स्वाती, ऋषिकेश, तात्या, डॉन, धोंडोपंत, विनायक, चतुरंग..
आपण दिलेल्या धिराबद्दल मी आपली आभारी आहे.
मी जेव्हा विणीचा पहिला धागा सुरू केला तेव्हा मिपावर नुकतीच आणिबाणी जाहिर झाली होती. बरेच वाद्-विवाद गाजत होते. मिपावर नियमित येत असल्यामुळे मला आंतरजालावरिल हे घर वाटू लागले होते आणि अजूनही वाटते.
मी स्वतः कोणत्याही प्रकारच्या वादविवादात कधी पडले नाही पण इथले वातावरण हलके व्हावे या दृष्टीने मी तो धागा चालू केला होता. अपेक्षेपेक्षा खूपच जास्ती मिपाकरांनी त्याला प्रतिसाद दिले. खूप चारोळ्या लिहिल्या गेल्या. भाग दुसरा करावा लागला.नंतर तिसराही करावा लागला. मिपावरचे वातावरण प्रसन्नकरण्यात १००% नाही पण १०% तरी मी यशस्वी झाले होते. पुढे विनोदी चारोळ्यांचा धागा सुरू करावा असा विचार होता.. पण झाले भलतेच. मी करायला गेले काय आणि माझेच हसे झाले.
चरोळ्या लिहिणे बंद नक्की नाही केले. पुन्हा लिहिन नक्कि लिहिन.. पण थोडे दिवस थांबावं..
कारण 'त्या' सभासदाचा 'तो' प्रतिसाद माझ्या हळव्या मनाला दुखवण्यासाठी पुरेसा होता.
मी तुमची सगळ्यांची ऋणी आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल. असाच मिपाच्या सदस्यांचा स्नेह परस्परांशी वाढत राहो हीच त्या जगन्नियंत्याला प्रार्थना..
आपली कायमची ऋणी,
प्राजु.
प्रतिक्रिया
21 Jan 2008 - 10:17 am | विसोबा खेचर
मिपावर नियमित येत असल्यामुळे मला आंतरजालावरिल हे घर वाटू लागले होते आणि अजूनही वाटते.
क्या बात है! प्राजू, मिपा तुम्हा सगळ्यांचंच आहे...!
चरोळ्या लिहिणे बंद नक्की नाही केले. पुन्हा लिहिन नक्कि लिहिन.. पण थोडे दिवस थांबावं..
जरूर! प्लीज टेक युअर ओन टाईम...
मी तुमची सगळ्यांची ऋणी आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल. असाच मिपाच्या सदस्यांचा स्नेह परस्परांशी वाढत राहो हीच त्या जगन्नियंत्याला प्रार्थना..
प्राजू, मिपावर आणि मिपाकरांवर तू जो विश्वास दाखवला आहेस त्याबद्दल औपचारिक आभार मानून मी परकेपणा करणार नाही!
च्यामारी, आत्ताच्या आत्ता मिपा तुझ्या नावावर करू का बोल प्राजू? आपण पडलो साला फकीर माणूस. आपली काय ग्यॅरेंटी नाय.
तात्या.
21 Jan 2008 - 12:47 pm | स्वाती राजेश
इथे सकळचे ७.२० वाजले आहेत. तुझी सकाळी सकाळी ही बातमी वाचली. छान वाटले.
तुझ्या बहारदार कवितेच्या प्रतिक्षेत असलेली तुझी..
मैत्रिण,
स्वाती
21 Jan 2008 - 7:03 pm | लबाड मुलगा
प्राजु
टेन्शन नही लेने का
बिंधास रहने का
दुनिया को कोलने का
एक हात से
क्या...पक्या