मला इश्वर दिसतो आहे !

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
24 Feb 2009 - 10:38 pm

मला इश्वर दिसतो आहे ,
पंख पसरलेल्या पक्षासारखा मुक्त..
तळ्यातल्या सुंदर कमळाप्रमाणे अलिप्त...
आम्रवनात कुंजन करणा-या कोकीळे प्रमाणे आनंदी
अन अथांग आकाशा प्रमाणे......... अनादी......

मला कळून चुकल आहे कि,
जीवन हाच एकमेव इश्वर आहे..
म्हणुनच,.... मी वृ क्षांची पूजा करतो.
अन पूजा करतो , पर्वतांचीही.....
मी पूजा करतो नद्यांची....
अन पूजा करतो , गगनातील ता-यांचीही......
मी इश्वराच्या चरणावर वाहिल्या जाणा-या,
फुलांचीही पूजा करतो....

जे जे चैतन्यशील आहे , त्या सा-यांची
मी पूजा करतो.......कारण..
जिथे जिथे जीवन आहे
तिथे तिथे इश्वरत्व आहे
अशी माझी स्रद्धा आहे

अन तरीही लोकं मला नास्तिक म्हणतात.........!!!

कविताप्रकटन