साने गुरुजी खुप भाउक माणुस. गरिबांचं दु:ख बघवलं नाही म्हणुन त्यानी आत्महत्या केली. मी कधीही त्यांचं आता उठवु सारे रान एैकलं की मला त्यांची आठवण येते. खास मिपासाठी ते गाणं इथं देत आहे.
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण
गीत - साने गुरुजी
स्वर - आकाशवाणी गायकवृंद
प्रतिक्रिया
24 Feb 2009 - 5:42 pm | प्रकाश घाटपांडे
साने गुरुजींचे साधना आता आंतरजालावर आहे. इथे पहा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Feb 2009 - 8:11 pm | विंजिनेर
एका चांगल्या संकेतस्थळाची माहिती दिल्यावद्दल आपले आभार.
24 Feb 2009 - 9:56 pm | दवबिन्दु
आम्हाल शाळेत होतं. दाणादाण बोलताना मजा यायाची.