळाली नाहीत. बघु कधी मिळतायत"

------------------------------------------------------------------------------------------

याआधीचा संवादः
संवाद-४

मांडणीविचार