सरते पुढे, अडते, फिरते
तुज पाहता, पाऊल हे
ओसंडते डोळ्यातूनी
हिंदकळते ह्रदयात जे
मी लाख थांबवी तरी
वळते नजर, झुकते नजर
अन लाज बोलते मला
भिडवू नको, नजरेस गे....
किती करावी याचना
वेड्या मना तुझी रे मी
वागू नको, असा.. तसा.. ,
आवर मना, आवर हे....
चाहुल ती येता जरा
अडखळते मीच चालता
वर भास हे झुलवी मला
सावरशील, सावर रे....
अता छतावरी किती
मी कोरली स्वप्ने नवी
अजाणता झाले तुझी
तुज आळवी, सत्यात ये....