आमच्या कणकवलेक राणे नांवाचे डॉक्टर आसत.सगळे राणे आता रावराणे नाव लावतत.ह्यो रावराणे दाक्तर ,त्याका लहानपनापासून बगीतलेलो.त्याचो बापूस कणकवलेच्या सोमवारच्या बाजारात नारळ विकत होतो.ह्यो पोरगो चांगलो शिकलो.मुंबईक इलो. एमबीबीएस झालो. गांवात इलो.एक दवाखानो थाटल्यान.दोन वर्षात तीन मजली दवाखानो घातल्यान.
झाला काय? मी आता सत्तर वर्षाचो..मे महिन्यातसगळ्या कुटुंबाक घेवन कणकवल्येक गेलय.आंबे खाल्लय.गरे खाल्लय,काजूगर,काजू खाल्लय.पोटात चावरी वाटाक लागली.सगळी म्हणाली.तुमी रावराणे डॉक्टराकडे जावा.मी गेलंय. डॉक्टरान पाच दिवसांचा औषध दिल्यानी.सगळा औषध घेतलंय पण चावरी कमी नाय.तीन इंजीक्शना झाली. तरी फरक नय. मी पण औषध घेत होतंय ,आंबे गरे खात होतंय.त्यासाठीच तर मे महिन्यात कोकणात जातंव.मग खावक नको काय आंबे गरे.?
डॉक्टर म्हणाक लागले ब्लड टेस्ट करू या.साडेतीनशें रुपये घेतल्यान.ब्लडटेस्ट नॉर्मल इली.मग म्हणाक लागले ,तुमची युरीन टेस्ट करू या.मी म्हटलंय, युरीन टेस्ट...त्याका खर्च किती येतलो?
तर नर्स म्हणाली ऐंशी रुपये लागतले.
युरीन माझी.त्याची टेस्ट करूक ऐंशी? मनात म्हटलं, डॉक्टरानो,मी काय मूर्ख नाय आसय. खूप वर्षा मुंबैक काढून चांगलो हुषार झालंय.
एकदा तर डाक्टरांक विचारलय, "मी परत मुंबैक जाव काय? थयसर के.इ.एम.हॉस्पीटलमध्ये आमच्या ओळखीचो एक माणूस लॅबमधी शिपाई म्हणून कामाक असा.मी जायनं थयसर".
तर म्हणूक लागले,"तू हयसर थांब. मुंबैक के.इ.एम.मध्यें भरती झालेलो पेशंट आजपर्यंत कधी बरो होउन परत इलो हा काय ? तुमी युरीन टेस्ट करून घ्या."
दुसर्या दिवसाक मी फाटफटी उठलंय.घरात सगळ्यांक उठवलंय.मोठी बाटली भरून लघवी गोळा केलंय.आठ वाजता दवाखान्यात गेलंय.नर्स म्हणाली आता तुमी संध्याकाळी ६ वाजता या.रिपोर्ट मिळतलो.युरीन टेस्टचो रिपोर्ट मिळूसाठी सकाळी आठ पासून संश्याकाळी ६ पर्यंतचो वेळ.
"बाबा रे बाबा!" नर्स म्हणाली "तुमी काय एकटे पेशंट नाय.आणि खूप पेशंट आसत." संध्याकाळी या.
संध्याकाळी सात वाजता दवाखान्यात गेलंय. डॉक्टर रावराणे आरामात पेपर वाचत बसलेले.
"डॉक्टर सकाळी वाचायचो पेपर आत्ता तिन्हीसांजा वाचताहत.?"
ते म्हणाले "कणकवल्येक पेपर येयपर्यंत दोन वाजतत म्हणून आम्ही संध्याकाळीच वाचतंव."
"तां जाऊ देत .माझ्या युरीन टेस्टचो रिपोर्ट काय?"
डॉक्टर-"अगदी नॉर्मल.काय जावक नाय.तुम्ही आता औषध बंद करा.रोज फिरा,चाला.बरा वाटतंला.
थोडे आंबे गरे कमी खावा."
माझी टेस्ट नॉर्मल तर बाकीच्यांचा काय. टेस्ट नॉर्मल.
"डॉक्टर मी घरी माघारणीक फोन करू काय ?"
डॉक्टरांच्या टेबलवर फोन बघीतलंय,नी एकदम हिची आठवण झाली.मी फोन फिरवलंय.फोन माघारणीन घेतल्यान.
"हॅलो टेस्टचो रिपोर्ट मिळालो."?
"होय गो बाय.रिपोर्ट मिळालो.नॉर्मल असा."
तुमची युरीन टेस्टचो रिपोर्ट नॉर्मल ,पण आमचा काय? डॉक्टर काय म्हणाले"
"सगळे रिपोर्ट नॉर्मल बायो ,माका काय एक जावक नाय.तुका नाय ,बाबल्या ,बंती ,पिंकी, रेखा म्हाधा एव्हढाच नायतर मोत्याक देकू काय एक जावक नाय."
--------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
26 Feb 2009 - 5:41 pm | घाशीराम कोतवाल १.२
मी फाटफटी उठलंय.घरात सगळ्यांक उठवलंय.मोठी बाटली भरून लघवी गोळा केलंय.
