खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे.
मामाजी: अरे कोण आहे रे तिकडे. जरा त्या ऑस्कर कमीटीच्या अध्य्क्षाना जरा फोन लाव.
असिस्टंटः का हो सर?
मामाजी: तुला रे कशाला चौकशा. धु म्हटले का धुवायचे. आणि मी कितीही गुप्त ठेवले तरी ते तुला कळणारच आहे.
असिस्टंटः (हसत) करतो सर.
असिस्टंट फोन लावतो.
मामा़जी: मी मामाजी बोलतोय. काय पोझिशन आहे ऑस्कर ची. त्या डॉग ला काही मिळणार आहे की नाही.
अध्यक्षः दोन मिळायची चान्सेस आहेत.
मामाजी: दोन ने काय होते आहे. चांगली आठ मिळायला हवी. 'बापाची' आज्ञा आहे. त्यात दोन तरी भारतीय असायला हवेत.
अध्यक्षः आता ते माझ्या हातात नाही.
मामाजी: मला शहाणपणा शिकवु नका. काय फिरवायाची ती चक्रे फिरवा पण आठ म्हणजे आठ. नंतर मला भेटा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला धन्यवाद देईन. आणि नाही मिळाली तर हातात धरायला काहीच शिल्लक रहाणार नाही हे लक्षात ठेवा.
अध्यक्षः बरे साहेब. पण हे असे का हे जरा समजले तर बरे पडेल.
मामाजी: रात्री घरी या. येताना जरा उंची शँपेन पण आणा.
अध्यक्ष रात्री मामाजीच्या घरी पोचतात.
मामाजी: अरे फोकलीच्या, एवढे कसे कळत नाही. हे तुमच्या धंद्याला पण बरे दिवस आणेल. भारताची लोकसंख्या ११० कोटी. त्यांना
ऑस्कर मीळाले की तुमचे पिक्चर गावागावात चालतील की. पैसा च पैसा. मंदीतना बाहेर पडायचा आणखी एक मार्ग. थर्ड वर्ल्ड चे मार्केट कॅप्च्युअर करणे ही प्रायॉरीटी आहे. मागे नाही का 'विश्वसुंदरी' किताब देउन सौंदर्य प्रसाधन कंपन्यानी मोप पैसा कमवला. केवढ्या वाढल्या कंपन्या.
किती नोकर्या वाढल्या. आता भारतातल्या गावागावात आपले ब्रॅड पोचले. आणि डॉग नावाने जरा निगेटीव पब्लिसिटी आलेली आहे.
ती जरा समारंभात मॅनेज करा. भाषणे आधीच लिहुन द्या. भारतातील लोकांच्या बरे वाटेल अशी लिहुन द्या. आणि हो त्या पिक्चर मधील झोपडपट्ट्यतील मुलांसाठी जरा व्यवस्था बरोबर ठेवा. त्यांच्या शिक्षणासाठी 'फाउंडेशन्'करा. त्याची जरा प्रसिद्धी करा.
भारतीय अंमळ वेड्झवे असतात. त्याना अशा गोष्टीवर लगेच विश्वास बसतो. काय कमी पडल तर मला सांगा. लगेच ट्रांसफर करतो.
गुप्त रिपोर्ट प्रमाणे आजही भारताची 'बाइंग पॉवर' आपल्या पेक्षा कितीतरी चांगली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी अनेक मार्ग अवलंबवावे लागतील त्या पैकी हा एक.
अध्यक्षः आणखी कुठले मार्ग?
मामाजी: ते तुला काय करायचे आहे?
अध्यक्षः एक तरी सांगा. आणखी एक 'शँपेन ची केस' पाठवतो.
मामाजी: अरे बोकडा, तुला न्युक्लिअर डील माहीत नाही का? तीथे जेंव्हा एका छोट्या पार्टीने डिल मधे 'पो' घातला तेंव्हा ते प्रकरण कसे 'मुलायम' पणे सोडवले. पैसा ओतावा लागला. पण काम झाले.
अध्यक्षः पण तेंव्हा 'बाप' वेगळे होते.
मामा़जी: तु येडा का खूळा. अरे बापाचा रंग कसाही असु दे. तो फक्त अमेरिकेचाच विचार करतो. ३० वर्षाने भारत संपुर्ण आपला असायला पाहीजे असा प्लान आहे. मग कुठलाही बाप असु दे.'ऍक्शन प्लान' मधे बदल नाही.
