सुक्ष्म बदल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
26 Feb 2009 - 6:06 pm

"तुम्हाला 'रुटिन' चा कंटाळा येत नाही का हो सर" लिफ्ट मधे इती १२ वा माळा
वय वर्षे ३५ असलेल्याना सुद्धा रुटीन चा कंटाळा. तरी बरे दरवर्षी दोन वेळा ऑफिस खर्चाने भारत दर्शन नक्की असते. त्याला पण रुटीनमुळे कंटाळले की काय असा प्रश्न डोक्यात आला.
तसा रुटीन च्या कंटाळ्याबद्द्ल मला रुटीनली प्रश्न विचारला जातो. आणि मी सुद्धा रुटीन उत्तरे देतो.
१. रुटीन कुणाला चुकले आहे.
२. रुटीन मधेच आनंद शोधायचा. वगैरे वगैरे. असो.
काल चिरंजीवांचा २२ वाढदिवस. ऑफिसमधे बायकोचा फोन आला. येताना एक छोटा वॅनिला कप घेउन या. मी आईस्क्रीम टाळतो. घसा सांभाळावा लागतो. आज रात्री साधे फृट सॅलड मला आणि चिरंजीवांना आईस्क्रीम सकट असा बेत असणार ह्याची खात्री झाली. जेवण झाल्यावर समोर काहीतरी वेगळेच मिळाले.
मध्यम आकाराचे चिकू उभे कापलेले होते. वरची साल काढलेली होती. दोन्ही भाग टुथपीक ने जोडलेले होते. अख्खा चिकू एकाच वेळी खायची आज्ञा झाली.
मी निमुट्पणे टुथपीक ला धरुन तो चीकु तोंडात ढकलला. ३ ते ४ वेळा चावल्यावर तोंडात कधी न अनुभवलेली चव आली. चिरंजीव पण खुष. वेगळाच आयटम खाल्ल्याचा आनंद झाला.
चिकू सोलला होता. उभे दोन भाग करुन बी काढल्यावर त्यातील दोन्ही भागातील मोठा चमचा गर काढला होता. एक स्ट्रॉबेरी तशीच उभी कापुन चीकुच्या पोटात विभागलेली होती. परत तीच प्रक्रिया स्ट्रॉबेरीवर पण अजमावण्यात आली होती. स्ट्रॉबेरीच्या पोटात एका भागात मधात मॅरिनेट केलेली किश्मिस तर दुसर्‍या भागात वॅनिला आईस्क्रीम. आणि मग टुथपीकने परत जोडणी. धरतीवर स्वर्ग सुख मिळाले.
दुसर्‍या दीवशी सकाळी न्याहरी ला असाच सुक्ष्म बदल दिसला. कालवलेले पातळ पोहे. नेहेमीचे रुटीन. आदल्या दिवशी आणलेल्या शहाळ्याच्या पाण्यामधले थोडे पाणी पातळ पोह्यावर शिंपडून मग मसाल्याबरोबर कालवलेले होते. गुळाच्या ठीकाणी मधाचा प्रयोग झाला होता. पोहे ही डीश इतकी उंच पातळीवर जाते हे सांगुन विश्वास बसणार नाही. बरोबर होते केळ्याचे बन्स. मला बन्स आवडत नाही . "जरा खाउन बघा, वेगळे आहेत"- बायको
आता बन्स मधे काय वेगळे असणार. पीठामधे पिकलेले केळे घालुन केलेली पुरी ही माझी व्याख्या.
"अहो केळे नेहेमीचे. पण आज जरा बदल आहे. वेलची केळी घालुन केले आहेत. चार दिवसानी मोठी मद्रासी केळी घालुन करीन. बघा परत वेगळी चव लागेल." बायको. मी चेहेरा निर्विकार ठेउन बन्स खाल्ले. चव आवडली. नेहेमी पेक्षा वेगळी.
तीच ही न्याहरी, तेच ते जेवण जरा सुक्ष्म बदल केले तर वेगळ्याच पातळीवर जाते. हाच नियम इतर रुटीन ला लगु नाही काय?
जाता जाता: १२ व्या माळ्याला नेमक्या कुठल्या रुटीनचा कंटाळा आला आहे कुणास ठाउक?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

26 Feb 2009 - 6:22 pm | विसुनाना

जाता जाता ठेवणीतले अस्त्र काढलेत! ;)

श्रावण मोडक's picture

26 Feb 2009 - 6:24 pm | श्रावण मोडक

विसुनानांशी पूर्ण सहमत. :)
बाकी सूक्ष्म बदलही महत्त्वाचे हे नक्की.

