माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
24 Feb 2009 - 11:09 am

गडबड वेड्या वस्तीमध्ये
शाळा पाखरांची
पोपट मैना आणि कबुतर
लगबग चिमण्यांची

डेरदार त्या वृक्षावरती
घर आणिक शाळा
सकाळ सायंकाळी भरतो
प्क्ष्यांचा मेळा

कावळा मास्तर शाळेमध्ये
पोर चिमणा-चिमणी
कावळा शिकवी धडे-कविता
मुले गाती गाणी

किलबिल किलबिल किती तयांची
आसमंत दाट्तो
मैना गाइ सुरेल गाणे
पोपट तो नाचतो

अवतीभवती मनुष्यप्राणी
लोभी हलकट
मारामारी आणि भांडणे
नुसता हवरट

स्वार्थापायी या अधमाने
कुर्हाड हो आणलि
घर आणिक शाळा त्यांची
झरझर हो तोडली

घिरट्या घालीत होते पक्षी
घर हरवले कोठे
आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या
आसमंत दाटे

किलबिल किलबिल हरवून गेली
सुने सुने झाले
माझी पाखरे माझे पक्षी
दूर उडून गेले

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

24 Feb 2009 - 11:49 am | अनिल हटेला

किलबिल किलबिल हरवून गेली
सुने सुने झाले
माझी पाखरे माझे पक्षी
दूर उडून गेले

काय ओळी आहेत ....मनाला भिडल्या !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

संदीप चित्रे's picture

24 Feb 2009 - 9:28 pm | संदीप चित्रे

>> स्वार्थापायी या अधमाने
कुर्हाड हो आणलि
घर आणिक शाळा त्यांची
झरझर हो तोडली

>> किलबिल किलबिल हरवून गेली
सुने सुने झाले
माझी पाखरे माझे पक्षी
दूर उडून गेले

या ओळी खूप आवडल्या.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

चतुरंग's picture

24 Feb 2009 - 10:25 pm | चतुरंग

छान कविता. अजून लिहा.

चतुरंग

प्राजु's picture

24 Feb 2009 - 10:54 pm | प्राजु

खूपच सुंदर..
अजूनही येऊद्यात अशा कविता. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

24 Feb 2009 - 11:12 pm | चन्द्रशेखर गोखले

अ..प्र..ति..म..
गुणगुणायला लावणारी कविता..

आकाशी नीळा's picture

27 Feb 2009 - 10:28 am | आकाशी नीळा

अप्रतीम कविता.