अध्यक्षः २६/११ नंतर आपल्याकडे 'ऑर्डरी' वाढल्या की काय.?
मामाजी: गप्प बस. कुठे ट्रांसमिटर बसवला असेल त्याचा नेम नाही. हा विषय तुझा नाही.
अध्यक्षः म्हणजे ते मुंबईत झालेले कांड म्हणजे........
मामाजी: आता तुझे थोबाड बंद कर आणि सुट इथुन. काम खात्री लायकरित्या झाले पाहीजे बर का. काय म्हणतो तुझा 'जिवलग्' मित्र. चांगलाच दोस्ताना आहे हां तुमचा. पेंथ हाउस ची पार्टी चांगलीच झाली म्हणे.
अध्यक्षः मी तुमच्या पाया पडतो. तुमचे काम होइल. पार्टीची वाच्यता होणार नाही एवढे वचन द्या.
मामाजी: मग ठरले तर.'डॉग' ला आठ ऑस्कर. आणि भारतातील सर्व चॅनेलना दृष्य प्रसारित करायच्या हक्काचे पैसे घेउ नका. आपल्या मुलाखत घेणार्या पाठवुन द्या दोन चार 'फुकण्या' भारतात. एक महिनाभर तरी भारुड चालले पाहीजे.
त्या 'प्रोड्युसर गिल्ड' चा अध्यक्ष ला निरोप द्या. दहा बारा 'जगाची प्रेषित अमेरिका 'ह्या विषयावर पिक्चर काढायला सांगा. बरे असते भारतातील अमेरिकेच्या इमेज साठी.
प्रतिक्रिया
24 Feb 2009 - 1:07 pm | मराठी_माणूस
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे.
वाचल्या नंतर तसे वाटले नाही :)
24 Feb 2009 - 1:10 pm | अवलिया
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे.
वस्तुस्थितीला काल्पनिक समजण्याचे काय कारण... ?
३० वर्षाने भारत संपुर्ण आपला असायला पाहीजे असा प्लान आहे
किती आयले किती गयले....
जगाची प्रेषित अमेरिका
हुं......
असो. काही काळजी करु नका... साम्राज्याचा अंत जवळ आला आहे.
(सभ्यतेच्या सर्व मर्यादा पालन करुन प्रतिसाद दिला आहे याची नोंद घ्यावी. अन्यथा.... )
--अवलिया
24 Feb 2009 - 1:58 pm | विनायक प्रभू
किती आयले किती गयले
मला पण विश्वास ठेवायला आवडेल पण.......
24 Feb 2009 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार
यकदम धुमशान हो गुर्जी. लेख एकदम चरचरीत !
>>मामा़जी: तु येडा का खूळा. अरे बापाचा रंग कसाही असु दे. तो फक्त अमेरिकेचाच विचार करतो.
सत्यवचन !!
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
24 Feb 2009 - 1:12 pm | प्रकाश घाटपांडे
आजचा दिस काय खरा नाय. पेशल विप्र क्रिप्टिक. आजच सकाळ मध्ये डॉ नीता बडवेंचा हा लेख वाचला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Feb 2009 - 1:14 pm | दशानन
=))
सत्य वचन सत्य वचन !!!
हरि ओम ... सत सत ! हरि ओम !
em>Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
24 Feb 2009 - 1:14 pm | विसुनाना
कालच एका सुहृदाबरोबर अशीच चर्चा झाली.
लेख आवडला.
24 Feb 2009 - 1:44 pm | सहज
मामाजी की जय हो!
:-)
24 Feb 2009 - 2:21 pm | ब्रिटिश
गूप्ती - ५०० रु.
तलवार - १००० रु.
कट्टा(तमंचा) - २००० रु.
पोकल बांबु - १० रु.
आमाला कडकी लागली क आमी दोन गटामदी लावालाव्या करतो न दोगावजनांना हत्यारं ईकतो
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
24 Feb 2009 - 4:42 pm | विनायक प्रभू
अमेरिकन अध्यक्ष पदासाठी अगदी योग्य उमेदवार आहेस रे तु बाल्या
24 Feb 2009 - 2:53 pm | जागु
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे.
आहो समजण्याचा प्रयत्न केला तरी ही बुद्धी समजु देत नाही. हे खरच वाटत आहे. :-C
24 Feb 2009 - 4:50 pm | छोटा डॉन
>>आहो समजण्याचा प्रयत्न केला तरी ही बुद्धी समजु देत नाही. हे खरच वाटत आहे.
+१, असेच म्हणतो...