दशानन's picture

26 Feb 2009 - 6:26 pm | दशानन

+३ हेच म्हणतो!

१००% सहमत.

गणा मास्तर's picture

26 Feb 2009 - 8:24 pm | गणा मास्तर

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

टारझन's picture

27 Feb 2009 - 2:02 am | टारझन

त्यात सुक्ष्म बदल कसा करता येईल ?

-इण्णोव्हेटिव्ह) टारझन

विजुभाऊ's picture

27 Feb 2009 - 7:28 pm | विजुभाऊ

बर्‍याच लोकांच्या बाबतीत रुटीन चेन्ज करणे हेही रुटीन होते. ;)
पण नेहमीचीच डीश जर्रा वेगळ्या प्रकारे सजवली किंवा वेगळ्या वातावरणात चाखली तरी वेगळीच लागते. उदा:नेहमी घरात जेवतो. एखादे वेळेस टेरेसवर जेवुन पहा.....मोकळ्या हवेत

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

अवलिया's picture

26 Feb 2009 - 6:26 pm | अवलिया

हम्म.
उगीच नाही तुमचे नाव हिस्ट्रीशीटर मधे

--अवलिया

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 6:53 pm | विनायक प्रभू

आयुष्य ३ पत्तीचा खेळ.
३ पत्तीत सुद्धा वेरीएशन ने खेळाची गम्मत वाढवतात.

अवलिया's picture

26 Feb 2009 - 6:56 pm | अवलिया

ब्लाईंड फुल स्टेक

--अवलिया

वेताळ's picture

26 Feb 2009 - 6:34 pm | वेताळ

किती सुक्ष्मबदल टिपलेत. एकाच लेखात दोन वेगवेगळ्या पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद. फोटो टाकले असते तर अजुन मजा आली असती.
वेताळ

रामदास's picture

26 Feb 2009 - 6:58 pm | रामदास

असे सुंदर पदार्थ पानात पडायला लागले तर तो गनीमी कावा असू शकतो.

छोटा डॉन's picture

26 Feb 2009 - 7:54 pm | छोटा डॉन

हा हा हा, रामदाससर रॉक्स ..!
प्रभुकाका, लेख भारी आहेच पण त्यातली पदार्थाची वर्णने लै भारी आहेत ...

अवांतर : तुमच्याकडे नाष्ट्याला लै भारी काही काही असते बॉ, यायला हवे एकदा ;)
नाहीतर इथे आमचे नशिब, आज रस्सम्+भात आणि भात + रस्सम तर परवा भातात रस्सम कालवुन.:(
असो.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 7:21 pm | विनायक प्रभू

कसला कावा न काय. शरणागत आहे.
आता सद्यपरिस्थिती अशी आहे.
आलो मी तुला शरण
माझे डोके तुझे चरण
फ्रुट सॅलड नसेल तर चालेल
देशील ना भात आणि वरण

रेवती's picture

26 Feb 2009 - 7:27 pm | रेवती

आपल्या लेखाला प्रतिक्रिया देणं आजकाल अवघड होऊ लागलय.
कोणत्या वाक्याचा अर्थ काय असेल व आपण भलतीच प्रतिक्रिया देऊन बसलो तर..... असे वाटते.
वरिल लेखाचा अर्थ समजला पण पाककृतीचा आधार लेख लिहिण्यासाठी घेतल्यामुळे हा प्रतिसाद पाककृती साठी देत आहे.
अतिषय वेगळी पाकृ आहे. काकूंना विचारून संपूर्ण पाकृ द्यावी ही विनंती.
तसेच मागच्या एका लेखात द्रोणातल्या इडल्यांबद्दल लिहिले होते, त्याचीही पाकृ द्यावी.
बघा सर, लेखातून मेसेज मिळायच्या ऐवजी पदार्थच लक्षात ठेवले जातात......शेवटी जेवणातही बदल हवे असतातच.
आम्हाला पुढच्या स्वयंपाकाची काळजी. (अरे देवा!)

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2009 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या लेखाला प्रतिक्रिया देणं आजकाल अवघड होऊ लागलय.
कोणत्या वाक्याचा अर्थ काय असेल व आपण भलतीच प्रतिक्रिया देऊन बसलो तर..... असे वाटते.