=)) =)) =)) =))
तुमची युरीन टेस्टचो रिपोर्ट नॉर्मल ,पण आमचा काय? डॉक्टर काय म्हणाले"
"सगळे रिपोर्ट नॉर्मल बायो ,माका काय एक जावक नाय.तुका नाय ,बाबल्या ,बंती ,पिंकी, रेखा म्हाधा एव्हढाच नायतर मोत्याक देकू काय एक जावक नाय."
=)) =)) =)) =))
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
26 Feb 2009 - 6:19 pm | विसुनाना
जबरदस्त गजाली असा हां.
हसून हसून पोटात चावरी झाली, काय समजलेत?
अवांतर :
माका वाटत - चार म्हैन्याचे गरवार आसत असा रिपोर्ट येतो की काय?
26 Feb 2009 - 7:24 pm | विनायक प्रभू
मस्त
आणखी एक ब्रँड तयार होत आहे.
26 Feb 2009 - 8:13 pm | लिखाळ
गजाली मस्त आहे... :) एकदम मजेदार.. मालवणी वाचायला मजा आली..
पुढील लेखनास शुभेच्छा !
-- लिखाळ.
26 Feb 2009 - 9:04 pm | प्रमोद देव
:)
27 Feb 2009 - 11:34 am | चाणक्य
:))
27 Feb 2009 - 12:37 pm | यशोधरा
=)) धन्य!
27 Feb 2009 - 1:54 pm | प्रदीप
आवडले.
27 Feb 2009 - 4:05 pm | वि_जय
प्रतिभाबाय...
लेख खरोखरच चांगलो लिवलस..
शिरा इली ती एकदा दाक्तराकडे जावचा लागला काय अशीच पनवती लागता नाय?
ह्यो रावराणो डाक्तर खयचो.. कणकवलेच्या बाजारपेठेतलो काय ..वरचो कोर्टाच्या.. नाक्यावयलो?मुरेडाँगरेच्या रस्त्याजवळ्चो?
मायझये... सगळे मेले सारखेच..पिडतत रांडेचे.. खरा कि नाय?
आवशीक खाव होरान एक पानयासारख्या दिसनारा विंजीक्शन देतीत नी शंभराची नोट मागतीत..
जपान रव्ह गे बाय...
असो.. घो काय म्हणता तुझो? एक चेडू काय झिल हा ना गे तुका?
27 Feb 2009 - 7:18 pm | बिपिन कार्यकर्ते
गजाल मस्तच....
मालवणी वाचूक मजा येतंय!!!
बिपिन कार्यकर्ते
27 Feb 2009 - 7:44 pm | रेवती
मजेशीर आहे गोष्टं.
फार हसले मी.
रेवती
28 Feb 2009 - 7:10 am | चित्रा
असेच म्हणते. मजेशीर आहे गोष्ट.
27 Feb 2009 - 8:15 pm | मदनबाण
प्रतिभा ताई मस्त लिहले आहे तुम्ही..माका गजाली आवडली... :)
मालवणी खरचं गोड भाषा आहे...अजुन संपुर्ण कळत नाही पण जाम मजा येते वाचायला...:)
(मच्छिंद्र कांबळी यांच्या चाहता)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
27 Feb 2009 - 8:53 pm | प्राजु
जबरदस्त..
व्वा! प्रतिभाताई... मस्त गजाली लिहिली आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Feb 2009 - 3:43 am | पिवळा डांबिस
चड गजाल आसा!!!
खूप आवाडली!!
आता मिपावर कोकणी संघ स्थापन करूक काय येक हरकत नाय!!!!
यशो, सामंतांनु, धन्या, नंद्या, तुमचो काय विचार?
:)
28 Feb 2009 - 7:33 am | श्रीकृष्ण सामंत
डांबीसानु,
ह्या काय विचारणां झाला? कोकणी संघ स्थापूक माझी कायच हरकत नाय.आता जग इतक्या पुढे चल्ला हा.माझ्या माहितीतला सांगतंय.गोव्याक वर्तमान पत्रां छापतत.लिपी इंग्रजीतून असतां,पण वाचला जातां गोव्याच्या कोकणीत.
तशी मधून मधून माका मालवणीतून लिहूक खूमकी येतां. माका मालवणीतून लिऊक खूप
आवडात.
मिपाच्या वाचकांक पण आणखी एका भाषेचो परिचय झालो तर काय वाईट नाय.
भूताखेताच्यो,देवदेवचाराच्यो,धयकाल्याच्यो,शेळोप्याच्या गजालिच्यो,काय कमी कैन्यो आसत?
चार दिवसापूर्वी मी मिपावर "भावडो" मालवणीतून लिलंय.दिडशेच्यावर वाचना झाली.कदाचीत गजाल आवडली नसात."पुर्षाची आणि कुत्र्याची जात एक आसां" असां लोक म्हणतत ह्या तेतेबायचा म्हणणां" वाचकांक आवडला नसात.कुणी कसलोच प्रतिसाद दिलो नाय म्हणून म्हणतंय.
पण डांबीसानु,तुमच्या आयडीयाची कल्पना झकास आसां.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
28 Feb 2009 - 5:37 am | समिधा
धमाल आहे..
=))