गुणी व यशस्वी कलाकारांचे कौतुक वगैरे मान्य आहे व त्यात काही काड्या घालायच्या नाहीत पण आम्हाला मनापासुन ही एक मस्त "मार्केटिंग स्ट्रॅटेजी" आहे असे वाटते.
लक्षणेसुद्धा तीच आहेत ...
असो.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
24 Feb 2009 - 3:25 pm | सुमीत
काल्पनिक नाहीच आहे, खरे वाटत अहे पण लिहिले सहीच आहे :)
तसेच http://beta.esakal.com/2009/02/23234820/q-and-a-slumdog-millionaire.html इथे वाचल्या वर चित्रपटाने मूळ कथानकाशी फारकत घेऊन ज्या प्रकारे चित्रण केले आहे त्या वरून हे सर्व खरेच आहे ह्यात शंका नाही.
24 Feb 2009 - 3:35 pm | विसोबा खेचर
भारताची लोकसंख्या ११० कोटी. त्यांना ऑस्कर मीळाले की तुमचे पिक्चर गावागावात चालतील की. पैसा च पैसा. मंदीतना बाहेर पडायचा आणखी एक मार्ग. थर्ड वर्ल्ड चे मार्केट कॅप्च्युअर करणे ही प्रायॉरीटी आहे. मागे नाही का 'विश्वसुंदरी' किताब देउन सौंदर्य प्रसाधन कंपन्यानी मोप पैसा कमवला. केवढ्या वाढल्या कंपन्या.
मास्तर, झकास ठोकले आहे..!
आणि हो त्या पिक्चर मधील झोपडपट्ट्यतील मुलांसाठी जरा व्यवस्था बरोबर ठेवा. त्यांच्या शिक्षणासाठी 'फाउंडेशन्'करा. त्याची जरा प्रसिद्धी करा. भारतीय अंमळ वेड्झवे असतात. त्याना अशा गोष्टीवर लगेच विश्वास बसतो.
अगदी खरं! साले ऑस्करचे ८ तुकडे फेकले आणि आम्ही लगेच पाघळलो भेंचोत! छ्या..!
साला, बोललो की तात्या बोलतो म्हणतात!
मास्तर, पुन्हा एकवार अभिनंदन...
तात्या.
24 Feb 2009 - 8:03 pm | विनायक प्रभू
इस्पीक ला इस्पीक स्पीकायचे नसते हो तात्या.
24 Feb 2009 - 4:02 pm | राघव
एकदम आवड्या :)
लय भारी!!
मुमुक्षु
24 Feb 2009 - 5:02 pm | लिखाळ
मस्त :)
-- लिखाळ.
24 Feb 2009 - 11:37 pm | मयुरा गुप्ते
जबरा....अगदी मनातल बोल्लात. बक्षिसांचा बदाबदा पाऊस पाडला कि आपल्या तुंबड्या भरता येतात. मग मिस वडा चा महापुर येतो दरवर्षिं. नाहीतर भारतिय उपखंडात क्रीकेट वर्ड कप येतो. नाहीतर 'स्लमडोग' ना 'डमडोग' बनवुन स्वताच्या देशाची दिवाळ्खोरी कमी करता येते. स्लमडोग तसेच आणि तेथेच राहातात.
खुप छान लेख्....मस्त.
24 Feb 2009 - 11:40 pm | चतुरंग
डायरेक्ट धोतराच्या सोग्यालाच हात घातलाय अधेमधे कुठे थांबलेच नाहीत!! :T
आम्हाला मच्छिंद्र कांबळींच्या वस्त्रहरणची आठवण झाली!! ;)
चतुरंग
25 Feb 2009 - 12:31 am | पिवळा डांबिस
अरे बापाचा रंग कसाही असु दे. तो फक्त अमेरिकेचाच विचार करतो.
अगदी खरंच आहे.....
हिकडं त्याला बाप म्हणून दाखवायचं आणि तिकडं उर्वरित जगाचं श्राद्ध घालायचं!!!!
:)
25 Feb 2009 - 9:40 am | सखाराम_गटणे™
लोकसत्ता,
काहींना बरा वाटला तर काहींना अजिबात आवडला नाही. काहींनी त्यातील गरिबीच्या, दारिद्रय़ाच्या प्रदर्शनाबद्दल नापसंती व्यक्त केली आणि तो ‘अमेरिकन कट’ असल्याचा हास्यास्पद दावा केला.
http://loksatta.com/daily/20090225/edt.htm
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.