असेच वाटते आम्हालाही !

रुटीन लाइफमधे सुक्ष्म बदल केले की त्यात सुद्धा मजा येते हा संदेश...मात्र गुरुजी द्यायला विसरले नाही.

-दिलीप बिरुटे
(प्रभुसरांच्या लेखनाचा वाचक...)

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 9:58 pm | विनायक प्रभू

प्राध्यापक साहेब तुम्ही सुद्धा असे म्हटले तर कसे चालेल.

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 7:28 pm | विनायक प्रभू

अहो तै, तसे काहीही नाही हो.
निदान ह्या लेख कम पाकृ मधे.

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 7:31 pm | शंकरराव

तैं शी सहमत आहे

श्पेलींग मिष्टेकची चूक असेल तर दुरुस्त करावी म्हणतो.

निदान ह्या लेख काम पाकृ मधे.
विप्र तुम्हाला असे म्हणायचे आहे का?

लिखाळ's picture

26 Feb 2009 - 7:47 pm | लिखाळ

छान लेख ... पाकृसुद्धा छान..
यावरुन अशोक सराफ यांनी काम केलेला 'एक उनाड दिवस' हा चित्रपट आठवला. एक दिवस वेगळा जगला तर आयुष्यामध्ये आनंद येतो या कल्पनेवर आधारित आहे.
-- लिखाळ.

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Feb 2009 - 8:13 pm | ब्रिटिश टिंग्या

एकदा खरोखर एखादा दिवस वेगळा जगुन पहा!

चतुरंग's picture

26 Feb 2009 - 8:41 pm | चतुरंग

रुटीनला बदलण्यासाठी लक्षात ठेवून प्रयत्न करावे लागतात आणि तुमचे असले छोटेखानी लेख आम्हाला आठवण करुन देतात, त्याबद्दल धन्यवाद!!
जाता जाता चिमटा काढलातच! ;)
तुमच्या चिरंजीवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (खर्‍या खर्‍या बरंका, तो टार्‍या किंवा त्या दुर्बीटणे बाई देतात तसल्या नव्हेत! ;) )

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2009 - 8:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हं बोलून घ्या रंगराव, बोलून घ्या मला गरीब बिचारीला! ;-)

पाकॄ बसल्या जागी खायला मिळाल्या तरच आवडल्या असं म्हणेन!
रूटीनचा अजिबात कंटाळा येत नाही... अर्थात सध्याचं रूटीन आणि हापिसातलं काम अंमळ आवडतं आहे म्हणून! त्यामुळे नो कमेंट्स!!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

ब्रिटिश's picture

26 Feb 2009 - 8:53 pm | ब्रिटिश

रयवार सकाली नास्ट्याला बोलवा न आमच रुटीन चेंज करा

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 9:46 pm | विनायक प्रभू

आता काय छापील आमंत्रण पाठवु काय रे बाला? तुम्ही सगळे हक्काने आलात तर बरेच वाटेल मला.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 10:11 pm | प्रकाश घाटपांडे

विप्र यखांद बदलारिष्ट किंवा बदलासव काढा. लई खपनं. अरिष्टे किंवा आसवे जमत नसतीन त मंग "आसने" शिकवण्याचा क्लास काढा १२ व्या माळ्याव फुल्ल गर्दी व्हईन.
ता.क योगासने म्हंतोय मी.;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पण जाता जाता .. तिरकस वार .... :)
रूटीनमध्ये तुमच्या अशा लेखनाच्या वाचनामुळे सूक्ष्म बदल नक्कीच होतो. :)
त्याबद्दल आपले आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2009 - 2:12 am | पिवळा डांबिस

मी चेहेरा निर्विकार ठेउन बन्स खाल्ले. चव आवडली. नेहेमी पेक्षा वेगळी.
आवडली ना चव? मग जरा तो निर्विकार चेहरा मोडून जरा हसून तुमच्या बायकोला सांगितलं का तसं?
त्या बिचार्‍या माऊलीला बरं नसतं का वाटलं?

च्यायला,
गावाला करी समुपदेशन,
आपण मात्र कुर्ला स्टेशन ||
:)
(ह. घ्या!)

संदीप चित्रे's picture

27 Feb 2009 - 2:33 am | संदीप चित्रे

चित्रासकट द्यायला सांगाल का काकूंना?
इथे चिकू मिळाले नाहीत पण भारतात आल्यावर तरी रेसिपी वापरता येईल.